Horoscope Today 20 february 2024 : एकादशीचा आजचा दिवस कोणासाठी ठरेल खास व कोणाला होईल चिंता फार, वाचा राशीभविष्य!
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 20 february 2024 : एकादशीचा आजचा दिवस कोणासाठी ठरेल खास व कोणाला होईल चिंता फार, वाचा राशीभविष्य!

Horoscope Today 20 february 2024 : एकादशीचा आजचा दिवस कोणासाठी ठरेल खास व कोणाला होईल चिंता फार, वाचा राशीभविष्य!

Feb 20, 2024 09:08 AM IST

Horoscope Today 20 february 2024 : आज २० फेब्रुवारी २०२४ मंगळवार रोजी, दिवस शुभ असेल की अशुभ, लाभ होईल की नुकसान, किती संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे राशीभविष्य.

Horoscope Today 20 february 2024
Horoscope Today 20 february 2024

आज मंगळवार २० फेब्रुवारी रोजी, चंद्र गुरूच्या नक्षत्रातून आणि बुधाच्या राशीतुन गोचर करणार आहे. रवि-बुध आणि शनिशी नवमपंचम योग घटीत होत असुन बव करणात कसा असेल मंगळवार! वाचा राशीभविष्य!

मेष: 

आज व्यवसायात उलाढाल करत राहाल. तुम्हाला चैन पडणार नाही. प्रवासात काळजी घ्यावी. नशिबाची साथ चांगली मिळेल. कौटुंबिक सुख मिळेल. जोडीदाराचे सहकार्यही उत्तम मिळेल. उदार वृत्तीमुळे ओळखीही जास्त होतील. प्रेमी जनांना त्यांची आवडती व्यक्ती भेटल्यामुळे आनंदी राहाल. मोठ्या लोकांशी पटणार नाही. वाहन व घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. नावलौकीक वाढेल. विद्यार्थी अभ्यासात प्रगती करतील.

वृषभ: 

आज कामांना न्याय देण्यासाठी जीवाचे रान कराल. विद्यार्थी अभ्यासापेक्षा दुसऱ्या क्षेत्रात जास्त रमतील. नोकरीत वरिष्ठांच्या विरुद्ध बंड पुकाराल. विशेष संधी मिळतील. कामातील योग्य नियोजन आणि शिस्त कामाची गती वाढवेल. कौटुंबिक पातळीवर पत्नीकडून व संततीकडून उत्तम सुख मिळेल. लेखन कार्य व ग्रंथप्रकाशानात लाभ होईल. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. उत्तम धनप्राप्ती होईल. आळशी वृत्ती टाळावी.

मिथुन: 

आज आत्मविश्वासामुळे अडचणीवर मात करण्याची ताकद तुमच्याकडे राहील. तरुण वर्गात नवीन ओळखी होतील आणि त्याचे रुपांतर प्रेमात होऊ शकेल. मौल्यवान वस्तु हरवण्याची शक्यता आहे. अनिद्रेचा त्रास होईल. व्यापारीवर्गाकरिता आजचा दिवस नुकसानदायक राहण्याची शक्यता आहे. विनाकारण वाद घालू नयेत. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक कराल. फसवणुक होऊ शकते. 

कर्क: 

आज तुम्हाला कधीच तुमच्या कौतुकाने भूल पाडणार नाही. नोकरीत थोडा दूरदर्शी पणा ठेऊन त्याप्रमाणे कामाची पद्धत अवलंबावी लागेल. कोर्टकचेरीची कामे रेंगाळू शकतात. प्रकृती कडे दूर्लक्ष करून चालणार नाही. आपल्यावरील कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. नवीन वाहन खरेदीची इच्छा मनात निर्माण होईल. आर्थिक नियोजानावर वेळेत भर द्या. व्यापारात काळजीपूर्वक व्यवहार करणे अत्यावश्यक आहे. 

सिंहः 

आज तुम्ही करीत असलेल्या कामाची पावती तुम्हाला मिळेल. महत्त्वाच्या कामाची जबाबदारी अंगावर घेऊन पार पाडण्याची कुवत आज दाखवून द्याल. आर्थिक आघाडी वर प्रगती होईल. मनातील योजना पार पाडता येणार आहेत. तशी काही आर्थिक तरतूद होणार आहे. मोठ्या व्यवहारात आर्थिक फसवणुक होणार नाही याची काळजी घ्या. अर्थिक कामात चांगले यश लाभेल. स्वभावातील रागीटपणावर मात्र नियंत्रण ठेवा.

