आज अष्टमीचा चंद्र गुरूच्या राशीतुन आणि शुक्राच्या नक्षत्रा तुन भ्रमण करणार असुन, परिघ योग देखील आहे. वाचा आजचे राशीभविष्य!
आज घरामध्ये मनासारखी खरेदी कराल. जवळच्या व्यक्तींचा जास्त विचार कराल. घरामध्ये मंगलकार्य ठरल्यामुळे उत्साही आनंदी वातावरण निर्माण होईल. वास्तुविषयी काम सुरुळित पार पडणार आहेत. कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. मनात उर्जा आणि उत्साह वाढेल. वाहन घर खरेदीसाठी शुभ दिवस आहे. नाते संबंधात स्नेह निर्माण होईल. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेम भावना वाढेल.
आज नवीन योजनांचे व्यवसायात स्वागत होईल. एखादी आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. अनुकूल अपेक्षित लाभदायक घटना घडतील. मेहनतीचे फळ मिळण्याचा योग आहे. फक्त भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. नवीन वाहन खरेदीस चांगला दिवस आहे. कायदेशीर बाबींची प्रक्रीया असेल तर निकाल आपल्या बाजुने लागेल. नवदांपत्यास आनंदाची बातमी मिळेल. गुंतवणुकीसाठी शुभ दिवस आहे. आर्थिक स्त्रोत वाढेल.
आज हक्काच्या वस्तूंबांबत तुमचे विचार स्वच्छ आणि स्पष्ट राहतील. नोकरी व्यवसायात अडलेली कामे पार पडतील. वरिष्ठांची मने जिंकून घ्याल. आपल्या फायद्याच्या गोष्टी ओळखाल. करिअरमध्ये महत्त्वाच्या संधी येतील. कामाचे उत्तम नियोजन खूप उपयोगी पडेल. दुसऱ्यावर विसंबून राहू नये. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे ऐकावे लागेल. केलेल्या कष्टाचे चीज होईल. कामात यश मिळेल.
आज आर्थिक बाबतीत पैसा मिळण्याच्या अनेक वाटा खुल्या होतील. चैनीच्या वस्तू खरेदी करण्याकडे कल राहील. नोकरी व्यवसायात पूर्वी केलेल्या कामाचा लाभ मिळेल. कामकाजात वेळेवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरणार आहेत. एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. वारसाहक्काने सांपत्तिक मदत मिळेल. भागीदारीत लाभ होतील. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. मौल्यवान वस्तुची खरेदी कराल.
आज तुम्हाला प्रेरणा देणारे लोक भेटतील आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा घ्याल. अनेक संधी दार ठोठावतील. परदेशगमनाचे योग संभवतात. खूप दिवसांपासून मनात असलेली एखादी गुंतवणूक करण्यास उत्तम दिवस आहे. पैशाबाबत काटेकोर राहाल आणि इतरांनीही तसे रहावे अशी तुमची इच्छा असेल. परदेश भ्रमणाचे योग आहेत. प्रवासातुन आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. लाभाची मोठी संधी प्राप्त होईल. यश संपादन करण्याची संधी मिळेल.
आज स्वतःच संभ्रमात पडाल. करिअरमध्ये परदेशी कंपन्यांशी संबंध येईल. यंत्रावर काम करणाऱ्यांनी अवश्य काळजी घ्यावी. प्रकृती थोडी नरमगरम राहिल्यामुळे उत्साह वाटणार नाही. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी तडजोड करावी लागेल. महत्वाच्या कामाबाबतीत जपून निर्णय घ्या. कुटुंबात वडिलोपार्जित संपत्ती मध्ये नविन समस्या उद्भवतील. वादामधुन नुकसान सहन करावे लागेल. आळशीवृत्ती टाळावी.
आज आर्थिक लाभ चांगले होतील. कामे मार्गी लागतील. घरातील हलक्या फुलक्या वातावरणामुळे सुखावून जाल. करिअरमध्ये एखादा दृढनिश्चय कराल. स्वतंत्रपणे कार्य करण्यात धन्यता मानाल. कौतुकास पात्र व्हाल. हसतमुख राहून इतरांच्या जीवनात आनंद निर्माण कराल. परदेश भ्रमणासाठी उत्तम दिवस आहे. मित्रमैत्रिणींबरोबर सलोख्याचे संबंध होतील. कौटुंबिक वातावरण प्रसन्नतापूर्वक राहील. आर्थिक लाभ होईल. जुनी आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
आज मनाला ताण जाणवेल. संततीकडून अपेक्षाभंग होऊ शकतो. भरपूर कष्ट राखून घ्यावे लागतील. व्यसनांपासून सावध राहा नाहीतर त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होईल. प्रवासामध्ये आपल्या चीजवस्तूंची काळजी घ्या. कौटुंबिक सौख्य व जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. लहरी स्वभावावर नियंत्रण ठेवा. आळस झटकुन कामाला लागा.मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.
आज अत्यंत शुभ दिवस असणार आहे. नोकरी व्यवसायात आपण करीत असलेल्या कामाची चांगल्या पद्धतीने तपासणी करा. सूचक स्वप्ने पडतील. मानमरातब अधिकाराचे योग संभवतात. स्वत:बरोबर दुसऱ्याचाही फायदा कराल. आर्थिक दृष्ट्या उन्नती होईल. नोकरीत जबाबदारीत वाढ होईल. आपली कामे यशस्वीपणे पार पाडाल. निर्णायक कामात यश मिळेल. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याचे योग आहेत.
आज आर्थिक योजनांचा पाठपुरावा कराल. जुनी येणी वसूल होतील. नोकरीमध्ये कामाचा ताण वाढला तरी त्यातील शॉर्टकट शोधून काम सोपे कराल. घरातील प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे आनंदी वातावरण लाभेल. उद्योग व्यवसायात नविन विचार नवीन विषय पुढे येतील. आर्थिकदृष्या खुपच उत्तम दिवस आहे. वेगवेगळ्या मार्गाने धनलाभ होतील. नवे मित्रमैत्रिणी भेटतील. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल. गुंतवणुक फायदेशीर ठरेल.
आज काम आणि दाम यांचे गणित जमवता जमवता वैयक्तिक जीवनात त्याचे पडसाद खोलवर उमटतील. एखादा निर्णय तडका फडकी घेऊ नका. वाहने जपून चालवा. जुनी दुखणी डोके वर काढतील. राजकारणी लोकांना जनतेचा रोष पत्करावा लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. मनाप्रमाणे कामे घडतलीच असे नाही. महत्वाची कामे शक्यतो टाळा. कामाचा ताणतणाव राहील. व्यापारात आर्थिक बाबतीत नुकसान संभवते.
आज सहकार्य लाभल्यामुळे मन प्रसन्न राहील. आत्मसन्मान वाढेल. मनात प्रसन्नता असल्याने तुमच्या नियोजीत कामात वेग येईल. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती उत्तम राहील. भागीदारीमुळे आर्थिक धनलाभ होतील. मानमरातब मिळेल. जुने मित्र भेटतील. आर्थिक पातळी वरील प्रश्न चुटकीसरशी सोडवाल. स्वप्नांच्या दुनियेतच वावराल. स्वतःसाठी चोखंदळपणे खरेदी कराल. काही महत्त्वाचे निर्णय अविचारपणे घेतले जाण्याची शक्यता आहे.