मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 21 March 2024 : फाल्गुन द्वादशी गुरुवारचा दिवस तुम्हाला कसा जाईल! वाचा राशीभविष्य!

Horoscope Today 21 March 2024 : फाल्गुन द्वादशी गुरुवारचा दिवस तुम्हाला कसा जाईल! वाचा राशीभविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Mar 21, 2024 10:03 AM IST

Horoscope Today 21 march 2024: आज २१ मार्च २०२४ गुरुवार रोजी, दिवस शुभ असेल की अशुभ, किती संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे राशीभविष्य.

आजचे राशीभविष्य २१ मार्च २०२४
आजचे राशीभविष्य २१ मार्च २०२४

आज चंद्र कर्क राशीत भ्रमण करतोय. चंद्राचा प्लुटोशी प्रतियोग आणि शनि बरोबर दृष्टीयोग घटीत होणार आहे. कसा जाईल आजचा गुरुवारचा दिवस! पाहुयात राशीनुसार!वाचा राशीभविष्य!

मेषः 

आज तुमचा आनंद अधिकच दुणावेल. घरात नवीन वस्तूंची खरेदी कराल. तुम्हाला चैन पडणार नाही. योग्य नियोजन करणार आहात. उद्योग धंद्यात विशेष लाभ मिळेल. वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल, मन प्रसन्न राहील. मानसन्मान प्रतिष्ठा मिळाल्याने आनंदी राहाल. मत्सर संवाद टाळावा. कोणाचाही द्वेष करू नका. व्यापार उद्योगात वाढ होईल. भागीदारांकडून उत्तम सहकार्य लाभेल.

वृषभः 

आज बराच पैसा खर्च कराल. आर्थिक स्थिती सुधारेल. मित्रमंडळींचे उत्तम सहकार्य मिळेल. मोठ्या भावंडांची मदत मिळेल. खेळाडूंना लाभदायक दिवस आहे. शेअर्समध्ये दिर्घकालीन गुंतवणूक लाभ देणार आहे.खाद्य पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल. मानसन्मानाचे योग येतील. प्रयत्न यशस्वी ठरतील. अपेक्षेप्रमाणे प्रगती होईल. रखडलेल्या कामास गती मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. 

मिथुनः 

आजच्या वैवाहिक जीवनात थोडी तडजोड करावी लागेल. अंगात थोडा आळस शिरेल त्यामुळे कामे उरकण्यात थोडी दिरंगाई होईल. भावंडांशी मतभेद संभवतात. शेजाऱ्यांच्या गुप्त कारवायांमुळे त्रासून जाल. घरातील तंग वातावरण काही वेळा त्रासदायक होईल. मुलांच्या मताशी सहमत न झाल्यामुळे तणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. कंटूंबातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. मानसिक त्रास जाणवेल.

कर्कः 

आज तुम्ही वरचढ ठरणार आहात. चैनीच्या वस्तूंची खरेदी करण्याचा मूड राहील. मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. व्यवहारात स्त्रियांच्या मध्यस्थीमुळे मनासारखी कामे होतील. वाहन खरेदीचे योग आहेत. कामकाजात अनुकुल स्थिती राहणार आहे. कुटुंबात वेळेचे नियोजन उत्तम कराल. कामकाजाला सुरुवात करा. व्यापारात वाढ विस्तार होईल. आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल.

सिंहः 

आज मानसिक अस्वस्थता जाणवेल. वडीलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. खेळाडूंना लाभदायक दिवस आहे. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कलाकारांना कला क्षेत्रात वाव मिळेल पण आर्थिक लाभ मिळणार नाही. सहकार्य लाभणार नाही. व्यापार रोजगातात काही अडचणीचा सामना करावा लागू शकतो. दुरवरचे प्रवास शक्यतो टाळा. थोडी चिडचिड होईल. वादावादीचे प्रसंग उद्भवतील. स्वप्नांचा संबंध वास्तवाशी लावण्याचा प्रयत्न करू नये. मानसिक त्रास वाढेल.

