मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 28 January 2024: आजचा दिवस भाग्यदायक, रविवार ठरणार सुख-संपत्तीचा! वाचा राशीभविष्य!

Horoscope Today 28 January 2024: आजचा दिवस भाग्यदायक, रविवार ठरणार सुख-संपत्तीचा! वाचा राशीभविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 28, 2024 09:32 AM IST

Horoscope Today 28 January 2024: आज २८ जानेवारी २०२४ रविवार रोजी, दिवस शुभ असेल की अशुभ, लाभ होईल की नुकसान, किती संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे राशीभविष्य.

Horoscope Today 28 January 2024
Horoscope Today 28 January 2024

आज रविवार २८ जानेवारी रोजी, चंद्र सुर्याच्या राशीतुन आणि केतु-शुक्राच्या नक्षत्रा तुन भ्रमण करणार आहे. मघा नक्षत्रातून चंद्र पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात जाईल आणि सिंह राशीत संक्रमण करेल. आज चंद्र आपल्या अनुकूल राशीत असल्यामुळे अनेक शुभ योगायोगही फलदायी ठरतील. वाचा राशीभविष्य!

मेषः 

आज महत्त्वाची कामे रखडतील. व्यवसायात एखादी योजना रद्द होईल. संवेदनशील स्वभावामुळे नुकसान होऊ शकते. घरातील स्वास्थ्य जास्तीत जास्त टिकवण्याचा प्रयत्न कराल. निष्काळजीपणा घातक ठरेल. धैर्याने आणि संयमाने काम करा. व्यापारात मोठी गुंतवणूक करू नये. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीकरिता अनिष्ट दिवस आहे. मनोबल विचलित होण्याची शक्यता आहे. कायद्याच्या चौकटीत राहुन कामे करावीत. प्रवास शक्यतो टाळा. व्यापारात मोठी गुंतवणूक करू नका. आर्थिक हानी होईल.

वृषभ: 

आज कामात मान सन्मान मिळतील. प्रवासात पैशाचा व्यय होऊ शकतो. अशा परिस्थितीत प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार कराल आणि कंटाळा न करता कामाला लागाल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. घरामध्ये प्रत्येकाची उगीचच काळजी कराल. मनःस्वास्थ्य हरवून बसाल. धाडसी निर्णय घेण्याची शक्यता आहे. कामात यश मिळाल्याने आनंदी राहाल. व्यापारात उत्पन्नात वाढ होईल. कायदेशीर बाबी पूर्ण करा. आर्थिक स्त्रोत वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.  विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते.  नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी यशस्वी दिवस आहे.  जनमानसात प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल.

मिथुनः 

आज कार्यात सहभागी व्हाल. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक करायला हरकत नाही. ज्यांना व्यसन आहे त्यांनी ते कमी करावे. भागीदारीच्या धंद्यात एकमेकांचे मत पटणे अवघड राहील. गूढ गोष्टींची आवड निर्माण होईल. स्वतंत्र विचार कराल. व्यवसायात लाभ होतील. व्यापारात आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबावर खर्च होईल. नियोजीत काम वेळेवर पूर्ण कराल. प्रवासाचे योग आहेत. आर्थिकदृष्ट्या प्रवास लाभदायक ठरतील. पद प्रतिष्ठा लाभेल. 

कर्कः 

आज झोपेची तक्रार राहील. अडलेली कामे मार्गी लागतील. दुसरे काय म्हणतात यापेक्षा तुमचे अंतर्मन तुम्हाला काय सांगते याचा विचार करावा. काम करण्यासाठी बुद्धीबरोबर चिकाटीही हवी. घरातील दोन पिढ्यांमध्ये संघर्ष संभवतो. आपल्या जबाबदाऱ्या ओळखून त्या पूर्ण कराल. आत्मविश्वासाचा अतिरेक करणे टाळा. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहील. विरोधक डोके वर काढतील. कौटुंबिक समस्या उद्भभवतील. मानसिक स्वास्थ सांभाळा. अनावश्यक कामात वेळ वाया घालू नका. कामचुकारपणा करू नका. प्रवास टाळा.

सिंहः 

आज उधारी वसूल होईल. यश मिळाल्यामुळे कष्टाचे काही वाटणार नाही. कामातील बदल तुम्हाला बरेच काही शिकवून जाईल. व्यवसायात आपल्या मतावर ठाम राहणार आहात. मनावर थोडा ताण येईल. हाती आलेला पैसा कुटुंबातील अडचणींवर खर्च होईल. कामकाजाचा विस्तार होईल. नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा.  भागीदाराकडून मदत मिळेल. विरोधकावर मात करू शकाल. आर्थिक हानी होण्याची शक्यता राहील. बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना भरभरटीचा दिवस आहे. एखाद्या विधायक कार्याची मुहूर्तमेढ रोवली जाईल. सहकार्य मिळेल. नवीन प्रकल्प कामे पुर्णात्वास जातील.

