मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 22 March 2024 : आज शुक्र प्रदोष व्रत, जन्मतारखेनुसार कसा जाईल दिवस! वाचा राशीभविष्य!

Horoscope Today 22 March 2024 : आज शुक्र प्रदोष व्रत, जन्मतारखेनुसार कसा जाईल दिवस! वाचा राशीभविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Mar 22, 2024 09:21 AM IST

Horoscope Today 22 march 2024: आज २२ मार्च २०२४ शुक्रवार रोजी, दिवस शुभ असेल की अशुभ, किती संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे राशीभविष्य.

आजचे राशीभविष्य २२ मार्च २०२४
आजचे राशीभविष्य २२ मार्च २०२४

आज चंद्र सिंह राशीत भ्रमण करतोय. प्रदोष दिनी चंद्र सुर्याच्या राशीतुन आणि केतुच्या नक्षत्रातून गोचर करणार आहे. वाचा राशीभविष्य!

मेषः 

आज व्यक्तींना उत्तम धनप्राप्तीचा योग आहे. प्रकृतीच्या जुन्या तक्रारी पुन्हा उद्भवतील, त्यामुळे योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. व्यापार व्यावसायिकांमध्ये आर्थिक आवक वाढेल. शेअर्समध्ये अथवा कमी कालावधीची गुंतवणूक करताना ती विचारपूर्वक करणे गरजेचे राहील. नवीन वाहन अथवा चैनीच्या वस्तू खरेदीचे योग आहे. परदेश भ्रमणासाठी अनुकुल दिवस आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल.

वृषभ: 

आज कार्यक्षेत्राच्या ठिकाणी सावध राहावे. रागाचा पारा चढेल. बरीच कामे सुलभ होतील. आर्थिक खोळंबलेली कामे मार्गी लागतील. वातावरण प्रसन्न राहु शकते. वादविवाद होणारा दिवस ठरेल. सावध राहा. कौटुंबिक किंवा मालमत्ते विषयक प्रश्न निर्माण होतील. कर्ज घेण्यापासून दूर राहा. मनस्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. व्यवहारात फसवणुकीची शक्यता आहे. 

मिथुन: 

आज सहकार्याची अपेक्षा कराल, परंतु निराशा पदरात पडेल. पण आर्थिक प्रश्न सुटतील. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. उद्दिष्ट साकार करण्यासाठी अनुकूलता लाभेल. जोमाने चिकाटीने प्रयत्न करावे. अपेक्षित संपादन करता येईल. दिवस शुभ लाभदायी असणार आहे. आर्थिक आवक वाढल्याने आपण संतुष्ट असाल. वास्तु खरेदी विक्रीतून फायदा होईल. आजचा दिवस आनंददायी आहे. व्यापारात नवीन योजना यशस्वी होतील.

कर्क: 

आज घरातील वयस्कर व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. नोकरीत बॉसची मर्जी राहील. त्याचा फायदा करून घ्या. जुळवाजुळव करण्यात धन्यता मानाल. मधुमेहाचा विकार आहे त्यांनी पथ्य पाळावे. क्लेश वाढेल. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. नुकसान होण्याची शक्यता आहे. आपल्या कामाचे चिज होणार नाही. कामात निरुत्साहीपणा राहील. व्यापारात पद प्रतिष्ठा सांभाळा. जोडीदाराशी कटकटीचे वातावरण राहील.

सिंह: 

आज आर्थिक बाबतीत अनुकुलता असणार आहे. भरपूर कष्टाची आहुती द्यावी लागेल. उत्साही वातावरण राहील. प्रिय व्यक्तीसाठी वाटेल तो त्याग करण्याची तयारी दर्शवाल. मनावरचा संयम सुटण्याची शक्यता आहे. मनोरंजनाकडे कल राहील. व्यापारात उत्तम धनलाभ होईल. उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. तिर्थक्षेत्री यात्रा घडतील. आज भाग्याची साथ लाभेल. शुभवार्ता ऐकायला मिळेल. सरकारी कामातुन लाभ होईल.

कन्याः 

आज चंद्रबल अनिष्ट आहे. गुंतवणूकीचे कोणतेही निर्णय घेऊ नयेत. गाठीभेटी होतील. घरात वादाचे प्रसंग निर्माण होतील. प्रवासात विघ्ने निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रवास थोडा जपूनच करावा. पत्नी जोडीदाराच्या आरोग्याची समस्या चिंतीत करणारी ठरेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. वादविवाद होण्याची शक्यता आहे. प्रेमप्रकरणात त्रास होईल.