कन्या: 

आजचं गोड बोलण्यावर भर ठेवाल. जोडीदाराशी जुळवून घ्यावे लागेल. उच्च शिक्षणाच्या अभ्यासात जास्त लक्ष घालाल. आनंददायी वातावरण राहील. व्यापारात वेळेवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. भागीदारीत अपेक्षित लाभाचे योग आहेत. संपत्तीचे प्रश्न मार्गी लागेल. स्वसंपादिन धनाचा उपभोग घ्याल. घर खरेदीची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण उत्साही राहील. जुने मित्र सहकारी भेटतील. व्यवसायानिमित्त प्रवास होईल.

तूळ: 

आज घरातील लोकांना तुमचे विचार योग्य तऱ्हेने पटवून द्याल. कामाला जास्त महत्त्व द्याल. मनावरचा ताण बर्‍यापैकी कमी झालेला असेल. सहकुटुंब प्रवासाचा बेत आखाल. कौटुंबिक पातळीवर जोडिदाराचं चांगले सहकार्य मिळेल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. नवीन योजनेस प्रारंभ करण्यास उत्तम दिवस आहे. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवा. 

वृश्चिक: 

आज भाग्याची साथ चांगली मिळेल. व्यवसायात साम दाम दंड भेद या नीतीने वागून तुम्ही ठरवलेले उद्दीष्ट पूर्ण कराल. आनंदी वातावरण राहील. एखादी मोठी गुंतवणक करण्यासाठी दिवस चांगला आहे. कार्यक्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग कराल. उतावीळपणावर आवर घालावा. व्यापारात आर्थिकवृद्धी होईल. भागीदाराकडून सहकार्य लाभेल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. नवीन स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचे योग आहे. कुटुंबात शुभवार्ता मिळेल.

धनु: 

आज करिअरमध्ये खूप कष्ट करावे लागतील. गुप्त शत्रू डोके वर काढतील. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आरोग्य बिघडू शकते. स्थावर मालमत्तेचे काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. कोर्टकचेरीच्या कामामध्ये अडचणी वाढतील. आपण अहंकारी वृत्तीचा त्याग करावा. नव्या योजनावर काळजीपूर्वक काम करावे लागेल. वेळेचे व्यवस्थापन गरजेचे आहे. फसवणूक आर्थिक हानी संभवते. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. वैद्यकीय बाबीवर खर्च होईल.

मकर: 

आज लोकांची मने दुखावतील. कुटुंबात मुलांच्या वागण्यामुळे ताण निर्माण होईल. विद्यार्थी अभ्यासाच्या नवीन योजना राबवतील. तुमचा मुड कधी जाईल आणि कधी चिडाल याचा भरवसा राहणार नाही. मानसिक त्रास निर्माण होणाऱ्या घटना घडतील. मनात उदासिनता वाढेल. यश संपादन करण्यासाठी कोणाचा तरी आधार घ्यावा लागेल. व्यापारात नवनवीन गोष्टी पुढे येतील. प्रवासात विघ्ने निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रवास थोडा जपूनच करावा. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. 

कुंभ: 

आज मुलाच्या भन्नाट कल्पनांमुळे चक्रावून जाल. कुटुंबातील नातेवाईकांच्या तऱ्हेवाईक वागण्यामुळे त्रस्त व्हाल. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे अनेक बेत ठरवाल. मनोधैर्य सांभाळा. विचाराअंतीच निर्णय घ्या. वाईट मित्राच्या संगतीमुळे नुकसान होईल. गैरसमज पसरणार नाहीत याची काळजी घ्या. क्षाणिक फायद्यासाठी गुंतवणुक करू नका. गुप्तशत्रुपासुन त्रास संभवतो. जोडीदारासोबत स्नेहपूर्वक वागा. प्रकृति अस्थिर राहील.

मीन: 

आजचा समस्यांना धीराने तोंड द्याल. परदेशगमनाच्या संधी मिळतील. सर्व कामे एकट्याने करणे शक्य नसल्यामुळे इतरांवर विश्वास ठेवणे भाग पडेल. काम करण्याचा उत्साह वाढेल. धाडसी निर्णय अंगलट येऊ शकतात. नास्तिकता वाढीस लागेल. अनाठायी खर्च होईल. मित्रमैत्रिणींची जपून निवड करावी. कष्टाची पराकाष्ठा करावी लागेल. कुटुंबातील सदस्याच्या आजारपणाने त्रासुन जाल. खर्चाने मन व्यथित होईल. मनात चिडचिडेपणा वाढेल.

Whats_app_banner