मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 29 february 2024 : कोणत्या राशींसाठी सुखकर दिवस! वाचा राशीभविष्य!

Horoscope Today 29 february 2024 : कोणत्या राशींसाठी सुखकर दिवस! वाचा राशीभविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Feb 29, 2024 09:47 AM IST

Horoscope Today 29 february 2024 : आज २९ फेब्रुवारी २०२४ गुरुवार रोजी, लाभ होईल की नुकसान, दिवस शुभ असेल की अशुभ, किती संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे राशीभविष्य.

Horoscope Today 29 february 2024
Horoscope Today 29 february 2024

आज चंद्र तूळ राशीत संक्रमण करणार आहे. चंद्रदेव गुरू-हर्षल बरोबर प्रतियोग करीत आहेत. गजकेसरीयोग तसेच वृद्धी योग आणि तैतील करणाचा कसा प्रभाव राहील! वाचा राशीभविष्य!

मेष: 

आज तुम्हाला सहकार्य चांगले मिळणार आहे. आरोग्याबाबतीत उपचार वेळेवर घ्यावेत. तुमच्याकडे पाहून तुमच्या जवळच्या लोकांना उत्साह वाटेल. प्रकृती अस्वास्थ्य थोडे जाणवेल. पूर्वी केलेल्या कार्याचा मोबदला मिळेल. नोकरीत दुसऱ्याच्या कार्यात हस्तक्षेप करु नका. विद्यार्थीवर्गानी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. जुनी घेणी वसुल होतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवास सुखकर व लाभदायक होतील. गुंतवणूकीतून चांगला नफा मिळेल.

वृषभः 

आज काम करण्यास उत्साह येईल. कुठेही टोकाची भूमिका घेऊ नका. अती महत्त्वाकांक्षा असमाधान निर्माण करेल. वारसा हक्काने धनप्राप्तीची शक्यता राहील. संशोधन क्षेत्रात प्रगती कराल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. जिवनाचा मनसोक्त आनंद घ्याल. कामाच्या ठिकाणी कौतूक होईल. मानसन्मान मिळेल. यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील. 

मिथुन: 

आज कामे मार्गी लागतील. मानसिक स्वास्थ्य देणाऱ्या घटना घडतील. कामाच्या बाबतीत दुसऱ्यांना कामाला लावाल. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी येतील. प्रवासात थोडा त्रास होण्याची शक्यता असल्यामुळे उत्तम नियोजन करणे आवश्यक ठरेल. कामात यश मिळण्याचे योग आहेत. आर्थिक गुंतवणुक करताना विचार पूर्वक करा. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. कुटुंबात धार्मिक कार्य घडेल. प्रवासातुन लाभ होईल. 

कर्क: 

आज काही कामे असतील तर ती रखडतील. घरातील मोठ्या लोकांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. स्वतःच्या हिमतीवर कामे पूर्ण कराल. कष्टाला आपलेसे केलेत तर यश निश्चित मिळेल. मोठी आर्थिक गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. अंहकार आणी मोठेपणामुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे. मन चिंताग्रस्त राहील. वाईट सवयीचा त्याग करा. 

सिंह: 

आज घरामध्ये तुमचे विचार इतरांना पटणार नाहीत. त्यामुळे मतभेद होण्याची शक्यता आहे. घरातील स्त्रियांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. परदेशगमनात अडचणी आल्यामुळे परदेशी जाण्याचे बेत लांबणीवर पडतील. झोपेच्या तक्रारी डोके वर काढतील. शेअर बाजारात गुंतवणूक करताना अविचार होण्याची शक्यता आहे. व्यवसायात वादविवाद होऊ शकतात. वातावरण ताण तणावात्मक राहील.

