मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 3 february 2024 : अडचणी वाढतील की कमी होतील, कसा राहील आजचा दिवस! वाचा राशीभविष्य!

Horoscope Today 3 february 2024 : अडचणी वाढतील की कमी होतील, कसा राहील आजचा दिवस! वाचा राशीभविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Feb 03, 2024 09:26 AM IST

Horoscope Today 3 february 2024: आज ३ फेब्रुवारी २०२४ शनिवार रोजी, लाभ होईल की नुकसान, दिवस शुभ असेल की अशुभ, किती संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे राशीभविष्य.

Today Horoscope 3 february 2024
Today Horoscope 3 february 2024

आज शनिवार ३ फेब्रुवारी रोजी, चंद्र तूळ राशीत व विशाखा नक्षत्रात भ्रमण करत असून, गंड आणि वृद्धी योगात कसा जाईल आजचा दिवस? वाचा राशीभविष्य!

मेषः 

आज कार्यक्षेत्रात वरचढ ठरणार आहात. चैनीच्या वस्तू खरेदी करण्याचा मूड राहील. मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. व्यवहारात स्त्रियांच्या मध्यस्थीमुळे मनासारखी कामे होतील. मनाजोग्या व अनुकुल घटना घडतील. वाहन खरेदीचे योग आहेत. कुटुंबात वेळेचे नियोजन उत्तम कराल. कामकाजाला सुरुवात करा. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. व्यापारात वाढ विस्तार होईल. योग्यवेळी घेतलेल्या निर्णयाचा फायदा होईल. साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल.

वृषभः 

आज करिअरमध्ये मानसिक अस्वस्थता जाणवेल. वडीलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. खेळाडूंना लाभाचा दिवस आहे. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कलाकारांना कला क्षेत्रात वाव मिळेल. योग्य वेळी पैशाची व्यवस्था न झाल्यामुळे थोडी चिडचिड होईल. स्वप्नांचा संबंध वास्तवाशी लावण्याचा प्रयत्न करू नये. दिनमान कामाच्या दृष्टीकोनातून कष्टदायक असणार आहे. वादविवादामुळे मानसिक त्रास वाढेल. मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. पारिवारिक सहकार्य लाभेल. प्रवास शक्यतो टाळा.

मिथुन: 

आज मोहात न पडता कामे करण्याला प्राधान्य द्या. प्रयत्नाला महत्त्व द्यावे. मुलांच्या आवाक्याबाहेरच्या मागण्यांमुळे वैतागुन जाल. हृदयविकाराचा त्रास असणाऱ्यांनी पथ्यपाणी सांभाळा. प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार करणे आवश्यक ठरेल. घराकडे जातीने लक्ष द्याल. स्वभावात राग उत्पन्न होण्याची शक्यता आहे. मनमुटाव होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक टाळा. कर्जप्रकरण व्यवस्थित हाताळा. भावनावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक समस्याकडे लक्ष राहणार नाही. खर्च वाढेल.

कर्क: 

आज कष्टाचे चीज होईल. स्थावर इस्टेटीचे प्रश्न मात्र रेंगाळण्याची शक्यता आहे. निद्रानाशाचे विकार उद्भवू शकतात, याचे मुख्य कारण मानसिक अस्थिरता असू शकते. वाचनाची आवड जोपासाल आणि ज्ञानाचा आनंद घ्याल. गोड बोलून कामे करून घ्याल. आर्थिक स्थिती सुधारेल. एखादी फायदेशीर गुंतवणूक कराल. कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य घ्या. लेखन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंडळीना उत्तम दिवस आहे.

सिंहः 

आज खूप स्वप्ने रंगवली असतील. तर त्याची पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू होईल. काळजी करण्यापेक्षा काळजी घेण्याची सवय अंगी बाळगा. हुशारी आणि उद्योग प्रियतेमुळे यशाला खेचून आणाल. बौद्धीक क्षेत्रात काम करणारांना चांगल्या संधी मिळतील. व्यापार उद्योग क्षेत्रात मोठे निर्णय घेऊ नयेत. भागीदारासोबत वाद विवाद टाळा. व्यावसायिक योजना गुप्त ठेवा. देण्याघेण्याच्या व्यवहारात सावधपणा ठेवा. आर्थिक व्यवहार फार काळजीपूर्वक करा. मोठी आर्थिक गुंतवणूक आज टाळा. मित्रांची भागीदारीत मदत घ्यावी.

