मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 23 february 2024: आजचा माघ शुक्ल चतुर्दशी; शुक्रवारचा दिवस कसा जाईल, वाचा राशीभविष्य!

Horoscope Today 23 february 2024: आजचा माघ शुक्ल चतुर्दशी; शुक्रवारचा दिवस कसा जाईल, वाचा राशीभविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Feb 23, 2024 06:00 AM IST

Horoscope Today 23 february 2024 : आज २३ फेब्रुवारी २०२४ शुक्रवार रोजी, लाभ होईल की नुकसान, दिवस शुभ असेल की अशुभ, किती संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे राशीभविष्य.

Today horoscope 23 february 2024
Today horoscope 23 february 2024

आज शुक्रवार २३ फेब्रुवारी रोजी, चंद्र स्वतःचा मालकीच्या कर्क राशीतून संक्रमण करणार असून, रवि-बुध यांच्याशी षडाष्टक योग करीत आहे. अशात कसा असेल मेष ते मीन सर्व राशींसाठी आजचा दिवस! वाचा राशीभविष्य!

मेषः 

आज कामाचा दर्जा सुधारून टाकाल. ऐषोआरामाचे जीवन जगावेसे वाटेल. घरामध्ये मंगलकार्ये ठरतील. त्यासाठी उत्तमोत्तम खरेदी कराल. विवाह इच्छूकांना आपला जोडीदार निवडण्याची संधी मिळेल. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. आध्यात्मिक विषयाची आवड निर्माण होईल. स्वभाव मन मिळावु राहील. नवीन वाहन घर खरेदीचे योग आहेत. प्रियजनांच्या भेठीगाठी होतील. 

वृषभः 

आज घरामध्ये जास्तीत जास्त वेळ द्यावा लागेल. आत्मविश्वास आणि उत्साह कमी राहील. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना काळ अनुकूलच आहे. कर्ज फेड करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. विद्यार्थ्यांनी आळसापासून दूर राहावे. मनासारख्या घटना घडण्यास पूरक दिवस आहे. ध्येयप्राप्तीकडे वाटचाल करा. बढती मिळण्याचे योग आहेत. कलाकारांना प्रसिद्धीचे योग आहे. आपले आरोग्य मानसिक समाधानामुळे उत्तम राहणार आहे.

मिथुनः 

आज विरोधावर मात करण्याची ताकद येईल. आर्थिक स्थिती सुधारली तरी खर्च तेवढेच वाढतील. अध्यात्मिक प्रगती साधाल. नवीन योजनेत कामाच्या जबाबदाऱ्या वाढतील. व्यवसायात आर्थिक तेजी आणि नेमकेपणा राहील. धन व संपत्ती लाभेल. नवीन कल्पना आखाव्या लागतील. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग येतील. जमीन खरेदी विक्रीतून उत्तम आर्थिक फायदा होईल. देवधर्म पूजापाठ यासारख्या धार्मिक कार्य करण्याची इच्छा निर्माण होईल.

कर्कः 

आज तुम्ही अस्वस्थ व्हाल. जास्तच कष्ट घ्यावे लागतील. व्यवसाय नोकरीत शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरेल. मोठ्यांच्या मनाप्रमाणे वागावे लागेल. निर्णय विचारपूर्वक घेणे गरजेचे आहे. घरातील वातावरण ताण-तणावात्मक राहील. उद्योग धंद्यात लक्ष कमी राहील. आर्थिक समस्या येऊ शकतात. निरर्थक कामात आपला वेळ जाईल. वेळेचा अपव्यय टाळा. 

सिंहः 

आज उत्तम यश मिळेल. एखाद्याच्या मध्यस्थीने कामे लवकर होतील. धंद्यातील कामे अंतिम टप्प्यावर जाऊन पोहोचतील. प्रसिद्धीचे योग येतील. खेळाडूंना चांगल्या संधी निर्माण होतील. प्रत्येक गोष्टीचे उत्तम चिंतन कराल. आपल्या कार्यक्षेत्रात आर्थिक लाभाबरोबर प्रतिष्ठाही मिळेल. जमिन विक्रीतून लाभ होईल. घरात एखादे धार्मिक कार्य कराल. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. खर्चावर नियंत्रण ठेवा.

