मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 2८ february 2024 : आज कोणत्या राशींवर होईल गणेश कृपा! वाचा राशीभविष्य!

Horoscope Today 2८ february 2024 : आज कोणत्या राशींवर होईल गणेश कृपा! वाचा राशीभविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Feb 28, 2024 08:50 AM IST

Horoscope Today 28 february 2024 : आज २८ फेब्रुवारी २०२४ बुधवार रोजी, लाभ होईल की नुकसान, दिवस शुभ असेल की अशुभ, किती संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे राशीभविष्य.

Horoscope 28 february 2024
Horoscope 28 february 2024

आज चंद्र बुधाच्या राशीतुन आणि मंगळाच्या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. चंद्रमा मंगळ, प्लुटोशी नवमपंचम योग करीत असुन गंड योगात कसा असेल बुधवार! वाचा राशीभविष्य!

मेषः 

आज एखादी गोष्ट धडाडीने करण्यात तुमचा पुढाकार राहील. कर्जाची परतफेड उत्तम प्रकारे करू शकाल. मुलांच्या अडचणी समजून घेण्यात यशस्वी व्हाल. जगावेगळ्या गोष्टी करण्याकडे कल राहील. स्पर्धा परिक्षा विद्यार्थ्यांसाठी शुभयोग आहे. नोकरीत अनुकुलता जाणवेल. शासकीय नोकरदारासाठी यशाचा दिवस आहे. कामात यश मिळेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. अपेक्षित यश लाभेल. 

वृषभः 

आज जेवढी कामे उरकता येतील तेवढी उरकणार आहात. मालमत्तेसंबंधी महत्त्वाचे निर्णय घेणार आहात. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने मात्र तडजोड करावी लागेल. अतिउत्साह व अतिरेकपणा मात्र टाळावा. नोकरीत अडकलेली कामे पूर्ण होतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आपले प्रयत्न यशस्वी होतील. मान सन्मान मिळेल. कामे पूर्णत्वास जातील. व्यवहारिक समस्या दूर होतील. आरोग्य उत्तम राहील.

मिथुन: 

आज बौद्धिक बाबतीत उत्कृष्ट फळे मिळतील. मुलांशी मतभेद होतील. नोकरी व्यवसायात जोखमीचे निर्णय टाळा. धंद्यात कोणत्याही प्रकारची नवीन गुंतवणूक करू नये. अनिद्रेचा त्रास जाणवेल. मनावर संयम राखण्याचा प्रयत्न करा. कामात अडथळे निर्माण होऊ शकतात. चिंताग्रस्न मन राहील. कर्ज घेणे देणे शक्यतो टाळावे. फसगत होईल. आरोग्य बाबतीत विशेष काळजी घ्यावी.

कर्क: 

आज प्रेमवीरांना आपले प्रेम आवडत्या व्यक्तीसमोर व्यक्त करण्यास चांगला दिवस आहे. आर्थिक घडी चांगली बसेल. हाताखालच्या लोकांचे सहकार्य उत्तम मिळाल्यामुळे कामाची गती वाढेल. आपल्या कार्यक्षेत्रात भरभराट होईल. कामकाजाचा विस्तार होईल. आर्थिक हानी होण्याची शक्यता राहील. विरोधक आक्रमक होतील त्यांचा पराजय करण्यात यशस्वी व्हाल.

सिंह: 

आज विवाह इच्छुकांचे विवाह जमतील. प्रेमप्रकरणामध्ये तरुणांना यश मिळेल. काही कामे अडली असतील तर ती पार पडतील. आत्मविश्वास वाढल्यामुळे नियोजित कामात चांगली प्रगती कराल. निश्चितच कामकाज किंवा रोजगारात संतोषजनक परिणामाची आशा करू शकता. सामाजिक मान सन्मान वाढेल. एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. नवीन रोजगारात परिक्षेत व मुलाखतीत यश मिळेल. 

कन्याः 

आज महत्वकांक्षेनुसार यश मिळेल. लेखकांच्या लिखाणाला उत्तेजन मिळेल. आध्यात्मिक उन्नती होऊन उपासनाही चांगली होईल. नोकरी रोजगारातील बदल प्रगतीकारक ठरतील. सामाजिक कार्य घडेल. तिर्थक्षेत्री प्रवास घडतील. व्यवहारात आर्थिक लाभ झाल्याने आनंदी राहाल. कौतुकास पात्र ठराल. मानसिक स्वास्थ लाभेल.

तूळ: 

आज शेअर मार्केटमध्ये मोठा फायदा होऊ शकतो. मात्र जोखीम घेणे टाळावे. तुमच्या विक्षिप्त स्वभावाचा फायदा इतर घेणार नाहीत याची काळजी घ्या. अविचाराने कर्ज काढू नका. व्यक्तिगत समस्या निर्माण होतील. कौटुंबिक जबाबदारीकडे लक्ष द्या. आहारात नियमितता ठेवा. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल. त्रासदायक दिवस राहील. प्रवासात दुर्घटनेची शक्यता आहे. कुटुंबातील वरिष्ठ सदस्य आणि संततीची विशेष काळजी घ्या.

वृश्चिकः 

आज कुटुंबातील काही निर्णय मनाविरुद्ध घ्यावे लागण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या दुटप्पी वागण्याचा त्रास होईल. अडचणीच्या काळात मध्यस्थांची मदत होईल. छोटी मोठी सवलत मिळण्यासाठी वरिष्ठांना खूष ठेवावे लागेल. प्रवासामध्ये चीजवस्तूंची काळजी घ्यावी. मानसिक स्थिती थोडीसी बिघडेल. मान अपमानचे प्रसंग घडतील. संतती व पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या. 

धनु: 

आज नोकरी व्यवसायात कामाच्या निमित्ताने बाहेरगावी किंवा परदेशात प्रवास करावे लागतील. कोणत्याही आर्थिक प्रलोभनांना बळी पडू नये. बोलण्यातील संभ्रम मात्र दूर ठेवा. नोकरीतील बदल लाभदायक ठरतील. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव राहील. आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल. गृहसौख्य पत्नीकडून सहकार्य लाभेल. संततीची विद्याभ्यासात रुची वाढेल.

मकर: 

आज विचारपूर्वक निर्णय घ्या. कलाकारांना चांगला वाव मिळेल. व्यवसायात मात्र लहरीपणा ठेऊन चालणार नाही. आरोग्याच्या दृष्टीने जुनी दुखणी त्रास देतील. पथ्यपाणी सांभाळावे. दुसऱ्याला सहकार्य करण्यात तत्पर राहाल. आशाजनक वातावरण निर्माण होईल. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. वाहन व घर खरेदीचा योग आहे. आईच्या प्रकृतिकडे लक्ष द्यावे. खर्च मात्र विचार करून करा. 

कुंभ: 

आज प्रेमीजनांना आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. नोकरी व्यवसायात कष्टाची बाजी लावाल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराला समजून घ्याल. मनोबल उंचावलेले असेल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. मानसन्मान वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

मीन: 

आज नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. घरातील मोठ्या माणसांचा वरदहस्त राहील. स्फूर्तिदायक घटना घडल्यामुळे कामामध्ये एक प्रकारची गती जाणवेल. तुमचे कर्तृत्व लोकांच्या नजरेत भरेल. आपापल्या क्षेत्रात प्रचंड झेप घ्याल. नवीन संधी चालून येतील. आपली कार्यक्षमता वाढणार आहे. कार्यक्षेत्र विस्तारेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रयत्नांना यश मिळेल. अपेक्षेपेक्षा आधिक लाभ होईल. 

WhatsApp channel