मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today January 2024: कालाष्टमीचा दिवस तुमच्यासाठी आर्थिकवृद्धीचा ठरेल की फसवणुकीचा, वाचा राशीभविष्य

Horoscope Today January 2024: कालाष्टमीचा दिवस तुमच्यासाठी आर्थिकवृद्धीचा ठरेल की फसवणुकीचा, वाचा राशीभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 04, 2024 08:41 AM IST

Horoscope Today 4 January 2024: आज ४ जानेवारी २०२४ गुरुवार रोजी, लाभ होईल की नुकसान, दिवस शुभ असेल की अशुभ, किती संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे राशीभविष्य.

Today Horoscope 4 January 2024
Today Horoscope 4 January 2024

आज गुरुवार ४ जानेवारी रोजी, चंद्र बुधाच्या कन्या राशीत असून, सूर्योदयानंतर शुक्राच्या राशीत प्रवेश करणार आहे. येथे तो बुध आणि मंगळाशी योग करेल. गुरू-हर्षल वर चंद्राची पुर्ण दृष्टी असेल. कालाष्टमीचं चंद्रबल कसं असेल! वाचा राशीभविष्य!

मेष: 

आज आपल्यावरील कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. नवीन वाहन खरेदीची इच्छा मनात निर्माण होईल. तुमची बौद्धिक क्षमता सिद्ध कराल. तज्ज्ञांच्या सल्ल्याने आर्थिक गुंतवणूक करायला हरकत नाही. कुटुंबातील लहान व्यक्तींचा सल्ला फायद्याचा ठरेल. जोडीदाराचे सहकार्य उत्तम राहील. नोकरी व व्यवसायात हव्या असलेल्या संधी मिळतील. आर्थिक नियोजानावर वेळेत भर द्या. नवनविन प्रलोभने येत राहतील. आपली मानसिकतेला विचलित करणाऱ्या घटना घडतीत. व्यापारात काळजीपूर्वक व्यवहार करणे अत्यावश्यक आहे. मोठ्या सांपत्तिक उलाढालीत आर्थिक हानी होण्याची संभावना आहे. कुंटुंबात खेळीमेळीचे वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा.

वृषभ: 

आज अनावश्यक चिंता तुमचा पाठलाग करतील. प्रत्यक्षात न उतरणारी स्वप्ने रंगवल्यामुळे अपेक्षा भंगाला तोंड द्यावे लागेल. व्यापारात वेळेवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. भागीदारीत अपेक्षित लाभाचे योग आहेत. स्थावर मालमला संपत्तीचे प्रश्न मार्गी लागेल. धनाचा उपभोग घ्याल. प्रेमप्रकरणात मात्र फसगत होण्याची शक्यता आहे. क्रिडाक्षेत्रातील व्यक्तिंना योग्य संधी चालून येतील. घर खरेदीची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण उत्साही राहील. जुने मित्र सहकारी भेटतील. व्यवसाया निमित्त प्रवास होईल. मिळालेले लाभ योग्य पद्धतीने उपयोगात आणावेत. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडथळे निर्माण होतील.

मिथुन: 

आजचं लोकांचे सहकार्य उत्तम मिळेल. व्यापारात परिस्थितीवर मात कराल. उद्योग व्यवसायात प्रगती होईल. नोकरीत मानाच्या जागा मिळतील. नवीन वाहन खरेदीचे योग आहे. मनावरचा ताण बर्‍यापैकी कमी झालेला असेल. सहकुटुंब प्रवासाचा बेत आखाल. कौटुंबिक पातळीवर जोडिदाराचं चांगले सहकार्य मिळेल. त्यांच्या मदतीने महत्त्वाचे निर्णय घेणे शक्य होईल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. नवीन योजनेस प्रारंभ करण्यास उत्तम दिवस आहे. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवा. चैनीच्या वस्तू घेण्याकडे ओढ राहील. विद्यार्थ्यांना साहित्य वाचनाची आवड निर्माण होईल. प्रेमप्रकरणात अनुकूलता येईल. कुटुंबातील सदस्याचे आजारपण असेल तर प्रकृतीत सुधारणा होईल. 

