आज सोमवार ५ फेब्रुवारी रोजी, चंद्र मंगळाच्या वृश्चिक राशीतुन संक्रमण करणार असून, बुधाच्या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. कसा जाईल आजचा दिवस? वाचा राशीभविष्य!
आज नवीन कामाची आखणी कराल. प्रभाव वाढेल. बोलण्यामुळे गैरसमज होत नाहीत ना याचा विचार करून संवाद साधावा. कलाकरांना संधी मिळेल. यशासाठी जिद्दीने कामाला लागाल. बरीच कामे मार्गी लागतील. पूर्वीपेक्षा पैशाची आवक चांगली राहील. आत्मविश्वास वाढल्याने अवघड समस्याही सहज सोडवाल. आजचे निर्णय महत्वपूर्ण ठरतील. चैनीच्या वस्तूसाठी खर्च करावा लागेल. समाजात केलेल्या कार्याची स्तुती होईल. महत्वपूर्ण व्यक्तींच्या गाठीभेटी होतील.
आज द्विधा मन:स्थितीमुळे तुमचा घोटाळा होऊ शकतो. कामाचे नियोजन करावे लागेल. अतिरिक्त राग आणि वादविवाद टाळा. नोकरीत वारिष्ठांकडून त्रास जाणवेल. विरोधकांपासून विशेष काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी. अतिरिक्त ताणतणाव वाढेल. वादविवाद टाळावेत. फसवणुक होईल. उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण अधिक राहील. शारिरिक व्याधी उद्भवतील. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. महिलांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक तोटा होईल.
आज दिवस लाभदायक आहे. हातात पैसा आल्यामुळे बरीच देणीही देऊन टाकाल. व्यवसायात कामासाठी काही गोष्टींकडे कानाडोळा करावा लागेल. यामुळे कामांना गती येईल. नोकरी धंद्यात काही ठोस बदल कराल. पदप्राप्ती होईल. कामाप्रती सजग राहा. आनंदाची व समाधानाची बातमी ऐकायला मिळेल. नव्या संधी मिळतील. घरात मंगल कार्य घडतील. विदयार्थ्यांची प्रगती होईल. सहकार्य लाभेल. अचानक आर्थिक लाभ घडेल. गुंतवणुक फायदेशीर ठरेल.
आज यशप्राप्ती लाभेल. आर्थिक कामे मनासारखी घडतील. प्रगती होईल. परिपूर्ण काम कराल. कलाक्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. आपपल्या क्षेत्रात योग्य गुरूवर्य मंडळी भेटतील. पती पत्नीत स्नेह निर्माण होईल. महिला वर्गाकडून विशेष सहकार्य लाभेल. दुरवरचे प्रवास हितकारक ठरतील. आपल्या आवडीच्या गोष्टीसाठी वेळ मिळेल. आनंद प्राप्त होईल. अपेक्षेप्रमाणे लाभ होईल.
आज अत्यंत शुभ दिवस असेल. नवीन प्रॉपर्टी संबंधी विचार चालले असतील तर प्रत्यक्षात उतरवायला हरकत नाही. नोकरी व्यवसायात इतर लोकांचे डावपेच ताबडतोब लक्षात येतील. पैशाची आवक चांगली राहील. प्रेम प्रकरणात आवडत्या व्यक्तीजवळ मनातले व्यक्त करण्यासाठी उत्तम दिवस आहे. शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना मोठे यश प्राप्त होईल. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढेल. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात आनंदी राहाल.
आज नातेवाईकांमध्ये आर्थिक व्यवहार करू नयेत. जोडीदाराबरोबर क्षुल्लक कारणावरून वाद संभवतात. आपल्या व वरिष्ठांच्या विचारात मतभेद निर्माण होऊ शकतात. नोकरीत केलेली चुकू महागात पडेल. कायदेशीर कारवाईचा त्रास होऊ शकतो. कर्जप्रकरणे नामंजूर होतील. कर्ज घेणे देणे टाळावे. आर्थिक फसवणूक होऊ शकते. प्रवास टाळावेत. वाहने सावकाश चालवा. आरोग्याची काळजी घ्या.
