मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 29 January 2024: महिन्याचा शेवटचा सोमवार कसा जाईल, बाप्पा कोणावर होतील प्रसन्न! वाचा राशीभविष्य!

Horoscope Today 29 January 2024: महिन्याचा शेवटचा सोमवार कसा जाईल, बाप्पा कोणावर होतील प्रसन्न! वाचा राशीभविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 29, 2024 08:48 AM IST

Horoscope Today 29 January 2024 : आज २९ जानेवारी २०२४ सोमवार रोजी, दिवस शुभ असेल की अशुभ, लाभ होईल की नुकसान, किती संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे राशीभविष्य.

Today horoscope 29 january 2024
Today horoscope 29 january 2024

आज सोमवार २९ जानेवारी रोजी, संकष्ट चतुर्थी असून, चंद्र सिंह राशीतून व शुक्राच्या नक्षत्रातुन भ्रमण करणार आहे. वक्री हर्षल मार्गी होत असून गुरूशी संयोग करीत आहे. आज शोभन योगात कसा असेल या सप्ताहातील पहिला सोमवार!वाचा राशीभविष्य!

मेष: 

आज आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी थोडं थांबावं लागेल. घरात व्यर्थ खर्च वाढतील. कोणतेही निर्णय घाईत घेऊ नयेत. नोकरी निमित्त घराबाहेर राहण्याचे योग येतील. दुसऱ्यांनी दिलेला सल्ला तुम्हाला आवडणार नाही. मानसिक स्थिती थोडीसी बिघडेल. मान अपमानचे प्रसंग घडतील. प्रतिस्पर्धी वरचढ होतील. वाहन व घर बदलण्याचे प्रसंग घडतील. लोकांचा विरोध व असहकार्य लाभेल. संतती व पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या. 

वृषभ: 

आज कलाकारांची कला बहरेल व संधी मिळतील. कामातील बदल तुमच्यासाठी उत्साहदायी ठरेल. उपासना करणार्‍यांना भक्ती आणि श्रद्धेची आर्द्रता जाणवेल. घरामध्ये मंगलकार्य होईल. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी चांगले ग्रहमान आहे. संततीसंबंधी तुमचे विचार वेगळे असतील घरातील काही प्रश्नांसाठी एकत्र तोडगे काढावे लागतील. उधारी वसूल होईल. विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाचे योग येतील. मन प्रसन्न राहील. व्यक्तीमत्वाचा प्रभाव राहील. 

मिथुन: 

आज उत्तम बुद्धीमत्तेचा योग्य वापर कराल. एखादा धाडसी निर्णय घ्याल. नवीन योजना राबविण्यात यशस्वी व्हाल. उच्च शिक्षण घेणाऱ्यांना योग्य संधी मिळतील. नवीन विचारांचा पाठपुरावा कराल. प्रगती पाहून मनाला समाधान लाभेल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मानसन्मानात वाढेल. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेन अधिक लाभ होतील. नवीन भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. 

कर्कः 

आज विचारपूर्वक निर्णय घ्या. थोडी संघर्षात्मक व विरोधात्मक परिस्थिती घरात आणि घराबाहेर निर्माण होऊ शकते. ताणतणाव जाणवेल. बौद्धीक कसरतीपेक्षा युक्तीने काही गोष्टी केल्या तर यश मिळू शकेल. नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. भांवडाकडून सहकार्य लाभेल. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. वाहन व घर खरेदीचा योग आहे. प्रगती होईल. खर्च मात्र विचार करून करा. मान-सन्मान मिळेल. कुंटुंबासोबत तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. 

सिंहः 

आज कामाचा दर्जा वाढवाल. संतुलित विचाराचा पाठपुरावा करण्याच्या फायदा होईल. फक्त रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कोणत्याही प्रश्नाची उकल तुमच्याकडून फार चांगली होत असल्यामुळे अनेक जणांचे सल्लागार बनाल. मानसिक अवस्था उत्तम राहील. मात्र अतिउत्साह व अतिरेकपणा टाळावा. नोकरीत अडकलेली कामे पूर्ण होतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. यश व मान-सन्मान मिळेल. विरोधकांची मने जिंकाल. भरभरटीचा दिवस आहे. नवीन प्रस्ताव हाती येतील. कामे पूर्णत्वास जातील. व्यवहारिक समस्या दूर होतील.

कन्या: 

आज व्यक्तीत्वामध्ये सुधारणा करावी असे सारखे वाटत राहील. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील. त्यामुळे वेळात वेळ काढून जोडीदारासाठी निश्चित वेळ द्याल. करमणुकीचे कार्यक्रम बघण्यात वेळ घालवाल. भाग्याची साथ तर चांगली मिळेल. त्यामुळे नवीन योजना राबवायला हरकत नाही. शासकीय सेवेतील मंडळीना देखील उत्तम दिवस आहे. आपल्या कार्यक्षेत्रात भरभराट होईल. भागीदाराची व्यवसायात मदत मिळेल. फसवणूक किंवा आर्थिक हानी होण्याची शक्यता राहील.

