Horoscope Today 4 March 2024 : कोणत्या राशींना ग्रहबल लाभणार! वाचा राशीभविष्य!-horoscope today 4 march 2024 daily rashi bhavishya in marathi ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 4 March 2024 : कोणत्या राशींना ग्रहबल लाभणार! वाचा राशीभविष्य!

Horoscope Today 4 March 2024 : कोणत्या राशींना ग्रहबल लाभणार! वाचा राशीभविष्य!

Mar 04, 2024 10:03 AM IST

Horoscope Today 4 march 2024 : आज ४ मार्च २०२४ सोमवार रोजी, लाभ होईल की नुकसान, दिवस शुभ असेल की अशुभ, किती संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे राशीभविष्य.

आजचे राशीभविष्य ४ मार्च २०२४
आजचे राशीभविष्य ४ मार्च २०२४

आज अष्टमीचा चंद्र गुरू आणि मंगळाच्या राशीतुन तर बुधाच्या नक्षत्रातुन भ्रमण करणार असून,कौलव करण आणि वज्र योगाच्या प्रभावात कोणत्या राशींना लाभणार ग्रहबल! वाचा राशीभविष्य!

मेषः 

आज हजरजबाबी स्वभावामुळे लोकांवर प्रभाव पाडाल. राजकारणी लोक आपला मुत्सद्दीपणा दाखवतील. भक्तिमार्गाकडे वळाल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. इतरांच्या सहयोगाने कामात यश येईल. आपले विचार योग्य ठेवा. नोकरी रोजगारात प्रसन्न वातावरण असल्यामुळे आपण केलेले प्रयत्न यशस्वी होतील. मित्र आणि शुभचिंतक याच्या माध्यमातून आपल्या समस्या दूर होण्यास मदत होईल. कौटुंबिक वातावरण आनंदमय राहील. 

वृषभः 

आज आर्थिक आवक चांगली राहील. सहलीला जाण्याचे बेत ठरतील. तुमच्या बोलण्याची छाप इतरांवर पडेल. समाजात आपली प्रतिष्ठा वाढल्याने आनंदी राहाल. अधिक प्रयत्न केल्यास जास्तीचे यश मिळू शकेल. संशोधनात्मक कार्य प्रारंभ करण्यास उत्तम दिवस आहे. स्पर्धेत विजयी होण्याचे योग आहेत. कुंटुबातील वातावरण आनंददायी आणि सहकार्याचे राहील.

मिथुन: 

आज जवळच्या लोकांची मने दुखावली जातील. कोणतेही निर्णय घाईने घेऊ नयेत. काही क्षुल्लक गोष्टींबाबत मानसिक त्रास होऊ शकतो. कौटुंबिक पातळीवर कुटुंबातील सदस्यांच्या भावनेकडे दुर्लक्ष करू नका. व्यापारात आर्थिक नियोजानावर सावधानीपूर्वक निर्णय घ्या. मुलाची चिंता सतावेल. वैद्यकीय बाबीवर खर्च वाढेल. दुरवरचे प्रवास टाळावेत. 

कर्क: 

आज चांगली कामे मिळतील. तुमची मते बेधडकपणे मांडाल आणि वाहवा मिळवाल. नवीन योजना राबवाल. कलेच्या क्षेत्रात खूप काम कराल परंतु त्यासाठी लगेच संधी मिळणार नाही. तुमची बौद्धीक आणि मानसिक उन्नती होईल. नावलौकिक मिळेल. रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल कराल. व्यवहारात सावधपणा बाळगा. आर्थिक बळ कमी पडल्याने योजना अपूर्ण राहू शकतात. 

सिंह: 

आज जोडीदाराशी संबंध सलोख्याचे राहतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. पूर्वी केलेल्या चांगल्या कामाचे फळ नक्की मिळेल. हाताखालच्या लोकांचे सहकार्य चांगले मिळेल. आध्यात्मिक प्रगती चांगली होईल. कार्यक्षेत्रात यश मिळेल. महत्वाची कामे हाती असतील तर पूर्ण होतील. जबाबदारीत वाढेल. व्यापारात आर्थिक फायदा होईल. संपत्तीचे प्रश्न मार्गी लागतील. 

