मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 25 february 2024 : आज माघ कृष्ण प्रतिपदा; रविवारचा सुट्टीचा दिवस कसा जाईल, वाचा राशीभविष्य!

Horoscope Today 25 february 2024 : आज माघ कृष्ण प्रतिपदा; रविवारचा सुट्टीचा दिवस कसा जाईल, वाचा राशीभविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Feb 25, 2024 08:43 AM IST

Horoscope Today 25 february 2024 : आज २५ फेब्रुवारी २०२४ रविवार रोजी, लाभ होईल की नुकसान, दिवस शुभ असेल की अशुभ, किती संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे राशीभविष्य.

Horoscope Today 25 february 2024
Horoscope Today 25 february 2024

आज रविवार २५ फेब्रुवारी रोजी, गुरू प्रतिपदेचा चंद्र रविच्या राशीतुन आणि शुक्राच्या नक्षत्रातुन भ्रमण करणार आहे. तसेच आजचा नवमपंचम योग आपल्या राशीला कसा फलद्रुप होईल! कसा असेल मेष ते मीन सर्व राशींसाठी आजचा दिवस! वाचा राशीभविष्य!

मेषः 

आज आवडत्या व्यक्तीबरोबर वेळ मजेत घालवाल. घर किंवा वाहन खरेदी कराल. प्रवासामध्ये चीजवस्तू सांभाळा. मुलांच्या अभ्यासात जास्त लक्ष घालावे लागेल. यशस्वी व्हाल. आर्थिक ओढाताण संपेल. मनात सकारात्मकता वाढेल. आपल्या प्रतिभेस वाव मिळेल. नावलौकिक वाढेल. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ होईल. परिचित व्यक्तीची अचानक भेट होईल. 

वृषभः 

आज वैवाहीक जीवनात वाद जास्त ताणायचे नाहीत हे ठरवायला लागेल. आर्थिक बाबतीत उगीच चिंता कराल. उसने पैसे देण्याचे टाळा. कुटुंबातील काही व्यक्तींमुळे मानसिक त्रास होऊ शकतो. अविचार महागात पडेल. आपल्याला मनस्ताप करावा लागेल. जपुन पाऊल टाकावी लागणार आहेत. उद्योग धंद्यात काही व्यवहार अनपेक्षित फलदायी ठरतील. नोकरी व्यापारात सहकार्याच्या भावनेतून राहा. अनावश्यक राग आणि तापटपणा टाळा. आत्मविश्वास आणि अतिउत्साहीपणा टाळावा. विचार पूर्वक निर्णय घ्या. 

मिथुनः 

आज महत्त्वाची कामे रखडतील. व्यवसायात एखादी योजना रद्द करावी लागेल. अती संवेदनशील स्वभावामुळे कधीकधी यांचे नुकसान होऊ शकते. घरातील स्वास्थ्य जास्तीत जास्त टिकवण्याचा प्रयत्न कराल. नोकरी व्यवसायात निष्काळजीपणा अंगलट येऊ शकतो. धैर्याने आणि संयमाने काम करा. व्यापारात मोठी गुंतवणूक करू नये. प्रवास शक्यतो टाळा. प्रवासात काही अडचणी उद्‌भवतील. कुटुंबापासुन विभक्तीचा योग आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करू नका. आर्थिक हानी होईल.

कर्क: 

आज मान-सन्मान मिळण्याचे योग आहेत. प्रवासात पैशाचा व्यय संभव आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार कराल आणि कंटाळा न करता कामाला लागाल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखावह होण्यासाठी उत्तम नियोजनाची आवश्यकता भासेल. घरामध्ये प्रत्येकाची उगीचच काळजी कराल. मनःस्वास्थ्य मात्र हरवून बसाल. कामात यश मिळाल्याने आनंदी राहाल. कौटुंबिक सौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी यशस्वी दिवस आहे. जनमानसात प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल.

सिंहः 

आज राजकीय सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे तज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक करायला हरकत नाही. जोडीदाराच्या धंद्यात एकमेकांशी पटणे जरा अवघड राहील. अशावेळी शांत राहणे श्रेयस्कर ठरेल. गूढ गोष्टींची आवड निर्माण होईल. स्वतंत्र विचार कराल. व्यवसायात लाभ होतील. प्रवासाचे योग आहेत पण तुमच्या मुडी स्वभावामुळे प्रवासात इतरांशी पटणे अवघड जाईल. निरनिराळ्या सूचना कल्पना व्यावसायिकदृष्ट्या आमलात आणा.

