मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 24 January 2024: गैरसमज निर्माण होण्याची शक्यता! वाचा राशीभविष्य!

Horoscope Today 24 January 2024: गैरसमज निर्माण होण्याची शक्यता! वाचा राशीभविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 24, 2024 09:54 AM IST

Horoscope Today 24 January 2024: आज २४ जानेवारी २०२४ बुधवार रोजी, दिवस शुभ असेल की अशुभ, लाभ होईल की नुकसान, किती संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे राशीभविष्य.

Horoscope Today 24 January 2024
Horoscope Today 24 January 2024 (Freepik)

आज बुधवार २४ जानेवारी रोजी, मिथुन राशीनंतर चंद्र कर्क राशीत प्रवेश करेल.अशा स्थितीत आज चंद्रावर बुधाची दृष्टी खूप शुभ आहे. तसेच बुध आणि मंगळाचा संयोग होईल. वाचा राशीभविष्य!

मेष: 

आज लांबच्या प्रवासाचे बेत आखले जातील. वैवाहिक जीवनात घरातील वातावरण आनंदी राहील. वेगवेगळ्या कल्पनांचे स्वागत होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. विद्यार्थ्यांना संधी मिळेल. वाहन घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. स्नेह प्राप्त होईल. व्यापार उद्योग तेजीत राहील. नावलौकिक वाढेल. कला क्षेत्रातील व्यक्तिंना लाभ होईल. आरोग्याकडे लक्ष द्या. आपल्या कुवती पेक्षा मोठी जबाबदारी स्विकारू नये. 

वृषभ: 

आज प्रमोशन मिळण्याचे योग आहेत. व्यवहारिक निर्णय घेण्यावर जास्त भर द्याल. जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात आवश्यक ते बदल करण्याच्या संधी मिळतील. कौटुंबिक पातळीवर उत्तम सुख मिळेल. लेखन कार्य व ग्रंथप्रकाशानात लाभ होईल. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. मित्रमैत्रिणींकडून लाभ होतील. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी शुभ दिवस आहे. उत्तम धनप्राप्ती होईल. प्रयत्नात यश मिळेल.

मिथुन: 

आज कोणत्याही कामाचे नियोजन करण्यात कमी पडू शकतात. बुद्धीचा उपयोग विधायक कामासाठी करणे आवश्यक आहे. मित्रपरिवारावर जास्त विश्वास टाकणे योग्य ठरणार नाही. आर्थिक विवंचना थोडी सतावेल. मौल्यवान वस्तु गहाळ होण्याची शक्यता आहे. पूर्वी घेतलेला निर्णय चुकीचा ठरण्याची शक्यता आहे. झोपेचा त्रास होईल. प्रकृतीची विशेष काळजी घ्या. वाहन जपून चालवा. काळजीपूर्वक व्यवहार करा.

कर्कः 

आज आर्थिक बाबतीत प्रगती होईल. परदेशाशी संबंधित कामे लवकर घडून येतील. घरातील लोकांचे उत्तम सहकार्य लाभेल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. खरेदी करण्याचा मूड राहील. बेरोजगारांना नवीन नोकरीची संधी मिळेल. मनातील योजना पार पाडता येणार आहेत. तशी काही आर्थिक तरतूद होईल. मोठ्या व्यवहारात आर्थिक फसवणुक होणार नाही काळजी घ्या. अर्थिक कामात चांगले यश लाभेल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा.

सिंहः 

आज बौद्धिक क्षमता सिद्ध कराल. तज्ज्ञांच्या सल्ल्याने एखादी आर्थिक गुंतवणूक करायला हरकत नाही. कुटुंबातील लहान व्यक्तींचा सल्ला मानलात तर फायद्याचे ठरेल. जोडीदाराचे सहकार्य उत्तम राहील. नोकरी व्यवसायात हव्या असलेल्या संधी मिळतील. संधीचा लाभ घ्यावा. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. नवीन वाहन खरेदीची इच्छा मनात निर्माण होईल. आर्थिक नियोजानावर वेळेत भर द्या. कुंटुंबात खेळीमेळीचे वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा.

कन्याः 

आजच्या इच्छा पूर्ण होतील. तरीसुद्धा अनावश्यक चिंता तुमचा पाठलाग करतील. प्रत्यक्षात न उतरणारी स्वप्ने रंगवल्यामुळे अपेक्षा भंगालाही तोंड द्यावे लागेल. व्यापारात वेळेवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. भागीदारीत अपेक्षित लाभाचे योग आहेत. स्थावर मालमला संपत्तीचे प्रश्न मार्गी लागेल. स्वसंपादिन धनाचा उपभोग घ्याल. प्रेमप्रकरणात मात्र फसगत होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडथळे निर्माण होतील.