कन्याः 

आज घरातील अनेक अडचणी सोडवाल. ध्येयाजवळ पोहचण्याचा फार मोठा गुण तुमच्यामध्ये आहे. त्यामुळे सगळ्यावर मात कराल. एखादी छोटी सकारात्मक गोष्टसुद्धा तुम्हाला खूप मोठा आनंद देवून जाईल. तुमच्या आकर्षक बोलण्यामुळे तुमची कामे पटकन होऊन जातील. कामाचा दर्जा सुधारेल. त्यामुळे आर्थिक भरभराट व्हायलाही मदत होईल. व्यापार व्यवसायातील आर्थिक समस्या दूर होईल. मनोबल उंचावेल. कायदेशीर कामात यश मिळेल. धाडसी निर्णय घ्याल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा.

तूळ: 

आज सामाजिक क्षेत्रात मान मिळेल. काम करण्यात आनंद वाटणार नाही. वेळेवर कामे दिली नाहीत तर पुढच्या कामावर त्याचा परिणाम होईल. कौटुंबिक कामाचा बोजा तुमच्यावर पडला तरी शांततेने त्याचे नियोजन करायला लागेल. अनिद्रेचा त्रास जाणवेल. शत्रुपक्ष वरचढ राहील. नोकरीत विरोधकावर लक्ष ठेवा. कार्यक्षेत्रात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. आहारावर नियंत्रण ठेवा. व्यसनापासून सावध राहा. फसगत होईल. आज कर्ज घेणे देणे शक्यतो टाळा. आरोग्याची काळजी घ्यावी.

वृश्चिकः 

आज कामासाठी दिनमान मंगलमय आहे. घरातील वाद संपुष्टात येऊन गृहसौख्यात भर पडेल. धंद्यात नवनवीन प्रयोग कराल. सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍यांना काम केल्याचे समाधान मिळेल. प्रेम प्रकरणात यश येईल. जनमानसावर तुमची विलक्षण छाप पडेल. जनसंपर्क वाढल्याने फायदा होईल. कामकाजात गुप्तता बाळगा. व्यापारासाठी प्रवास होण्याचा योग आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे.

धनुः 

आज धार्मिक गोष्टी करण्याकडे कल राहील. अडलेली कामे मार्गी लागतील. सद्गुरूंचा वरदहस्त राहील. तुमच्यातील सद्गुणांची लोक कदर करतील. कुटुंबामध्ये तुमच्या सल्ल्याला महत्त्व राहील. परदेशगमनाचे योग येतील. त्यामुळे फायदाही होईल. आत्मविश्वासाने पावले पुढे टाकाल. अध्ययन आणि अध्यापन यामध्ये विशेष गोडी घ्याल. आनंदाच्या बातम्या ऐकायला मिळतील. अहंकाराची भावना टाळावी. आर्थिक लाभ होईल. नोकरीत कामे यशस्वी होतील. शैक्षणिक कार्यात लक्षणीय प्रगती होईल. कामानिमित्त घरापासून दुर जावे लागेल. मित्रमैत्रिणी मध्ये स्नेह वाढेल. मन प्रसन्न व समाधानी राहील. 

मकरः 

आज कामाचे उत्तम नियोजन करणार आहात. किर्ती प्रसिद्धीचे योग संभवतात. स्वतंत्र विचार कराल आणि ते अमलातही आणाल. उत्तम कल्पनाशक्तीचा आविष्कार तुमच्यात पहायला मिळेल. खेळाडूंना आपापल्या क्षेत्रात वाव मिळेल. व्यवसायात व्यवहार जास्त सांभाळाल. दूरदृष्टी ठेऊन कामाची आखणी कराल. जुनी मित्रमंडळी भेटतील. मोठा आर्थिक लाभ होईल. मनासारख्या घटना घडतील. आकस्मिक धनलाभ होण्याचा योग आहे. सहकार्य लाभेल. नवीन योजनेची सुरुवात कराल. जोशपूर्वक कामात रस घ्याल.

कुंभः 

आज आवडत्या व्यक्तीबरोबर वेळ मजेत घालवाल. घर किंवा वाहन खरेदी कराल. प्रवासामध्ये चीजवस्तू सांभाळा. मुलांच्या अभ्यासात जास्त लक्ष द्यावे लागेल. अती संवेदनशील असल्यामुळेच थोडा तापटपणाही वाढेल. तुमच्या वागणुकीमुळे जवळचे लोक संभ्रमात पडतील. व्यवसायात धाडसाची कामे कराल आणि त्यात यशस्वी व्हाल. आर्थिक ओढाताण संपेल. मनात सकारात्मकता वाढेल. आपल्या प्रतिभेस वाव मिळेल. प्रगती होईल व नावलौकिक वाढेल. गत काळात केलेल्या कार्यातून मोठे लाभ होऊ शकतात. वडिलार्जित प्रॉपर्टीत लाभ होईल. 

मीनः 

आज वैवाहीक जीवनात वाद जास्त ताणू नका. खर्च वाढल्यामुळे आर्थिक बाबतीत उगीच चिंता कराल. कोणालाही उसने पैसे देऊ नका. कुटुंबातील काही व्यक्तींमुळे मानसिक त्रास होऊ शकतो. आपल्याला मनस्ताप करावा लागेल. उद्योग धंद्यात काही व्यवहार अनपेक्षित फलदायी ठरणार आहेत. अनावश्यक राग आणि तापटपणा टाळा. आत्मविश्वास आणि अतिउत्साहीपणा टाळावा. गुढशास्त्रे अध्यात्म वाचनात रस वाटेल. विचारपूर्वक निर्णय घ्या.