आज मंगळवार ३० जानेवारी रोजी, चंद्र कन्या राशीतून व रविच्या नक्षत्रातुन भ्रमण करणार आहे. चंद्र-केतु युती, अतिगंड योग आणि कौलव करणाच्या प्रभावात कसा जाईल आजचा दिवस! वाचा राशीभविष्य!
आज लांबच्या प्रवासात अडथळे येऊ शकतात. आर्थिक गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावे. नको तेथे खर्च झाल्यामुळे चिडचिड होईल. करिअरमध्ये जास्त लक्ष दिल्यास यशस्वी व्हाल. कोणतेही संशोधन चांगले कराल. नको त्या गोष्टीचा आधार घेऊ नका. संधी समोर येऊन निघून जाऊ शकते. व्यावसायिकांना आर्थिक येणी येण्यास त्रास जाणवेल. नोकरीच्या ठिकाणी अडचणीचा सामना करावा लागू शकतो. स्थानबदलाची शक्यता आहे. रागाचा अतिरेक टाळावा. आळसाचा अतिरेक होईल.
आज आनंदी आणि उत्साही वातावरणात काम करत राहिल्यामुळे कामाचा दर्जा वाढेल. दुसऱ्यांना मदत करण्यात कायम पुढे राहाल. वातावरणात चैतन्य निर्माण करू शकाल. साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना मोठे यश लाभेल. नोकरीत मना सारखी बदली किंवा पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. व्यापारात आर्थिक आवक चांगली राहील. नवीन व्यवसायिक प्रस्ताव येतील. कुटुंबात आनंददायक वातावरण राहील. प्रवासातुन आर्थिक लाभ होऊ शकतो. वडिलांकडून आर्थिक सहकार्य लाभेल.
आज सर्व नकारात्मक गोष्टींना तोंड द्याल. उत्कृष्ट कल्पनाशक्ती आणि अंतःस्फूर्तीच्या जोरावर जनमानसात प्रभाव पाडाल. लोकांकडून काम करवून घ्याल. चिंतनातून सर्जनशीलता निर्माण कराल. तुमच्या कर्तृत्वाला वाव देणाऱ्या गोष्टी घडतील. कामाची उत्तम अंमलबजावणी कराल. प्रश्न व्यवस्थित हाताळाल. अडचणीवर मात करूनच संधी मिळते यावर विश्वास ठेवा. जास्तीत जास्त एकांतवास आवडेल. रोजगारात मनासारखी पदोन्नती व बदली होऊ शकते. कुटुंबात समाधान राहील व आंनदाची बातमी मिळेल. मनोधैर्य उंचावेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे.
आज स्वतःवरचा आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात त्रासापासून सुटका मिळणार नाही. उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. धीटपणे प्रसंगांना सामोरे जाल. मुलांची अभ्यासात प्रगती होईल. खेळाच्या क्षेत्रात करिअर करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी मिळतील. कष्टाने ध्येयपूर्ती होईल. नवीन योजना हाती घ्याल. एखादा मोठा आर्थिक व्यवहार होऊ शकतो. बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल. कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. व्यवसाया निमित्त प्रवास होईल.
आज व्यवसायात खूप काम कराल आणि त्याचा लाभही मिळेल, त्यामुळे आनंदी व उत्साही राहाल. सहकार्य उत्तम मिळेल. मित्रमंडळी बरेच दिवसांनी भेटतील. गप्पांमध्ये वेळ चांगला जाईल. वैवाहिक जीवनात कोणतेही टोकाचे निर्णय लगेच घेऊ नयेत. कलेत हाती घेतलेल्या कामात यशस्वी रहाल. नवीन प्रकल्प हाती येतील. केलेल्या कामाचे कौतूक होऊन मान-सन्मान वाढेल. प्रतिभेस वाव मिळेल. नोकरीत पदोन्नती मिळेल.
आज तुमचा दरारा निर्माण कराल. घरातील शांतता भंग होईल. वडिलोपार्जित इस्टेटीचे वाद चिघळतील. नोकरी धंद्यात आनंदी आणि उत्साही वातावरणामुळे कामाचा उत्साह वाढेल. खूप दिवसांपासून अडलेली ऑर्डर हातात पडेल. परदेशाशी संबंधित व्यवहारांना चालना मिळेल. व्यवसायाच्या ठिकाणी तरुणांचा आवडत्या व्यक्तीशी परिचय होईल. संवाद वाढेल. आर्थिक लाभ होईल. आपली स्थिती मजबूत होईल. कौटुंबिक सामंजस्य राहील. घर व वाहन खरेदीचा योग आहे.
