Horoscope Today 3 January 2024: उत्तम आरोग्य, मालामाल होण्याची संधी! वाचा राशीभविष्य!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 3 January 2024: उत्तम आरोग्य, मालामाल होण्याची संधी! वाचा राशीभविष्य!

Horoscope Today 3 January 2024: उत्तम आरोग्य, मालामाल होण्याची संधी! वाचा राशीभविष्य!

Jan 03, 2024 08:03 AM IST

Horoscope Today 3 January 2024: आज ३ जानेवारी २०२४ बुधवार रोजी, दिवस शुभ असेल की अशुभ, लाभ होईल की नुकसान, किती संधी मिळेल, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे राशीभविष्य.

Horoscope 3 January 2024
Horoscope 3 January 2024

आज बुधवार ३ जानेवारी रोजी, चंद्र बुधाच्या कन्या राशीत गोचर करणार आहे. अशात चंद्राचा रवि आणि बुधाशी संयोग होईल. तसेच, चंद्र-केतु युती व राहु-चंद्र प्रतियोग आणि शोभन योगात दिवस कसा असेल! वाचा राशीभविष्य!

मेषः

आज वास्तु खरेदीचे योग आहे. भरपूर आर्थिक लाभ होईल. घरामध्ये चांगले वातावरण असेल आणि कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात काहीतरी नवीन करण्याचा विचार मनात येईल. बौद्धिक आणि शैक्षणिक कार्यात, व्यवसाय किंवा नोकरीमध्ये मान-सन्मान आणि लाभ मिळेल. नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. कामातून मिळणाऱ्या लाभात मन समाधानी राहील. धन लाभाचा दिवस आहे. दिवसाची सुरुवात अनेक सकारात्मक गोष्टींनी होईल.

वृषभ: 

आज मिळालेल्या लाभात मन समाधानी राहणार नाही. दुरवरचे प्रवास शक्यतो टाळा. खरेदी विक्रीचा व्यवहार आज करू नका. कौटुंबिक ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. व्यर्थ खर्च टाळावा आणि किरकोळ आजारांनाही गांभीर्याने घ्यावे. मौल्यवान वेळ वाया घालवू नये. दिनचर्येत ध्यान योगा आणि व्यायामाचा समावेश अवश्य करावा. कामकाज किंवा रोजगार क्षेत्रात आज निराशा होईल. वादविवाद आणि गैरसमज वाढतील असे बोलू नका. राग आणि चिडचिडेपणावर नियंत्रण ठेवा. काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.

मिथुन:

आज प्रॉपर्टीच्या कामात यश मिळू शकते. व्यापारात आर्थिक लाभ घडतील. शुभवार्ता ऐकायला मिळतील. मंगल कार्याचे नियोजन कराल. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक वृद्धी होईल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. परदेशाशी संबंधित कोणतीही स्वप्ने पूर्ण होऊ शकते, अनेक संधी निर्माण होऊ शकतात. संधी ओळखून पुढे जावे लागेल. नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित करणारा दिवस ठरेल. यश निश्चित लाभेल. बौद्धिक क्षेत्रात काम करण्याऱ्या व्यक्तींचा मानसन्मान होईल. व्यवसायात कार्यक्षेत्रात विस्तार होईल. आजचा दिवस आपल्यास अत्यंत शुभ फलदायी ठरेल.

कर्कः

आज नेतृत्वगुण विकसित होईल. नवीन प्रकल्पांमध्ये सहज व्यवहार करू शकाल. कौटुंबिक जीवन खूप चांगले ठेवाल. कलाक्षेत्रातील व्यक्तींना मान- सन्मान मिळेल. नोकरीत वेगळ्या कल्पना नक्की मांडा. वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. वडिलोपार्जित मालमत्तेबाबतचा जुना वादही मिटू शकतो. विरोधकांवर मात कराल. पदोन्नती व वेतनवाढीचा योग आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. शासकीय दप्तरी रखडलेली कामे मार्गी लागतील. पती पत्नीतील संबंध दृढ होतील. आजच दिनमान आत्मविश्वासाने परिपूर्ण राहील. आरोग्य उत्तम राहील. गुप्तपणे काम करत राहावे आणि यश मिळवावे.

