मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 27 January 2024: आजचा शनिवारचा दिवस आनंदाचा राहील की चिंतेचा, वाचा राशीभविष्य!

Horoscope Today 27 January 2024: आजचा शनिवारचा दिवस आनंदाचा राहील की चिंतेचा, वाचा राशीभविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 27, 2024 08:03 AM IST

Horoscope Today 27 January 2024: आज २७ जानेवारी २०२४ शनिवार रोजी, दिवस शुभ असेल की अशुभ, लाभ होईल की नुकसान, किती संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे राशीभविष्य.

Horoscope Today 27 January 2024
Horoscope Today 27 January 2024

आज शनिवार २७ जानेवारी रोजी, आयुष्मान योग आणि तैतील करण असा दुहेरी शुभ योग आहे. चंद्रभ्रमण रविच्या राशीतुन आणि केतुच्या नक्षत्रातुन होत असुन चंद्रदेव राहु आणि नेपच्यून बरोबर प्रतियोग करीत आहेत. या योगाचे काय शुभ अशुभ परिणाम मिळतील! वाचा राशीभविष्य!

मेष: 

आज उत्साही अल्यामुळे सहवासात येणाऱ्यांनाही आनंदी कराल. घर सजवण्याचे स्वप्न साकार होईल. घरात सजावटीच्या वस्तूंची खरेदी कराल. धाडसाचे कौतुक ऐकायला मिळेल. धंद्यात वाढ होईल. राजकारणी लोकांना आपला मान जपण्यासाठी संपर्क वाढवावा लागेल. कष्टाच्या मानाने लाभ कमी मिळेल, मात्र आपला वेगळा ठसा उमटवाल. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळेल. भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. तुमची पदोन्नती व प्रगती होईल.

वृषभ: 

आज कार्यक्षेत्रात एक वेगळाच ठसा उमटेल. जोडीदाराची साथ चांगली मिळेल. नवीन घर स्थावर खरेदीचे योग येऊ शकतात. तुमचे एखाद्या विषयामध्ये जेवढे ज्ञान असेल त्याप्रमाणे पैसा निश्चित मिळणार आहे. त्या दृष्टीने पुढे जायला हरकत नाही. व्यवसायात मनाप्रमाणे कामे मिळतील. कामासाठी प्रवास घडेल. मान सन्मान मिळेल. वाहन घर खरेदी करता शुभ योग आहे. यश मिळाल्याने आनंदी राहाल. आर्थिक मदत मिळेल. अध्यात्माविषयी श्रद्धा वाढेल.

मिथुनः 

आज नवीन योजना यशस्वी होतील. मनःशांती मिळेल. फक्त यामध्ये थोडे धाडस दाखवा. आपल्या महत्त्वाकांक्षी योजनांचे नियोजन चाणाक्षपणे कराल व त्यात यशस्वी व्हाल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. फिरायला जाण्याचे बेत ठरतील. आत्मविश्वास द्विगुणित होईल. अर्थिक स्तोत्र निर्माण होतील व आर्थिक लाभ नक्की होईव. कुटूंबात स्नेह वाढेल. रागावर नियंत्रण ठेवा. आनंदाची बातमी मिळेल. नाव लौकिकता प्राप्त होईल. 

कर्क: 

आज अहंकार बाजूला ठेवायला हवा. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने अभ्यासाकडे लक्ष द्यावे. प्रवासात वादविवाद टाळा. वैवाहिक जीवनात छोट्या मोठ्या तडजोडी कराव्या लागतील. कुटुंबातील इतर व्यक्तींमुळे त्रास सहन करावे लागतील. अशावेळी मानसिक अस्थिरता जाणवेल. संतीतीबाबत महत्त्वाचे निर्णय घेताना थोडे गोंधळून जाल. सावधानीपूर्वक वाटचाल करावी. देण्याघेण्याचे व्यवहार लांबणीवर टाकणेच उत्तम राहील. इतरांना आर्थिक मदत करताना विशेष काळजी घ्या. कारण नंतर पैसे वसूल होणे अवघड जाणार आहे.

सिंह: 

आज राबाहेर वादाचे मुद्दे उत्पन्न झाले तर वाद कमी करण्यावर मार्ग काढावा. आर्थिक उलाढाली यशस्वी ठरतील. विश्वासाला न्याय देण्यासाठी जीवाचं रान कराल. स्वत:च्या हिमतीवर कामे पूर्णत्वाला न्याल. पैशाची अडकलेली कामे मात्र पार पडतील. मोठ्या भावंडांची साथ चांगली मिळेल. व्यापाऱ्यांना फायदा होईल. जोखमीच्या व्यवहारात मात्र सावध राहा. पदोन्नतीची संधी आहे. कल्पनाशक्तीला वाव मिळेल. मानसिकता स्थिर ठेवा. आहारावर नियंत्रण ठेवावे. व्यसनापासून दूर रहा. विद्यार्थ्यांची प्रगती होईल. कौटुंबिक स्नेह निर्माण होईल.

