Horoscope Today 29 November 2023: येणारा दिवस कसा जाणार याचं कुहल प्रत्येकाला असतं. तो चांगलाच असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण तसं होतंच असं नाही. त्यामुळंच आपलं भविष्य जाणून घ्यायची उत्सुकता माणसाला असते. मनुष्याच्या जन्म राशीनुसार आणि ग्रहांच्या स्थितीवरून ज्योतिषशास्त्र भविष्याबद्दल काही अंदाज वर्तवत असतं. त्याआधारे अनेक जण आपल्या दिवसाची आखणी करतात किंवा सतर्कता बाळगतात. त्यांच्यासाठी ज्योतिषविद्येचे अभ्यासक जय घोडके (jaynews21@gmail.com) सांगताहेत आजचं राशिभविष्य!
मेष : आजचा दिवस चांगला आहे. राहु-केतु व्यापारी आणि नोकरदारांसाठी चांगला दिवस आहे. खरेदी आणि शुभ कामासाठी चांगले दिनमान आहे. गुप्त शत्रू त्रास देणार असल्याने तुमच्या कामाबाबत गुप्तता ठेवा. आज प्रवासाचा योग आहे. आज विधायक कार्य तुमच्या हातून घडणार आहे.
वृषभ : आजचा दिवस चांगला आहे. नोकरीत आज बढतीचे योग आहे. व्यापारात आर्थिक प्रगती होईल. कामानिमित्त घरापासून लांब जावे लागणार आहे. जुनी देणी येतील. घरासंबंधी समस्या दूर होतील.
मिथुन : आज चांगला दिवस आहे. चंद्रगोचरामुळे मोठा आर्थिक लाभ होईल. ग्रहयोग चांगले आहेत. व्यवसायात भरभराट होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य मिळेल. प्रेमप्रकरणातील अडचणी दुर होतील.
कर्क : आज चांगले दिनमान आहे. तुमच्या मनात सकारात्मकता वाढेल. वैज्ञानिक क्षेत्रातील व्यक्तींकरिता दिवस चांगला आहे. आधी केलेल्या कामाचे शुभ फळे मिळतील. वडिलार्जित संपत्तीतून मोठा आर्थिक लाभ होणार आहे.
सिंह : आज दिनमान प्रतिकूल आहे. अनिष्ट ग्रहमान असल्याने मनस्ताप होईल. व्यावसायिक व्यक्तिंना जपून पाऊले टाकावे लागणार आहे. उद्योग धंद्यात काही व्यवहार अनपेक्षित फलदायी ठरतील. मोठे व्यवहार टाळा. आज आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कर्ज प्रकरणे टाळा.
कन्या : आज तुम्हाला संयमाने काम करावे लागणार आहे. मोठे आर्थिक व्यापार टाळा. व्यापारात मोठी गुंतवणूक टाळा. कायद्याच्या कचाट्यात अडकाल. नियम बाह्य काम चुकूनही करू नका. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका.
तुला : आजचा चांगला दिवस आहे. नोकरीत आणि व्यापारात परिश्रमाचा चांगला मोबदला मिळेल. व्यापारात चांगला फायदा होईल. कायदेशीर बाबी व्यवस्थित ठेवा अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. परदेशात जाण्याचा योग आहे. व्यापारात नव्या योजना सुरू केल्यास चांगला आर्थिक लाभ मिळणार आहे.
वृश्चिक : आजचा दिवस अनुकूल आहे. नोकरी व्यापारात मोठे आर्थिक लाभ मिळणार आहे. नियोजीत कामे वेळेवर पूर्ण करावी लागणार आहेत. परदेशगमनाचा योग आहे. लांबच्या प्रवासतून आर्थिक लाभ होतील. आज तुमच्या हातून चांगले काम होणार आहे.
धनु : आज प्रतिकूल दिनमान आहे. आत्मविश्वासाचा अतिरेक टाळा. प्रेमसंबंधात अपयश येण्याची शक्यता आहे. यामुळे भावनांवर नियंत्रण ठेवा. व्यापारात मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. गुप्त शत्रू त्रास देतील.
मकर: आजचा दिवस फायदेशिर ठरणार आहे. चंद्रगोचरात व्यापाराचा विस्तार होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी राखाल. व्यवसायातील वातावरण चांगले राहिल. जामीन राहणे टाळा अन्यथा मोठी फसवणूक होण्याची शक्यता आहे.
कुंभः आजच चांगला दिवस आहे. चंद्रभ्रमणात व्यापार व्यवसायातील आर्थिक समस्या दूर होईल. कायदेशीर कामे फायदेशिर ठरतील. नोकरीत समस्या दूर होईल. व्यापारात नविन योजना आखाल. त्या फायदेशीर ठरतील.
मीन: आजचा दिवस वाईट आहे. गुप्त शत्रू त्रास देतील. शत्रुपक्ष त्रास देतील. नोकरीत विरोधकावर लक्ष ठेवा. आहारावर नियंत्रण ठेवा. व्यसनापासून दूर राहावे लागर आहे.