सिंहः

आज कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्यावे. परस्पर मतभेद होऊ शकतात. जोडीदाराशी विवाद टाळा. रोजगारात विपरित प्रसंग घडतील. मनात नैराश्य निर्माण होईल. नुकसान होऊ शकते. विचार पूर्वक निर्णय घ्या. व्यापारात विनम्रतेने आणि संयमाने कामे करण्याचा प्रयत्न करा. क्रिडा क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधीचा योग आहे. नोकरीत स्थान बदल होईल. वेळेचा अपव्यय टाळा. प्रवासातून लाभ होणार नाही. प्रवास निरर्थक ठरतील. नोकरीत स्थान बदल होईल. प्रेमप्रकरणात वितुष्ट निर्माण होऊ शकते. संततीविषयी चिंता निर्माण होईल. दुर्व्यसनांपासून सावध राहा. घाई गडबडीतील निर्णय घेऊ नका. कमाईपेक्षा खर्च जास्त करू नका. येणाऱ्या खर्चामुळे चिंतीत राहाल.

कन्या:

आज कार्यक्षमतेमुळे फायदा होईल. पालकांकडून भरपूर सहकार्य मिळेल. नवीन कार किंवा घर घेण्याचे योग आहेत. कार्यक्षेत्रात सबुरीने वाटचाल करा. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक लाभ होईल. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संधी मिळतील. आपल्या कार्यक्षेत्रात स्वतःला सिद्ध कराल. व्यापारात उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यात यश येईल. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपक्षेप्रमाणे यश मिळेल. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपक्षेप्रमाणे यश येईल. दिवसभर मन प्रसन्न राहील. व्यापार उद्योगात फायदा होईल. सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मान सन्मानात वाढ होईल. व्यापारात नवीन भागीदारासोबत नवीन प्रकल्पाची सुरुवात कराल. खर्च मात्र विचार करून करा.

तूळ:

आज कोणतेही काम करण्यासाठी आत्मविश्वास वाढेल. उत्पन्नाचे अधिक स्रोत विकसित करण्याच्या स्थितीत असाल. तुम्ही कोणत्याही परीक्षेत यश मिळवू शकता. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वादही मिटतील. नवीन कार किंवा घर खरेदी करण्याची परिस्थिती होईल. पैसे चांगल्या कामांवर खर्च कराल. नोकरीत अनुकूल वातावरण लाभेल. शासकीय सेवेत नोकरदारासाठी सफलदायक दिवस आहे.कर्मावर विश्वास ठेवा. आपल्या कार्यक्षेत्रात धाडसी निर्णय घ्याल. भांवडाकडून मदत मिळेल. व्यापारात तुम्हाला भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल.  मानसन्मान मिळेल. आजचा दिवस ठरविल्याप्रमाणे कामे पार पाडण्यात उपयुक्त असा आहे. आर्थिक लाभ होतील. उन्नतीकारक दिवस आहे. 

वृश्चिक:

आज व्यवसायात काहीतरी नवीन करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला ठरू शकतो. विरोधकही शांत होतील. परदेशात नोकरी किंवा शिक्षणासाठी इच्छुक असलेल्यांनी प्रयत्न करावेत. राजकारणात काम करणाऱ्यांना यश मिळेल. नशीबाचे पाठबळ लाभणार आहे. नोकरीत मनाजोगे घडेल. नवीन प्रयोग यशस्वी होतील. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील.दुरचे प्रवास घडतील. परदेशगमनाचे योग आहेत. धार्मिक सामाजिक कार्यात सक्रियतेने भाग घ्याल. मित्रमंडळीचे सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात यश येईल. स्वतःच्या मनाने विचाराअंतीच निर्णय घ्या. आहारावर नियंत्रण ठेवा. साहित्यिक संपादन या बौद्धिक अधिष्ठान असणाऱ्या कार्यक्षेत्रात आपल्या कार्याचा विस्तार वाढेल. मानधनात वाढ होईल. नवनवीन कल्पना सुचतील. पदोन्नती होईल.

