Horoscope Today 21 September 2023 : येणारा दिवस कसा जाणार याचं कुतुहल प्रत्येकाला असतं. तो चांगलाच असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण तसं होतंच असं नाही. त्यामुळंच आपलं भविष्य जाणून घ्यायची उत्सुकता माणसाला असते. मनुष्याच्या जन्म राशीनुसार आणि ग्रहांच्या स्थितीवरून ज्योतिषशास्त्र भविष्याबद्दल काही अंदाज वर्तवत असतं. त्याआधारे अनेक जण आपल्या दिवसाची आखणी करतात किंवा सतर्कता बाळगतात. त्यांच्यासाठी ज्योतिषविद्येचे अभ्यासक जय घोडके (jaynews21@gmail.com) सांगताहेत आजचं राशिभविष्य!
मेषः रोजगाराच्या संधी मिळतील, व्यापारात नाव कमवाल. आरोग्याची काळजी घ्या. विदेशात फिरायला जाण्याचे योग आहेत. वैवाहिक जीवनात पत्नीचा पूर्ण पाठिंबा मिळाल्याने आपले मनोबल वाढवणारा दिवस राहील. शुभरंगः तांबूस शुभदिशाः दक्षिण.
वृषभः कौटुंबिक कलह वाढण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल. मानसिक तणाव येईल. दूरचे प्रवास टाळायला हवे. शासकीय कर्मचारी असाल तर खोट्या प्रकरणात निष्कारण गुंतला जाल. आर्थिक हानी संभवते स्वभावातील मानीपणा हट्टीपणा सोडा. शुभरंगः सफेद शुभदिशाः वायव्य.
मिथुनः बायकोशी भांडणं होतील. मुलामुलींना परिक्षांमध्ये मोठं यश मिळेल. पैशांचे व्यवहार काळजीपूर्वक करा. कौटुंबिक सौख्य लाभेल. धैर्य आणी संयम राखा. शुभरंगः पोपटी शुभदिशाः उत्तर.
कर्कः राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे काम कराल. रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये प्रतिकारक दिनमान आहे. घरातील समस्या दूर होतील. प्रेम प्रकरणात स्नेह वाढेल. जोडीदाराकडून सहकार्य लाभणार आहे. शुभरंगः सफेद शुभदिशाः वायव्य.
सिंह: व्यवसायात हमखाश यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहिल. विरोधकांवर मात कराल. भागीदारांकडून नवीन लाभदायक प्रस्ताव येईल. प्रवासाचे नियोजन आखाल. प्रवास सुखकर होतील. शुभरंगः लाल शुभदिशाः पूर्व.
कन्या: वादविवाद टाळा. नातेवाईक मित्रमैत्रिणीबाबत अशुभ अप्रिय घटना घडतील. तणावमुक्त होऊन कार्य करा. आर्थिक बाबतीत कोणावर विसंबून राहू नये. संततीवर लक्ष ठेवा. शुभरंगः हिरवा शुभदिशाः उत्तर.
तुला: व्यवसायात किंवा रोजगारात मोठे परिवर्तन घडून येण्याची शक्यता आहे. लोकप्रियता वाढणार आहे. शासनाकडून पैसा किंवा सन्मान मिळेल. मानसिक संतुलन संभाळा. शुभरंगः गुलाबी शुभदिशाः आग्नेय.
वृश्चिक: वाणीचा बुद्धीचा प्रभाव इतरावर राहील. व्यापारात प्रतिष्ठा वाढेल. मित्रमैत्रीणीचे सहकार्य लाभेल. व्यापारात मोठे लाभ होतील. राजकीय व्यक्तींनी वाद निर्माण होईल असी विधान टाळावीत. शुभरंगः नारंगी शुभदिशाः दक्षिण.
धनु: नोकरीत प्रगतीकारक दिवस असून नवीन चांगली संधी अथवा पदोन्नती होईल. ग्रहयोग अनुकूल आहे. कला क्षेत्रातील व्यक्तींना आनंदाचा दिवस आहे. स्थावर इस्टेटीपासून लाभ होईल. व्यसनापासुन दुर रहा. शुभरंगः पिवळा शुभदिशाः ईशान्य.
मकर: प्रभावशाली लोकांशी संपर्क येईल. व्यापारात नवीन योजनेमध्ये लाभ होईल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. विरोधकापासून सावध रहा. सामाजिक मान सन्मान मिळेल. मानसिक समाधान लाभेल. शुभरंगः निळा शुभदिशाः पश्चिम.
कुंभ: अनिश्चततेमुळे अडचणी वाढतील. नोकरीत नव्या कल्पना सुचत असल्या तरी त्या विशेष फायद्याच्या ठरणार नाहीत. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होईल. आरोग्याची काळजी घ्यावी. शुभरंगः जांभळा शुभदिशाः नेॠत्य.
मीन: नातेवाईकांसोबत वदविवाद टाळावेत. अनावश्यक कामासाठी वेळ वाया घालू नका. नोकरीत कार्याचा विस्तार वाढेल. प्रतिस्पर्ध्यावर नजर ठेवा. आर्थिक प्राप्तीचा मार्ग सापडेल. आनंदी वार्ता ऐकायला मिळतील. शुभरंगः पिवळसर शुभदिशाः ईशान्य.