Horoscope Today 4 february 2024: षडाष्टक योगात आजचा दिवस यशाचा की अपयशाचा! वाचा राशीभविष्य!-horoscope today 4 february 2024 daily rashi bhavishya in marathi ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 4 february 2024: षडाष्टक योगात आजचा दिवस यशाचा की अपयशाचा! वाचा राशीभविष्य!

Horoscope Today 4 february 2024: षडाष्टक योगात आजचा दिवस यशाचा की अपयशाचा! वाचा राशीभविष्य!

Feb 04, 2024 10:24 AM IST

Horoscope Today 4 february 2024: आज ४ फेब्रुवारी २०२४ रविवार रोजी, लाभ होईल की नुकसान, दिवस शुभ असेल की अशुभ, किती संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे राशीभविष्य.

Horoscope 4 february 2024
Horoscope 4 february 2024

आज रविवार ४ फेब्रुवारी रोजी, चंद्र मंगळाच्या राशीतुन गोचर करणार असून गुरू आणि शनिच्या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. कसा जाईल आजचा दिवस? वाचा राशीभविष्य!

मेष: 

आज मागचा अनुभव पाठीशी घेऊन निर्णय घ्याल. स्वतःचे सामर्थ्य ओळखून वाटचाल कराल. वेळेचे महत्त्व जपाल. व्यवहारामध्ये चौकसपणा ठेवलात तर फायद्याचे ठरेल. वडिलोपार्जित अथवा वडिलांबरोबर व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. प्रवासाचे योग येतील. विचारपूर्वक गुंतवणूक करा. आर्थिक बाबतीत वृद्धी होईल. कामातून मिळणाऱ्या लाभात मन समाधानी राहील. मानसन्मान व प्रतिष्ठा वाढेल. आकस्मिक लाभाचा योग आहे.

वृषभ: 

आज मानसिक अस्थिरतेला तोंड द्यावे लागेल. हातात पैसा आल्यामुळे बरीच देणीही देऊन टाकाल. जोडीदाराबरोबर क्षुल्लक कारणावरून वाद संभवतात. काही गोष्टींकडे कानाडोळा करायला लागेल. रोजगारात जबाबदारीनुसार काम करा. काही व्यवहार अनपेक्षित नुकसानकारक ठरतील. गुंतवणूक करू नका. वादविवाद आणि गैरसमज वाढतील असे संवाद टाळावेत. कौटुंबिक ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. राग आणि चिडचिडेपणावर नियंत्रण ठेवा. प्रवास टाळा

मिथुन: 

आज पैसा वसूल करताना जास्त कष्ट घेतले तरी पैसे मिळणार नाहीत. प्रगती होईल. वैवाहिक तुमच्या धोरणीपणामुळे तुमचे यश पक्के आणि स्थायी स्वरूपाचे असेल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणचे वातावरण तुम्हाला मोहित करणारे असेल. एक वेगळाच उत्साह आणि आनंद लाभेल. यश निश्चित लाभेल. व्यवसायात कार्यक्षेत्रात विस्तार होईल. दिवस अत्यंत शुभ फलदायी ठरेल.

कर्क: 

आज मामुली यश मिळत असल्यामुळे थोडे निराश व्हाल. कुठे चुकते हे कळण्यासाठी त्यातील तज्ञांचा अवश्य सल्ला घ्या. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. जवळच्या माणसांची परिस्थिती समजाऊन घ्यावी लागेल. आर्थिक नियोजनाचे गणित चुकू शकते. खरेदी करताना खर्चावर नियंत्रण ठेवावे. नवीन संधीचा योग आहे. वेळेचा अपव्यय टाळा. प्रवासातून लाभ होणार नाही. प्रवास टाळा. 

सिंह: 

आज आर्थिक घडी बसेल. संततीसाठी काही कारणास्तव पैसा खर्च करावा लागेल. कलाकरांना संधी मिळतील. यशाची जबरदस्त आसक्ती तुम्हाला नेहमीच असते. त्यामुळे जिद्दीने कामाला लागाल. कलावंतांना उत्तम प्रसिद्धी मिळेल. घरामध्ये समारंभाचे नियोजन आपण उत्कृष्ट आखाल. व्यवसायिकांना काळ अनुकूल आहे. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव वाढेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. पतीपत्नीतील संबंध दृढ होतील. आजचा दिवस आत्मविश्वासाने परिपूर्ण राहील.