धनुः 

आज चंद्र गोचरात प्रतिकूल असल्याने प्रतिकूलता जाणवेल. वैवाहिक जीवनाबद्दल थोडे सावध राहावे लागेल. जोडीदाराशी वारंवार मतभेद होतील. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्त्रोत वाढवण्यासाठी कठोर परिश्रम कराल आणि त्याचे फायदे देखील मिळतील. गोड बोलण्याने बरीच कामे मार्गी लावता येतील. कलह होण्याची शक्यता राहील. भांडण टाळा. छोट्याशा कारणाने मन दुखावेल. प्रकृतीच्या समस्या उद्भभवतील. जोडीदाराशी स्नेहपुर्वक वागा. आर्थिक हानीची शक्यता वाटते. चिंता वाढविणारा दिवस असुन मनावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी.

मकर: 

आज चंद्रबल उत्तम राहणार आहे. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. कुटुंबातील वातावरण समाधानी आनंदी असेन. वरिष्ठाकडून सहकार्य लाभेल. व्यावसायिक जोडिदार भागीदारासोबत नवीन व्यापार प्रारंभास दिनमान अनुकुल राहिल. व्यवहार चातुर्य संयमी भूमिका घेतली तर मोठा आर्थिक लाभ होईल. कामाप्रती सजग रहा. मित्रांकडून आयकारक प्रस्ताव येतील. कुटुंबात मंगलकार्याची रुपरेखा नियोजन कराल. पत्नीचा सल्ला फायदेशीर ठरेल. सर्वच स्तरातील नातेसंबंधात स्नेह निर्माण होईल. कुटुंबातील वातावरण स्नेहपूर्वक राहिल. प्रमोशन मिळेल.

कुंभ: 

आज राहु-चंद्र प्रतीयोगात समिश्र दिनमान राहील. कौटुंबिक तणाव देत राहतील. परंतु कोणाचेही बोलणे मनावर घेऊ नका आणि संयमाने काम करा. कुटुंबातील सदस्यांसोबत सलोख्याने रहा. नोकरीत वरिष्ठांशी वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. शारिरिक त्रास जुना आजार उद्भभवण्याची शक्यता आहे. मानसिक दृष्टीकोनातून क्लेश उत्पन्न करणार दिनमान आहे. कुटुंबातील वरिष्ठ सदस्याच्या आरोग्याची काळजी घ्या. वैद्यकिय उपचारा वर खर्च होण्याची शक्यता आहे. व्यर्थ खर्च वाढतील.

मीन: 

आज कामे वेळेत पूर्ण कराल. नोकरीत वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. नोकरीत प्रगतीकारक दिवस असुन, नवीन चांगली संधी अथवा पदोन्नती होईल. आपण पूर्वी घेतलेल्या कष्टाचे फळ आपणास मिळेल. नविन मित्र भेटतील. रोजगारात कार्यक्षमतेमध्ये वाढ होईल. व्यावसायिकांना अपेक्षित यश लाभेल. कला क्षेत्रातील मनोरंजन विश्वातील मंडळीना उत्तम दिवस आहे. विद्यार्थ्यानी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. कुटुंबांवर वाहन घर खरेदीस अनुकूल दिवस आहे. आरोग्य स्वास्थ उत्तम राहील. ज्येष्ठ व्यक्तिंच्या सहवास लाभेल. कुटुंबातील वातावरण आनंददायक राहिल.

 

जय अर्जुन घोडके

(jaynews21@gmail.com)

(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)

Whats_app_banner