मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 27 february 2024 : मंगळवारचा दिवस कोणासाठी ठरेल मंगलमय? वाचा राशीभविष्य!

Horoscope Today 27 february 2024 : मंगळवारचा दिवस कोणासाठी ठरेल मंगलमय? वाचा राशीभविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Feb 27, 2024 10:19 AM IST

Horoscope Today 27 february 2024: आज २७ फेब्रुवारी २०२४ मंगळवार रोजी, लाभ होईल की नुकसान, दिवस शुभ असेल की अशुभ, किती संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे राशीभविष्य.

Today Horoscope 27 february 2024
Today Horoscope 27 february 2024 (Freepik)

आज बुधाच्या राशीतुन चंद्रभ्रमण होणार आहे. अहोरात्र चंद्र केतुच्या युतीत असून, मंगळाशी धनलाभ योग करीत आहे. वणिज करणात कसा असेल मंगळवार! वाचा राशीभविष्य!

मेष: 

आज कार्यक्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग कराल. कामगारांच्या प्रश्नाकडे डोळेझाक करून चालणार नाही. परदेशाशी व्यवहार असणाऱ्यांना फायदेशीर दिवस ठरेल. करिअरमध्ये बाजी मारून न्याल. उतावीळपणावर आवर घाला. व्यापारात बदल होऊ शकतो. कामाचे सकारात्मक परिणाम दिसतील. व्यापारात आर्थिकवृद्धी होईल. भागीदारा कडून सहकार्य लाभेल. कुटुंबात शुभवार्ता मिळेल. योग्य वेळी योग्य निर्णय घ्या.

वृषभ: 

आज वडिलोपार्जित मालमत्तेसंबंधी वाद निर्माण होतील. व्यापारात व्यवहाराची सांगड योग्यरितीने घातली नाही तर तोट्याचे प्रमाण वाढेल अडकलेले पैसे वसूल करण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक लाभ चांगले होतील. नव्या योजनावर काळजीपूर्वक काम करावे लागेल. वेळेचे व्यवस्थापन गरजेचे आहे. संततीच्या आरोग्याकडे लक्ष द्या. जुनी येणी रखडतील. कर्ज प्रकरणे नामंजूर होतील. फसवणूक होऊ शकते.

मिथुन: 

आज मानसिक त्रास निर्माण होणाऱ्या घटना घडतील. विद्यार्थ्यांना तडजोड करावी लागेल. आर्थिक समाधान मिळाल्यामुळे स्वस्थ रहाल. थोडे गैरसमज होऊ शकतात. काही गोष्टी फायद्याच्या ठरतील. व्यापारात नवनवीन गोष्टी पुढे येतील. प्रवासात विघ्ने निर्माण होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. आपल्या उदारपणाचा फायदा घेतला जाईल. 

कर्क: 

आज मनोधैर्य सांभाळा. आरोग्याच्या दृष्टीने जुनी दुखणी त्रास देतील. विचाराअंतीच योग्य निर्णय घ्या. वाईट मित्राच्या संगतीमुळे नुकसान होईल. कार्यक्षेत्रात आपल्या विषयी गैरसमज पसरणार नाही याची काळजी घ्या. शांत चित्त ठेवणाचा प्रयत्न करा. कर्जाचा बोजा वाढू शकतो. व्यापारात आर्थिक नुकसान संभवते. जोडीदारासोबत स्नेहपूर्वक वागा. प्रकृति अस्थिर राहील.

सिंह: 

आज मुलांसाठी अचानक पैसा खर्च करावा लागू शकतो. पैशाचे पाठबळ चांगले मिळाल्यामुळे नवीन योजना मनामध्ये राबवाल आणि त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जीवाचे रान करायची तयारी ठेवाल. व्यावसायिकांनी दिशाभूल होणार नाही याची काळजी घ्यावी. अनाठायी खर्च होईल. व्यापारात उत्पन्न कमी खर्च अधिक होईल. कष्टाची पराकाष्ठा करावी लागेल. प्रवास टाळा.

