मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope today 20 September 2023 : मेष, मिथुन आणि तूळ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खास, वाचा आजचं राशीभविष्य

Horoscope today 20 September 2023 : मेष, मिथुन आणि तूळ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खास, वाचा आजचं राशीभविष्य

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 20, 2023 05:49 AM IST

zodiac signs today 20 September 2023 : कोणत्या राशींच्या लोकांसाठी शुभ आहे आजचा दिवस? कोणाला राहावं लागेल सावध? कोणाला मिळेल प्रमोशन? कसं असेल तुमचं मानसिक संतुलन? नेमका कसा जाईल आजचा दिवस? वाचा आजचं राशीभविष्य.

 Today horoscope
Today horoscope

Horoscope Today 20 September 2023 : येणारा दिवस कसा जाणार याचं कुतूहल प्रत्येकाला असतं. तो चांगलाच असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण तसं होतंच असं नाही. त्यामुळंच आपलं भविष्य जाणून घ्यायची उत्सुकता माणसाला असते. मनुष्याच्या जन्म राशीनुसार आणि ग्रहांच्या स्थितीवरून ज्योतिषशास्त्र भविष्याबद्दल काही अंदाज वर्तवत असतं. त्याआधारे अनेक जण आपल्या दिवसाची आखणी करतात किंवा सतर्कता बाळगतात. त्यांच्यासाठी ज्योतिषविद्येचे अभ्यासक जय घोडके (jaynews21@gmail.com) सांगताहेत आजचं राशिभविष्य!

ट्रेंडिंग न्यूज

मेषः आज धनलाभ होणार आहे. प्रकृतीची काळजी घ्या. नव्या नोकरीची संधि आहे. पत्नीची साथ लाभेल. कामात तसेच व्यवसायात कनिष्ठ व्यक्तिंची जुळून घ्या. तसे न केल्यास त्रास होईल. परदेशात जाण्याचे योग येतील.

शुभरंग: केसरी शुभदिशा: दक्षिण.

वृषभः आजचा दिवस जरा कठीण आहे. कामाच्या ठिकाणी नव्या अडचणींना सामोरे जावे लागेल. कुटुंबातील वातावरण शांत ठेवा. मानसिक स्वास्थाची काळजी घ्या. प्रेमप्रकरणात वादविवादा होतील. मित्रमैत्रिणी भागीदारीतील आर्थिक व्यवहार देवाण-घेवाण अडचणीत आनेल यामुळे असे व्यवहार टाळा.

शुभरंग: सफेद शुभदिशा: वायव्य

मिथुनः आजचा दिवस जरा कठीण जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जरा संयम राखा. विरोधी गट तुमच्या विरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे. कामातील व्यवहार करतांना काळजी पूर्वक करा. नोकरीत वरिष्ठ त्रास देतील. त्यामुळे काळजी पूर्वक काम करा.

शुभरंग: हिरवा शुभदिशा: उत्तर.

कर्कः तुमच्या स्वभावामुळे जवळचे मित्र आप्तेष्ट संबंध दुखावण्याची शक्यता आहे. नोकरी-व्यापारात चांगली फळे मिळतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी हितसंबंध जोपासा. वेळेचे व्यवस्थापन करा, असे केल्यास आर्थिक लाभ होतील.

शुभरंग: गुलाबी शुभदिशा: वायव्य.

सिंहः आजचा दिवस चांगला आहे. मोठा मान सन्मान मिळेल. कौटुंबिक पातळीवर देखील आनंद उपभोगाल. नव्या संधी प्राप्त होतील. मनाप्रमाणे कामे करता येतील. कौटुंबिक प्रेम चांगले मिळेल.

शुभरंग: लाल शुभदिशा: पूर्व.

कन्याः आजचे दिनमान चांगले आहे, पण काळजी घ्यावी लगणार आहे. ग्रहमान प्रतिकुल असल्याने मानसिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. मन शांत ठेवा. उताविळपणा टाळा.

शुभरंग: पोपटी शुभदिशा: उत्तर.

तुलाः आजच दिनमान जरा त्रासदायक राहणार आहे. अती धाडसीपणा टाळा. मित्रमैत्रिणींची जपून निवड करा. प्रेमसंबधात अडचणी येण्याची शक्यता आहे. मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या. आर्थिक खर्च वाढेल.

शुभरंग: भगवा शुभदिशा: आग्नेय.

वृश्चिक: आजचा दिवस चांगला आहे. नोकरी, व्यवसायात भरभराट होईल. परदेशात जाण्याची संधि मिळेल. कुंटुबातील वरिष्ठ सदस्यांकडून स्नेह प्राप्त होईल. प्रेम प्रकरणातील अडथळे दूर होतील.

शुभरंग: तांबूस शुभदिशा: दक्षिण.

धनुः आजचा दिवस शुभ जाणार आहे. अनेक चांगल्या घटना घडतील. सत्पुरुषांच्या सेवेतून सन्मार्गाने उत्तम धन मिळेल. घरात धार्मिक कार्य घडतील. मित्रमैत्रिणींकडून लाभ होतील. प्रवासातुन धनप्राप्ती होईल.

शुभरंग: पिवळसर शुभदिशा: ईशान्य.

मकरः आज धनलाभाचा योग आहे. मनोबल व आत्मविश्वासात वाढेल. राजकीय सामाजीक क्षेत्रातील व्यक्तींना पदप्रतिष्ठा मानसन्मान लाभेल. खरेदीसाठी शुभ योग आहे. व्यापारात धनवान होण्याचे योग आहेत. सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल.

शुभरंग: निळा शुभदिशा: पश्चिम.

कुंभः आर्थिक प्रगती होईल. कुटुंबातील सदस्यांकडून सहकार्य लागेल. नातेवाईक आप्तेष्ट यांची साथ लाभेल. सोबतच आपण केलेल्या कामाचे कौतूक होऊन मानसन्मान देखील लाभणार आहे. व्यापारात व्यवसियाकांनी केलेली गुंतवणुक फायदेशीर ठरणार आहे.

शुभरंग: जांभळा शुभदिशा: नैऋत्य.

मीन: आपल्या कार्यक्षेत्रात परिस्थिती संयम ठेवून हाताळा. अन्यथा प्रतिष्ठेस तडा जाण्याची शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल. नोकरीत स्थान बदल घडण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गास प्रतिकुल काळ असणार आहे.

शुभरंग: पिवळा शुभदिशा: ईशान्य.

WhatsApp channel