मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 31 December 2023: वर्षाचा शेवटचा दिवस मेष ते मीन राशीसाठी कसा असेल, वाचा राशीभविष्य!

Horoscope Today 31 December 2023: वर्षाचा शेवटचा दिवस मेष ते मीन राशीसाठी कसा असेल, वाचा राशीभविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Dec 31, 2023 06:00 AM IST

Horoscope Today 31 December 2023: आजचा या वर्षाचा शेवटचा दिवस शुभ असेल की अशुभ, आज लाभ होईल की नुकसान, दिवस किती महत्वाचा राहील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे राशीभविष्य.

Today Horoscope 31 December 2023
Today Horoscope 31 December 2023

आज ३१ डिसेंबर रोजी, आज वर्ष २०२३ चा शेवटचा दिवस असून, रविवार आहे. सिंह राशीतून चंद्रभ्रमण होत असुन, रवि-मंगळ-बुध या तीन ग्रहांशी नवमपंचम योग तयार होत आहे. वक्री गुरू मार्गी होत आहे. प्रीति योगात सुट्टीचा आणि वर्षातील शेवटचा दिवस कसा असेल! वाचा राशीभविष्य!

मेषः 

आज फायदेशीर दिवस आहे. हातात घेतलेल्या कामात यश मिळेल. मोठ्या घराण्याचा स्नेह प्राप्त होईल. सामाजिक कार्यात आपला लौकीक सांभळण्याचा प्रयत्न करावा. तुमच्या बोलण्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. मित्र मैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. आनंदी आणि उत्साही वातावरण लाभेल. तुमच्या आनंदात वरिष्ठही सहभागी झाल्यामुळे आनंद द्विगुणीत होईल. मानसिक आणि शारिरिक आरोग्य उत्तम राहील. आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. खेळाडूंसाठी यशाचा दिवस आहे. 

वृषभः 

आज प्रगती करण्याच्या विचाराबरोबर आपण आपले आरोग्यही जपा. शुल्लक कारणांवरुन मानसिक दडपण वाटेल. प्रेमिकांना एकमेकांच्या वागण्यामुळे मानसिक त्रास होईल. आपले विचार कमी जुळतील. कोर्टकचेरीचे प्रसंग सध्या टाळावेत. घरातील जुन्या पिढीच्या लोकांशी मात्र मतभेद होण्याची शक्यता आहे. नियोजन आणि शिस्त नसेल. व्यवसायिकांना व्यवसायासाठी अडचणीतून मार्ग काढावा लागेल. जपून वाहन चालवा. आपल्या संशयी स्वभावावर आळा घाला. काही मनस्ताप देण्यासारख्या घटना अनुभवास येतील. प्रवासात काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

मिथुनः 

आज आर्थिक मदत करताना विशेष काळजी घ्या. नात्यात मैत्रीत मधुरता येईल.नवीन वस्तूंची खरेदी कराल. मुलांच्या करियर संबंधी आर्थिक तरतूद करण्याकडे कल राहील. कुटुंबात तुमच्या नवीन विचारांचे स्वागत होईल. नवीन धोरणं योजना राबवून स्पर्धकांवर मात करावी लागेल. लेखक कलाकारांना नवनिर्मितीच्या संधी उपलब्ध होतील. कर्जाच्या समस्येतून बाहेर पडण्याचे मार्ग सापडतील. मनातील योजना पार पाडता येणार आहेत. नवीन मित्र परिवार जोडला जाईल. नव्या योजनावर काळजीपूर्वक काम करावे लागेल. वेळेचे व्यवस्थापन गरजेचे आहे. व्यापारात फसव्या योजनेवर विश्वास ठेवू नका. विचारपूर्वक निर्णय घेऊ नका.