कन्या: 

आज प्रवासाला जावे लागेत. तब्येत चांगली ठेवा. पायाची दुखणी वाढू शकतात. संततीच्या वागण्या बोलण्याचा त्रास होऊ शकतो. संसारात जोडीदाराचे वर्चस्व सहन करावे लागेल. तडजोडही करावी लागेल. प्रवास आवश्यक असल तरच करा. कामाच्या ठिकाणी ताण जाणवेल. प्रयत्न यशस्वी होण्यास अडथळे निर्माण होतील. खर्च विचारपूर्वक करावा. 

तूळ: 

आज अचानक फायदा होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. धार्मिकतेकडे जास्त कल राहील. विद्यार्थ्यांचा अभ्यासात चांगला मूड लागेल. गाठीभेठी होतील. आत्मविश्वास वाढल्याने कोणतेही काम सहजतेने करु शकाल. मौजमजा करण्याकडे कल राहील. वाद विवाद टाळावेत. प्रवासातून आर्थिक लाभ होतील. परदेश भ्रमण घडेल. 

वृश्चिक: 

आज तरुणांना प्रेमात पडावेसे वाटेल पण ते व्यक्त करण्याचे धाडस नसेल. रागावर नियंत्रण ठेवा. संयम बाळगुन काम करा, नुकसान संभवते. कुटुंबातील सदस्यांसोबत मतभेद निर्माण होतील. नवीन खरेदीत पैसे खर्च होतील. व्यापारात प्रसिद्धी आणि यश मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक किंवा साहित्यिक समारंभात भाग घ्याल. भांडण आणी वादविवाद टाळा. पत्नीसोबत वाद घालू नका.

धनुः 

आज फायदा होईल. पैसाही खर्च कराल. कामाच्या ठिकाणी योग्य तेथे कर्तव्य निभावाल. कार्यक्षेत्रात वेळेचा चांगला सदुपयोग करून आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. कामकाजामध्ये वाढ होईल. काळजीपूर्वक निर्णय घ्या. फायदेशीर राहील. महत्वकांक्षा पूर्ण होतील. यश मिळवल्याने उत्साह वाढेल. आर्थिक लाभ होतील.

मकरः 

आज अडलेली कामे पूर्ण होतील. नोकरी व्यवसायात धाडस दाखवाल, वेगवेगळ्या संधी चालून येतील. नवीन योजना भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. व्यापार चांगला चालेल. भौतिक सुख साधनांची आवड निर्माण होईल. योजनेनुसार काम केल्यास फायदा होईल. आईवडिलांशी असलेले संबंध दृढ होतील. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी वाढेल. आर्थिक आवक वाढणार आहे. 

कुंभः 

आज वडिलोपार्जित धंद्यामध्ये वाढ कराल. किर्ती प्रसिद्धीचे योग येतील. नवीन नोकरी लागू शकते. वैवाहिक जीवनात सामंजस्य राहील. दुसऱ्याच्या मताशी लवकर सहमत होणार नाही. जोडीदाराकडून बऱ्याच अपेक्षा पूर्ण होतील. व्यवसायात बरीच उलाढाल कराल. विद्यार्थ्यांना एखाद्या स्पर्धेत चांगले यश मिळू शकते. कार्यक्षेत्र विस्तारेल. व्यापार रोजगार चांगला चालेल. 

मीनः 

आज नोकरीमध्ये कोणावरही अवलंबून राहू नये. स्वत:ची कामे स्वतः करावीत. रोजगारात विपरित प्रसंग घडतील. आर्थिक टंचाई निर्माण होतील. मनात नैराश्य निर्माण होईल. विचार पूर्वक निर्णय घ्या. व्यापारात विनम्रतेने आणि संयमाने कामे करण्याचा प्रयत्न करा. कमाईपेक्षा खर्च जास्त करू नका. येणाऱ्या खर्चामुळे चिंतीत राहाल. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.

Whats_app_banner