मराठी बातम्या  /  Astrology  /  Horoscope Today 29 March 2023, Daily Rashi Bhavishya In Marathi

Horoscope today 29 March 2023 : आज दुर्गाष्टमीचा कसा असेल दिवस? वाचा राशिभविष्य !

Horoscope Today
Horoscope Today
Ninad Vijayrao Deshmukh • HT Marathi
Mar 29, 2023 05:33 AM IST

Rashi Bhavishya Today 29 March 2023 : अनेक राशींसाठी आजचा दिवस काळजी घेण्याचा. हितशत्रू आणि इतर व्यक्ती त्रास देतील. आरोग्य सांभाळा. सप्ताहात बुधाच्या राशी बदलामुळे कोणत्या राशींना होणारं आकस्मिक धनलाभ जाणुन घ्या आपल्या राशी नुसार !

मेषः आज जोरदार शुभ फळे मिळतील. उन्नतीकारक दिवस आहे. व्यवसायिकांनी सहकार्याकडून आर्थिक लाभ होणार आहेत. व्यापारात बदल प्रगती घडविणारे ठरतील. नोकरदार वर्ग कलाकारांना प्रसिद्धि बरोबर यश मिळवून देणारा योग आहे. आपण केलेल्या कष्टाचे चीज होईल. अचानक आर्थिक लाभ मिळेल. व्यवसायिकांना योजना पद्धतीने केलेल्या कामामुळे आर्थिक दृष्ट्या उन्नती होईल. तरुण तरुणींना नोकरी मिळण्यासाठी उद्याचा दिवस उत्तम राहाल. स्पर्धेमध्ये यश मिळेल. एकंदरीत आपल्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करणारा दिवस आहे.

ट्रेंडिंग न्यूज

शुभरंगः तांबडा शुभदिशा: दक्षिण.

वृषभः आज यश निश्चित लाभणार आहे. संततीचे सुख उत्तम रहिल. कौटुंबिक सुख उत्तम मिळेल. आकस्मिक धनलाभ होऊ शकतात. सामाजिक कार्यात मान सम्मान वाढेल. गृहसौख्यात उत्तम संयोग राहील. प्रसन्नतापूर्ण आणी आंनदी मन रहिल. आध्यात्माकडे ओढ राहिल. वाहन स्थावर जंगम मालमत्ता यात वृद्धी होईल. व्यापारी वर्गासाठी धन वृद्धिचा दिवस आहे. सरकारी कामकाजात यश येईल. गृहसौख्य उत्तम लाभेल. कुटुंबाविषयी स्नेह वाढेल. उत्तम दिनमान आहे. मुलाकडून आंनदाची बातमी मिळेल. कार्यक्षेत्रात प्रगती कराल. वैवाहिक जीवनात प्रेम व आपुलकी राहील.

शुभरंग: सफेद शुभदिशा: पश्चिम.

मिथुनः आजचा दिवस आर्थिक हानीकारण ठरणार आहेत. अंत्यत काळजीपूर्वक व्यवहार करा. भावनावर नियंत्रण ठेवून वाटचाल करा. स्वभावात राग मस्तर निर्माण होईल. धाडसी निर्णय अंगलट येऊ शकतात. नास्तिकता वाढीस लागेल. अनाठायी खर्च होईल. कामात रिस्क घेवू नका. मित्रमैत्रिणींची जपून निवड करावी.नातेवाईकांशी पटणार नाही. आनंदावर विरजण पडण्यासारख्या घटना घडतील. मनात एक प्रकारची खिन्नता राहणार आहे. प्रयत्नांची आणि कष्टाची पराकाष्ठा करावी लागेल. कुटुंबातील सदस्याच्या आजारपणाने त्रासुन जाल. खर्च वाढणार आहे.खर्चाने मन व्यथित होईल. मनात चिडचिडेपणा वाढणार आहे.

शुभरंग: पांढरा शुभदिशा: वायव्य.