आज अडकलेले पैसे हातात पडतील. श्रमसाफल्याचा अनुभव घ्याल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. परदेश प्रवासाचे बेत आखाल. जोडीदाराबरोबर सुसंवाद साधाल. स्वत:मध्ये असलेल्या कलेला न्याय द्याल. नवीन कल्पनांचा मागोवा घ्याल. कामानिमित्त परदेशगमनाच्या संधी मिळतील. महत्वाच्या कामात यश मिळेल. कुंटुबातील ज्येष्ठ व्यक्तीकडून विशेष सहकार्य मिळेल. मोठ्यांची मर्जी व मान राखाल. कुटुंबात सुखद वातावरण निर्माण होईल. खर्चावर काहीसे नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक योग उत्तम आहे. भरभराट होण्याची शक्यता असून बढतीचे योग आहे.
आज नोकरीत नवीन योजनेवर कार्य कराल. अपूर्ण राहीलेली कामे पूर्ण होतील. स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. धनलाभ होऊ शकतो. कौटुंबिक सौख्य लाभेल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. जोडीदाराच्या मनाचा विचारही करावा लागेल. संततीसाठी काही कारणास्तव पैसा खर्च करावा लागेल. नवीन गोष्टींची कास धराल. कलाकरांना संधी मिळतील. जिद्दीने कामाला लागाल. कलावंतांना उत्तम प्रसिद्धी मिळेल. घरामध्ये समारंभाचे नियोजन आपण उत्कृष्ट आखाल. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव वाढेल.
आज तणावाच्या प्रसंगांना सामोरे जावे लागेल. राजकारणी लोकांना आपली बाजू जनतेसमोर मांडण्यासाठी काहीतरी नवीन युक्ती शोधावी लागेल. रोग प्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे रोगांना आमंत्रण द्याल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. यंत्रावर काम करताना सांभाळून रहावे. थोड्या तापट स्वभावामुळे इतरांशी फटकून वागाल. कामकाजात व्यत्यय निर्माण होईल. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होईल. कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. कौटुंबिक समस्याकडे लक्ष राहणार नाही. शत्रुपक्ष वरचढ राहील. मानसिक स्वास्थ राखा.
आज आपल्या मताशी ठाम राहाल. उपासना करून आध्यात्मिक उंची गाठाल. नवनवीन योजना डोक्यात घोळतील आणि त्या राबवण्यासाठी कष्टाचे डोंगर उपसाल. जवळच्या प्रवासाचे बेत ठरवाल. परिस्थितीचा समन्वय साधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कराल. त्यामुळे दुसऱ्यांना आदर वाटेल. बुद्धी व तर्कसंगत वृत्तीने कार्यात यश मिळण्याचे योग आहेत. वेळेचा सदुपयोग करा. नोकरीमध्ये केलेल्या कामाचे महत्व वाढेल. औद्योगिक कार्यात नवीन योजनेतून लाभ होईल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक मदत मिळेल. नोकरीत नवीन संकल्पना मांडाल.
आज परदेशगमनासाठी अडचणी उद्भवतील. मनाविरुद्ध माघार घ्यावी लागेल. मुलांमध्ये चिकाटी आणि निग्रही वृत्तीचा अभाव दिसल्यामुळे त्यांना योग्यवेळी समज द्यावी लागेल. कर्तव्याशी प्रामाणिक राहा. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवेल. तुमच्या कामाचे श्रेय दुसर्याला मिळेल. व्यापारी वर्गाांनी कोणतेही महत्वपूर्ण निर्णय घेऊ नयेत. नोकरीत वरिष्ठ सदस्यांसोबत विवाद निर्माण होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी. अतिरिक्त ताणतणाव वाढेल. नव्या ओळखीवर फारसे विसंबून राहू नका.
आज समोरच्या माणसाच्या गूढ वागण्याचा थोडा त्रास होईल. कोणालाही जामीन राहू नये. दुसऱ्यांची मने दुखावली जाऊ शकतात. कुटुंबातील लोकांना तुमची ठाम मते पटणार नाहीत. तेथे वादविवाद होतील. थोडा उद्धटपणा टाळा. विधायक गोष्टी कराल पण भांडखोरपणाने इतरांची नाराजीही ओढवून घ्याल. आपल्या कार्यक्षेत्रात मितभाषी राहा अन्यथा अडचणीचा सामना करावा लागेल. मन लावून काम करा. भागीदारासोबत व्यवहार सामंजसपणे ठेवा.