मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 22 february 2024: आजचा माघ शुक्ल त्रयोदशी गुरुवारचा दिवस कसा जाईल, वाचा राशीभविष्य!

Horoscope Today 22 february 2024: आजचा माघ शुक्ल त्रयोदशी गुरुवारचा दिवस कसा जाईल, वाचा राशीभविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Feb 22, 2024 11:34 AM IST

Horoscope Today 22 february 2024: आज २२ फेब्रुवारी २०२४ गुरुवार रोजी, दिवस शुभ असेल की अशुभ, लाभ होईल की नुकसान, किती संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे राशीभविष्य.

horoscope 22 february 2024
horoscope 22 february 2024

आज गुरुवार २२ फेब्रुवारी रोजी, गुरुपुष्यामृत योग आणि विश्वकर्मा जयंतीचा चंद्र स्वराशीतून आणि पुष्य या सर्वाधिक शुभ नक्षत्रातुन भ्रमण करीत आहे. अशात कसा असेल मेष ते मीन सर्व राशींसाठी आजचा दिवस! वाचा राशीभविष्य!

मेष: 

आज मोहात न पडता कामे करण्याला प्राधान्य द्या. प्रयत्नाला महत्त्व द्यावे लागेल. हृदयविकाराचा त्रास असणाऱ्यांनी पथ्यपाणी सांभाळा. स्वभावात राग उत्पन्न होण्याची शक्यता आहे. मनमुटाव होण्याची शक्यता आहे. मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. कर्जप्रकरणात काळजीपूर्वक व्यवहार करा. भावनावर नियंत्रण ठेवा. 

वृषभ: 

आज कष्टाचे चीज होईल. स्थावर इस्टेटीचे प्रश्न मात्र रेंगाळण्याची शक्यता आहे. निद्रानाशाचे विकार उद्भवू शकतात. वाचनाची आवड जोपासाल आणि ज्ञानाचा आनंद घ्याल. गोड बोलून कामे करून घ्याल. आर्थिक स्थिती सुधारेल. एखादी फायदेशीर गुंतवणूक कराल. धनलाभाचा योग आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल.  लेखन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंडळीना उत्तम दिवस आहे. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील.

मिथुन: 

आज प्रेमीजनांना प्रेमप्रकरणातअडथळे संभवतात. कामाची गती मंदावेल. धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टीत जास्त आवड निर्माण होईल. व्यापारात वाढ करणारा दिवस राहील. मेहनतीनुसार चांगल्या फलांची प्राप्ती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. व्यापारी वर्गात व्यवसायात अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल करावी. वादविवाद मात्र टाळावे. आर्थिक बाबतीत लाभाच्या दृष्टीकोनातून उत्तम दिवस राहील.

कर्क: 

आज प्रत्येक कामाचे खोलवर चिंतन कराल. कल्पनाशक्ती आणि दूरदर्शी पणाच्या जोरावर लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवाल. तुमची अध्यात्मिक साधना फळाला येईल. सामाजिक कार्यात रस घ्याल. गैरसमज, वितंडवादाची गाठोडी मागे टाकून पुढे जाल तर सुखी व्हाल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. आर्थिक लाभाची सुखद संधी मिळेल. कौटुंबिक सौख्य समाधानकारक राहील. दुरवरचे प्रवास लाभदायक भौतिक सुख उत्तम मिळेल.

सिंहः 

आज हाती घेतलेल्या कामात यशस्वी व्हाल. अडचणी येतील. परंतु एकंदरीत यशाकडेच वाटचाल राहील. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. इस्टेटीतून वारसाहक्कातुन धनलाभ संभवतो. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. नावलौकिक वाढेल. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तिंच्या भेटी घडतील. कार्य पद्धतीवर लक्ष केंद्रित केल्यास अनपेक्षीत लाभ होतील. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. सहकार्य मिळेल. 

