आज भानुसप्तमीचा चंद्र मंगळाच्या राशीतुन आणि शनिच्या नक्षत्रातुन भ्रमण करीत आहे. कसा जाईल महिन्यातील पहिला शुक्रवार! वाचा राशीभविष्य!
आज ज्ञान आणि धडाडी यांच्या जोरावर सर्व गोष्टी तडीस न्याल. घरामध्ये अचानक एखाद्या गोष्टीला तोंड द्यावे लागेल. भाग्याची साथ चांगली मिळेल. मूड चांगला राहील. उद्योग धंद्यात विशेष लाभ मिळेल. व्यापारात चांगले बदल मोठे फायदेशीर ठरतील. वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. कोणाचाही द्वेष करू नका.
आज धार्मिक गोष्टींमध्ये पैसा खर्च कराल. गैरसमज होऊ नये असा संवाद साधावा. ध्येय गाठण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. कुटुंबाची चांगली साथ तुम्हाला मिळणार आहे. वडिलोपार्जित इस्टेटीसंबंधाच्या कामाला गती येईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. नवीन गृहपयोगी वस्तु खरेदी कराल. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. पदप्राप्ती, मानसन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. नवीन योजना पूर्णत्वास जातील. मित्रमंडळींचे सहकार्य लाभेल.
आज परदेशी गोष्टी खरेदीचे योग येतील. स्वच्छंदीपणा थोडी स्वार्थी वृत्ती ठेवणार आहात. घरामध्ये तुमच्या नवीन विचारांचे स्वागत होईल. आर्थिक निर्णय जबाबदारीने घ्यावे लागतील. दुसऱ्याच्या मनात काय चालले आहे याचा थांगपत्ता तुम्हाला बरोबर लागेल. स्वास्थ सांभाळा. मनमुटाव होऊ शकतो. अंहकारवृत्तीमुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे. कर्ज प्रकरणात काळजीपूर्वक व्यवहार करा.
आज धंद्यात चांगली प्रगती कराल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. आपल्या इष्ट देवतेची उपासना आणि चिंतन मानसिक स्वास्थ्यासाठी उपयोगी पडेल. कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. धाडसी निर्णय घ्याल. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य घ्या. अतीउत्साही होऊन निर्णय घेऊ नका. धनलाभाचा योग आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. कुटुंबासोबत दुरवरच्या प्रवासाचं नियोजन कराल.
आज कलाकारांना आपली कला लोकांसमोर सादर करण्याची संधी मिळेल. कौतुकास पात्र ठराल. धंद्यामध्ये योग्य समयसूचकता दिसून येईल. व्यापारात वाढ करणारा दिवस राहील. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल करावी. कौटुंबिक जिवन अनुकुल राहणार आहे. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. आर्थिक उलाढालीतून फायदा होईल.
आज दुसरा एखादा व्यवसाय चालू करण्याची शक्यता आहे. शेअर मार्केट मध्ये पैसा मिळेल. उत्तम प्रगती आणि नावलौकिक लाभेल. काम करण्याचा उत्साह वाढेल. त्यामुळे कामाला आपोआपच गती येईल. खरेदी विक्रीच्या व्यवहारात आर्थिक लाभ होईल. सकारात्मकेचे परिणाम दिसतील. आपल्या इच्छेप्रमाणे कार्य घडतील. आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेच आहे. आत्मविश्वासाचा अतिरेक करणे टाळा. कौटुंबिक सौख्य समाधानकारक राहील.
आज प्रत्येक काम फत्ते करणार आहात. संयमाची कसोटी तुम्हाला सांभाळावी लागेल. कुटुंबातील व्यक्तींचे उत्तम सहकार्य मिळेल. कामे उलटपालट होऊन जातील. रागाचा पारा एकदम चढल्यामुळे जवळचे लोक संभ्रमात पडतील. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. वारसाहक्कातुन धनलाभ संभवतो. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. आर्थिक मदत मिळेल. परदेश प्रवास होण्याची शक्यता आहे.
आज तुमच्याकडे चांगुलपणा असला तरी कधी कधी तुमचे वागणे सहनशक्तीच्या पलिकडे राहील. अतीआत्मविश्वासामुळे तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची कला नजरेत भरण्यासारखी समोर येईल. घरामध्ये स्फूर्तीदायक वातावरण निर्माण होईल. भागीदारा सोबत वाद विवाद टाळा. व्यावसायिक योजना गुप्त ठेवा. मानसिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. मनावर नियंत्रण ठेवून संयम राखावा.
आज एखादा निर्णय आर्थिक व्यय होण्यासाठी कारणीभूत ठरेल. परदेशगमनाचे योग येतील. तुमचा धाडसी स्वभाव दिसून येईल. विद्यार्थ्यांना अभ्यासाबाबत गोडी निर्माण होईल. बौद्धीक क्षेत्रात प्रगतीच्या संधी निर्माण होतील. पाठीची दुखणी डोके वर काढतील. व्यायाम आणि औषधोपचार या दोहोंची साथ मिळेल. प्रयत्नांना यश लाभेल. अपेक्षेप्रमाणे प्रगती होईल. विरोधकांवर मात कराल. रखडलेल्या कामास गती मिळेल. गुंतवणूक लाभ देणार आहे.
आज आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे खर्चिकपणाही वाढेल. अंधश्रद्धा ठेवण्यापेक्षा डोळसपणे एखाद्या गोष्टीचा विचार करायला लागेल. फायदा नुकसानीच्या घटना घडतील. विद्याभ्यासात प्रगती होईल. वाचनाची गोडी वाढेल. कंटूंबातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. मन समाधानी राहील. व्यापारानिमित्त प्रवास होईल. कुटुंबातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रवासात विशेष काळजी घ्यावी लागेल.
आज जोडीदाराचे सहकार्य उत्तम मिळेल. आर्थिक फायदा चांगला होईल. कामाचे उत्तम नियोजन कराल. स्थावर इस्टेटी संबंधी अचानक काही समस्या उद्भवण्याची शक्यता. स्वत:ची कामे स्वतःच केलेली बरी पडतील. मनाजोग्या अनुकुल घटना घडतील. वाहन खरेदीचे योग आहेत. कामकाजात अनुकुल स्थिती राहील. कुटुंबात वेळेचे नियोजन उत्तम कराल. घेतलेल्या निर्णयाचा फायदा होईल. आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. वैवाहिक सुख वाढेल.
आज आरोग्याच्या तक्रारी उद्भवल्यामुळे मन:स्वास्थ्य लाभणार नाही. घरात चैनीच्या गोष्टी खरेदी केल्यामुळे खर्चात वाढ होईल. दिवस कष्टदायक असणार आहे. वादविवादामुळे मानसिक त्रास वाढेल. मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न ठेवा. पारिवारिक सहकार्य लाभणार नाही. दुरवरचे प्रवास शक्यतो टाळा. अर्थप्राप्तीत अडथळे निर्माण होतील.
संबंधित बातम्या