आज सहकार्य लाभेल. मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. इतरांना खूप सहकार्य कराल. नावलौकिक वाढेल. लेखकांच्या लिखाणास गती मिळेल. व्यवसायात उत्तम नियोजनामुळे एक प्रकारची शिस्त असेल. आवडी निवडी बदलत राहतील. प्रगती कराल. हाती कमी पैसा असल्याने योजना अपूर्ण राहू शकते. वास्तविकतेला महत्व देणे गरजेचे आहे. प्रगती होईल. लाभदायक घटना घडतील. महत्वाची कामे तुम्हाला अपेक्षित असणाऱ्या वेळेत पुर्ण होतील. कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
आज थोडे आस्थिर आणि चंचलं बनाल. स्वभावामुळे जवळच्या लोकांची मने दुखावली जाऊ शकतात. मुलांशी थोडे मतभेद संभवतात. गुप्तशत्रुपासुन पिडा उत्पन्न होऊ शकते. ताणतणाव वाढेल. हातून चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. नोकरीत बदलाचे निर्णय घेऊ नयेत. वरिष्ठांकडून कामाचा दबाव राहील. मनमुटाव होऊ शकतात. प्रत्येक व्यवहार काळजीपूर्वक करा. अन्यथा मोठी आर्थिक हानी होऊ शकते. नेहमीच्या कामात खुप मेहनत घ्यावी.
आज आंनदाची बातमी मिळेल. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. जवळच्या माणसांची परिस्थिती समजाऊन घ्यावी लागेल. जोडीदाराच्या मनाचा विचारही करावा लागेल. संततीसाठी काही कारणास्तव पैसा खर्च करावा लागेल. कार्यक्षेत्रात वृद्धी होईल. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. प्रगती होईल. प्रवासातून आज लाभ होणार आहे. फलदायी दिवस आहे. मन प्रसन्न असेल. आईच्या आरोग्याची काळजी मात्र घ्या.
आज मानसन्मान मिळेल. मागचा अनुभव पाठीशी घेऊन निर्णय घ्याल. स्वत:चे सामर्थ्य ओळखून वाटचाल कराल. चिकाटी जिद्द आणि स्थैर्य कामी येईल. नोकरीत कर्तुत्वाला चांगली संधी मिळेल. आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. उत्तम सहकार्य लाभेल. अचानक लाभ होतील. कौटुंबिक वातावरण चांगले व आनंददायी राहील. कुटुंबातुन विशेष सहकार्य लाभेल. भरभराटीचा दिवस आहे. विद्याभ्यासात प्रगती राहील. संशोधनपर कार्यात मानसन्मान मिळेल.
आज परदेशगमनाचे योग येतील. खर्चामुळे थोडी चिडचिड होईल. नोकरी व्यवसायात मनासारखे वातावरण लाभेल. वातावरण चांगले राहील अचानक लाभ होऊ शकतो. वारसा हक्काचे प्रकरण मार्गी लागेल. घरातील कौटुंबिक वातावरण चांगले राहील. संततीची उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल राहील. प्रगती होईल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक बाबतीत मदत मिळेल. मनातील संभ्रम दुर करून आत्मविश्वासाने सामोरे जा. यश निश्चित लाभेल.
आज आर्थिक दृष्टीकोनातून उत्तम दिवस राहील. उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यात यश येईल. प्रत्येक काम फत्ते करणार आहात. प्रेमळ आणि परोपकारी वृत्तीमुळे अनेक लोक जोडले जातील. सामाजिक क्षेत्रात काम कराल. आनंदी राहाल. नोकरीत बौद्धिक चातुर्याने आपण हाती घेतलेल्या कामात यश मिळवाल. उद्योग व्यापार तेजी राहील. अधिक प्रयत्न केल्यास जास्तीचे यश मिळू शकेल. कुटुंबात आनंददायी आणि सहकार्याचे वातावरण राहील.
जय अर्जुन घोडके
(jaynews21@gmail.com)
(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)
संबंधित बातम्या