कन्या: 

आज उत्तम ग्रहयोग आहे. प्रगती होईल. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. भांवडे मदत करतील. वित्तीय संस्थेत काम करण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात हितशत्रु आणि स्पर्धकांवर मात कराल. व्यवसायात जम बसेल. सार्वजनिक कामची आवड राहील. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. धार्मिक सामाजिक कार्यात सक्रियतेने भाग घ्याल. मित्रमंडळीचे सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात यश येईल. कार्याचा विस्तार वाढेल.

तूळ: 

आज परदेशगमनाचे योग येतील. आर्थिक नवीन गुंतवणूक कराल. खर्चामुळे थोडी चिडचिड होईल. जोडीदाराच्या मनासारखे वागल्यामुळे सौख्याचा अनुभव घ्याल. संततीच्या मनाचा आदर केल्यामुळे दोन पिढ्यांमधील अंतर कमी होईल. त्यामुळे मुलेही खूष राहतील. वादविवाद टाळा. फसवणुक होण्याचे योग आहे. लक्ष्मीची अवकृपा राहील. छोट्याशा कारणाने मन दुखावेल. प्रकृतीच्या समस्या उद्भभवतील. 

वृश्चिक: 

आज समाजात मान मिळेल. थोडासा ताणही येईल. नवे मार्ग आपणास सापडतील. लांबचे प्रवास आनंददायक होतील. प्रसिद्धीही मिळेल. योग्य व्यक्तीचा सल्ला घेणे आपल्यास फायदेशीर ठरेल. कुंटुबातील वातावरण एकंदरीत आनंददायक राहिल. कुंटुंबात सलोख्याचे वातावरण निर्माण होईल. कौटुंबिक जबाबदारीकडे लक्ष दया. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक लाभ होईल.

धनु: 

आज परिपूर्ण काम कराल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. इतरांना खूप सहकार्य कराल. नावलौकिक वाढेल. लेखकांच्या लिखाणास गती मिळेल. व्यवसायात उत्तम नियोजनामुळे एक प्रकारची शिस्त असेल. तरुणांच्या आवडी निवडी बदलत राहतील. मनाप्रमाणे खरेदी कराल. बेरोजगारांना नोकरी मिळेल. सार्वजनिक कामची आवड राहील.

मकर: 

आज आर्थिक व्यवहार करू नयेत. थोडे आस्थिर आणि चंचल बनाल. व्यवसायात मनावर ताबा ठेवावा लागेल. हट्टी आणि दुराग्रही स्वभावामुळे जवळच्या लोकांची मने दुखावली जाण्याची शक्यता आहे. प्रकृती स्वास्थ्य वरचेवर बिघडण्याची शक्यता आहे. मुलांशी थोडे मतभेद संभवतात. कला दाखवण्याची संधी मिळेल. वाहने जपून चालवा. पत्नीचा सल्ला फायदेशीर ठरेल.

कुंभ: 

आज आर्थिक निर्णय चुकीचे घेतले जाण्याची शक्यता आहे. कर्जबाजारी असणाऱ्यांनी हप्ते वेळेवर फेडण्याची खबरदारी घ्यावी. रचनात्मक कामाकडे ओढ राहील. परिस्थितीचा आढावा चांगला घ्याल. इतरांवर जास्त विश्वास टाकत नसल्यामुळे कामाचा गाडा स्वत: ओढाल परंतु त्यामुळे थकवा जास्त जाणवेल. मानसिक दृष्टीकोनातून क्लेश उत्पन्न करणारा दिवस आहे.

मीन: 

आज बरीच कामे मार्गी लागतील. पूर्वीपेक्षा पैशाची आवक चांगली राहील. प्रेमप्रकरणामध्ये यश येईल. संघर्षाचा आणि प्रतिकाराचा भाग जरा जास्त राहिल्यामुळे तापटपणा वाढेल. दुसऱ्याला समजून घेण्यात थोडे कमी पडाल. दुसऱ्यावर कुरघोडी करण्या अगोदर विचार करावा लागेल. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल. आज गुंतवणूक करा. गृहसौख्य उत्तम आहे. प्रेम प्रकरणात संबंध दृढ होतील. प्रोत्साहन मिळेल.