मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 31 January 2024 : महिन्याचा शेवटचा बुधवार तुमच्यासाठी किती महत्वाचा राहील! वाचा राशीभविष्य!

Horoscope Today 31 January 2024 : महिन्याचा शेवटचा बुधवार तुमच्यासाठी किती महत्वाचा राहील! वाचा राशीभविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 31, 2024 08:35 AM IST

Horoscope Today 31 January 2024: आज ३१ जानेवारी २०२४ बुधवार रोजी, दिवस शुभ असेल की अशुभ, लाभ होईल की नुकसान, किती संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे राशीभविष्य.

Horoscope 31 January 2024
Horoscope 31 January 2024

आज बुधवार ३१ जानेवारी रोजी, चंद्र कन्या राशीतून व मालकीच्या नक्षत्रातुन भ्रमण करणार आहे. रवि आणि मंगळाशी नवमपंचम योग करीत असुन सुकर्मा योग देखील आहे. कसा जाईल आजचा दिवस! वाचा राशीभविष्य!

मेष: 

आज मानसिक अस्थिरतेला तोंड द्यावे लागेल. बरीच देणीही देऊन टाकाल. जोडीदाराबरोबर क्षुल्लक कारणावरून वाद होऊ शकतो. कोणतेही काम पूर्ण करायचे असेल तर काही गोष्टींकडे कानाडोळा करायला लागेल. जबाबदारी नुसार काम करा. संकटाचा सामना करावा लागेल. उद्योगधंद्यात काही व्यवहार अनपेक्षित नुकसानकारक ठरतील. क्षणिक फायद्यासाठी गुंतवणूक करू नका. मन समाधानी राहणार नाही. दुरवरचे प्रवास शक्यतो टाळा. खरेदी विक्रीचा व्यवहार आज करू नका. कौटुंबिक ताण-तणाव वाढू शकतो.

वृषभ: 

आज वसुलीचे पैसे मिळणार आहेत. प्रगती कराल. यश पक्के आणि स्थायी स्वरूपाचे असेल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणचे वातावरण तुम्हाला मोहित करणारे असेल. उत्साह आणि आनंद लाभेल. नवीन जागा घेण्याच्या विचारात असाल तर त्यात यश मिळेल. सामाजिक कार्यकर्त्या महिलांसाठी काळ अनुकूल आहे. खेळाडूंसाठी शुभ घटनांचा काळ आहे. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक वृद्धी होईल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. आत्मविश्वासाने सामोरे जा. यश निश्चित लाभेल. व्यवसायात कार्यक्षेत्रात विस्तार होईल.

मिथुन: 

आज प्रचंड मेहनतीच्या मानाने यश कमी मिळत असल्यामुळे थोडे निराश व्हाल. चुका दुरुस्तीसाठी तज्ञांचा अवश्य सल्ला घ्या. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. जवळच्या माणसांची परिस्थिती समजाऊन घ्यावी लागेल. आर्थिक नियोजनाचे गणित चुकू शकते. खरेदी करताना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. स्थावर अथवा दीर्घ मुदतीची गुंतवणूक पुढील काळासाठी फायदेशीर ठरेल. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्यावे. परस्पर मतभेद होऊ शकतात, वाद टाळा. नवीन संधीचा योग आहे. वेळेचा अपव्यय टाळा. प्रवासातून लाभ होणार नाही.

कर्क: 

आज जोडीदाराच्या मनाचा विचार करावा. आर्थिक घडी बसेल. संततीसाठी काही कारणास्तव पैसा खर्च करावा लागेल. कलाकरांना संधी मिळतील. यशासाठी जिद्दीने कामाला लागाल. कलावंतांना उत्तम प्रसिद्धी मिळेल. घरामध्ये समारंभाचे नियोजन आपण उत्कृष्ट आखाल. व्यवसायिकांना काळ अनुकूल आहे. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव वाढेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. जमिनीसंबधीत रखडलेली कामे मार्गी लागतील. पतीपत्नीतील संबंध दृढ होतील. आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल.

सिंह: 

आज नवीन प्रॉपर्टीसंबंधी विचार असेल तर प्रत्यक्षात उतरवायला हरकत नाही. प्रेम प्रकरणात आवडत्या व्यक्तीजवळ आपले मनोगत व्यक्त करायला उत्तम ग्रहयोग आहे. प्रगती होईल. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. भांवडे मदत करतील. वित्तीय संस्थेत काम करण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात हितशत्रु आणि स्पर्धकांवर मात कराल. व्यवसायात जम बसेल. सार्वजनिक कामची आवड राहील. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. धार्मिक सामाजिक कार्यात सक्रियतेने भाग घ्याल. 

