Horoscope Today 26 January 2024: तुमचा खिसा भरलेला राहील की रिकामा होईल, वाचा राशीभविष्य!-horoscope today 26 january 2024 daily rashi bhavishya in marathi ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 26 January 2024: तुमचा खिसा भरलेला राहील की रिकामा होईल, वाचा राशीभविष्य!

Horoscope Today 26 January 2024: तुमचा खिसा भरलेला राहील की रिकामा होईल, वाचा राशीभविष्य!

Jan 26, 2024 07:44 AM IST

Horoscope Today 26 January 2024: आज २६ जानेवारी २०२४ शुक्रवार रोजी, दिवस शुभ असेल की अशुभ, लाभ होईल की नुकसान, किती संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे राशीभविष्य.

Horoscope Today 26 January 2024
Horoscope Today 26 January 2024

आज शुक्रवार २६ जानेवारी रोजी, चंद्र कर्क राशीत संक्रमण करेल.चंद्र मंगळ, बुध आणि शुक्राशी षडाष्टक योग करीत असून, प्रीती योगात कसा असेल शुक्रवार! वाचा राशीभविष्य!

मेषः 

आज शेअर मार्केट मध्ये व्यवहार करणाऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो, मात्र जोखीम घेणे टाळा. तुमच्या विक्षिप्त स्वभावाचा फायदा इतर घेणार नाहीत याची काळजी घ्या. अविचाराने कर्ज काढू नका. व्यक्तिगत समस्या निर्माण होतील. कौटुंबिक जबाबदारीकडे लक्ष द्या. आहारात नियमितता ठेवा. मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल. चोरी अथवा नुकसानीची घटना घडू शकते. अपचन पोटदुखी याकडे दुर्लक्ष करू नये. नोकरी व्यापारात त्रासदायक दिवस राहील. प्रवास नुकसानकारक राहील. कुटुंबातील वरिष्ठ सदस्य आणि संततीची विशेष काळजी घ्या.

वृषभः 

आज अनुकूल वातावरण निर्माण होईल. उधारी वसूल होईल. एखादी गोष्ट धडाडीने करण्यात तुमचा पुढाकार राहील. कर्जाची परतफेड उत्तम प्रकारे करू शकाल. मुलांच्या अडचणी समजून घेण्यात यशस्वी व्हाल. जगावेगळ्या गोष्टी करण्याकडे कल राहील. कोणतीही टोकाची भूमिका घेण्याअगोदर सुवर्णमध्य काढावा लागेल. यशाचा दिवस आहे. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. पत्नीची साथ मिळेल. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल व लाभ होईल. पुरस्कार मिळतील.

मिथुनः 

आज दिवस मध्यम स्वरूपाचा राहील. कुटुंबातील काही निर्णय मनाविरुद्ध घ्यावे लागू शकतात. जोडीदाराच्या दुटप्पी वागण्याचा त्रास होईल. अडचणीच्या काळात मध्यस्थांची मदत होईल. छोटी मोठी सवलत मिळण्यासाठी वरिष्ठांना खूष ठेवावे. प्रवासामध्ये चीजवस्तूंची काळजी घ्या. मानसिक स्थिती थोडी बिघडेल. मान अपमानचे प्रसंग घडतील. नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील. कामात असंतोषजनक वातावरण राहील. वाहन घर बदलण्याचे प्रसंग घडतील. लोकांचा विरोध व असहकार्य लाभेल. संतती व पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या. राग निर्माण होईल. मानसिक स्वास्थ बिघडेल. स्थावर मालमत्तेची विक्री करताना घाई गडबड करु नका.

कर्क: 

आज प्रेमप्रकरणात अस्थिरता जाणवेल. कामाच्या निमित्ताने बाहेरगावी किंवा परदेश प्रवास घडेल. कोणत्याही आर्थिक प्रलोभनांना बळी पडू नये. मुलांच्या संदर्भात घेतलेले निर्णय पुन्हा तपासून पहावे लागतील. बोलण्यातील संभ्रम मात्र दुर ठेवा. नोकरीतील बदल लाभदायक ठरतील. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव राहील. स्वतःच्या मनाने विचारा अंतीच निर्णय घ्या. आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल. शासकीय कामकाजातून यश मिळेल. योजनेतून लाभ होतील व यशस्वी व्हाल. पत्नीकडून सहकार्य लाभेल. संततीची विद्याभ्यासात रुची वाढेल. दिवस शुभ आहे.

सिंह: 

आज विचारपूर्वक निर्णय घ्या. कलाकारांना चांगला वाव मिळेल. व्यवसायात मात्र लहरीपणा ठेऊन चालणार नाही. आरोग्याच्या दृष्टीने जुनी दुखणी त्रास देतील. पथ्यपाणी सांभाळावे. दुसऱ्याला सहकार्य करण्यात तत्पर रहाल. लोकांची दाद चांगली मिळेल. आशाजनक वातावरण निर्माण होईल. नोकरीत आर्थिक बाबतीत वृद्धी होईल. भांवडाकडून सहकार्य लाभेल. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. वाहन व घर खरेदीचा योग आहे. आईच्या प्रकृतिकडे लक्ष द्यावे. पराक्रम व क्षमतेमुळे यश व फायदा होईल. खर्च मात्र विचार करून करा.

