Horoscope Today 23 January 2024: मंगळवार ठरेल मंगलमय, आर्थिक स्त्रोत वाढतील! वाचा राशीभविष्य!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 23 January 2024: मंगळवार ठरेल मंगलमय, आर्थिक स्त्रोत वाढतील! वाचा राशीभविष्य!

Horoscope Today 23 January 2024: मंगळवार ठरेल मंगलमय, आर्थिक स्त्रोत वाढतील! वाचा राशीभविष्य!

Jan 23, 2024 08:19 AM IST

Horoscope Today 23 January 2024: आज २३ जानेवारी २०२४ मंगळवार रोजी, दिवस शुभ असेल की अशुभ, लाभ होईल की नुकसान, किती संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे राशीभविष्य.

horoscope today 23 January 2024
horoscope today 23 January 2024

आज मंगळवार २३ जानेवारी रोजी, भौमप्रदोष आहे व चंद्र बुधाच्या राशीतुन आणि राहुच्या नक्षत्रातुन भ्रमण करणार आहे. चंद्राचा मंगळ, बुध आणि शुक्राशी प्रतियोग होत असून, वैधृती योगात कसा असेल मंगळवार! वाचा राशीभविष्य!

मेषः 

आज धार्मिक कार्य घडतील. व्यवसायात कुणी नवीन भागीदार जोडण्याचा विचार कराल. भांडवलाची गरज वाटेल. कामाची पद्धत बदलावी लागेल. तुमचे विचार लादण्याचा प्रयत्न कराल. विद्यार्थ्यांनी मनात शंका ठेवू नये. बौद्धिक क्षेत्रात आनंदी दिवस आहे. मन प्रसन्न राहील. नवनवीन कल्पना सुचतील आणि त्या आमलातही आणाल. त्यातून आर्थिक स्तोत्र वाढेल. मनातील संभ्रम दुर ठेवा. वैवाहीक जीवन सुखी राहील. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. नवीन कामकाज प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. आरोग्य उत्तम राहील. नवीन घर व वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे.

वृषभः 

आज समिश्र दिवस राहील. नोकरीत हक्क आणि अधिकारासाठी लढा द्यावासा वाटेल. कमाई वाढण्याचे योग बनतील. तुमची स्थिती उत्तम होईल. धैर्यावर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सवलतींचा उपयोग योग्य कारणा करता करावा. संयशावृती वाढेल. भावनेवर नियंत्रण ठेवा. अनैतिकता वाढेल. नोकरी बदलाचा विचार करत असाल तर बदलाची शक्यता आहे. मनावरचा संयम कमी होऊ शकतो. शासकीय कामकाजात अडचणीत आणणारा दिवस राहील. मित्रमैत्रिणी सोबत आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. भांवडासोबत वादविवाद टाळा. व्यावसायिक स्पर्धेत अपेक्षित सहकार्य लाभणार नाही. व्यर्थ कामात वेळ वाया घालवाल.

मिथुन: 

आज आर्थिक लाभ होईल. मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. बचत करा. कौटुंबिक शांतता राखाल. थोरामोठ्यांचे निर्णय लाभदायक ठरतील. वडिलोपार्जित स्थावर मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. प्रतिष्ठा वाढविणारा दिवस आहे. मानी आणि अहंकारी वृत्तीचा मात्र त्याग करा. ध्येय निश्चित करा. वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. आज यश निश्चित लाभेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. सहकार्य लाभेल. आकस्मिक धनलाभ होईल. विदेश भ्रमणाचे योग आहे. प्रवासातुन आर्थिक लाभ घडतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.

कर्कः 

आज अत्यंत शुभ दिवस आहे. व्यापाऱ्यांना कौटुंबिक जीवनात सुख-समृद्धी लाभेल. मेहनत पाहून तुम्हाला उत्तम कार्यासाठी कार्यक्षेत्रात ओळख मिळेल व मोठे अधिकारी तुम्हाला भेटू शकतात आणि प्रोत्साहन देऊ शकतात. आकस्मिक लाभ होतील. नोकरीत समाधानकारक वातावरण लाभेल. पदोन्नतीचे योग आहे. वरिष्ठ मंडळी आपल्या कामावर समाधानी असतील. शुभ दिवस आहे. कलाकारांचा मान-सन्मान वाढेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. उधारी वसुल होईल. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवास लाभाचा ठरेल.

सिंह: 

आज उत्तम दिवस राहील. वडिलधाऱ्यांपासून आर्थिक लाभ होतील. नोकरीत बढतीचे योग आहेत. लोकांना पटेल असेच वक्तव्य करा. विलासी वस्तूंची खरेदी कराल. आपला आत्मविशास वाढेल. मानसन्मान मिळेल. नवीन योजना आखल्या जातील. आपल्या कल्पनांना जोडीदारांकडून साथ लाभेल. मित्रमैत्रिणी नातेवाईकांकडून मदत मिळेल. कार्यक्षेत्रात मन लागेल. कामाचा योग्य मोबादला मिळाल्याने आत्मसुख मिळेल. पत्नीसौख्य आणी संततीसौख्यही उत्तम असेल. आनंददायी वातावरण राहील. स्वभावातील गुणदोष मात्र टाळा. सहकार्य लाभेल. शासकिय योजनेतून लाभ होईल. आकस्मिक धनलाभ होईल.