कर्कः आज मानसिक स्वास्थ लाभेल. आंनदायक वातावरण राहिल. कलाक्षेत्रातील व्यक्तींना योगकारक दिवस आहे. नवीन प्रकल्प कामे मिळतील. मनातील अहंकाराची भावना टाळावी. आर्थिक लाभ होईल. नोकरीत कामे यशस्वी होतील. शैक्षणिक कार्यात लक्षणीय प्रगती होईल. कामानिमित्त घरापासून दुर जावे लागेल. मित्रमैत्रिणी मध्ये स्नेह वाढेल. मन समाधानी राहिल. व्यापारात नफ्यात वाढ होणार आहे. कौटुंबिक सौख्य ही उत्तम लाभेल. नवनवीन कल्पना सुचतील आणि आमलातही आणाल. मनोधैर्य चांगलेच उचांवेल. कला क्षेत्रातील मंडळींनी या शुभ दिनाचा फायदा करून घ्यावा. जोडीदाराकडून अपेक्षेप्रमाणे साथ मिळेल. मन आंनदी राहिल.

शुभरंग: पोपटी शुभदिशा: उत्तर.

सिंहः आज सराकात्मक मानसिकता आणि दिनमान फलदायी ठरणार आहेत. नोकरीत बदल किंवा बढतीचे प्रबल योग आहेत. नोकरीत नियोजित कामे वेळेवर कराल. नवनवीन कल्पना आमलात आणाल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. केलेल्या कार्यातून उत्तम धनप्राप्ती होणार आहे. व्यापारात धनवान होण्याचे योग आहेत. आकस्मिकपणे धनलाभ होईल. सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल. कौटुंबिक पातळीवर संतुष्ट राहाल. पत्नीकडून विशेष सहकार्य लाभेल. संततीकडून आनंदाची बातमी मिळेल. भागीदारीत लाभ होतील. आरोग्य उत्तम राहिल. मानसिक स्वास्थ लाभेल. प्रवासातुन लाभ होतील.

शुभरंग: लाल शुभदिशा: पूर्व.

कन्याः आज यश दायक दिनमान राहील. नोकरीत नवीन संधी मिळतील. आपल्या कार्यक्षेत्रात वाढ व विस्तार होईल. नोकरीत स्थान बदलाची उत्तम संधी आहे. बढ़ती व प्रमोशनचे योग आहेत. आजचा दिवस सफलतापूर्वक व्यतीत कराल. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य लाभेल. व्यापारात नविन योजनाची सुरुवात होऊ शकते. जुनी येणी वसुल होतील. उत्पनाचे स्तोत्र वाढतील. राजकिय सामाजिक कलाक्षेत्रातील व्यक्तींना योग्य लाभ व मानसन्मान प्राप्त होईल. शैक्षणिक कार्यात बौद्धिक कार्यात यश लाभेल. परदेशगमन होईल. प्रवासातून लाभ आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

शुभरंग: हिरवा शुभदिशा: उत्तर

तुलाः आज आपल्या कार्यक्षेत्रात भाग्याची साथ लाभणार आहे. दैवी पाठबळामुळे अल्प प्रयत्नात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. कलाकारांसाठी विशेषत: उत्तम दिवस आहे. आर्थिक स्थिती चांगली राहिल. व्यवसायिकांना नफ्यात वाढ होईल. गृहसौख्य उत्तम राहील. दिवसभर मन प्रसन्न असेल. पत्नी सौख्य लाभेल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. नोकरी व्यवसायात स्वतःच्या विवेक बुद्धीने निर्णय घ्या. आपल्याला यश नक्की मिळेल. शासकीय कामकाजात दिनमान उत्तम आहे. नवीन योजनाची सुरूवात होईल. परमेश्वरावर श्रद्धा वाढेल. आध्यात्मिक कार्य घडेल. साधु संत दर्शन घडेल.

शुभरंग: पांढरा शुभदिशा: वायव्य.

वृश्चिकः आज आपण सावधानीपूर्वक निर्णय घ्यावेत. रोजगारात धाडसी निर्णय घेणे टाळावेत. आपणा विषयी गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. मानसिक बौद्धिक ताण वाढणार आहे. व्यक्तिगत समस्या निर्माण होतील. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्या. आहारात नियमितता ठेवा. बुद्धीचे कामे अधिक करू नका. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल. चोरी अथवा नुकसानीची घटना घडण्याची शक्यता आहे. कर्ज घेणे आज टाळा. घाई गडबडीतील निर्णय अंगाशी येऊ शकतात. प्रवास नुकसानकारक राहिल. प्रवासात दुर्घटनेची शक्यता आहे. दुरवरचे प्रवास टाळावेत. आरोग्याबाबतीत विशेष लक्ष दयावे.