कन्या: 

आज वैवाहिक जीवनात घरातील वातावरण आनंदी राहील. वरिष्ठांची मर्जी राहील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याची संधी मिळेल. वाहन घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. नावलौकिक वाढेल. कौटुंबिक सौख्य व जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्य आणि मानसिक स्वास्थ बिघडणार नाही याबाबत काळजी घ्या.

तूळ: 

आज मानमरातब प्रमोशन मिळण्याचे योग येतील. उधारी वसूल होईल. व्यवसायात आवश्यक ते बदल करण्याच्या संधी मिळतील. कौटुंबिक पातळीवर पत्नीकडून व संततीकडून उत्तम सुख मिळेल. लेखन कार्य व ग्रंथप्रकाशानात लाभ होईल. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. मित्रमैत्रिणीं कडून लाभ होतील. प्रवासातून आर्थिक लाभ घडतील. आपल्या तर्कबुद्धीने शत्रुवर विजय मिळवाल. नवे काही करण्याचा प्रयत्न कराल. 

वृश्चिक: 

आज कामाचे नियोजन करण्यात मात्र कमी पडण्याची शक्यता आहे. आर्थिक विवंचना थोडी सतावेल. मौल्यवान वस्तु गहाळ होण्याची शक्यता आहे. पूर्वी घेतलेला निर्णय चुकीचा ठरण्याची शक्यता आहे. अनिद्रेचा त्रास होईल. विनाकारण वाद घालू नयेत. उत्पन्नापेक्षा अधिक खर्च कराल. फसवणुक होण्याची शक्यता आहे. काळजीपूर्वक व्यवहार करा. 

धनुः 

आज आर्थिक बाबतीत प्रगती होईल. घरातील लोकांचे उत्तम सहकार्य लाभेल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. एखादी मस्त खरेदी करण्याचा मूड राहील. बेकारांना नवीन नोकरी लागण्याची संधी उपलब्ध होईल. मनातील योजना पार पाडता येणार आहेत. तशी काही आर्थिक तरतूद होणार आहे. मोठ्या व्यवहारात आर्थिक फसवणुक होणार नाही याची काळजी घ्या. स्वभावातील रागीटपणावर मात्र नियंत्रण ठेवा.

मकरः 

आज तुमची बौद्धिक क्षमता सिद्ध कराल. आर्थिक गुंतवणूक करायला हरकत नाही. जोडीदाराचे सहकार्य उत्तम राहील. नोकरी व्यवसायात हव्या असलेल्या संधी मिळतील. संधीचा लाभ घ्यावा. आपल्यावरील कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. नवीन वाहन खरेदीची इच्छा मनात निर्माण होईल. आर्थिक नियोजानावर वेळेत भर द्या. व्यापारात काळजीपूर्वक व्यवहार करणे अत्यावश्यक आहे. कुंटुंबात खेळीमेळीचे वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा.

कुंभः 

आज इच्छेला पूरक वातावरण लाभेल. तरीसुद्धा अनावश्यक चिंता तुमचा पाठलाग करतील. प्रत्यक्षात न उतरणारी स्वप्ने रंगवल्यामुळे अपेक्षा भंगाला तोंड द्यावे लागेल. व्यापारात वेळेवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. भागीदारीत अपेक्षित लाभाचे योग आहेत. स्थावर मालमला संबंधी प्रश्न मार्गी लागेल. स्वसंपादिन धनाचा उपभोग घ्याल. प्रेमप्रकरणात मात्र फसगत होऊ शकते. घर खरेदीची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण उत्साही राहील.

मीन: 

आज कुटुंबातील लोकांचे सहकार्य उत्तम मिळेल. व्यापारात परिस्थितीवर मात कराल. खर्चिक आणि उधळ्या स्वभावाला आळा घालावा लागेल. उद्योग व्यवसायात प्रगती होईल. नोकरीत मानाच्या जागा मिळतील. नवीन वाहन खरेदीचे योग आहे. सहकुटुंब प्रवासाचा बेत आखाल. महत्त्वाचे निर्णय घेणे शक्य होईल. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवा. प्रकृतीत सुधारणा होईल.