कन्याः 

आज तब्येत खूष राहील. सगळीकडे धडाडी दाखवाल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. ज्यांचे परदेशात व्यवहार आहेत त्यांना तेथून चांगले संकेत मिळाल्यामुळे छोटी ट्रीप करावीशी वाटेल. प्रकृतीचा कोणताही त्रास अंगावर काढू नये. नोकरी व्यवसायात घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांपासून लाभ होईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. नवीन गृहपयोगी वस्तु खरेदी कराल. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग आहे. पदप्राप्ती, मानसन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. मित्रमंडळींचे सहकार्य लाभणार आहे. शुभदिवस आहे.

तूळ: 

आज कामामध्ये अडथळे आले तरी चिकाटी ठेवून पुढे नेण्याची जबाबदारी ठेवावी लागेल. प्रेमप्रकरणातअडथळे संभवतात. कामाची गती मंदावेल. धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टीची जास्त आवड निर्माण होईल. व्यापारात वृद्धीचा दिवस राहील. कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. व्यापारी वर्गात व्यवसायात अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल करावी. कौटुंबिक जिवन अनुकुल राहणार आहे. जोडीदाराचे सहकार्य लागेल. आर्थिक बाबतीत लाभाचा दिवस राहील.

वृश्चिक: 

आज एक प्रकारची प्रेरणा आतून निर्माण होईल. प्रत्येक कामाचे खोलवर चिंतन कराल. कल्पनाशक्ती आणि दूरदर्शी पणाच्या जोरावर लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवाल. तुमची अध्यात्मिक साधना फळाला येईल. सामाजिक कार्यात रस घ्याल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. नवीन उमेदीने कामाला लागा. खरेदी विक्रीच्या व्यवहारात आर्थिक लाभ होईल. सकारात्मकेचे परिणाम दिसतील. खाण्या-पिण्याची पथ्य पाळा. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. व्यापारात आर्थिक लाभाची सुखद संधी मिळेल. कौटुंबिक सौख्य समाधानकारक राहील. दुरवरचे प्रवास लाभदायक होईल.

धनुः 

आज हाती घेतलेल्या कामात यशस्वी व्हाल. मुडी स्वभावामुळे तुम्ही जरा जगावेगळे वाटता. कोणत्याही गोष्टीसाठी पराक्रमाची शर्थ कराल. अडचणी येतील. परंतु एकंदरीत यशाकडेच वाटचाल राहील. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. इस्टेटीतून, वारसाहक्कातुन धनलाभ संभवतो. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. व्यापारात जुनी येणी वसूल होतील. नातेवाईक आप्तेष्टांकडून सहकार्य लाभेल. आर्थिक मदत मिळेल. मुलांच्या प्रगतीमुळे प्रसन्न वातावरण राहील. परदेश प्रवास होऊ शकतो.

मकरः 

आज आनंदी आणि उत्साही वातावरण लाभेल. आनंद अधिकच दुणावेल. घरात नवीन वस्तूंची खरेदी कराल. उत्तम महत्त्वाकांक्षा ठेवून कामे पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन करणार आहात. आपणास उद्योग धंद्यात विशेष लाभ मिळेल. व्यापारात चांगले बदल मोठे फायदेशीर ठरतील. वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल व मन प्रसन्न राहील. कोणाचाही द्वेष करू नका. व्यापार उद्योगात वाढ होईल. भागीदारांकडून उत्तम सहकार्य लाभेल. पत्नीसोबत गोडी व दुरावा असे दोन्ही अनुभव येतील.

कुंभः 

आज धार्मिक गोष्टी करण्यासाठी बराच पैसा खर्च कराल. आर्थिक स्थिती सुधारेल. मित्रमंडळींचे उत्तम सहकार्य मिळेल. मोठ्या भावंडांची मदत मिळेल. तुमच्या कामाचे लाभ तुम्हाला चांगले होतील. खेळाडूंना लाभदायक दिवस आहे. खाद्य पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल. बौद्धीक क्षेत्रात मानसन्मानाचे योग येतील. आपल्या प्रयत्नांना यश लाभेल. विरोधकांवर मात कराल. रखडलेल्या कामास गती मिळेल. कौटुंबिक पातळीवर वातावरण चांगले राहील. गुंतवणूक लाभ देणार आहे. विद्यार्थी प्रगती करतील.

मीनः 

आज वैवाहिक जीवनात थोडी तडजोड करावी लागेल. आळसामुळे कामे करण्यात थोडी दिरंगाई होईल. भावंडांशी मतभेद संभवतात. शेजाऱ्यांच्या गुप्त कारवायांमुळे त्रासून जाल. मुलांच्या मताशी सहमत न झाल्यामुळे तणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. शिक्षणात थोडे अडथळे संभवतात. व्यापारात फायदा नुकसानीच्या घटना घडतील. विद्याभ्यासात प्रगती होईल. कुटुंबातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. मन समाधानी राहील. 

 

जय अर्जुन घोडके

(jaynews21@gmail.com)

(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)