मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 21 february 2024 : बुधप्रदोष दिनी व शुभ योगात आजचा दिवस कसा जाईल, वाचा राशीभविष्य!

Horoscope Today 21 february 2024 : बुधप्रदोष दिनी व शुभ योगात आजचा दिवस कसा जाईल, वाचा राशीभविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Feb 21, 2024 09:32 AM IST

Horoscope Today 21 february 2024 : आज २१ फेब्रुवारी २०२४ बुधवार रोजी, दिवस शुभ असेल की अशुभ, लाभ होईल की नुकसान, किती संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे राशीभविष्य.

Today Horoscope 21 february 2024
Today Horoscope 21 february 2024 (Freepik)

आज बुधवार २१ फेब्रुवारी रोजी, भीष्मद्वादशी आणि प्रदोष दिनी चंद्र गुरू आणि शनिच्या नक्षत्रातुन संक्रमण करणार असून शुभ योगात कसा असेल बुधवार! वाचा राशीभविष्य!

मेषः 

आज लांबच्या प्रवासात अडथळे येऊ शकतात. आर्थिक गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. नको तेथे खर्च झाल्यामुळे चिडचिड होईल. करिअरमध्ये जास्त लक्ष दिल्यास यशस्वी व्हाल. कोणताही निर्णय घेण्यात दिरंगाई झाल्यामुळे दारात आलेली संधी दार ठोठावून निघून जाऊ शकते. व्यावसायिकांना आर्थिक येणी येण्यास त्रास जाणवेल. राग व आळस टाळा. स्वभावात चिडचिडेपणा निर्माण होईल. मनात नैराश्य व असमाधानी भावना निर्माण होऊ शकते.

वृषभः 

आज कामाचा दर्जा वाढेल. दुसऱ्यांना मदत करण्यात कायम पुढे राहाल. वातावरणात चैतन्य निर्माण करू शकाल. साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना मोठे यश लाभेल. नोकरीत मनासारखी बदली किंवा पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. व्यापारात आर्थिक आवक चांगली राहील. प्रवासातुन आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वडिलांकडून आर्थिक सहकार्य लाभेल. पदप्राप्ती आणि प्रतिष्ठा लाभेल. कौटुंबिक सुखशांती आनंददायक वातावरण राहील.

मिथुन: 

आज खंबीर मनाने सर्व नकारात्मक गोष्टींना तोंड द्याल. जनमानसात प्रभाव पाडाल. चिंतनातून सर्जनशीलता निर्माण कराल. तुमच्या कर्तृत्वाला वाव देणाऱ्या गोष्टी घडतील. कामाची उत्तम अंमलबजावणी कराल. एखाद्या प्रश्नातून सावधपणे मार्ग काढून ते प्रश्न व्यवस्थित हाताळाल. रोजगारात मनासारखी बढती व बदली होऊ शकते. आर्थिक लाभाची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण समाधानाचे व आनंददायी राहील. आंनदाची बातमी मिळेल. 

कर्क: 

आज स्वतःवरचा आत्मविश्वास वाढेल. त्रासापासून सुटका मिळणार नाही. त्याचा उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. मनातील काहीही हातचे राखून न ठेवता मोकळ्या निर्भिड स्वभावाबद्दल तुम्ही प्रसिद्ध व्हाल. धीटपणे प्रसंगांना सामोरे जाल. मुलांची अभ्यासात प्रगती होईल. खेळाच्या क्षेत्रात करिअर करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी मिळतील. कष्टाने ध्येयपूर्ती होईल. नवीन योजना हाती घ्याल. एखादा मोठा आर्थिक व्यवहार होऊ शकतो. प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल.

सिंहः 

आज खूप काम कराल आणि त्याचा लाभही तुम्हाला मिळेल. त्यामुळे आनंदी उत्साही राहाल. नवीन मालमत्ता घेण्यासाठी प्रयत्न कराल. नोकरीत बरोबरच्या लोकांचे सहकार्य उत्तम मिळेल. मित्रमंडळी बरेच दिवसांनी भेटतील. गप्पांमध्ये वेळ चांगला जाईल. वैवाहिक जीवनात कोणतेही टोकाचे निर्णय लगेच घेऊ नयेत. हाती घेतलेल्या कामात यशस्वी व्हाल. प्रतिभेस वाव मिळेल. 