कर्कः 

आज आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. व्यवसाय वृद्धीच्या संधी मिळतील. शेअर्स अथवा अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नवीन गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रातील ज्ञानाचा तुम्हाला खूप उपयोग होईल. तुमच्या नवीन कल्पनांचे स्वागत होईल. यशाचा आनंद मिळणार आहे. जोडीदाराचा सल्ला मान्य करावा लागेल. कुटुंबातील व्यक्तींवर अथवा घरासाठी खर्च करावा लागेल. खेळाडूंना अपेक्षित संपादन करता येईल. वाहन चालविताना वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. शैक्षणिक कार्यासाठी परदेशी जाण्याची शक्यता आहे. कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.

सिंहः 

आज वेळेत काम पूर्ण करण्यावर भर द्या. प्रकृतीची विशेष काळजी लागेल. अपेक्षित यशासाठी कष्ट वाढवावे लागणार आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करावी लागेल. काम करताना मेहनत घ्यावी लागेल. फटकन एखादा निर्णय घेण्याचा अविचारही हातून घडू शकतो. नोकरीत व्यापारात कामाचा विस्तार वाढेल. जाहिरात मीडिया क्षेत्राशी निगडित व्यवसाय करणाऱ्यांना लाभ होईल. व्यापार करणाऱ्यांचा कामाचा व्याप वाढणार आहे. कलाकारासाठी फायदेशीर दिवस आहे. आर्थिकबाबतीत व्यवहार सावधानी पूर्वक करावेत. नवीन आव्हान स्वीकारावे लागेल.

कन्याः 

आज दुसऱ्यांचा विचार करणे आवश्यक ठरेल. वैवाहिक सौख्य चांगले मिळेल. जोडीदाराचे सहकार्य चांगले मिळेल. बुद्धी आणि शारीरिक ताकद यांचे प्रमाण बिघडल्यामुळे कामाचा वेग कमी होईल. आपल्या कार्यक्षेत्रात आर्थिक लाभा बरोबर प्रतिष्ठाही मिळेल. जमिन विक्रीतून लाभ होईल. व्यवसायवृद्धी साठी प्रवासाचे योग येतील. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. खरेदी करताना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. स्थावर अथवा दीर्घ मुदतीची गुंतवणूक पुढील काळासाठी फायदेशीर ठरणार आहे. जुनी येणी अचानक वसूल होतील. कर्जप्रकरणात दिलासा मिळेल. घरात एखादे धार्मिक कार्य कराल. वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे.

तूळ: 

आज आर्थिक स्थिती समाधानकारक झाल्यामुळे निवांत रहाल. मोठे प्रवासाचे योग येतील. व्यवसायात कामाची पद्धत आखीव आणि आधुनिक असल्यामुळे कामाची गती वाढेल. कलेच्या क्षेत्रात प्रगती होईल. वाद्यकलेशी निगडित व्यवसायांना चलती जाणवेल. युवकांना काळ अतिशय अनुकूल आहे. नव नविन संधी आपल्याला मिळणार आहेत. कलाकारांना त्यांच्या कलागुणांना विकसित करण्यास ग्रहमान अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळेल. मेहनत वाढवावी लागणार आहे. कोणताही महत्त्वाचा व्यवहार करताना कागदोपत्री तपासणी काळजी पूर्वक करणे आवश्यक आहे. संततीकडून सर्वदृष्ट्या आनंद दायक बातम्या मिळतील. प्रेमियुगुलांना काळ प्रतिकुल आहे. जबाबदारीने काम करा. त्याच बरोबर वेळेचे नियोजन असेल तर योग्यच फायदा होईल.

वृश्चिकः 

आज सकारात्मक विचारामुळे उत्साह वाढेल. वैवाहिक जीवनात चांगला दिवस आहे. फायदेशीर व्यवहार करता येतील. एखाद्या जुन्या मित्राची भेट होईल. चिकाटीने प्रयत्न करावे. अपेक्षित संपादन करता येईल. व्यावसायिकांमध्ये आर्थिक आवक वाढेल. शेअर्समध्ये अथवा कमी कालावधीची गुंतवणूक करताना विचारपूर्वक करावी, दुसऱ्यांना मदत करताना सावधगिरी बाळगा. अर्थिक व्यवहार करताना गुंतवताना तात्पुरता फायदा लक्षात घेऊ नये. संततीकडून सर्व दृष्ट्या आनंददायक बातम्या मिळतील. त्यांची प्रगती उल्लेखनीय असेल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. तुमच्या कामाचा लाभ तुम्हाला निश्चित मिळणार आहे.