कन्या: 

आज नुकसान होऊ शकते. वैवाहिक जीवनात ताणतणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. अती भावनाप्रधानतेमुळे मात्र मनःस्तापाचे प्रसंग येतील. आलेला पैसा ताबडतोब गुंतवणूक करणे हिताचे ठरेल. कोणताही विषय जास्त ताणू नये. स्पर्धकांच्यावर लक्ष ठेवा. मानसिक शारिरिक थकवा जाणवेल. मोठे व्यवहार टाळावेत.

तूळ: 

आज घर सजवण्याचे स्वप्न साकार होईल. घरात उंची वस्तूंची खरेदी कराल. मुलांकडून त्यांच्या धाडसाचे कौतुक ऐकायला मिळेल. धंद्यात वाढ होईल. राजकारणी लोकांना आपला मान जपण्यासाठी संपर्क वाढवावा लागेल. कष्टाच्या मानाने लाभ कमी मिळेल. तुमची पदोन्नती व प्रगती होईल. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळेल. कलाक्षेत्रातील महिला अनुकूल प्रगतीच शिखर गाठतील. अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

वृश्चिक: 

आज करिअरमध्ये तुमच्या चपळ कार्य क्षमतेमुळे आपापल्या कार्यक्षेत्रात एक वेगळाच ठसा तुम्ही उमटवणार आहात. जोडीदाराची साथ चांगली मिळेल. नवीन घर स्थावर खरेदीचे योग येऊ शकतात. तुमचे एखाद्या विषयामध्ये जेवढे ज्ञान असेल त्याप्रमाणे पैसा निश्चित मिळणार आहे. त्या दृष्टीने पुढे जायला हरकत नाही. कामासाठी प्रवास घडेल. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ होईल. 

धनु: 

आज नवीन योजना यशस्वी होतील. मनःशांती मिळेल. यशस्वी व्हाल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. सहलीचे बेत ठरतील. नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित होईल. उद्योग व्यापारात अर्थिक स्तोत्र निर्माण होतील. कुटूंबात स्नेह वाढेल. रागावर नियंत्रण ठेवा. आजचा दिवस यशप्राप्तीचा आहे मोठे आर्थिक व्यवहार करण्यास उपयुक्त दिवस आहे. आनंदाची बातमी मिळेल. 

मकरः 

आज अहंकार बाजूला ठेवायला हवा. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने अभ्यासाकडे लक्ष द्यावे. प्रवासात वादविवाद टाळा. वैवाहिक जीवनात छोट्या मोठ्या तडजोडी कराव्या लागतील. कुटुंबातील इतर व्यक्तींमुळे त्रास सहन करावे लागतील. कोणतेही महत्वाचे निर्णय आज घेऊ नयेत. सावधानीपूर्वक वाटचाल करावी. आर्थिक मदत करताना विशेष काळजी घ्या.

कुंभः 

आज वादाचे मुद्दे उत्पन्न झाले तर तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल. आर्थिक उलाढाली यशस्वी ठरतील. विश्वासाला न्याय देण्यासाठी जीवाचं रान कराल. स्वत:च्या हिमतीवर कामे पूर्णत्वाला न्याल. पैशाची अडकलेली कामे मात्र पार पडतील. याबाबत मध्यस्थ म्हणून जवळच्या मित्राची खूप मदत होईल. व्यापारात फायदा होईल. जोखमीच्या व्यवहारात मात्र सावधानी बाळगा. आहारावर नियंत्रण ठेवावे. व्यसनापासून दूर राहा. 

मीन: 

आज खर्चाला अनेक वाटा फुटतील. वाहने जपून चालवा. तुमच्या स्वतंत्र आचार विचाराचे फायदे तोटे अनुभवास येतील. मानापमानाच्या कल्पना जास्त वाढतील. नोकरीत ताण वाढेल. मनस्तापा सारख्या घटना घडतील. प्रसिद्धिसाठी अधिक पैसा खर्च कराल. अपेक्षेनुसार यश लाभणार नाही. प्रकृतीची विशेष काळजी घ्या. व्यापारात विनम्रतेने आणि संयमाने कामे कण्याचा प्रयत्न करा. 

WhatsApp channel