कन्याः 

आज आनंदी आणि उत्साही वातावरण लाभेल. तुमच्या आनंदात वरिष्ठही सहभागी होतील. घरात नवीन वस्तूंची खरेदी कराल. उत्तम महत्त्वाकांक्षा ठेवून कामे पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन करणार आहात. आपणास उद्योग धंद्यात विशेष लाभ मिळेल. व्यापारात चांगले बदल मोठे फायदेशीर ठरतील. वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. भागीदारांकडून उत्तम सहकार्य लाभेल. पत्नीसोबत गोडी व दुरावा असे दोही फळे अनुभवास येतील. परदेश भ्रमणाचा योग आहे.

तूळ: 

आज आर्थिक स्थिती सुधारेल. मित्रमंडळींचे उत्तम सहकार्य मिळेल. मोठ्या भावंडांची मदत मिळेल. तुमच्या कामाचे लाभ तुम्हाला चांगले होतील. खेळाडूंना लाभदायक दिवस आहे. खाद्य पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल. बौद्धीक क्षेत्रात मानसन्मानाचे योग येतील. विद्यार्थ्यांची शिक्षणामध्ये अपेक्षेप्रमाणे प्रगती होईल. संततीकडून आनंदाची बातमी कळेल. शेअर्समध्ये दिर्घकालीन गुंतवणूक लाभ देणार आहे. कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांकडून मार्गदर्शन आणि सहकार्य लाभेल.

वृश्चिकः 

आजच्या थोडी तडजोड करावी लागेल. आळसामुळे कामात दिरंगाई होईल. भावंडांशी मतभेद संभवतात. शिक्षणात थोडे अडथळे संभवतात. नोकरीत अतिरिक्त कामाचा ताण जाणवेल. वरिष्ठांशी वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. व्यापारानिमित्त प्रवास होईल. हानी होण्याची शक्यता आहे. कुटुंबात मतभेद संभवतात. कुटुंबातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. मानसिक त्रास जाणवेल. स्वभावातील चंचलतेवर नियंत्रण ठेवा.

धनुः 

आज आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम ठसा निर्माण करण्यास तुम्ही वरचढ ठरणार आहात. चैनीच्या वस्तूंची खरेदी करण्याचा मूड राहील. मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. कुटुंबात वेळेचे नियोजन उत्तम कराल. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. व्यापारात वाढ विस्तार होईल. योग्यवेळी घेतलेल्या निर्णयाचा फायदा होईल. साहित्या क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. वैवाहिक सुखात वाढ होईल.

मकरः 

आज करिअरमध्ये मानसिक अस्वस्थता जाणवेल. वडीलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. खेळाडूंना लाभदायक दिवस आहे. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराला पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे वादविवादाचे प्रसंग उद्भवतील. मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न ठेवा. पारिवारिक सहकार्य लाभणार नाही. व्यापार रोजगातात काही अडचणीचा सामना करावा लागू शकतो. दुरवरचे प्रवास शक्यतो टाळा. अर्थप्राप्तीत अडथळे निर्माण होतील.

कुंभः 

आज खूप स्वप्ने रंगवली असतील तर त्याची पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू होईल. काळजी करण्यापेक्षा काळजी घेण्याची सवय अंगी बाळगा. हुशारी आणि उद्योग प्रियतेमुळे यशाला खेचून आणाल. चांगल्या संधी मिळतील. स्वभावात थोडा निष्काळजीपणा राहील. फार ताण घेऊ नका. मानसिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. व्यवसायातील अडचणी सोडविण्यासाठी मित्रांची भागीदाराची मदत घ्यावी लागेल. आपल्या स्वभावात चंचलता निर्माण होईल. मोठी आर्थिक गुंतवणूक आज टाळा.

मीनः 

आज तब्येत खूष राहील. दूरच्या प्रवासाचे योग येतील. प्रकृतीचा कोणताही त्रास अंगावर काढू नये. नोकरी व्यवसायात घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांपासून लाभ होईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. नवीन गृहपयोगी वस्तु खरेदी कराल. फायदेशीर प्रवास होऊ शकतो. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग आहे. पदप्राप्ती, मान-सन्मान आणि प्रसिद्धी मिळेल.