कन्याः 

आज कामकाजामुळे काही कामे अडली असतील तर ती पूर्ण होतील. प्रमोशनही मिळू शकते. बराच पैसा खर्ची टाकाल. विद्यार्थ्यांचा तणाव कमी होईल. युवकांना काळ अतिशय अनुकूल आहे. नव नविन संधी मिळणार आहेत. कलाकारांना त्यांच्या कलागुणांना विकसित करण्यास ग्रहमान अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळेल. मेहनत वाढवावी लागेल. जबाबदारीने काम करा, फायदा होईल.

तूळ: 

आज वेगवेगळ्या संधी मिळतील. घरातील वातावरण सुधारेल. नोकरीत अधिकार मिळेल. राजकारणात भावनेपेक्षा बुद्धीच्या कसरतीचा उपयोग जास्त होईल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास यश मिळेल. स्पर्धकांवर मात करावी लागेल. नात्यात मैत्रीत मधुरता येईल. लेखक कलाकारांना नवनिर्मितीच्या संधी उपलब्ध होतील. मनातील योजना पार पाडता येतील. नव्या योजनावर काळजीपूर्वक काम करावे लागेल.

वृश्चिकः 

आज धडाडीचा मात्र फायदा होईल. प्रेम प्रकरणामध्ये तरुणांना यश येईल. महत्त्वाचे निर्णय लवकर घ्यावेत. परदेशी जाण्याचे योग येतील. उत्पन्नात वाढ होईल, परंतु हातात पैसे मिळायला थोडा वेळ लागेल. यशाचा आनंद मिळणार आहे. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. व्यवसाय वृद्धीच्या संधी चालून येतील. गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. कुटुंबातील व्यक्तींवर अथवा घरासाठी अचानक खर्च करावा लागेल.

धनुः 

आज मनाचा गोंधळ उडेल. अस्वस्थता वाढेल. थोडा ताण राहील. व्यवसायात मात्र स्पर्धकांना तोंड द्यावे लागेल. नव्या कल्पना इतरांना पटणार नाहीत. प्रेम आणि कर्तव्य यामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. नोकरीत व्यापारात कामाचा विस्तार वाढणार आहे. वेळेत काम पूर्ण करण्यावर भर द्या. प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. नोकरी करणाऱ्यांच्या कामाचा व्याप वाढणार आहे.

मकरः 

आज खर्चावर काटेकोरपणे नियंत्रण ठेवण्यात यशस्वी व्हाल. भाग्याची साथ चांगली मिळेल. तुमच्या मनातील गोष्टी पूर्ण होण्याचा मार्गावर राहतील. व्यवहारात तुमची मते स्पष्टपणे मांडायला घाबरू नका. लाबंच्या प्रवासाचे योग येतील. परंतु प्रवासामध्ये प्रकृती व चीजवस्तूंची काळजी घ्यावी. मानसिक आणि शारिरिक आरोग्य उत्तम राहील. बेरोजगारांना नोकरीची सुसंधी मिळेल. नोकरीत मोठ्या पदावर बदलीचे योग आहेत. मोठया अधिकाराची नोकरी मिळेल. हातात घेतलेल्या कामात यश मिळेल. मोठ्या घराण्याचा स्नेह प्राप्त होईल.

कुंभः 

आज एखाद्याच्या आजार पणासाठी पैसा खर्च होऊ शकतो. संततीच्या बाबतीत दोन पिढ्यां मधील संघर्ष अनुभवाल. इथे सुवर्णमध्य काढावा लागेल. आपले आरोग्यही जपा. व्यवसायिकांना व्यवसायासाठी अडचणीतून मार्ग काढावा लागेल. शुल्लक कारणांवरुन मानसिक भिती आपणास वाटेल. कोर्टकचेरीचे प्रसंग सध्या टाळावेत. प्रवासात काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

मीनः 

आज व्यवसायात कोणत्या गोष्टी केल्या असता आपली प्रगती होऊ शकते याचा खोलवर अभ्यास करा. वैवाहिक जीवनात एकमेकांना समजून घ्याल. त्यामुळे थोडी शांतता मिळेल. व्यवहारात नवनवीन गोष्टींचे जरा जास्तच आकर्षण राहील. व्यावसायिकांमध्ये आर्थिक आवक वाढेल. शेअर्समध्ये अथवा कमी कालावधीची गुंतवणूक करताना ती विचारपूर्वक करणे गरजेचे राहील. संततीकडून सर्व दृष्ट्या आनंददायक बातम्या मिळतील.

WhatsApp channel