Horoscope Today 22 September 2023 : शुक्राचा प्रभाव कोणत्या राशींवर?, वाचा आजचे राशीभविष्य
Rashi Bhavishya Today 22 September 2023 : कोणत्या राशींच्या लोकांसाठी शुभ आहे आजचा दिवस? कोणाला राहावं लागेल सावध? कोणाला मिळेल प्रमोशन? कसं असेल तुमचं मानसिक संतुलन? नेमका कसा जाईल आजचा दिवस? वाचा आजचं राशीभविष्य.
Horoscope Today 22 September 2023 : येणारा दिवस कसा जाणार याचं कुतुहल प्रत्येकाला असतं. तो चांगलाच असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण तसं होतंच असं नाही. त्यामुळंच आपलं भविष्य जाणून घ्यायची उत्सुकता माणसाला असते. मनुष्याच्या जन्म राशीनुसार आणि ग्रहांच्या स्थितीवरून ज्योतिषशास्त्र भविष्याबद्दल काही अंदाज वर्तवत असतं. त्याआधारे अनेक जण आपल्या दिवसाची आखणी करतात किंवा सतर्कता बाळगतात. त्यांच्यासाठी ज्योतिषविद्येचे अभ्यासक जय घोडके (jaynews21@gmail.com) सांगताहेत आजचं राशिभविष्य!
ट्रेंडिंग न्यूज
मेषः व्यापारात नवीन योजना कायदेशीर ठरतील. आर्थिक खर्चाचा ताळमेळ ठेवा. नोकरीत तणाव मुक्त झाल्याने मन समाधानी राहील. अचानक लाभ होतील. प्रवास लाभकारी ठरतील. आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. परदेशभ्रमणाचे योग आहेत. शुभरंग: केसरी शुभदिशा: दक्षिण.
वृषभः कुटुंबातील सदस्यांसोबत वादविदाचे प्रसंग टाळा. संततीकडे विशेष लक्ष दयावे. मुलांच्या कामावर नजर ठेवा. कलाक्षेत्रात केलेल्या कामाचे चीज होणार नाही. खर्चामध्ये वाढ होईल. आरोग्याची काळजी घ्या. शुभरंग: भगवा शुभदिशा: पश्चिम.
मिथुनः व्यापारात आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. कार्यक्षेत्रात विस्तार वाढ होईल. उधारी वसुली होईल. नव्या संधीचा फायदा होईल. आर्थिक बाबतीत मोठे लाभ होण्याची शक्यता आहे. प्रकृती स्थिर राहिल. प्रवासातुन आर्थिक फायदा होईल. शुभरंग: पोपटी शुभदिशा: उत्तर.
कर्क: आपल्या कार्यपद्धतीत बदल फायदा होईल. मान सन्मान मिळण्याचे योग आहेत. दुरच्या प्रवासातून लाभ होतील. दुर्व्यसना पासून दूर रहा. दुरवरचे प्रवास घडतील. दिनमान उत्तम राहिल. शुभरंगः गुलाबी शुभदिशा: वायव्य.
सिंहः प्रतिष्ठित व्यक्तींच्या संबंधाचा फायदा उचला. व्यापारात नवीन प्रस्ताव मिळतील. प्रिय व्यक्तींची भेट होण्याचे योग आहेत. आपल्या पराक्रमामुळे समाजात प्रतिष्ठा वाढणार आहे. मोठी आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. फायदेमंद दिवस राहील. शुभरंगः लालसर शुभदिशा: पूर्व.
कन्याः जवाबदारी वाढणार आहे. वादविवाद टाळावेत. नवीन संप्पत्ती खरेदीचा योग आहे. आर्थिक बाबतीत मध्यम स्वरुपाचा दिवस आहे. शेअर्स मधील गुंतवणूक आज करू नये. मित्रमैत्रिणीत आर्थिक व्यवहार टाळावेत. आध्यात्मिक ओढ निर्माण होईल. शुभरंग: हिरवा शुभदिशा: उत्तर.
तुलाः नात्यात मनमुटाव होण्याची शक्यता आहे. व्यापारात गुंतवणूक करण्याचा विचार टाळा. अंहकार आणी मोठेपणामुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. शुभरंगः सफेद शुभदिशा: आग्नेय.
वृश्चिक: कठोर भुमिकेत राहावं लागेल. वाईट सवयीचा त्याग करा. महत्वकांक्षेनुसार सर्व कामे पार पडतील. उताविळपणा करू नये. संयम ठेवून वाटचाल करावी. मनस्वास्थ सांभाळा. सकारात्मक विचार ठेवा. शुभरंग: तांबूस शुभदिशा: दक्षिण.
धनु: व्यापार रोजगारात नवीन संधी येऊ शकते. शुभकार्यात सहभाग घ्याल. यश व उत्साह वाढणार आहे. संकुचित मनोवृत्ती टाळा. प्रवास लाभकारी ठरतील. दुरवरचे प्रवास घडतील. शुभरंग: पिवळा शुभदिशा: ईशान्य.
मकरः मित्रमंडळीचे सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात यश येईल.स्वतःच्या मनाने विचाराअंतीच निर्णय घ्या. आहारावर नियंत्रण ठेवा. कार्याचा विस्तार वाढेल. मानधनात वाढ होईल. शुभरंग: जांभळा शुभदिशा: नैऋत्य.
कुंभः व्यापारात स्पर्धकांच्या चुकीचा नकळत फायदा होईल. व्यापारात वाढ होईल. महत्वपूर्ण व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. शासकीय योजनेतून लाभ घडेल. वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. शुभरंग: निळा शुभदिशा: पश्चिम.
मीन: व्यापारात आर्थिक समस्या येऊ शकतात. निरर्थक कामात आपला वेळ जाणार आहे. वेळेचा अपव्यय टाळा. धार्मिक प्रतिष्ठीत व्यक्ती किंवा राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी होतील. त्यातून फायद्याची शक्यता आहे. शुभरंग: पिवळसर शुभदिशा: ईशान्य.