मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 2 february 2024: आजचा शुक्रवारचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील! वाचा राशीभविष्य!

Horoscope Today 2 february 2024: आजचा शुक्रवारचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील! वाचा राशीभविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Feb 02, 2024 08:39 AM IST

Horoscope Today 2 february 2024: आज २ फेब्रुवारी २०२४ गुरुवार रोजी, लाभ होईल की नुकसान, दिवस शुभ असेल की अशुभ, किती संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे राशीभविष्य.

Today Horoscope 2 february 2024
Today Horoscope 2 february 2024 (Freepik)

आज शुक्रवार २ फेब्रुवारी रोजी, कालाष्टमीचा चंद्र शुक्राच्या राशीतुन भ्रमण करणार असुन शनिशी नवमपंचम व गुरू-हर्षलशी प्रतियोग करीत आहे. राहुचं नक्षत्र आणि शुल योगात कसा जाईल आजचा दिवस! वाचा राशीभविष्य!

मेषः 

आज लाभदायक आर्थिक योजनांचा पाठपुरावा कराल. जुनी येणी वसूल होतील. मित्रमंडळींचे सहकार्य उत्तम मिळेल. कामाचा ताण वाढला तरी काम सोपे करून घ्याल. घरातील प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे आनंदी वातावरण लाभेल. आपल्या स्वभावातील दूरदर्शीपणामुळे कठीण परिस्थिती यशस्वीरित्या हाताळाल. उद्योग व्यवसायात नविन विचार नवीन विषय पुढे येतील. आर्थिकदृष्या खुपच उत्तम दिवस आहे. संततीकरिता आजचा दिवस उत्साहाचा आहे. प्रवासाचे योग घडतील. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल. गुंतवणूक नक्की करावी भविष्यात ही गुंतवणुक आपणास फायदेशीर ठरेल.

वृषभः 

आज विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. काम करी दाम वैयक्तिक जीवनात असे पडसाद खोलवर उमटतील. एखादा निर्णय तडका फडकी घेण्यापासून सावध राहा. वाहने जपून चालवा. जुनी दुखणी डोके वर काढतील. राजकारणी लोकांना जनतेचा रोष पत्करावा लागेल. कोणत्याही गोष्टीचा लाभ होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. हाती पैसा असला तरी खर्चही वाढणार आहेत. मनाप्रमाणे कामे घडतलीच असे नाही. अनेपक्षित नुकसान देखील होऊ शकते. मनावर संयम ठेवून वाटचाल करावी. 

मिथुनः 

आज मुलांच्या प्रगतीची चिंता वाटेल. पूर्वी केलेल्या कामाची मात्र पावती मिळेल. जुने मित्र भेटतील. स्वप्नांच्या दुनियेतच वावराल. स्वतःसाठी खरेदी कराल. इतरांशी सल्लामसलत करून निर्णय घ्यावेत. जोडीदाराचे सहकार्य लाभल्यामुळे मन प्रसन्न राहील. आत्मसन्मान वाढेल. अनुकुल घटना घडतील. मनात प्रसन्नता असल्याने तुमच्या नियोजीत कामात वेग येईल. तीर्थक्षेत्री जाण्याचा योग आहे. विद्यार्थ्यांची अभ्यासाची प्रगती उत्तम राहील. भागीदारीमुळे आर्थिक धनलाभ होतील. प्रगतीचा दिवस आहे.

कर्कः 

आज आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मध्यस्थांची मदत घ्यावी लागेल. घरामध्ये मनासारखी खरेदी कराल. त्यामध्ये चैनीच्या वस्तूंचा जास्त समावेश असेल. जवळच्या व्यक्तींचा जास्त विचार कराल. घरामध्ये मंगलकार्य ठरल्यामुळे उत्साही आनंदी वातावरण निर्माण होईल. वारसा हक्कातुन मिळणारी संपत्ती वास्तुविषयी काम सुरुळित पार पडणार आहेत. आपल्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. मनात उर्जा आणि उत्साह वाढेल. वाहन व घर खरेदीसाठी शुभ दिवस आहे. नातेसंबंधात स्नेह व प्रेम भावना वाढेल. विशेष फायदा होण्याचे योग आहेत.

सिंहः 

आज नवीन योजनांचे व्यवसायात स्वागत होईल. अनेक गोष्टींचे लाभ मिळणार आहेत. तुमच्या व्यक्तीमत्त्वात सुधारणा कराल. त्याबरोबरच उत्तम बोलण्याची साथ जर व्यवहारात दिलीत तर फायदा होईल. एखादी आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. अपेक्षित लाभदायक घटना घडतील. मेहनतीचे फळ मिळण्याचा योग आहे. फक्त भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. आज गुंतवणुकीसाठी शुभ दिवस आहे. आर्थिक स्त्रोत वाढेल. नवीन वाहन खरेदीस चांगला दिवस आहे.

