मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 25 January 2024: तुमच्या अडचणी वाढतील की कमी होतील! वाचा राशीभविष्य!

Horoscope Today 25 January 2024: तुमच्या अडचणी वाढतील की कमी होतील! वाचा राशीभविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 25, 2024 08:41 AM IST

Horoscope Today 25 January 2024: आज २५ जानेवारी २०२४ बुधवार रोजी, दिवस शुभ असेल की अशुभ, लाभ होईल की नुकसान, किती संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे राशीभविष्य.

Horoscope Today 25 January 2024
Horoscope Today 25 January 2024

आज गुरुवार २५ जानेवारी रोजी, चंद्र कर्क राशीत संक्रमण करेल.शाकंभरी पौर्णिमेचा चंद्र रवि प्लुटो या ग्रहांशी प्रतियोग करीत असून, गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशीसाठी अनुकुल असेल! वाचा राशीभविष्य!

मेष: 

आज आर्थिक बाबतीत अनुकुलता असेल. समाजात प्रतिष्ठा मिळेल पण त्यासाठी भरपूर कष्ट करावे लागेल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी उत्साही वातावरण राहील. प्रिय व्यक्तीसाठी वाटेल तो त्याग करण्याची तयारी दर्शवाल. परदेशगमनाच्या संधी येतील. मनावरचा संयम सुटू शकतो. आपल्या आवडीनिवडी पूर्ण करू शकाल. मनोरंजनाकडे कल राहील. कुंटुंबात एखादी शुभ घटना घडेल. योग्य नियोजन आचुक निर्णय यामुळे यश लाभेल. व्यापारात उत्तम धनलाभ होईल. कौटुंबीक सुख उत्तम मिळेल.

वृषभः 

आज अचानक धनलाभाच्या कोणत्याही मार्गाला जाऊ नये. शेअर गुंतवणूकीचे कोणतेही निर्णय घेऊ नयेत. नेहमी पेक्षा घरच्या समस्यांकडे तुम्हाला जास्त लक्ष द्यावे लागेल. आवडत्या व्यक्तीच्या गाठीभेटी होतील. राग वाढल्यामुळे घरात वादाचे प्रसंग निर्माण होतील. प्रवासात विघ्ने निर्माण होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आपल्या उदारपणाचा फायदा घेतला जाईल. प्रेमप्रकरणात त्रास होतील. दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. व्यवहार जपुन करावेत, अन्यथा अडचणी वाढतील.

मिथुन: 

आज सहकार्याची अपेक्षा कराल, परंतु निराशा पदरात पडेल. आर्थिक प्रश्न सुटतील. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. मन अस्थिर राहील पण कामे व्यवस्थित पूर्ण करण्याकडे कल राहील. संधीचं सोनं कराल. उद्दिष्ट साकारण्यासाठी अनुकूलता लाभेल. परिस्थितीवर मात करण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करावे. अपेक्षित यश संपादन करता येईल. दिवस शुभ लाभदायी असणार आहे. महिलांना धार्मिक सत्संग उत्तम घडेल. 

कर्क: 

आज मनातील उत्तेजना वाढेल. तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. भांडणाचा प्रसंग आला तरी त्यात भाग न घेतलेला बरा राहील. नोकरीत बॉसची मर्जी राहील, त्याचा फायदा करून घ्या. मधुमेहाचा विकार आहे त्यांनी पथ्य पाळावे. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका, नुकसान होऊ शकते. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक चिंता निर्माण होईल. दिवस ताणतणाव निर्माण करणारा आहे. मनाप्रमाणे घटना घडणार नाहीत. 

सिंहः 

आज उत्तम धनप्राप्तीचा योग आहे. आवडणारी एखादी गोष्ट मनापासून करायला जास्त आवडेल. परंतु तसे वातावरण मिळेल असे नाही. व्यसनावर नियंत्रण ठेवा, प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल. योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आर्थिक आवक वाढेल. शेअर्समध्ये अथवा कमी कालावधीची गुंतवणूक करताना ती विचारपूर्वक करणे गरजेचे राहील. चैनीच्या वस्तू खरेदीचे योग आहे. परदेश भ्रमणासाठी अनुकुल दिवस आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.

कन्या: 

आज कार्यक्षेत्राच्या ठिकाणी सावध राहावे. रागाचा पारा चढेल. घरातील गोष्टींकडे लक्ष घालावे लागेल. लोकांच्या संपर्कात रहाण्याचे कसब वापरलेत बरीच कामे सुलभ होतील. आर्थिक खोळंबलेली कामे मार्गी लागतील. एकमेकांमधील संबंध जपलेत तर वातावरण प्रसन्न राहू शकते. कुटुंबात काहीसा वादविवाद होणारा दिवस ठरेल. कर्ज घेण्यापासून दूर राहा. मनस्वास्थ बिघडण्याचा शक्यता आहे. आर्थिक व्यवहार टाळा, फसवणूक होऊ शकते. अध्यात्माची आवड निर्माण होईल.