कन्याः 

आज दुर्मिळ गोष्टींचा संग्रह कराल. व्यवसायातील अडलेली कामे मार्गी लागतील. दुसरे काय म्हणतात यापेक्षा तुमचे अंतर्मन तुम्हाला काय सांगते याचा विचार करावा. काम करण्यासाठी बुद्धीबरोबर चिकाटीही हवी शक्ती आणि युक्तीचा सुरेख संगम व्यवहारात दिसेल. घरातील दोन पिढ्यांमध्ये संघर्ष संभवतो. परंतु वेळीच सर्व गोष्टी उघड बोलून वातावरण थंड कराल. आपल्या जबाबदाऱ्या ओळखून त्या पूर्व कराल. आत्मविश्वासाचा अतिरेक करणे टाळा. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहील. व्यर्थ वेळ टाळा.

तूळ: 

आज उधारी वसूल होतील. हवे तसे यश मिळाल्यामुळे कष्टाचे काही वाटणार नाही. कामातील अचानक बदल तुम्हाला बरेच काही शिकवून जाईल. व्यवसायात आपल्या मतावर ठाम रहाणार आहात. घरात वेळ देऊ शकणार नसल्यामुळे मनावर थोडा ताण येईल. कामकाजाचा विस्तार होईल. नवीन कल्पना नक्की मांडा. व्यवसायातील वातावरण चांगले राहील, अचानक लाभ होण्याचे योग आहेत. व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदत मिळेल. फसवणूक आर्थिक हानी होण्याची शक्यता राहील. 

वृश्चिकः 

आज घरातील अनेक अडचणी सोडवाल. ध्येयाप्रत पोहचण्याचा फार मोठा गुण तुमच्यामध्ये आहे. त्यामुळे सगळ्यावर मात कराल. एखादी छोटी सकारात्मक गोष्टसुद्धा तुम्हाला खूप मोठा आनंद देवून जाईल. तुमची कामे पटकन होऊन जातील. कामाचा दर्जा सुधारेल. त्यामुळे आर्थिक भरभराट व्हायलाही मदत होईल. आर्थिक समस्या दूर होईल. मनोबल उंचावलेलं असेल. कायदेशीर कामात यश मिळेल. दिवस फायदेशीर राहिल. 

धनुः 

आज सामाजिक क्षेत्रात मान मिळेल. कौटुंबिक वातावरण  नसल्यामुळे काम करण्यात आनंद वाटणार नाही. व्यवसायात वेळेवर कामे दिली नाहीत तर पुढच्या कामावर त्याचा परिणाम होईल. कौटुंबिक कामाचा बोजा तुमच्यावर पडला तरी शांततेने त्याचे नियोजन करायला लागेल. अनिद्रेचा त्रास जाणवेल. शत्रुपक्ष वरचढ होतील. नोकरीत विरोधकावर लक्ष ठेवा. व्यसनापासून सावध रहा. फसगत होईल. आज कर्ज घेणे देणे शक्यतो टाळा. आरोग्या बाबतीत विशेष काळजी घ्याल.

मकरः 

आज कामासाठी दिनमान मंगलमय आहे. गृहसौख्यात भर पडेल. धंद्यात नवनवीन प्रयोग कराल. सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍यांना काम केल्याचे समाधान मिळेल. प्रेम प्रकरणात यश येईल. जनमानसावर तुमची विलक्षण छाप पडेल. वेळीच सावध रहायला हवे. जनसंपर्क वाढल्याने फायदा होईल. कामकाजात गुप्तता बाळगा. आर्थिक स्थिती चांगली राहील. उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे.

कुंभः 

आज धार्मिक गोष्टी करण्याकडे कल राहील. अडलेली कामे मार्गी लागतील. सद्गुरूंचा वरदहस्त राहील. तुमच्यातील सद्गुणांची लोक कदर करतील. कुटुंबामध्ये तुमच्या सल्ल्याला महत्त्व राहील. परदेशगमनाचे योग येतील. त्यामुळे फायदाही होईल. आत्मविश्वासाने पावले पुढे टाकाल. मनातील अहंकाराची भावना टाळावी. आर्थिक लाभ होईल. कामानिमित्त घरापासून दुर जावे लागेल. प्रसिद्धि मिळेल. घरासंबंधी समस्या दूर होतील. मन प्रसन्न राहील.

मीनः 

आज किर्ती प्रसिद्धीचे योग संभवतात. स्वतंत्र विचार कराल आणि ते अमलातही आणाल. उत्तम कल्पनाशक्तीचा आविष्कार तुमच्यात पाहायला मिळेल. व्यवसायात व्यवहार जास्त सांभाळाल. दूरदृष्टी ठेऊन कामाची आखणी कराल. मोठा आर्थिक लाभ होणार आहे. ग्रहयोग उत्तम आहे. मनासारख्या घटना घडतील. व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता असून आकस्मिक धनलाभ होण्याचा योग आहे. 

 

जय अर्जुन घोडके

(jaynews21@gmail.com)

(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)

WhatsApp channel