तूळ: 

आज तीर्थयात्रेला जाण्याचे बेत ठरवाल. कुटुंबासाठी एखादा त्याग करावा लागेल. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. कुटुंबासाठी वेळ मिळेल. क्रोधावर मात्र नियंत्रण ठेवा. पत्नी व पुत्र यामुळे काहीसा मानसिक त्रास सोसावा लागेल. स्पर्धकांवर विजय मिळवाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. मनात उत्साह राहील. जोडीदारांकडून सहकार्य लागेल. मातृपक्षाकडून आर्थिक लाभ होतील.

वृश्चिक: 

आज विद्यार्थ्यांना यश मिळेल. एखाद्या गोष्टीचा लाभ मिळण्यासाठी करावी लागणारी तडजोड थोडी मनाविरुद्ध असेल. अचानक धनप्राप्तीची उत्तम संयोग निर्माण करेल. शास्त्रीय विषयाची आवड निर्माण होईल. स्वभाव मन मिळावु राहील. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. भांवडे मदत करतील. वाहन खरेदीचा योग आहे. परदेशात नोकरीची संधी मिळेल. नवनवीन प्रोजेक्टसाठी अनुकूल दिनमान राहील.

धनुः 

आज अत्यंत शुभ दिनमान असेल. नोकरी व्यवसायात नवीन क्षितीजे साद घालतील. प्रवासाचे योग आहेत. कामात मात्र कसूर करू नये. ज्ञान आणि शक्ती याचा योग्य समन्वय साधाल. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने जादा काम करावे लागेल. आपल्या शांतीप्रिय स्वभाव आणि गुणवैशिष्टया मुळे पुरेपूर फायदा होईल. आर्थिक उत्पन्न मनासारखे होईल. आत्मविश्वास द्विगुणित होईल. कौटुंबिक जीवनात आनंद घ्याल. मन प्रसन्न राहील. 

मकर: 

आज प्रतिकूल वातावरण राहील. मनामध्ये मात्र प्रचंड खळबळ असा अनुभव येईल. जवळच्या मित्राच्या भरवशावर रहाल परंतु त्यापासून लाभ मिळणार नाही. थोडे मनःस्तापाचे प्रसंग येतील. जोडीदाराच्या अचानक चांगल्या वाईट वागण्यामुळे तुमचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. काहींना परदेशात प्रवास घडुन येतील. स्वभावानुसार मानसिक चिडचिड दगदग होईल. विरोधकांचा त्रास सहन करावा लागणार आहे. व्यापारात नुकसान होण्याची शक्यता आहे. वाईट संगत अंगलट येईल. गुंतवणूक टाळा.

कुंभः 

आज धडाडीने एखादे काम पूर्ण करणे या गोष्टी संभवतात. अभ्यासात प्रगती करून घेता येईल. खूप दिवसांपासून अडलेली कामे मार्गी लागतील. प्रवासाचे योग येतील. आर्थिक व्यवहारात तुम्हाला जाणवणारी भीती अयोग्य नाही. तेव्हा व्यवहार जपूनच करावा. नवीन संधी प्रस्ताव येतील. आपला आत्मविश्वास द्विगुणित राहणार आहे. मनात प्रसन्नता. समाधानकारक प्रगती राहील. भागीदारीमुळे आर्थिक धनलाभ होतील.

मीन: 

आज आर्थिक गुंतवणूक कराल. धार्मिक गोष्टी करण्याकडे कल राहील. मित्र परिवारामध्ये रमाल. बौद्धीक कसरती करण्याबरोबरच मनोरंजन करण्याकडेही कल राहील. सामाजिक कार्याची आवड निर्माण होईल. अनुकूल अपेक्षित लाभदायक घटना घडतील. नवदांपत्यास आनंदाची बातमी मिळेल. व्यापारात फसव्या योजनेवर विश्वास ठेवू नका. नातेवाईकांकडून सहकार्य लागेल. आज गुंतवणुकीसाठी शुभ दिवस आहे. आर्थिक स्त्रोत वाढेल.

WhatsApp channel