तूळ: 

आज आर्थिक अस्थिरता राहील जवळच्या प्रवासाच्या संधी मिळतील. परंतु प्रवासात काळजी घ्यावी. तुमच्या प्रेमळ स्वभावाचा इतर लोक फायदा घेणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. घरात सर्वांचीच चिडचिड होईल. मानसिक त्रास होईल. अनिद्रेचा त्रास जाणवेल. मनावर संयम राखण्याचा प्रयत्न करा. नोकरीच्या ठिकाणी कामात अडथळे निर्माण होऊ शकतात. व्यापारात समस्या निर्माण होतील. आज कर्ज घेणे देणे शक्यतो टाळावे. आर्थिक नुकसान होऊ शकते. मोठे व्यवहार उलाढाली यात फसगत होईल. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी.

वृश्चिकः 

आज कलाकारांच्या कलेला दाद मिळेल. नवनवीन कल्पना सुचतील, प्रयत्न कराल. परंतु लगेच यश मिळेल अशी अपेक्षा करणं चुकीचं ठरेल. तरुणांना प्रेमप्रकरणामध्ये यश मिळेल. आवडत्या व्यक्तीच्या संपर्कात याल. परंतु अभ्यासाकडे दुर्लक्ष होत नाही ना याची काळजी घ्यावी. कार्यक्षेत्रात परिवर्तन किंवा नवीन संधी चालून येतील. आपली कार्यक्षमता वाढेल. कार्यक्षेत्र विस्तारेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रयत्नांना यश मिळेल. मोठे पद, मानसन्मान व प्रसिद्धी मिळेल. आर्थिक लाभ चांगला होईल. व्यापारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल. 

धनुः 

आज आत्तापर्यंत घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. आयत्या वेळच्या खर्चासाठी मात्र तरतूद करून ठेवावी. गुप्तशत्रूंचा त्रास जाणवेल. नोकरीत नको तेथे धडाडी दाखवण्याची गरज नाही. तुमच्या बुद्धीमत्तेवर वरिष्ठ खूष होतील. त्यामुळे काही गोष्टी आपसूकच तुमच्या हिताच्या झाल्यामुळे तब्येत खूष होऊन जाईल. रोजगारात संतोषजनक परिणामाची आशा करू शकता. सामाजिक मान-सन्मान वाढेल. मोठा आर्थिक व्यवहार होऊ शकतो. आपल्या कडून वाद निर्माण होऊ शकतात. अतिरिक्त कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. यश मिळेल.

मकरः 

आज उच्च शिक्षणासाठी अनेक मार्गांनी संधी येतील. परदेशा संदर्भात काही अडलेली कामे मार्गी लागतील. घरामध्ये कळत नकळत ताणतणाव वाढल्याचे जाणवेल. जवळच्या प्रवासाचे बेत ठरतील. प्रसिद्धीचे योग येतील. एखादी गोष्ट भाग्यात असली तर मिळते याचा प्रत्यय येईल. यश मिळेल. नशीबाची साथ लाभेल. उत्तम दिवस आहे. बदल प्रगतीकारक ठरतील. आपल्या हातून आध्यात्मिक सामाजिक कार्य घडेल. 

कुंभः 

आज कर्ज हवे असणारांना त्याची तरतूद करता येईल. फक्त अंथरूण पाहून पाय पसरलेले चांगले राहील. मनावरचा ताण वाढेल. बौद्धीक आणि वैचारिक पात्रता वाढेल. कौटुंबिक जबाबदारीकडे लक्ष द्या. आहारात नियमितता ठेवा. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल. चोरी अथवा नुकसानीची घटना घडण्याची शक्यता आहे. अपचन पोटदुखी याकडे दुर्लक्ष करू नये. नोकरी व्यापारात त्रासदायक दिवस राहील. प्रवास नुकसानकारक राहील. 

मीनः 

आज जोडीदाराला समजून घेण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायातील समस्या सोडविण्याचे विविध पर्याय उपलब्ध होतील. प्रेमीजनांना अनुकूल काळ आहे. नोकरीमध्ये महत्त्वाची कामे स्वत:च करा. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. आर्थिक कामे होतील. आपणास अनुकूल वातावरण निर्माण होईल. अपेक्षित यश लाभेल. गृहसौख्य पत्नीची साथ मिळेल. व्यापारात लाभ होईल.

 

जय अर्जुन घोडके

(jaynews21@gmail.com)

(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)