कन्या: 

आज घरापासून दूर रहाण्याचे प्रसंग येतील. खर्चाला अनेक वाटा फुटतील. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींची काळजी घेणे आवश्यक आहे. वाहने जपून चालवा. तुमच्या विचाराचे फायदे तोटे अनुभवास येतील. परंतु कर्तृत्वाची वेगवेगळी क्षेत्र तुमच्यासाठी खुली होतील. नोकरीत ताण वाढेल. प्रसिद्धिसाठी अधिक पैसा खर्च कराल. केलेल्या कामात अपेक्षेनुसार यश मिळणार नाही. व्यवहार सावध राहून पूर्ण करावेत. मनावर नियंत्रण ठेवून वाटचाल करा. कमाईपेक्षा खर्च जास्त करू नका. येणाऱ्या खर्चामुळे चिंतीत राहाल. आरोग्याची काळजी घ्या.

तूळ: 

आज कामाच्या ठिकाणी उत्तम परस्पर संबंध निर्माण करण्यावर भर द्या. दुसऱ्यांचा जेवढा आदर कराल तेवढे सहकार्य चांगले मिळेल. प्रकृती अस्वास्थ्य थोडे जाणवेल, आरोग्याच्या बाबतीत उपचार वेळेवर घ्यावेत. हाताखालच्या लोकांचे सहकार्य उत्तम ठरेल. तुमच्याकडे पाहून तुमच्या जवळच्या लोकांना उत्साह वाटेल. कार्याचा मोबदला मिळेल. नोकरीत दुसऱ्याच्या कार्यात हस्तक्षेप करु नका. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. उधारी वसुल होईल. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवास सुखकर व लाभदायक होतील. 

वृश्चिकः 

आज समाजाचा प्रचंड प्रतिसाद मिळेल आणि काम करण्यास उत्साह येईल. फक्त कुठेही टोकाची भूमिका घेऊ नका. जास्त अपेक्षेमुळे असमाधान निर्माण होईल. वारसाहक्काने धनप्राप्तीची शक्यता राहील. कमी श्रमात जास्त संपत्ती मिळण्याची कला गवसेल. संशोधन क्षेत्रात प्रगती कराल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. जिवनाचा मनसोक्त आनंद घ्याल. यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील. आर्थिक गुंतवणूकीकरीता शुभ दिवस आहे.

धनु: 

आज बुद्धीच्या जोरावर अनेक कामे मार्गी लागतील. मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. कामाच्या बाबतीत दुसऱ्यांना कामाला लावाल. खेळाडूंसाठी दिवस चांगला आहे. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी लाभेल. कौटुंबिक सुख-समाधान लाभेल. प्रवासात थोडा त्रासदायक होऊ शकतो. कामात यश मिळण्याचे योग आहेत. जास्त फायदा मिळण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न फायदेशीर राहतील. व्यापारात फसव्या योजनेवर विश्वास ठेवू नका. आर्थिक गुंतवणुक करताना विचार पूर्वक करा. 

मकर: 

आज आळशीपणा कराल. परदेशा संदर्भात काही कामे असतील तर ती रखडतील. घरातील मोठ्या लोकांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. त्रास होईल. स्वतःच्या हिमतीवर कामे पूर्ण कराल. कष्ट केल्यास यश निश्चित मिळेल. मोठी आर्थिक गुंतवणूक टाळा. अंहकार आणी मोठेपणामुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे. वाईट सवयीचा त्याग करा. मनाची उद्विग्नता वाढेल. नोकरीत वरिष्ठांच्या विचाराविरुद्ध जाऊ नका. महत्वाची कामे शक्यतो आज टाळा. संततीसोबत वादविवाद होण्याची शक्यता आहे. मन चिंताग्रस्त राहील, मनावर संयम ठेवा. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष करु नका. 

कुंभ: 

आजच्या नवीन योजना राबवताना विचार करावा. घरामध्ये तुमचे विचार इतरांना पटणार नाहीत, त्यामुळे मतभेद होण्याची शक्यता आहे. घरातील स्त्रियांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. परदेशी जाण्याचे बेत लांबणीवर पडतील. झोपेच्या तक्रारी उद्भवू शकतात. नोकरीत अनुकुलता राहील. यशाचा दिवस आहे. कायदेशीर कामात विलंब होईल. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य मिळणार आहे. प्रेम प्रकरणात विरोधाला सामोरे जावे लागेल. महत्वाची कागदोपत्रे हरवू शकतात. सुखचैनीच्या वस्तूत खर्च वाढेल. व्यापारी वर्गास मोठे व्यवहार फायदेशीर ठरतील.

मीन: 

आज नुकसान होऊ शकते. वैवाहिक जीवनात ताणतणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. आलेला पैसा ताबडतोब गुंतवणूक करावा. मुलाच्या बाबतीत वाजवीपेक्षा जास्त विचार कराल. कुटुंबातील आपसातील मतभेद वाढू नयेत याची काळजी घ्या. विचारपूर्वक नियोजन करून कार्य करा. आर्थिक प्राप्तीसाठी खुप झगडावे लागेल. स्पर्धकांवर लक्ष ठेवा. लोकांचा विरोध असहकार्य लाभेल. मानसिक व शारिरिक थकवा जाणवेल. मनात असंतोष निर्माण होईल. मोठे व्यवहार टाळावेत.

 

जय अर्जुन घोडके

(jaynews21@gmail.com)

(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)