कन्या: 

आज झेपणारे काम स्वीकाराल. आर्थिक स्थिती उत्तम होईल. सोबतच आर्थिक निर्णय घेण्यासाठी सक्षम असाल. प्रभावशाली व्यक्तीच्या संपर्कात येण्याची संधी लाभेल. आपल्या वाणीचा आणि व्यक्तीमत्वाचा प्रभाव इतरांवर पडेल. कुटुंबामधून आपणास सुवार्ता मिळेल. व्यवसायात अनपेक्षीत फायदा होईल. भाग्यकारक घटना घडतील. नोकरीत अतिरिक्त कामाची जबाबदारी मिळेल. आप्तेष्ट मित्रपरीवारांकडून सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात यश लाभेल. संतती विषयी चिंता मिटेल. जमीन खरेदी विक्रीतून अधिक लाभ होईल.

तूळ: 

आज अशुभ परिणाम मिळतील. पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. योग व व्यायामात सातत्य ठेवा. व्यर्थ खर्च टाळा. वैचारिक मतभेदामुळे कौटूंबिक नात्यात दूरावा येऊ शकतो. पालकांच्या आरोग्याबद्दल सावध राहा. चंचलपणावर आवर घाला. व्यवसायिकांना आर्थिक येणी येण्यास त्रास जाणवेल. व्यवहार अर्धवट होतील. मान्यवरांची नाराजी ओढवून घेऊ नये अन्यथा त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. आर्थिक नुकसान होऊ शकते. विरोधक डोके वर काढतील. शत्रुपक्षाच्या कारवाया वाढू शकतात. कौटुंबिक पातळीवर काही समस्या उद्भभवतील. मानसिक स्वास्थाची काळजी घ्यावी. व्यर्थ वेळ वाया घालवू नका. प्रवासात काळजी घेणे आवश्यक आहे.

वृश्चिकः 

आज संधींना आपल्या हातून जाऊ देऊ नका. करिअरची गती काहीशी कमी होतांना दिसेल. कार्यक्षेत्रात जास्त काम करावे लागेल. त्यासाठी आवश्यक त्या सुविधा वरिष्ठ देतील. सुखसोयीच्या साधनाची खरेदी कराल. वारसाहक्कातुन मिळणाऱ्या मालमत्तेचे काम सुरुळित पार पडेल. आपल्या कलागुणांना वाव मिळेल.  प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढेल. नोकरवर्गाकरिता आनंदाची बातमी मिळेल. कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आंनदायक राहील. 

धनु: 

आज व्यापारात आर्थिक लाभाच्या मोहात न झेपणारे काम कराल. योग्य व्यक्तीची योग्य कामासाठी निवड करा. ठोस निर्णय घ्याल. मानसिक तनाव दूर होईल. जुने कर्ज परत मिळेल. विवाह जुळतील. भावंडाची योग्य साथ मिळेल. नवीन व्यवसायाचा प्रस्ताव येईल. युवकांना काळ अतिशय अनुकूल आहे. नविन संधी आपल्याला मिळणार आहे. सौभाग्य योगात वृद्धी होईल. आर्थिक बाबतीत प्रकरणे सुरुळीत पार पडतील. कर्ज मंजूर होईल. नोकरीत उपयोगी चर्चा घडुन येतील. टाळत असलेले काम पूर्ण होण्याचा योग आहे. यशस्वी व्हाल. कला क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी व मान-सन्मान मिळेल,  तसेच मानधन वाढेल. संततीच्या प्रश्नामध्ये निर्णायक यश मिळेल.

मकर: 

आज व्यवसायाशी संबंधित कोणतीही गोष्ट शेअर करणे टाळा. अडचणी येऊ शकतात. कामांना गती येईल. घरातील व्यक्तींना दिलेले आश्वासन पाळावे. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. आर्थिक नुकसान होण्याची फार शक्यता आहे. मानहानी खोटे आरोप याला सामोरे जावे लागेल. चुकीच्या संगतीमुळे आळ येतील. नोकरी व व्यापारात आर्थिक व्यवहार टाळावेत. शारिरिक इजा होईल, अथवा जुने आजार त्रास देतील. सांभाळून वाटचाल करावी. व्यापारात आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत.

कुंभ: 

आज कामकाज सुरु करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. ठोस निर्णय घ्याल. नोकरीत ठरविलेले उद्दिष्ट साध्य करण्याकरता मेहनत कराल. घरामध्ये परस्पर विचारांमध्ये मतभेद जाणवतील. आर्थिक वृद्धीची बातमी ऐकायला मिळेल. गुंतवणुकीसाठी दिवस उत्तम राहील. वाहन खरेदीचा विचार करत असाल तर दिवस आनंददायी आहे. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तींना प्रगतीकारक ग्रहमान आहेत. तुमची पदोन्नती व प्रगती होईल. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळेल. पत्नीकडून सहकार्य लाभेल. जोडीदार नोकरी करत असल्यास बढतीचे योग आहेत. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना पद प्रतिष्ठा लाभेल. संततीकडून समाधान लाभेल.

मीन: 

आज कलह उत्पन्न होणारा योग आहे. देवाण घेवाणीपूर्वी कागदपत्रे वाचा. मोठ्या निर्णयात कुटुंबाचे समर्थन मिळणार नाही. घरातील व्यक्तींशी क्षुल्लक कारणावरून वाद घालू नका. नव्या नोकरीचे निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. रागावर नियंत्रण ठेवा. नोकरी व्यापारात परस्पर सहकार्याच्या भावनेने राहा. मानसिक क्लेश वाढेल. कौटुंबिक पातळीवरही समस्या उद्‌भवतील. अनावश्यक राग आणी तापटपणा टाळावा. मोठी गुंतवणूक आज करू नये. प्रकृती वर लक्ष द्या. 

 

जय अर्जुन घोडके

(jaynews21@gmail.com)

(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)

 

Whats_app_banner