Horoscope today 19 September 2023 : सिंह, धनुसह 'या' राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला, फक्त 'हे' काम करू नका
zodiac signs today 19 September 2023 : कोणत्या राशींच्या लोकांसाठी शुभ आहे आजचा दिवस? कोणाला राहावं लागेल सावध? कोणाला मिळेल प्रमोशन? कसं असेल तुमचं मानसिक संतुलन? नेमका कसा जाईल आजचा दिवस? वाचा आजचं राशीभविष्य.
Horoscope Today 19 September 2023 : येणारा दिवस कसा जाणार याचं कुतूहल प्रत्येकाला असतं. तो चांगलाच असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण तसं होतंच असं नाही. त्यामुळंच आपलं भविष्य जाणून घ्यायची उत्सुकता माणसाला असते. मनुष्याच्या जन्म राशीनुसार आणि ग्रहांच्या स्थितीवरून ज्योतिषशास्त्र भविष्याबद्दल काही अंदाज वर्तवत असतं. त्याआधारे अनेक जण आपल्या दिवसाची आखणी करतात किंवा सतर्कता बाळगतात. त्यांच्यासाठी ज्योतिषविद्येचे अभ्यासक जय घोडके (jaynews21@gmail.com) सांगताहेत आजचं राशिभविष्य!
ट्रेंडिंग न्यूज
मेष: आजचा दिवस चांगला आहे. बौद्धिक क्षेत्रात प्रगती करू पाहणाऱ्या व्यक्तींना आजचा दिवस लाभदायक आहे. असे असले तरी काळजी घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी ताण वाढेल. कायद्याच्या कचाट्यातील गुंता सुटेल.
शुभरंगः नारंगी शुभदिशाः दक्षिण.
वृषभ: रोजगरात भरभराट होणार आहे. आजचे दिनमान चांगले राहणार आहे. प्रेमसंबंधात यश मिळेल. परदेशात जाण्याचा योग आहे. मन स्थिर ठेवावे लागणार आहे. मोजका आहार घ्यावा लागणार आहे. कौटुंबिक स्नेह वाढेल.
शुभरंगः गुलाबी शुभदिशाः आग्नेय.
मिथुन: आजचे दिनमान चांगले राहणार आहे. व्यापारात भरभराट होणार आहे. नोकरीत प्रगती होईल. कुटूंबात स्नेह वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. कार्यक्षेत्रात नावलौकिकता वाढेल.
शुभरंगः हिरवा शुभदिशाः उत्तर.
कर्क: आज दिवस आनंदी जाणार आहे. जमिनीच्या व्यवहारातील अडचणी दूर होतील. साहित्य क्षेत्रातील व्यक्तिंसाठी चांगले योग आहे. प्रतिष्ठा लाभेल. व्यापारात जुनी घेणी वसुल होतील.
शुभरंगः सफेद शुभदिशाः वायव्य.
सिंहः आजचा दिवस शुभ आहे. चांगल्या कार्यात सहभागी व्हा. कामाचे नियोजन करा, यश मिळेल. व्यापारात देखील भरभराट होणार आहे. धाडसी निर्णय घेण्यास योग चांगला आहे. परदेशात जाण्याची संधी आहेत.
शुभरंगः लाल शुभदिशाः पुर्व.
कन्या: आज आकस्मिक धनलाभ होण्याची शक्यता आहे. शुभकामाचे नियोजन करा. राजकीय लाभ मिळतील. कयामत यश मिळेल. जोडीदाराकडून साथ लाभेल. आर्थिक गुंतवणुक करताना विचारपूर्वक करा. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका.
शुभरंगः पोपटी शुभदिशाः उत्तर.
तुला: आजचा दिवस चांगला आहे. व्यापार योग आहे. नवीन रोजगार मिळेल. तसेच नवा उद्योग सुरू करण्यास चांगली संधी आहे. मनावर संयम ठेवा. शस्त्रक्रिया अपघात भय संभवते.
शुभरंगः पिवळसर शुभदिशाः आग्नेय.
वृश्चिक: आर्थिक व्यवहारातील अडचणी दूर होतील. विवाह इच्छुकांचे विवाह जमतील. कायदेशीर कामात विलंब होईल. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य मिळणार आहे. प्रेमप्रकरणात कुटुंबातील विरोधाला सामोरे जावे लागेल.
शुभरंगः केसरी शुभदिशाः दक्षिण.
धनु: आजचा दिवस थोडा काढीन जाण्याची शक्यता आहे. कामे करतांना जरा विचार करा. वारसा हक्क पेन्शन विमा यात यश मिळेल. शक्यतो प्रवास टाळा. संतती व पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या.
शुभरंगः पिवळा शुभदिशाः ईशान्य.
मकर: जमिनीचे व्यवहार करतांना काळजी घ्या. नवी संपतीत वाढ होईल. व्यापार कारखानदार वर्गाची व्यवसायात वाढ होईल. कला तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तींसाठी प्रगतीकारक ग्रहमान आहे. कामाच्या ठिकाणी भरभराट होईल.
शुभरंगः निळा शुभदिशाः नैऋत्य.
कुंभ: व्यापार वाढीच्या दृष्टीकोनातून उत्तम दिवस आहे. व्यवहार कुशलते मुळे आर्थिक लाभ होतील. वरिष्ठ व्यक्तींच्या स्तुतीस पात्र ठराल. परमेशरावर विश्वास दृढ होईल.
शुभरंगः जांभळा शुभदिशाः पश्चिम.
मीन: आज भातृसौख्य उत्तम लाभेल. भावाकडून नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. परमेश्वरा विषयी श्रद्धा वाढेल. तिर्थक्षेत्री प्रवास होतील. प्रेमातील अडथळे दूर होतील. परदेशात जाण्याची संधी मिळेल.
शुभरंगः पिवळसर शुभदिशाः ईशान्य.