कन्या: 

आज आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. अस्थिर आणि चंचल स्वभावामुळे घरातील लोकांशी मात्र खटके उडण्याची शक्यता आहे. नोकरी व्यवसायात कष्टाची बाजी लावाल. परंतु तेथील वातावरण मात्र उल्हासित करणारे असेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराला समजून घ्याल. मनोबल उंचावलेले असेल. मनाला समाधान लाभेल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. अधिक लाभ होतील. नवीन भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल.

तूळ: 

आज नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. घरातील मोठ्या माणसांचा वरदहस्त राहील. स्फूर्तिदायक घटना घडल्यामुळे कामामध्ये एक प्रकारची गती जाणवेल. तुमचे कर्तृत्व लोकांच्या नजरेत भरेल. आपापल्या क्षेत्रात प्रचंड झेप घ्याल. तरुण वर्गाला आपली आवडती व्यक्ती वारंवार भेटेल. कार्यक्षेत्रात परिवर्तन किंवा नवीन संधी चालून येतील. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रयत्नांना यश मिळेल. आर्थिक लाभ होईल व मान-सन्मान मिळेल. व्यापारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल. अपेक्षेपेक्षा आधिक लाभ होईल व यश मिळेल.

वृश्चिक: 

आज मानसिक अवस्था उत्तम राहील. नोकरी व्यवसायात अनपेक्षित संकटे आली तरी त्यातून सहीसलामत बाहेर पडाल. ग्रहांची साथ चांगली मिळेल. स्वतःचा मान राखून जेवढी कामे उरकता येतील तेवढी उरकणार आहात. स्थावर इस्टेटीसंबंधी महत्त्वाचे निर्णय घेणार आहात. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने मात्र तडजोड करावी लागेल. मात्र अतिउत्साह व अतिरेकपणा टाळावा. नोकरीत अडकलेली कामे पूर्ण होतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आपले प्रयत्न यशस्वी होतील. मान- सन्मान मिळेल. विरोधकांची मने जिंकाल. भरभरटीचा दिवस आहे. नवीन प्रस्ताव हाती येतील. कामे पूर्णत्वास जातील. व्यवहारिक समस्या दूर होतील. आरोग्य उत्तम राहील.

धनु: 

आज मानसिकता बिघडल्यामुळे काही गोष्टींना खीळ बसू शकते. बौद्धिक बाबतीत उत्कृष्ट फळे मिळतील. मुलांशी मतभेद होतील. अती भावनाप्रधानता टाळायला हवी. नोकरी व्यवसायात जोखमीचे निर्णय घेणे टाळावे. धंद्यात कोणत्याही प्रकारची नवीन गुंतवणूक न केलेली बरी राहील. मानसिक व अनिद्रेचा त्रास जाणवेल. मनावर संयम राखण्याचा प्रयत्न करा. नोकरीच्या ठिकाणी कामात अडथळे निर्माण होऊ शकतात. चिंताग्रस्न मन राहील. व्यापारात समस्या निर्माण होतील. आज कर्ज घेणे देणे शक्यतो टाळावे. फसगत होईल. आरोग्य बाबतीत विशेष काळजी घ्यावी.

मकर: 

आज बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना लाभकारक दिवस आहे. प्रेमवीरांनी आपले प्रेम आवडत्या व्यक्तीसमोर व्यक्त करण्यास चांगला दिवस आहे. नियोजनामुळे आर्थिक घडी चांगली बसेल. अवखळ मनाला विवेकाचे लगाम घालावे लागतील. हाताखालच्या लोकांचे सहकार्य उत्तम मिळाल्यामुळे कामाची गती वाढेल. उत्तम दिवस आहे. कार्यक्षेत्रात भरभराट होईल. कामकाजाचा विस्तार होईल. नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. भागीदाराकडून मदत मिळेल. विरोधकांना वेळीच चोख उत्तर दिले तर यशस्वी व्हाल.

कुंभ: 

आज विवाह इच्छुकांचे विवाह जमतील. प्रेमप्रकरणामध्ये तरुणांना यश मिळेल. व्यवसायात जोडीदाराच्या दुटप्पी वागण्याचा थोडा त्रास होईल. जीवनाकडे पाहणाऱ्याचा दृष्टीकोन खेळकर हवा. प्रवासयोग घडेल व अडलेली कामे पार पडतील. आत्मविश्वास वाढल्यामुळे नियोजित कामात चांगली प्रगती कराल. सामाजिक मान सन्मान वाढेल. कार्यक्षेत्रात आर्थिक कौटुंबिक बाबतीत परिवर्तन घडणार आहे. मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. नवीन रोजगारात परिक्षेत व मुलाखतीत यश मिळेल. 

मीनः 

आज महत्वकांक्षेनुसार यश मिळेल. लेखकांच्या लिखाणाला वाव मिळेल. शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्यांना फायदा संभवतो. व्यवसायात नवीन ऑर्डर्स मिळतील. आध्यात्मिक उन्नती होऊन उपासनाही चांगली होईल. नशीबाची साथ लाभेल. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. नोकरी रोजगारातील बदल प्रगतीकारक ठरतील. आपल्या हातून आध्यात्मिक सामाजिक कार्य घडेल. तिर्थक्षेत्री प्रवास घडतील. व्यवहारात आर्थिक लाभ झाल्याने आनंदी राहाल. मानसिक स्वास्थ लाभेल.