कन्या: 

आज कामाचा उत्साह वाढेल. घरातील शांतता ढवळून निघेल. वडिलोपार्जित इस्टेटीचे वाद चिघळतील. खूप दिवसांपासून रखडलेली ऑर्डर हातात पडेल. परदेशाशी संबंधित व्यवहारांना चालना मिळेल. रोजगारात आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक सामजस्य राहील. वेळेचा चांगला उपयोग करून आपल्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून कामाला लागा. घर वाहन खरेदीचा योग आहे.

तूळ: 

आज अडकलेले पैसे हातात पडतील. श्रमसाफल्याचा अनुभव घ्याल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. परदेश प्रवासाचे बेत आखाल. जोडीदाराबरोबर सुसंवाद साधाल. आर्थिक स्थिती सुधारेल. स्वत:मध्ये असलेल्या कलेला न्याय द्याल. कामानिमित्त परदेशगमनाच्या संधी मिळतील. महत्वाच्या कामात यश मिळेल. आर्थिक प्रगतीचा दिवस ठरेल. पण खर्चावर आवर घाला.

वृश्चिकः 

आज उपासना करून आध्यात्मिक उंची गाठाल. जवळच्या प्रवासाचे बेत ठरवाल. परिस्थितीचा समन्वय साधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कराल. त्यामुळे दुसऱ्यांना आदर वाटेल. व्यापारातील विस्ताराच्या दृष्टीने केलेल्या योजनात यशस्वी व्हाल. नोकरीत नवीन योजनेवर कार्य कराल. अपूर्ण राहीलेली कामे पूर्ण होतील. स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. धनलाभाची शक्यता आहे.

धनु: 

आज रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे रोगांना आमंत्रण द्याल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. थोड्या तापट स्वभावामुळे इतरांशी फटकून वागाल. अगदी साधी गोष्टसुद्धा संघर्षा शिवाय होत नाही हा अनुभव घेतल्यानंतर लढा देण्याची पात्रता अंगी बाळगाल. कामकाजात व्यत्यय निर्माण होईल. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होईल. रोजगारात कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. कौटुंबिक समस्याकडे लक्ष राहील. मानसिक स्वास्थ सांभाळा.

मकर: 

आज आपल्या मताशी ठाम रहाल. लोकमत जिंकण्यासाठी सर्व पणाला लावाल. जवळच्या प्रवासाचे बेत ठरवाल. परिस्थितीचा समन्वय साधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कराल. त्यामुळे दुसऱ्यांना आदर वाटेल. कार्यात यश मिळण्याचे योग आहेत. व्यापारात योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे फायदा होईल. वेळेचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्या. नोकरीत नवीन संकल्पना मांडाल.

कुंभ: 

आज परदेशगमनासाठी अडचणी उद्भवतील. मनाविरुद्ध माघारही घ्यावी लागेल. कर्तव्याशी प्रामाणिक राहा. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवेल. तुमच्या कामाचे श्रेय दुसर्‍याला मिळेल. व्यापारी वर्गाांनी कोणतेही महत्वपूर्ण निर्णय घेऊ नयेत. रागावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी. अतिरिक्त ताणतणाव वाढेल. नव्या ओळखीवर फारसे विसंबून राहू नका. व्यापारात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

मीन: 

आज चंद्रबल अनिष्ट आहे. समोरच्या माणसाच्या गूढ वागण्याचा थोडा त्रासच होणार आहे. कोणालाही जामीन राहू नये. कधी कधी दुसऱ्यांचा विचार न करता बोलल्यामुळे दुसऱ्यांची मने दुखावली जाऊ शकतात. कुटुंबातील लोकांना तुमची ठाम मते पटणार नाहीत. तेथे वादविवाद होण्याची शक्यता आहे. भांडखोरपणाने इतरांची नाराजीही ओढवून घ्याल. आपल्या कार्यक्षेत्रात मितभाषी राहा अन्यथा अडचणीचा सामना करावा लागेल. मन लावून काम करा. व्यापारात नवीन योजना असतील तर आज टाळा.

WhatsApp channel