कर्क: 

आज करिअर मध्ये एखादी गोष्ट करण्याचा निर्धार आणि निश्चयीपणाच्या जोरावर बाजी मारून न्याल. उतावीळपणावर आवर घालावा. व्यापारात बदल होण्याची शक्यता आहे. उद्योग व्यवसायातील मंडळीना नवीन प्रकल्प हाती येतील. धाडस आणि कामाचा उरक चांगला राहील. व्यवसायात कामगारांच्या प्रश्नाकडे डोळेझाक करून चालणार नाही. परदेशाशी व्यवहार असणाऱ्यांना फायदेशीर ठरेल. आपल्याला केलेल्या कामाचे सकारात्मक परिणाम दिसतील. व्यापारात आर्थिकवृद्धी होईल. भागीदारा कडून सहकार्य लाभेल. आपणास लाभ होईल. महत्वाच्या कामानिमित्त प्रवास घडेल. आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. नवीन स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचे योग आहे. कुटुंबात शुभवार्ता मिळेल. योग्य वेळी योग्य निर्णय घ्या.

सिंह: 

आज वडिलोपार्जित इस्टेटीसंबंधी वाद निर्माण होतील. व्यापारात व्यवहाराची सांगड योग्यरितीने घातली नाही तर तोट्याचे प्रमाण वाढेल अडकलेले पैसे वसूल करण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक लाभ चांगले होतील. नोकरीत नवीन कल्पनांचा वापर करून कामाचे नियोजन कराल. आपण अहंकारी वृत्तीचा त्याग करावा. माणसं दुरावली जातील असी वर्तणुक टाळावी. नव्या योजनावर काळजीपूर्वक काम करावे लागेल. वेळेचे व्यवस्थापन गरजेचे आहे. संततीच्या आरोग्याकडे लक्ष द्या. व्यापारात आर्थिक बाबतीत नुकसान होण्याची शक्यता आहे. जुनी येणी रखडतील. कर्ज प्रकरणे नामंजूर होतील. नवीन व्यापारास प्रारंभ करण्यासाठी अशुभ दिवस आहे. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. आर्थिक व्यवहार करताना पूर्ण सतर्क राहा. फसवणूक होऊ शकते.

कन्या: 

आज मानसिक त्रास निर्माण होईल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काही तडजोडी कराव्या लागतील. घरात आणि घराबाहेर मानसिक अस्वस्थता जाणवली तरी आर्थिक समाधान मिळाल्यामुळे स्वस्थ राहाल. थोडे गैरसमज होण्याची शक्यता आहे. ज्ञान आणि व्यवहार यांच्या योग्य नियोजनाचा मेळ घातला तर काही गोष्टी फायद्याच्या ठरतील. यश संपादन करण्यासाठी कोणाचा तरी आधार घ्यावा लागेल. व्यापारात नवनवीन गोष्टी पुढे येतील. प्रवासात विघ्ने निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रवास थोडा जपूनच करावा. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. आपल्या उदारपणाचा फायदा घेतला जाईल. कोणतेही काम अंगावर घेऊ नका, सावध राहा. नाहीतर कठीण प्रसंगाशी झगडावे लागेल. नव्या कल्पना इतरांना पटणार नाहीत.

तूळ: 

आज मनोधैर्य सांभाळा. व्यवसायात लहरीपणा ठेऊन चालणार नाही. शब्द जपून वापरा नाहीतर इतरांची मने दुखावली जातील. आरोग्याच्या दृष्टीने जुनी दुखणी त्रास देतील. त्यामुळे पथ्यपाणी सांभाळा. विचाराअंतीच निर्णय घ्या. वाईट मित्राच्या संगतीमुळे नुकसान होईल. आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या विषयी गैरसमज पसरणार नाहीत याची काळजी घ्या. शांत चित्त ठेवणाचा प्रयत्न करा. नोकरीमध्ये सरकारी अधिकारी वरिष्ठांकडून काही त्रास जाणवेल. कर्जाचा बोजा वाढण्याची शक्यता आहे. व्यापारात आर्थिक नुकसान संभवते. उताविळपणाने कोणत्याही गोष्टी करू नका. क्षाणिक फायद्यासाठी गुंतवणुक करू नका. गुप्तशत्रुपासुन त्रास संभवतो. जोडीदारासोबत स्नेहपूर्वक वागा. आरोग्याच्या तक्रारी असतील.