तूळ: 

आज लोकांचे सहकार्य उत्तम मिळेल. व्यापारात परिस्थितीवर मात कराल. खर्चिक आणि उधळ्या स्वभावाला आळा घालावा लागेल. उद्योग व्यवसायात प्रगती होईल. नवीन वाहन खरेदीचे योग आहे. मनावरचा ताण बर्‍यापैकी कमी झालेला असेल. सहकुटुंब प्रवासाचा बेत आखाल. जोडीदाराच्या मदतीने महत्त्वाचे निर्णय घेणे निश्चित शक्य होईल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. नवीन योजनेस प्रारंभ करण्यास उत्तम दिवस आहे. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवा. चैनीच्या वस्तू घेण्याकडे ओढ राहील. 

वृश्चिक: 

आज कार्यक्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग कराल. तारतम्य ठेवून निर्णय घ्यावे लागतील. धाडस आणि कामाचा उरक चांगला राहील. व्यवसायात कामगारांच्या प्रश्नाकडे डोळेझाक करून चालणार नाही. परदेशाशी व्यवहार असणाऱ्यांना फायदेशीर ठरेल. उतावीळपणावर आवर घालावा. व्यापारात बदल होऊ शकतात. कामाचे सकारात्मक परिणाम दिसतील. व्यापारात आर्थिकवृद्धी होईल. सहकार्य लाभेल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. नयोग्य वेळी योग्य निर्णय घ्या.

धनु: 

आज वडिलोपार्जित इस्टेटीसंबंधी वाद निर्माण होतील. व्यापारात तोट्याचे प्रमाण वाढेल पण अडकलेले पैसे वसूल करण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक लाभ चांगले होतील. नोकरीत नवीन कल्पनांचा वापर करून कामाचे नियोजन कराल. आपण अहंकारी वृत्तीचा त्याग करावा. माणसं दुरावली जातील असी वर्तणुक टाळावी. वेळेचे व्यवस्थापन गरजेचे आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. आर्थिक व्यवहार करताना पूर्ण सतर्क राहा. फसवणूक होऊ शकते.

मकर: 

आज मानसिक त्रास निर्माण होणाऱ्या घटना घडतील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काही तडजोडी कराव्या लागतील. आर्थिक समाधान मिळाल्यामुळे स्वस्थ राहाल. थोडे गैरसमज होण्याची शक्यता आहे. ज्ञान आणि व्यवहार यांच्या योग्य नियोजनाचा मेळ घातला तर काही गोष्टी फायद्याच्या ठरतील. यश संपादन करण्यासाठी कोणाचा तरी आधार घ्यावा लागेल. प्रवासात विघ्ने निर्माण होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे.

कुंभ: 

आज मनोधैर्य सांभाळा. व्यवसायात लहरीपणा ठेऊन चालणार नाही. आरोग्याच्या दृष्टीने जुनी दुखणी त्रास देतील. त्यामुळे पथ्यपाणी सांभाळणे हिताचे ठरेल. लहरी स्वभावावर नियंत्रण ठेवावे लागेल. विचारा अंतीच निर्णय घ्या. वाईट मित्राच्या संगतीमुळे नुकसान होईल. कार्यक्षेत्रात गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. मन शांत ठेवणाचा प्रयत्न करा. नोकरीमध्ये सरकारी अधिकारी वरिष्ठांकडून काही त्रास जाणवेल. कर्जाचा बोजा वाढू शकतो. प्रकृति अस्थिर राहील.

मीन: 

आज धाडसी निर्णय अंगलट येऊ शकतात. मुलांसाठी अचानक पैसा खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. पैशाचे पाठबळ चांगले मिळाल्यामुळे नवीन योजना मनामध्ये राबवाल आणि त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जीवाचे रान करायची तयारी ठेवाल. व्यावसायिकांनी दिशाभूल होणार नाही याची काळजी घ्यावी. अनाठायी खर्च होईल. कुटुंबातील सदस्याच्या आजारपणाने त्रासुन जाल. खर्चाने मन व्यथित होईल. मनात चिडचिडेपणा वाढणार आहे. प्रवास करताना काळजी घेणे आवश्यक आहे. शक्यतो प्रवास टाळा.

 

जय अर्जुन घोडके

(jaynews21@gmail.com)

(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)