कन्याः 

आज हक्काच्या वस्तूंबांबत तुमचे विचार स्वच्छ आणि स्पष्ट राहतील. नोकरी व्यवसायात अडलेली कामे पार पडतील. समयसूचकता दाखवाल. वरिष्ठांची मने जिंकून घ्याल. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी स्पर्धकांच्या हालचालीवर लक्ष ठेवणे हिताचे ठरेल. फायद्याच्या गोष्टी ओळखाल. करिअरमध्ये महत्त्वाच्या संधी येतील. कामाचे उत्तम नियोजन खूप उपयोगी पडेल. दुसऱ्यावर विसंबून राहू नये. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे ऐकावे लागेल. आपण केलेल्या कष्टाचे चीज होईल. ऊर्जादायी आणी प्रचंड उत्साहपूर्ण दिवस असेल. स्पर्धा-परिक्षेच्या मुलाखतीमध्ये यश मिळेल. 

तूळ: 

आज आर्थिक लाभ होईल पण खर्चही वाढतील. चैनीच्या वस्तू खरेदी करण्याकडे कल राहील. पूर्वी केलेल्या कामाचा लाभ मिळेल. कामकाजात वेळेवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरणार आहेत. एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. वारसाहक्काने सांपत्तिक मदत मिळेल. भागीदारीत लाभ होतील. आपल्या तार्किक बुद्धीने प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. मौल्यवान वस्तुची खरेदी कराल. मित्रमैत्रिणीत स्नेह वाढेल. इतरांवर प्रभाव राहील.

वृश्चिकः 

आज तुम्हाला प्रेरणा देणारे लोक भेटतील आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा घ्याल. परदेशगमनाचे योग संभवतात. खूप दिवसांपासून मनात असलेली एखादी गुंतवणूक करण्यास उत्तम दिवस आहे. नोकरीत मोजकेच काम करा पण ते बिनचूक असल्याची खात्री करा. परदेश भ्रमणाचे योग आहेत. प्रवासातुन आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरदार नोकरी बदलाचा विचार करीत असाल तर उत्तम योग आहे. मनोकामना पूर्ण करणारा दिवस आहे. लाभाची मोठी संधी प्राप्त होईल. विद्यार्थ्यांना नवनवीन क्षेत्रात यश संपादन करण्याची संधी मिळेल.

धनुः 

आज संभ्रमात पडाल. करिअरमध्ये परदेशी कंपन्यांशी संबंध येईल. अडलेल्या सरकारी कामांमध्ये स्वतःहून लक्ष घालाल. यंत्रावर काम करणाऱ्यांनी काळजी घ्यावी. खूप काम करावेसे वाटले तरी प्रकृती थोडी नरमगरम राहिल्यामुळे उत्साह वाटणार नाही. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी तडजोड करावी लागेल. महत्वाच्या कामाबाबतीत जपून निर्णय घ्या. आपल्या मनात नकारात्मक भावना वाढेल. नातेवाईकांशी व्यवहार जपुन करावेत. 

मकरः 

आज आर्थिक लाभ चांगले होतील. कामे मार्गी लागतील. करिअरमध्ये एखादा दृढनिश्चय कराल. स्वतंत्रपणे कार्य करण्यात धन्यता मानाल. नाविन्यपूर्ण गोष्टींमध्ये संशोधन करून इतरांच्या कौतुकास पात्र व्हाल. हसतमुख राहून इतरांच्या जीवनात आनंद निर्माण कराल. परदेश भ्रमणासाठी उत्तम दिवस आहे. मित्रमैत्रिणींबरोबर सलोख्याचे संबंध होतील. कौटुंबिक वातावरण प्रसन्नतापूर्वक राहील. आर्थिक लाभ होईल. प्रेमविवाहाच्या बाबतीत निर्णय जपुन घ्यावा. 

कुंभः 

आज मनाला ताण जाणवेल. संततीकडून अपेक्षाभंग होऊ शकतो. मुलांना मार्गदर्शनात थोडा वेळ ठेवावे लागेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करून घ्यावी लागेल. व्यसनांपासून सावध राहा नाहीतर त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होईल. प्रवासामध्ये आपल्या चीजवस्तूंची काळजी घ्या. छोट्याशा कारणाने मनशांती बिघडण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सौख्य व जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. वैद्यकीय बाबीवर खर्च वाढेल.

मीनः 

आज शुभ दिवस असणार आहे. लेखक पत्रकारांना चांगले ग्रहमान आहे. मित्रांच्या गोतावळ्यात जास्तीत जास्त राहण्याचा योग आहे. नोकरी व्यवसायात आपण करीत असलेल्या कामाची चांगल्या पद्धतीने तपासणी करा. सूचक स्वप्ने पडतील. स्वत:बरोबर दुसऱ्याचाही फायदा कराल. केलेल्या कामामुळे आर्थिक दृष्ट्या प्रगती होईल. नविन योजनेतून लाभ होईल. कामे यशस्वीपणे पार पाडाल. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. 

 

जय अर्जुन घोडके

(jaynews21@gmail.com)

(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)