तूळ: 

आज भाग्यदायक घटनाही घडतील. तीर्थयात्रेला जाण्याचे बेत ठरवाल. कुटुंबासाठी एखादा त्याग करावा लागेल, गैरसमज होईल. तुमच्या नवीन कल्पनांच स्वागत होईल. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. कुटुंबासाठी वेळ मिळेल. कामाचा वेग नक्कीच वाढेल. जुन्या मित्र मैत्रिणी आपणास पुन्हा भेटणार आहे. क्रोधावर मात्र नियंत्रण ठेवा. धनाचा उपभोग घ्याल. मनात उत्साह राहील. जोडीदारांकडून सहकार्य लाभेल. मातृपक्षाकडून आर्थिक लाभ होतील.

वृश्चिक: 

आज विद्यार्थ्यांना यश मिळेल. कुटुंबातीलच व्यक्ती तुमच्या फायद्याच्या ठरतील. मुलांसाठी वाट्टेल ते करण्याची इच्छा असली तरी तुम्हाला ते कठीण जाईल. एखाद्या गोष्टीचा लाभ मिळवण्यासाठी करावी लागणारी तडजोड थोडी मनाविरुद्ध असेल. अचानक धनप्राप्तीची उत्तम संयोग निर्माण होईल. वाहन खरेदीचा योग आहे. व्यवसायात अनुकूल अपेक्षित घटना घडतील. संततीकडून समाधान लाभेल. तरुणांना परदेशात नोकरीची संधी मिळेल. सांस्कृतिक कार्यात सहभाग घ्याल. शास्त्रीय विषयाची आवड निर्माण होईल. स्वभाव मन मिळावु राहील. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. भांवडे मदत करतील.

धनुः 

आज दूरची माणसे घरी येतील. प्रवासाचे योग आहेत. कामात मात्र कसूर करू नये. ज्ञान आणि शक्ती याचा योग्य समन्वय साधाल. जास्त काम करावे लागेल. आपल्या शांतप्रिय स्वभाव आणि गुणवैशिष्ट्यामुळे पुरेपूर फायदा होईल. महिला वर्गासाठी अतिशय अनुकूल दिवस आहे. मानसिक स्थिती प्रसन्न राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. आर्थिक उत्पन्न मनासारखे होईल. आत्मविश्वास द्विगुणित होईल. मन प्रसन्न राहील. नोकरी व्यवसायात नवीन दिशा मिळेल.

मकर: 

आज मन चलबिचल असेल. लाभ मिळणार नाही. थोडे मनःस्तापाचे प्रसंग येतील. जोडीदाराच्या अचानक चांगल्या वाईट वागण्यामुळे तुमचा गोंधळ होऊ शकतो. नोकरी व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. मनाची चंचलता मात्र दुर ठेवा. संयम ठेवून वाटचाल करावी. मोठी आर्थिक गुंतवणुक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. तब्बेतीची काळजी घ्या. विरोधकांचा त्रास सहन करावा लागेल. व्यापारात नुकसान होण्याची शक्यता आहे. अनैतिक कामापासुन दुर रहा अन्यथा कायद्याच्या कचाट्यात अडकाल.

कुंभ: 

आज आर्थिक गुंतवणूक कराल. आपले सर्व व्याप सांभाळून धार्मिक गोष्टी करण्याकडे कल राहील. मित्र परिवारामध्ये रमाल. बौद्धीक कसरती करण्याबरोबरच मनोरंजन करण्याकडेही कल राहील. धंद्यात नवीन कामे मिळण्याची शक्यता आहे. घरात नोकरवर्गाचे सहकार्य न मिळाल्यामुळे नेहमीच्या दिनचर्येत अडचणी येतील. सामाजिक कार्याची आवड निर्माण होईल. अपेक्षित लाभदायक घटना घडतील. नवदांपत्यास आनंदाची बातमी मिळेल. गुंतवणुकीसाठी शुभ दिवस आहे. आर्थिक स्त्रोत वाढेल. नोकरदारांना वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल.

मीनः 

आज स्वभावातील चंचलता कमी करावी लागेल व धडाडीने काम कराल. भागीदारीमुळे धनलाभ होतील. अभ्यासात प्रगती दिसेल. खूप दिवसांपासून अडलेली कामे मार्गी लागतील. लांबच्या प्रवासाचे योग येतील. नवीन वाहन घेण्याचा योग आहे. आर्थिक व्यवहार जपूनच करावा. नविन संधी प्रस्ताव येतील. आपला आत्मविश्वास द्विगुणित राहील. अनुकुल घटना घडतील. मनात प्रसन्नता असल्याने तुमच्या नियोजीत कामात वेग येईल. व्यवसायात समाधानकारक प्रगती राहील. घाईगडीमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. निर्णय विचारपूर्वक घ्यावे.

 

जय अर्जुन घोडके

(jaynews21@gmail.com)

(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)