शुभरंग: केसरी शुभदिशा: नैऋत्य.

धनुः आज आपणास अनुकूल वातावरण निर्माण होईल. आत्मविश्वास द्विगुणित राहिल. व्यापारात भागीदारीत नवीन योजनेस प्रारंभ करण्यास उत्तम दिवस आहे. नोकरीत कर्तुत्वाला चांगली संधी निर्माण होईल. आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. आपले कर्तुत्व सिद्ध झाल्याने जनमानसात प्रतिष्ठा वर्चस्व प्रस्थापित कराल. व्यवसायात भरभराटी होण्याची शक्यता आहे. नवनवीन योजना कार्यान्वित करू शकाल. मोठ्या भांवडाकडून उत्तम सहकार्य लाभेल. अचानक लाभ होतील. कौटुंबिक वातावरण चांगले व आनंददायी रहिल. विद्याभ्यासात प्रगती राहिल. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा.

शुभरंग: पिवळसर शुभदिशा: ईशान्य.

मकरः आज आरोग्याबाबतीत विशेष काळजी घ्या. नोकरीत विरोधक आक्रमक होतील. नोकरीत अतिउत्साही आणि अतिरक पणा टाळा. मानसिक स्वास्थ सांभाळा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. साकारात्मक दृष्टीकोन ठेवून वाटचाल करावी. अनिश्चिततेमुळे वैचारिक धाडसामध्ये कमतरता येईल. व्यापारात कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. कर्जप्रकरणात काळजीपूर्वक व्यवहार करा.भावनावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक समस्याकडे लक्ष राहणार नाही. पत्नीच्या प्रकृतीची चिंता सतावु शकते. आरोग्याबाबतीत खर्चात वाढ होईल.

शुभरंग: जांभळा शुभदिशा: पश्चिम.

कुंभः आज दिनमान शुभदायक राहिल. आपल्या कार्यक्षेत्रात कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. धाडसी निर्णय घ्याल. आपल्या भूमिकेला वरिष्ठांकडून पसंती मिळेल. शासकीय कामकाजात यश येईल. राजाश्रय लोभल. राजदप्तरी मान सन्मान होईल. व्यवसाय रोजगारात उच्च ज्ञान किंवा नवे तंत्रज्ञान अंत्यत फायदेशीर ठरेल. महिला वर्गाना विशेष प्रगतीचा टप्पा गाठता येईल. कौटुंबिक पातळीवर समाधानी रहाल. भाऊबहिणीकडून पाठबळ मिळेल. भांवडाकडून आर्थिक मदतीची शक्यता आहे. सुखात समाधानात वृद्धी करणारा दिवस आहे. स्थावर मालमत्तेत वाढ होईल. सुखकारक दिनमान असेल.

शुभरंग: पिवळसर शुभदिशा: ईशान्य.

मीनः आज आपणास अत्यंत शुभ फलदायी आहे. व्यवसाय कलाक्षेत्रातील व्यक्तींना स्वकर्तुत्व सिद्ध करण्यास वाव राहील. तुमची पदोन्नती आणि प्रगती होईल. आपणास मेहनतीनुसार चांगल्या फलांची प्राप्ती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. प्रगतीकारक काळ आहे. विद्यार्थ्यांना नवनवीन क्षेत्रात यश संपादन करण्याची संधी मिळेल. प्रेमप्रकरणात यश येईल. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. व्यापार कारखानदार वर्गात व्यवसायात वाढ होईल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल कराल.अनुकुल वातावरण असणार आहे. मनोबल उंचावेल. मनशांती लाभेल.

शुभरंग: जांभळा शुभदिशा: नैऋत्य.

जय अर्जुन घोडके

jaynews21@gmail.com

(लेखक ज्योतिष विद्येचे अभ्यासक आहेत.)