मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 3 April 2024 : आज बुधवार उत्तम ठरेल की दिवस चिंताग्रस्त राहील! वाचा राशीभविष्य!

Horoscope Today 3 April 2024 : आज बुधवार उत्तम ठरेल की दिवस चिंताग्रस्त राहील! वाचा राशीभविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Apr 03, 2024 10:16 AM IST

Horoscope Today 3 April 2024 : आज ३ एप्रिल २०२४ बुधवार रोजी, दिवस कसा जाईल, किती लाभ व संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे राशीभविष्य.

आजचे राशीभविष्य ३ एप्रिल २०२४
आजचे राशीभविष्य ३ एप्रिल २०२४

आज बुधवार ३ एप्रिल रोजी, नवमीचा चंद्र सुर्याच्या नक्षत्रातुन आणि शनिच्या राशीतून भ्रमण करीत आहे. वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!

मेष: 

आज सावधानीपूर्वक वाटचाल करावी. व्यापारात आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत. देण्याघेण्याचे व्यवहार लांबणीवर टाकणेच उत्तम राहील. इतरांना आर्थिक मदत करताना विशेष काळजी घ्या. अहंकार बाजूला ठेवा. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने अभ्यासाकडे लक्ष द्यावे. प्रवासात वादविवाद टाळा. वैवाहिक जीवनात छोटी मोठी तडजोड करावी लागेल. मानसिक अस्थिरता जाणवेल. मनमानी पद्धतीने काम करण्याची प्रवृती मात्र टाळा. 

वृषभ: 

आज वाद उद्भवला तर तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल. आर्थिक उलाढाल यशस्वी ठरेल. स्वत:च्या हिमतीवर कामे पूर्णत्वाला न्याल. पैशाची अडकलेली कामे पार पडतील. मोठ्या भावंडांची साथ चांगली मिळेल. व्यापारात फायदा होईल. प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत बढतीची संधी आहे. कल्पनाशक्तीला वाव मिळेल. विद्यार्थ्यांकडून विद्याभ्यासात प्रगती होईल. कौटुंबिक स्नेह निर्माण होईल. 

मिथुनः 

आज काम करण्यास उत्साह येईल. पण टोकाची भूमिका घेऊ नका. गुंतवणूकीकरीता उत्तम दिवस आहे. वारसा हक्काने धनप्राप्तीची शक्यता राहील. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. जिवनाचा मनसोक्त आनंद घ्याल. कामाच्या ठिकाणी कौतूक केले जाईल. शुभकार्यात सहभागी व्हाल. मानसन्मान मिळेल. यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील. 

कर्क: 

आज कामे मार्गी लागतील. दुसऱ्यांनाही कामाला लावाल. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी येतील. प्रवासात थोडा त्रास होण्याची शक्यता असल्यामुळे उत्तम नियोजन करणे आवश्यक ठरेल. कामात यश मिळेल. व्यापारात फसव्या योजनेवर विश्वास ठेवू नका. आर्थिक गुंतवणुक करताना विचारपूर्वक करा. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. परदेश भ्रमणाची शक्यता आहे. स्पर्धापरिक्षेत प्राविण्य मिळेल. कौटुंबिक सौख्य वाढेल. आळस दूर ठेवा.

सिंह: 

आज थोडा आळशीपणा कराल. तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. विशेषतः आईच्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक ठरेल. कष्टाला आपलेसे केलेत तर यश निश्चित मिळेल. मोठी आर्थिक गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. अंहकार आणी मोठेपणामुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे. वाईट सवयीचा त्याग करा. मनाची उद्विग्नता वाढेल. महत्वाची कामे शक्यतो आज टाळावीत. मन चिंताग्रस्त राहील. स्वतःच्या हिमतीवर कामे पूर्ण कराल.

कन्या: 

आज घरामध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. घरातील स्त्रियांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. झोपेच्या तक्रारी राहतील. व्यवसायात परिस्थिती ताण तणावात्मक राहील. यशाचा दिवस आहे. कायदेशीर कामात विलंब होईल. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य मिळणार आहे. महत्वाची कागदोपत्रे संभाळा. सुखचैनीच्या वस्तूत खर्च वाढेल. व्यापारी वर्गास मोठे व्यवहार फायदेशीर ठरतील.

