मराठी बातम्या  /  Astrology  /  Horoscope Today 3 June 2023, Daily Rashi Bhavishya In Marathi

Horoscope today 3 June 2023 : शिव योग विष्टी करणात कोणत्या राशींना आज लाभणार दैवी पाठबळ; वाचा राशीभविष्य!

  Horoscope
Horoscope
Ninad Vijayrao Deshmukh • HT Marathi
Jun 03, 2023 06:34 AM IST

Rashi Bhavishya Today 3 June 2023 : काही राशींसाठी आजचा दिवस लाभदायक आहे तर काही राशींसाठी आजचा दिवस काळजी घेण्याचा आहे. हितशत्रू आणि इतर व्यक्ती त्रास देतील. आरोग्य सांभाळा. सप्ताहात बुधाच्या राशी बदलामुळे कोणत्या राशींना होणारं आकस्मिक धनलाभ जाणुन घ्या आपल्या राशी नुसार !

मेषः आज आर्थिक बाबतीमधील प्रकरणे सुरुळीत पार पडतील. कर्ज मंजूर होईल. विद्यार्थीवर्गासाठी आजचा दिवस शुभ राहिल. स्पर्धापरिक्षेत यश मिळेल. नोकरीत उपयोगी चर्चा घडुन येतील. टाळत असलेले काम पूर्ण होण्याचा योग आहे. व्यापारातील विस्ताराच्या दृष्टीने केलेल्या योजनात यशस्वी व्हाल. कला क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी व मानधनात वाढ होईल. कामाचे कौतुक होऊन मानसन्मान वाढेल. संततीच्या प्रश्नामध्ये निर्णायक यश मिळेल. वैवाहिक जीवनात पत्नीचा पूर्ण पाठिंबा मिळाल्याने आपले मनोबल वाढवणारा दिवस राहील. प्रवास लाभदायक होतील.

ट्रेंडिंग न्यूज

शुभरंगः तांबडा शुभदिशाः दक्षिण.

वृषभः आज आपणास विशेष सुस्थिती लाभणार नाही. हाती घेतलेल्या कार्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. मानसिक अशांती असल्याने संकटाचा सामना करावा लागेल. नोकरीत जबाबदारी नुसार कामे करा. कलह वाढविणारे प्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे. मानसिक पिडादायक दिनमान आहे. व्यवसायिक मंडळीने जपून आर्थिक करावे. शासकीय कर्मचारी असाल तर खोट्या प्रकरणात निष्कारण गुंतला जाल. आर्थिक हानी संभवते स्वभावातील मानीपणा हट्टीपणा सोडा. कुटुंबात कलहाचे वातावरण निर्माण होऊ नये याची दक्षता घ्यावी. मानसिक स्वास्थ सांभाळा.

शुभरंगः पांढरा शुभदिशाः पश्चिम.

मिथुन: आज बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तीकडून उत्तम कार्य घडतील. निरनिराळ्या कल्पना आमलात आणा. विद्ववत्तेत वाढ होईल. प्रतिष्ठीत व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. रोजगारात यश व लाभ मिळण्याची पुरेपुर शक्यता आहे. व्यवसायात विस्तारासंबंधी योजना आखाल. मनाजोग्या घटना घडतील. प्रभावशाली व्यक्तीमत्वामुळे आपल्या गोष्टी लोकपर्यंत पोहचवण्यात यशस्वी व्हाल.आर्थिक लाभ झाल्याने आनंदी रहाल. संततीविषयी चिंता मिटेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. धैर्य आणी संयम राखा. शुभप्रद घटना घडतील. लाभदायक दिनमान असेल.

शुभरंगः पोपटी शुभदिशाः उत्तर.

कर्क: आज प्रतिष्ठित व्यक्तींची भेट आपल्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. मानसिक संतुष्टी मिळेल. नोकरीत फार धोका पत्करणे सध्या तरी योग्य नाही. निर्णच चुकीचा ठरू शकतो. कर्मप्रधान रहा. बुद्धी व तर्कसंगत वृत्तीने कार्यात सफलता मिळण्याचे योग आहेत. व्यापारात नवीन योजनेमध्ये लाभ होईल. आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. विरोधकापासून सावध रहा. मुलाच्या संबंधाताले प्रश्न सुटतील. चैन करण्याकडे ओढा राहिल. कौटूबिक सौख्य लाभेल. सामाजिक मान सन्मान मिळेल. आंनदी राहाल.