कन्याः 

आज कोणत्याही गोष्टीपेक्षा प्रयत्नाला महत्त्व द्यावे लागेल. मुलांच्या आवाक्याबाहेरच्या मागण्यांमुळे वैतागुन जाल. पथ्यपाणी सांभाळा. घराकडे जातीने लक्ष द्याल. स्वभावात राग उत्पन्न होण्याची शक्यता आहे. मनमुटाव होण्याची शक्यता आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. अंहकारवृत्ती मुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे. कर्जप्रकरणात काळजीपूर्वक व्यवहार करा. भावनावर नियंत्रण ठेवा. 

तूळ: 

आज कष्टाचे चीज होईल. मानसिक अस्थिरता असू शकते. गोड बोलून कामे करून घ्याल. आर्थिक स्थिती सुधारेल. एखादी फायदेशीर गुंतवणूक कराल. कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. लेखन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंडळीना उत्तम दिनमान आहे. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य घ्या. धनलाभाचा योग आहे. भावंडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. 

वृश्चिकः 

आज खूप स्वप्ने रंगवली असतील, तर त्याची पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू होईल. काळजी करण्यापेक्षा काळजी घेण्याची सवय अंगी बाळगा. हुशारी आणि उद्योग प्रियतेमुळे यशाला खेचून आणाल. बौद्धीक क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. स्वभावात थोडा निष्काळजीपणा राहील. व्यावसायिक योजना गुप्त ठेवा. देण्याघेण्याच्या व्यवहारात सावधपणा ठेवा. आर्थिक व्यवहार फार काळजीपूर्वक करा. फार ताण घेऊ नका. प्रतिकुल परिणाम येण्याची शक्यता आहे. व्यापार उद्योग क्षेत्रात मोठे निर्णय घेऊ नयेत. भागीदारा सोबत वाद विवाद टाळा.

धनुः 

आज नोकरी व्यवसायात मनासारखे कार्यामुळे तब्येत खूष राहील. दूरच्या प्रवासाचे योग येतील. प्रकृतीचा कोणताही त्रास अंगावर काढू नये. नोकरी व्यवसायात घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांपासून लाभ होईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. नवीन गृहपयोगी वस्तु खरेदी कराल. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. धनलाभाचा योग आहे. मोठी पदप्राप्ती, मानसन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. 

मकर: 

आज कामामध्ये अडथळे आले तरी चिकाटी ठेवून पुढे नेण्याची जबाबदारी ठेवावी लागेल. प्रेमीजनांना प्रेमप्रकरणातअडथळे संभवतात. कोणत्याही निर्णयात ठामपणा नसल्यामुळे कामाची गती मंदावेल. धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टीत जास्त आवड निर्माण होईल. व्यापारात वाढ करणारा दिवस राहील. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल करावी. कौटुंबिक जिवन अनुकुल राहणार आहे. जोडीदाराचे सहकार्य लागेल. 

कुंभ: 

आज प्रत्येक कामाचे खोलवर चिंतन कराल. तुमची अध्यात्मिक साधना फळाला येईल. गैरसमज दूर कराल तर सुखी व्हाल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. व्यवहारात आर्थिक लाभ होईल. सकारात्मकेचे परिणाम दिसतील. आपल्या इच्छेप्रमाणे कार्य घडतील. आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेच आहे. आत्मविश्वासाचा अतिरेक करणे टाळा. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. 

मीनः 

आज हाती घेतलेल्या कामात यशस्वी व्हाल. कोणत्याही गोष्टीसाठी पराक्रमाची शर्थ कराल. अडचणी येतील. परंतु एकंदरीत यशाकडेच वाटचाल राहणार आहे. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. वारसाहक्कातुन धनलाभ संभवतो. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. व्यापारात जुनी येणी वसूल होतील. नातेवाईक आप्तेष्टांकडून सहकार्य लाभेल. नावलौकिक वाढेल. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल.

WhatsApp channel