Horoscope Today 23 March 2024 : आजचा शनिवारचा दिवस शुल योगात कसा जाईल दिवस! वाचा राशीभविष्य!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 23 March 2024 : आजचा शनिवारचा दिवस शुल योगात कसा जाईल दिवस! वाचा राशीभविष्य!

Horoscope Today 23 March 2024 : आजचा शनिवारचा दिवस शुल योगात कसा जाईल दिवस! वाचा राशीभविष्य!

Mar 23, 2024 08:41 AM IST

Horoscope Today 23 march 2024 : आज २३ मार्च २०२४ शनिवार रोजी, दिवस शुभ असेल की अशुभ, किती संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे राशीभविष्य.

राशीभविष्य २३ मार्च २०२४
राशीभविष्य २३ मार्च २०२४

आज चंद्र सिंह राशीत भ्रमण करतोय. प्रदोष दिनी चंद्र सुर्याच्या राशीतुन आणि केतुच्या नक्षत्रातून गोचर करणार आहे. वाचा राशीभविष्य!

मेषः 

आज ठोस निर्णय घ्याल. मानसिक तनाव दूर होईल. जुने कर्ज परत मिळेल. विवाह जुळतील. भावंडाची योग्य साथ मिळेल. नवीन व्यवसायाचा प्रस्ताव येईल. युवकांना काळ अतिशय अनुकूल आहे. नविन संधी आपल्याला मिळणार आहे. सौभाग्य योगात वृद्धी होईल. आर्थिक बाबतीतील प्रकरणे सुरुळीत पार पडतील. कर्ज मंजूर होईल. नवीन संधी व मानधनात वाढ होईल. संततीच्या प्रश्नामध्ये निर्णायक यश मिळेल.

वृषभः 

आज अनपेक्षित फळे मिळण्याची शक्यता आहे. कामांना गती येईल. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. मानहानी खोटे आरोप याला सामोरे जावे लागेल. चुकीच्या संगतीमुळे आळ येतील. नोकरी व्यापारात आर्थिक व्यवहार टाळावेत. कुंटुंबातील वरिष्ठ मंडळीच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. सावधानीपूर्वक वाटचाल करावी. व्यापारात आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत.

मिथुनः 

आज ठोस निर्णय घेऊ शकाल. अडखळल्यासारखे होईल. घरामध्ये एकमेकांच्या विचारांची तफावत जाणवेल. आर्थिक वृद्धीची बातमी ऐकायला मिळेल. संततीकडून समाधान सुख लाभेल. गुंतवणुकीसाठी दिवस उत्तम राहील. वाहन खरेदीचा विचार करत असाल तर दिवस आनंददायी आहे. तुमची पदोन्नती व प्रगती होईल. यश संपादनाची संधी मिळेल. पद प्रतिष्ठा लाभेल. 

कर्क: 

आज कलह उत्पन्न होणारा योग आहे. देवाण घेवाणीपूर्वी कागदपत्रे वाचा. वाद घालू नका. कुटुंबाचे समर्थन प्राप्त होणार नाही. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. रागावर नियंत्रण ठेवा. मानसिक क्लेश वाढेल. कौटुंबिक पातळीवरही समस्या उद्‌भवतील. कुटुंबापासुन दुर जाल. अनावश्यक राग आणी तापटपणा टाळावा. मोठी गुंतवणूक आज करू नये. प्रकृती वर लक्ष द्या. 

सिंहः 

आज जादा भांडवलाची गरज वाटेल. कामाची पद्धत बदलावी लागेल. विद्यार्थ्यांनी मनात शंका ठेवू नये. बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तीस प्रकाशन साहित्यिक यांच्या करिता आनंदी दिवस आहे. मन प्रसन्न राहील. नवनवीन कल्पना सुचतील. आर्थिक स्त्रोत वाढेल. मनातील संभ्रम दुर ठेवा. दाम्पत्य जीवन सुखी राहील. आरोग्य उत्तम राहील. नवीन घर वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे.

कन्याः 

आज लढा द्यावासा वाटेल. तुमची स्थिती उत्तम होईल. सवलतींचा उपयोग योग्य कारणा करताच करावा. मनातील संयशावृती वाढेल. भावनेवर नियंत्रण ठेवा. अनैतिकता वाढीस लागेल. कामकाजात अडचणीत आणणारे दिनमान राहील. मित्रमैत्रिणी सोबत आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. भांवडासोबत वादविवाद टाळा. निरर्थक कामात वेळ वाया घालवाल.

तूळ: 

आज आर्थिक लाभ होईल. मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. धन संचय करा. कौटुंबिक शांतता राखण्यास मदत होईल. मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. मान प्रतिष्ठा वाढविणारा दिवस आहे. ध्येय निश्चित करा. वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. आज यश निश्चित लाभेल. आकस्मिक धनलाभ होईल. विदेश भ्रमणाचे योग आहे. प्रवासातुन आर्थिक लाभ घडतील. 

वृश्चिकः 

आज कौटुंबिक जीवनात आणि समृद्धी आणेल. आकस्मिक लाभ होतील. नोकरीत समाधानकारक वातावरण लाभेल. प्रमोशन, बढती, पदोन्नतीचे योग आहे. सरकारी योजना आमलात आणल्या जातील. कलाकाराचा मान-सन्मान वाढेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. जुनी येणी येतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवासातून लाभाचा दिवस आहे.

धनु: 

आज दिवस उत्तम राहील. आर्थिक लाभ होतील. बढतीचे योग आहेत. विलासी वस्तूंची खरेदी कराल. आपला आत्मविशास वाढेल. मानसन्मान प्रतिष्ठा मिळणार आहे. जोडीदारांकडून साथ लाभेल. मित्रमैत्रिणी नातेवाईकांकडून मदत मिळेल. कार्यक्षेत्रात मन मग्न राहील. कामाचा योग्य मोबादला मिळाल्याने आत्मसंतुष्टी मिळेल. पत्नीसौख्य आणी संततीसौख्यही उत्तम असेल. आनंददायी वातावरण राहील. स्वभावातील गुणदोष मात्र टाळावेत. 

मकर: 

आज आर्थिक स्थिती उत्तम होईल. संधी मिळेल. आपल्या वाणीचा आणि व्यक्तीमत्वाचा प्रभाव इतरांवर पडेल. कुटुंबामधून आपणास सुवर्ता मिळणार आहे. कामाची जबाबदारी मिळेल. मित्रपरीवारांकडून सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात यश लाभेल. जमीन खरेदी विक्री तून अधिक लाभ होईल. खरेदी पासून व्यवसायात अनपेक्षीत फायदा होईल. भाग्यकारक घटना घडतील. 

कुंभ: 

आज अशुभ परिणाम मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. योग व व्यायामात सातत्य ठेवा. खर्चाला आवर घाला. पालकांच्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. चंचलपणावर आवर घाला. व्यवसायिकांना आर्थिक येणी येण्यास त्रास जाणवेल. व्यवहार अर्धवट होतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहील. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही, याबाबत काळजी घ्यावी लागेल. 

मीनः 

आज नोकरीत नेहमीपेक्षा जास्त काम करावे लागेल. सुखसोयीच्या साधनाची खरेदी कराल. वारसाहक्कातुन मिळणारी संपत्ती वास्तुविषयी काम सुरुळित पार पडणार आहेत. आपल्या कलागुणांना प्रोत्साहन मिळणार आहे. नोकरवर्गाकरिता आनंदाची बातमी मिळेल. धनवृद्धी होईल. विरोधकावर मात कराल. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढेल.

Whats_app_banner