शुभरंगः गुलाबी शुभदिशाः वायव्य.

सिंह: आज आपल्या कार्यक्षेत्रात प्रतिकूल फल मिळेल. मनोबल फारसे चांगले राहणार नाही. नोकरीत विचारपूर्व निर्णय घ्या. वरिष्ठांकडून कमी प्रमाणात सहकार्य लाभेल. अनिश्चततेमुळे अडचणी वाढतील. व्यापारिक वाद मतभेद होण्याची शक्यता आहे. जबाबदारीची कामे संभाळून करावीत. नोकरीत नव्या कल्पना सुचत असल्या तरी त्या विशेष फायद्याच्या ठरणार नाहीत. उत्पन्नापेक्षा खर्च होईल असी स्थिती राहणार आहे. मनामध्ये कुटुंबातील सदस्याच्या प्रति चिंता निर्माण होईल. आजारपण सतावेल. वाहने सावकाश चालवा. अपघाता सारखे प्रसंग घडण्याची शक्यता आहे.

शुभरंगः लाल शुभदिशाः पुर्व.

कन्या: आज आपल्या कार्यातून प्रतिष्ठा वाढणार आहे. पत्नी नोकरीत असेल तर प्रमोशन बढती व वेतनवाढीचा योग आहे. कौटूबिक पातळीवर संतुष्ट राहाल. नवीन मित्रमैत्रिणी भेटतील. नातेवाईकांसोबत वदविवाद टाळावेत. अनावश्यक कामासाठी वेळ वाया घालू नका. नोकरीत आपल्या कार्याचा विस्तार वाढणार आहे. व्यापारात प्रतिस्पर्ध्यावर नजर ठेवा. प्रतिस्पर्ध्यामुळे हानी होण्याची शक्यता आहे. सामाजिक यशात थोरामोठ्यांचा सहभाग अपेक्षित राहील. काहींना नवीन आर्थिक प्राप्तीचा मार्ग सापडेल. शुभसंदेश ऐकायला मिळतील. न्यायालयीन कामात यश येईल.

शुभरंगः हिरवा शुभदिशाः उत्तर.

तुला : आज आपल्याला मान-सन्मान मिळेल. शांत व विवेक बुद्धाने काम केल्यास यश मिळेल. नम्रता ठेवल्यामुळे व्यवसायात हमखाश यश लाभेल. कौटुंबिक स्थितीत सुधारणा होणार आहे. काहींना धनलाभाच्या संधी मिळतील. नवीन व्यवसायास सुरुवात करू शकता. आर्थिक स्थिती चांगलो राहिल. अनुकुल घटना घडतील. मनात प्रसन्नता असल्याने तुमच्या नियोजित कामात वेग येणार आहे. विरोधकांवर मात कराल. भागीदारांकडून नवीन लाभदायक प्रस्ताव येईल. प्रवासाचे नियोजन आखाल. संततीकडून मोठी बातमी ऐकायला मिळेल.

शुभरंगः नारंगी शुभदिशाः वायव्य.

वृश्चिक: आज व्यापारी वर्गास आपले व्यापार कौशल्य सिद्ध करता येईल. शेअर मार्केटमध्ये मोठी गुंतवणुक कायदेशीर ठरेल. रोजगारात महत्वाची भूमिका घ्याल. अनावश्यक चिंता करू नका. फायद्याच्या बातम्या ऐकायला मिळतील. सामाजिक राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना प्रसिद्धी लाभेल. रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये प्रतिकारक दिनमान आहे. घरातील समस्या दूर होतील. प्रेमप्रकरणात स्नेह वाढेल. जोडीदाराकडून सहकार्य लाभणार आहे. कुंटुंबातील वातावरण प्रसन्न राहिल. आपल्या कार्यक्षेत्रात कामात गुप्तता पाळावी. विद्याभ्यासात प्रगति राहिल.