वृश्चिक: 

आज मुलांसाठी अचानक पैसा खर्च करावा लागू शकतो. पैशाचे पाठबळ चांगले मिळाल्यामुळे नवीन योजनांवर काम कराल. व्यावसायिकांची दिशाभूल होणार नाही याची काळजी घ्यावी. व्यर्थ खर्च होईल. मित्रमैत्रिणींची जपून निवड करावी. नातेवाईकांशी पटणार नाही. व्यापारात उत्पन्न कमी खर्च अधिक होईल. आनंदावर विरजण पडण्यासारख्या घटना घडतील. मनात एक प्रकारची खिन्नता राहणार आहे. प्रयत्नांची आणि कष्टाची पराकाष्ठा करावी लागेल. कुटुंबातील सदस्याच्या आजारपणाने त्रासुन जाल. खर्चाने मन व्यथित होईल. मनात चिडचिडेपणा वाढणार आहे. प्रवास करताना काळजी घेणे आवश्यक आहे. शक्यतो प्रवासाच टाळा. जर शक्य नसेल तर योग्य ती काळजी घ्या.

धनु: 

आज लांबच्या प्रवासाचे बेत आखले जातील. वैवाहिक जीवनात घरातील वातावरण आनंदी राहील. नोकरी व्यवसायात तुमच्या वेगवेगळ्या कल्पनांचे स्वागत होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याची संधी मिळेल. वाहन घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. कुंटुबातील वरिष्ठ सदस्यांकडून स्नेह प्राप्त होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल. कला क्षेत्रातील व्यक्तिंना लाभ होईल. कार्यप्रणाली व कल्पना शक्ती यात सुधारणा होईल. कौटुंबिक सौख्य व जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आपल्याला सांभाळता येईल तितकीच जबाबदारी स्विकारा. लहरी स्वभाव व व्यसनाधिनतावर आवर घालावा.

मकर: 

आज सरकारी नोकरीतल्या लोकांना प्रमोशन मिळण्याचे योग आहेत. व्यवहारिक निर्णय घेण्यावर जास्त भर द्याल. जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात आवश्यक ते बदल करण्याच्या संधी मिळतील. कौटुंबिक पातळीवर पत्नीकडून व संततीकडून उत्तम सुख मिळेल. लेखन कार्य व ग्रंथप्रकाशानात लाभ होईल. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. मित्रमैत्रिणींकडून लाभ होतील. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी शुभ दिवस आहे. व्यापारात उत्तम धनप्राप्ती होईल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळीचा गौरव वाढेल. आपल्या स्वभावातील आळशी वृत्ती टाळावी. प्रवासातून आर्थिक लाभ घडेल. आपल्या तर्कबुद्धीने शत्रुवर विजय मिळवाल. नवे काही करण्याचा प्रयत्न कराल. त्या प्रयत्नात यश मिळेल.

कुंभ: 

आज आर्थिक विवंचना थोडी सतावेल. आपल्या वस्तू सांभाळा. मौल्यवान वस्तु चोरी होण्याची शक्यता आहे. पूर्वी घेतलेला निर्णय चुकीचा ठरू शकतो. झोपेसंबंधी त्रास होईल. कोणत्याही कामाचे नियोजन पूर्ण होणार नाही. बुद्धीचा उपयोग विधायक कामासाठी करणे आवश्यक आहे. मित्रपरिवारावर जास्त विश्वास ठेऊ नका.  व्यापाऱ्यांसाठी आज नुकसानाचा दिवस राहील. विनाकारण वाद घालू नये. उत्पन्नापेक्षा अधिक खर्च कराल. फसवणुक होण्याची शक्यता आहे. काळजीपूर्वक व्यवहार करा. वाहन जपून चालवा. जोडीदाराची, वरिष्ठांची आरोग्याची काळजी घ्या.

मीनः 

आज आर्थिक बाबतीत प्रगती होईल. घरातील लोकांचे उत्तम सहकार्य लाभेल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. एखादी मस्त खरेदी करण्याचा मूड राहील. नवीन नोकरीची संधी उपलब्ध होईल. मनातील योजना पूर्ण होतील. तशी काही आर्थिक तरतूद होईल. मोठ्या व्यवहारात आर्थिक फसवणुकीपासून सावध राहा. अर्थिक कामात चांगले यश लाभेल. आपल्याला जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. नोकरी व्यापारात कामाचा विस्तार वाढेल. संततीकडून काही चांगल्या गोष्टी मिळतील. संततीची बौद्धिक प्रगती पाहून समाधान लाभेल. रागावर नियंत्रण ठेवा.

 

जय अर्जुन घोडके

(jaynews21@gmail.com)

(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)