धनुः 

आज हजरजबाबी स्वभावामुळे लोकांवर प्रभाव पाडाल. शेअर मार्केटध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. कामाचा वेग नक्कीच वाढेल. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. जोडीदाराशी संबंध सलोख्याचे राहतील. जोडीदाराकडून बऱ्याच अपेक्षा पूर्ण होतील. आपल्याला नवीन वाहन घेण्याचा योग आहे. आध्यात्मिक विषयाची आवड निर्माण होईल. स्वभाव मन मिळावु राहील. नवीन वाहन घर खरेदीचे योग आहेत. कला क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिकदृष्या लाभ होईल. आपला स्वभाव दृढनिश्चयी व उद्योगशील राहील. आकस्मिक धनलाभ प्राप्तीचे योग आहेत. मनात नसताना प्रवासाला जावे लागेत. तब्येत चांगली ठेवा. जुन्या मित्र मैत्रिणी आपणास पुन्हा भेटणार आहे.

मकरः 

आज कर्जफेड करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. व्यवसायिकांना चांगला दिवस आहे.  जोडीदारामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. घरामध्ये पाहुण्यांची वर्दळ राहील. तरुणांना नवीन मित्रमंडळी भेटतील. विद्यार्थ्यांनी आळसापासून दूर रहावे. मनासारख्या घटना घडण्यास पूरक दिवस आहे. सरकारी संदर्भातील व्यक्तींना देखील बढती मिळण्याचे योग आहेत. आर्थिक आवक उत्तम आल्याने समाधान व्यक्त कराल. जोडीदाराशी कुटुंबातील वातावरण एकंदरीत समाधानी राहील. गायन कलाकारांना प्रसिद्धीचे योग आहे. आपले आरोग्य मानसिक समाधानामुळे उत्तम राहील. आपल्या ध्येयप्राप्तीकडे वाटचाल करा.

कुंभः 

आज कर्जप्रकरण काळजीपूर्वक हाताळा. प्रत्येक गोष्टीसाठी निराश व्हाल. काळजी घ्यावी लागेल. निर्णय विचारपूर्वक घेणे जरुरीचे आहे. घरातील वातावरण ताण-तणावात्मक राहील. व्यवसायिकांचे उद्योगधंदयात लक्ष कमी होईल. विरोधी वातावरणाची काळजी घ्या. व्यापारात आर्थिक समस्या येऊ शकतात. स्थावर मालमत्तेबाबत अडचण येण्याची शक्यता आहे. व्यापारात सामंजस्य पणाची भुमिका घ्यावी. मनस्ताप होणाऱ्या घटना आपण टाळणं गरजेचं आहे. ध्येयापासून तुम्ही विचलित होऊ नका. बोलण्यावर संयम ठेवा. निरर्थक कामात आपला वेळ जाणार आहे. वेळेचा अपव्यय टाळा.

मीनः 

आज नवीन योजनेत कामाच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत. व्यवसायात आर्थिक तेजी आणि नेमकेपणा राहिल. सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल. आचरण उत्तम राहिल्यामुळे लौकिकता वाढेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चांगली कामे मिळतील. तुमची मत मांडाल आणि वाहवा मिळवाल. वारसाहकाने धन व संपत्ती लाभेल. नवीन कल्पना आखाव्या लागतील. व्यवसायानिमित्त प्रवास घडेल. जमीन खरेदी विक्रीतून उत्तम आर्थिक फायदा होईल. धार्मिक कार्य करण्याची इच्छा निर्माण होईल. वैवाहिक जोडीदाराला कार्यक्षेत्रात चांगली प्रगती करता येईल. घरासाठी चांगली खरेदी कराल. त्यामुळे सर्व खूष राहतील.

 

जय अर्जुन घोडके

(jaynews21@gmail.com)

(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)