शुभरंगः तांबूस शुभदिशाः दक्षिण.

धनु: आज राजकारणात चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. रागावर मात्र नियंत्रण ठेवा. भांवडासोबत वादविवाद टाळा. नातेवाईक मित्रमैत्रिणी बाबत अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. नोकरीत नवीन संधी आल्या तर स्वीकार करा. तणावमुक्त होऊन कार्य करा. आर्थिक बाबतीत कोणावर विसंबून राहू नये. वास्तु खरेदीविक्रीत कायदा होईल. मुलांच्या शिक्षणाबद्दल चिंता वाढवील. कुटुंबात धार्मिक विधी मंगल कार्य घडण्याची शक्यता आहे. जवळच्या व्यक्तींकडून उपयुका सल्ला मिळेल. संततीवर लक्ष ठेवा.

शुभरंगः पिवळा शुभदिशाः ईशान्य.

मकर: आज कुटुंबातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. भांवडाकडून मदत मिळेल. नोकरीत आपले कर्तुत्व सिद्ध कराल. जीवनात नवीन संधी निर्माण होतील. व्यापारिक स्पर्धेत यश मिळेल. व्यवसायात किंवा रोजगारात मोठे परिवर्तन घडून येण्याची शक्यता आहे. लोकप्रियता वाढणार आहे. शासनाकडून पैसा किंवा सन्मान मिळेल. जोडीदाराकडून सहकार्य लाभणार आहे. चांगल्या बातम्या ऐकण्यास मिळतील. चातुर्याने काम केले तर आजचा दिवस शुभ आहे. आर्थिकदृष्या अनेक मोठे प्रश्न हातावेगळे करू शकाल. प्रवासातुन लाभ होईल. परदेशगमनाची शक्यता आहे.

शुभरंगः जांभळा शुभदिशाः पश्चिम.

कुंभ: आज साहित्य कला लेखन कार्याकरिता विशेष लाभदायक ठरणार आहे. साडेसतीचा द्वितीय फेरा सुरु असला तरी तणावरहित चिंतामुक्त नवीन कार्यास आंरभ करा. यश निश्चितच लाभेल. आपला वाणीचा बुद्धीचा प्रभाव इतरावर राहिल. व्यापारात प्रतिष्ठा वाढेल. जुनायेणी उधारी वसुल होतील. नोकरदारांच्या मनाप्रमाणे घटना घडतील. विद्यार्थी तसेच महिला वर्गास उत्तम दिवस आहे. मित्रमैत्रीणीचे सहकार्य लाभेल. व्यापारात मोठे लाभ होतील. अपरिचित व्यक्तीकडून नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. कटुता निर्माण होईल असे बोलणे टाळावे.

शुभरंगः निळा शुभदिशाः नैऋत्य.

मीन: आज लाभदायक दिनमान आहे. व्यक्तीमत्वांचा प्रभाव जाणवेल. मन प्रसन्न राहिल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. नोकरीत प्रगतीकारक दिवस असुन नवीन चांगली संधी अथवा पदोन्नती होईल. आपण पूर्वी घेतलेल्या कष्टाचे फळ आपणास मिळेल. नविन मित्र भेटतील. दुसऱ्यावर सहज आपली छाप पडू शकेल. ग्रहयोग अनुकूल आहे. कला क्षेत्रातील व्यक्तींना आनंदाचा दिवस आहे. व्यापारात नवीन योजना यशस्वी होतील. कुटुंबातील सदस्यांसोबत स्नेह वाढेल. बेरोजगारांना रोजजाराची संधी मिळेल. स्थावर इस्टेटीपासून लाभ होईल. विद्यार्थ्याचे अभ्यासात लक्ष लागेल. व्यसनापासुन दुर रहा.

शुभरंगः केसरी शुभदिशाः ईशान्य.

जय अर्जुन घोडके

jaynews21@gmail.com

(लेखक ज्योतिष विद्येचे अभ्यासक आहेत.)

WhatsApp channel