तूळ: 

आज अंहकारी वृत्तीमुळे नुकसान होऊ शकते. मनःस्तापाचे प्रसंग येतील. कुटुंबातील आपसातील मतभेद वाढू नयेत याची काळजी घ्या. कोणताही विषय जास्त ताणू नये. आर्थिक प्राप्तीसाठी खुप झगडावे लागेल. स्पर्धकांच्यावर लक्ष ठेवा. मानसिक शारिरिक थकवा जाणवेल. मित्रमैत्रिणी बरोबर युक्तिवाद टाळावेत. मनात असंतोष निर्माण होईल.

वृश्चिक: 

आज घर सजवण्याचे स्वप्न साकार होईल. घरात उंची वस्तूंची खरेदी कराल. मुलांचे कौतुक ऐकायला मिळेल. धंद्यात वाढ होईल. कष्टाच्या मानाने लाभ कमी मिळेल. रोजगारात तुमची प्रगती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. व्यवसायात वाढ होईल. प्रगतीकारक ग्रहमान आहेत. तुमची पदोन्नती व प्रगती होईल. यश संपादनाची संधी मिळेल. अधिक लाभ होईल. अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

धनु: 

आज कार्यक्षेत्रात एक वेगळाच ठसा तुम्ही उमटवाल. जोडीदाराची साथ चांगली मिळेल. नवीन घर स्थावर खरेदीचे योग येऊ शकतात. व्यवसायात मनाप्रमाणे कामे मिळतील. व्यावसायिक किवा खाजगी कामासाठी प्रवास घडेल. नोकरीत योग्य मान सन्मान मिळेल. वाहन घर खरेदी करता योग आहे. व्यापारात नवीन बदलप्रयोग यशस्वी ठरतील. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. अध्यात्माविषयी श्रद्धा वाढेल. आर्थिक मदत मिळेल.

मकरः 

आज थोडे धाडस दाखवा, यशस्वी व्हाल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. सहलीचे बेत ठरतील. नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित होईल. उद्योग व्यापारात अर्थिक स्तोत्र निर्माण होतील. व्यापारात आर्थिक लाभ नक्की होणार आहे. मनोवांच्छित फळ मिळणार आहे. कुटूंबात स्नेह वाढेल. कुटुंबातून आपल्या कार्यास प्रोत्साहन मिळेल. स्वभावातील रागावर नियंत्रण ठेवा. आजचा दिवस यशप्राप्तीचा आहे मोठे आर्थिक व्यवहार करण्यास उपयुक्त दिवस आहे. आनंदाची बातमी मिळेल. 

कुंभ: 

आज घरापासून दूर राहण्याचे प्रसंग येतील. वडीलधाऱ्या व्यक्तींची काळजी घेणे आवश्यक आहे. वाहने जपून चालवा. तुमच्या स्वतंत्र आचार विचाराचे फायदे तोटे अनुभवास येतील. मानापमानाच्या कल्पना जास्त तीव्र होतील. नोकरीत ताण वाढेल. मनस्तापासारख्या घटना घडतील. प्रसिद्धिसाठी अधिक पैसा खर्च कराल. अपेक्षेनुसार यश लाभणार नाही. मनावर नियंत्रण ठेवून वाटचाल करा. प्रकृतीची विशेष काळजी घ्या. 

मीन: 

आज सहकार्य चांगले मिळणार आहे. आरोग्या बाबतीत उपचार वेळेवर घ्यावेत. हाताखालच्या लोकांचे सहकार्य उत्तम ठरेल. जवळच्या लोकांना उत्साह वाटेल. गुंतवणुकीच्या योजना फायदेशीर ठरतील. उत्पनात सुधारणा होतील. प्रकृती अस्वास्थ्य थोडे जाणवेल. पूर्वी केलेल्या कार्याचा मोबदला मिळेल. नोकरीत दुसऱ्याच्या कार्यात हस्तक्षेप करु नका. विद्यार्थीवर्गांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. जुनी घेणी वसुल होतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवास सुखकर व लाभदायक होतील. 

WhatsApp channel