कन्याः 

आज परदेशगमनाचे योग असतील. आर्थिक नवीन गुंतवणूक कराल. घरामध्ये अचानक उद्भवलेल्या खर्चामुळे थोडी चिडचिड होईल. इतरांचाही विचार करावा लागेल. वैवाहिक जीवनात कधी नव्हे ते जोडीदाराच्या मनासारखे वागल्यामुळे सौख्याचा अनुभव घ्याल. संततीच्या मनाचा आदर केल्यामुळे दोन पिढ्यांमधील अंतर कमी होईल. व्यापारात भागीदारासोबत वादविवाद टाळा. मोठी आर्थिक फसवणुक होऊ शकते. लक्ष्मीची अवकृपा राहील. मन दुखावेल. आरोग्याची विशेष काळजी घ्या. जोडीदाराशी स्नेहपुर्वक वागा.

तूळ: 

आज तुमच्याशिवाय कोणतेही काम होणार नाही. त्यामुळे समाजात मान मिळेल. घरामध्ये नवीन येणाऱ्या जबाबदाऱ्या हसतमुखाने पेलाव्या लागतील. याचा थोडासा ताणही येईल. नवे मार्ग आपणास सापडतील. लांबचे प्रवास आनंददायक होतील. नोकर वर्गावर विसंबून न रहाणे व्यवसायिकांना कमी त्रासाचे आहे. कुंटुंबात सलोख्याचे वातावरण निर्माण होईल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक लाभ होईल. व्यापारात उत्पन्न वाढेल. प्रसिद्धी मिळेल.

वृश्चिक: 

आज परिपूर्ण काम कराल. अभ्यासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. इतरांना खूप सहकार्य कराल. नावलौकिक वाढेल. लेखकांच्या लिखाणास गती मिळेल. व्यवसायात उत्तम नियोजनामुळे एक प्रकारची शिस्त असेल. तरुणांच्या आवडी निवडी बदलतील. मनाप्रमाणे खरेदी कराल. सहकार्य लाभेल. सामाजिक कार्याची आवड राहील. विद्यार्थ्यांची विद्याभासातात प्रगती पाहून समाधान होईल. 

धनु: 

आज आर्थिक व्यवहार करू नयेत. थोडे आस्थिर आणि चंचल बनाल. मनावर ताबा ठेवावा लागेल. हट्टी आणि दुराग्रही स्वभावामुळे जवळच्या लोकांची मने दुखावली जाऊ शकतात. प्रकृती स्वास्थ्य बिघडू शकते. मुलांशी थोडे मतभेद संभवतात. कला दाखवण्याची संधी मिळेल. वाहने जपून चालवा. लाभ अधिक होईल. प्रमोशन मिळेल. वरिष्ठाकडून सहकार्य लाभेल. कुटुंबात मंगलकार्याचे नियोजन कराल. पत्नीचा सल्ला फायदेशीर ठरेल. नातेसंबंधात स्नेह निर्माण होईल.

मकर: 

आज आर्थिक निर्णय चुकीचे घेतले जाऊ शकतात. हप्ते वेळेवर फेडण्याची खबरदारी घ्यावी. रचनात्मक कामाकडे ओढ राहील. परिस्थितीचा आढावा चांगला घ्याल. इतरांवर जास्त विश्वास नसल्यामुळे कामाचा गाडा स्वत: ओढाल परंतु त्यामुळे थकवा जास्त जाणवेल. व्यापारात आपले निर्णय चुकू शकतात. मुलांच्या बाबतीत काही विशेष कठोर निर्णय घ्यावे लागतील. मानसिक स्वास्थ बिघडू शकते. व्यापारी वर्गानी काळजीपूर्वक व्यवहार करावेत. सुखचैनीच्या वस्तूंवरील खर्च वाढणार आहे. 

कुंभ: 

आज बरीच कामे मार्गी लागतील. पूर्वीपेक्षा पैशाची आवक चांगली राहील. प्रेमप्रकरणामध्ये यश येईल. तापटपणा वाढेल. दुसऱ्याला समजून घेण्यात थोडे कमी पडाल. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल. आज गुंतवणूक करा. निश्चितच भविष्यात ही गुंतवणुक फायदेशीर ठरेल. प्रोत्साहन मिळेल. मित्र-मैत्रिणी व जोडीदारांकडून सहकार्य लाभेल. व्यापारात आपली प्रतिमा उंचावेल. प्रेम प्रकरणात संबंध दृढ होतील. व्यावसायिकांना अपेक्षित यश लाभेल.

मीन: 

आज सर्व बाबतीत मागचा अनुभव पाठीशी घेऊन निर्णय घ्याल. व्यापारात स्वतःचे सामर्थ्य ओळखून वाटचाल कराल. स्वतःच्या आणि इतरांच्या वेळेचे महत्त्व जपाल. व्यवहारामध्ये चौकसपणा ठेवलात तर फायद्याचे ठरेल. वडिलोपार्जित अथवा वडिलांबरोबर व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. प्रवासाचे योग येतील. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. सर्वच क्षेत्रातील जातकांना धनलाभाचा दिवस आहे. व्यापारात नवीन योजनेस प्रारंभ करा वक्तृत्वाचा प्रभाव राहील. मानसन्मान व प्रतिष्ठा वाढेल.

 

जय अर्जुन घोडके

(jaynews21@gmail.com)

(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)