मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 19 January 2024: आनंद व उत्साहाचा दिवस पण आरोग्य सांभाळा! मेष ते मीन राशींचे वाचा राशीभविष्य!

Horoscope Today 19 January 2024: आनंद व उत्साहाचा दिवस पण आरोग्य सांभाळा! मेष ते मीन राशींचे वाचा राशीभविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 19, 2024 09:19 AM IST

Horoscope Today 19 January 2024: आज १९ जानेवारी २०२४ शुक्रवार रोजी, दिवस शुभ असेल की अशुभ, लाभ होईल की नुकसान, किती संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे राशीभविष्य.

Horoscope Today 19 January 2024
Horoscope Today 19 January 2024

आज शुक्रवार १९ जानेवारी रोजी, मंगळ आणि गुरूचा राशी परिवर्तनाचा योग शुभ आणि लाभदायक असेल. आज चंद्र मेष राशीत गुरूसोबत भ्रमण करत आहे, हा देखील एक चांगला योगायोग आहे. अशात मेष ते मीन सर्व राशींसाठी आजचा दिवस कसा जाईल, वाचा राशीभविष्य!

मेषः 

आज स्पष्ट बोलाल त्यामुळे काहींना ते आवडणार नाही. नातेवाईकांमध्ये आर्थिक व्यवहार करू नयेत. जोडीदाराबरोबर क्षुल्लक कारणावरून वाद संभवतात. आपल्या व वरिष्ठांच्या विचारात मतभेद निर्माण होऊ शकतात. नोकरीत केलेली चुकू महागात पडेल. कायदेशीर कारवाईचा त्रास होऊ शकतो. शासकीय सेवेत प्रलोभनांना बळी पडू नये. कौटुंबिक पातळीवर सदस्यांशी सुसंवाद ठेवा. व्यापारात कर्जप्रकरणे नामंजूर होतील. कर्ज घेणे देणे टाळावे. आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. आरोग्य जपा व प्रवास टाळा.

वृषभः 

आज आयुष्यातील जोडीदाराकडून आपणास अनुकूल असे सहकार्य लाभेल. मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. इतरांना खूप सहकार्य कराल. नावलौकिक वाढेल. नोकरीत रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार आहात. व्यापारात थोड्याफार अडचणी निर्माण होतील. हाती कमी पैसा असल्याने योजना अपूर्ण राहण्याची शक्यता आहे. वास्तविकतेला महत्व देणे गरजेचे आहे. कुटुंबातून सहकार्य लाभेल. विद्यार्थ्यांची प्रगती होईल. लाभदायक घटना घडतील. सहकार्य लाभेल. कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.

मिथुनः 

आज विशेष काळजी घ्या. थोडे आस्थिर आणि चंचलं बनाल. व्यवसायात मनावर ताबा ठेवावा लागेल. ताणतणाव वाढेल. हातून चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. नोकरीत बदलाचे निर्णय घेऊ नयेत. वरिष्ठांकडून कामाचा दबाब राहील. मनमुटाव होण्याची शक्यता आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. प्रत्येक व्यवहार काळजीपूर्वक करा. अन्यथा मोठी आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. कायदेशीर पेचप्रसंगात अडकू शकतात. कायदा व नियमाच्या विरोधात काम केल्यास शिक्षा होऊ शकते. कामात खुप मेहनत घ्या.

कर्कः 

आज आंनदाची बातमी मिळेल. व्यवहारामध्ये चौकसपणा ठेवा, फायद्याचे ठरेल. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. जवळच्या माणसांची परिस्थिती समजून घ्यावी लागेल. जोडीदाराच्या मनाचा विचारही करावा लागेल. संततीसाठी काही कारणास्तव पैसा खर्च करावा लागेल. कार्यक्षेत्रात वृद्धी होईल. सहकार्य लाभेल. प्रगतीच्या मार्गाने वाटचाल कराल. विद्यार्थ्याची प्रगती होईल. मान-सन्मान प्रतिष्ठा वाढेल. कार्यक्षेत्र विस्तारेल. व्यापारी वर्गाला आर्थिक फायद्याचा दिवस आहे. आनंदी व ऊत्साही दिवस राहील. मनात प्रसन्नता असेल. आईच्या आरोग्याची काळजी मात्र घ्या.

सिंहः 

आज मानसन्मान मिळेल. आर्थिक स्थिती चांगली असेल तरी एखादी गोष्ट करता येणार नाही. सर्व बाबतीत मागचा अनुभव पाठीशी घेऊन निर्णय घ्याल. स्वत:चे सामर्थ्य ओळखून वाटचाल कराल. चिकाटी जिद्द आणि स्थैर्य कामी येईल. नोकरीत कर्तुत्वाला चांगली संधी निर्माण होईल. आपले कर्तुत्व सिद्ध झाल्याने जनमानसात प्रतिष्ठा वर्चस्व प्रस्थापित कराल. व्यवसायात भरभराट होऊ शकते. नवनवीन योजना कार्यान्वित करू शकाल. मोठ्या भांवडाकडून उत्तम सहकार्य लाभेल. अचानक लाभ होतील. कौटुंबिक वातावरण चांगले व आनंददायी राहील. 

कन्याः 

आज परदेशगमनाचे योग येतील. घरामध्ये अचानक उद्भभवलेल्या खर्चामुळे थोडी चिडचिड होईल. नोकरी व्यवसायात मनासारखे वातावरण लाभेल. अचानक लाभ होण्याचे योग आहेत. वारसा हक्काची प्रकरण मार्गी लागेल. घरातील कौटुंबिक वातावरण चांगले राहील. संततीची उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल राहील. चांगल्या भावनेने काम करा. आपल्या अंगीभूत कलेसाठी चांगले वातावरण आहे. व्यापारात आर्थिक उन्नती होईल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक बाबतीत मदत मिळेल. मनातील संभ्रम दुर करून आत्मविश्वासाने सामोरे जा. यश निश्चित लाभणार आहे.

तूळ:

आज आर्थिक दृष्टीकोनातून उत्तम दिवस राहील. उत्पन्नाताचे स्तोत्र वाढविण्यात यश येईल. प्रत्येक काम फत्ते करणार आहात. प्रेमळ आणि परोपकारी वृत्तीमुळे अनेक लोक जोडले जातील. शांत आणि धीमेपणाने काम करण्याच्या वृत्तीमुळे रचनात्मक कामाकडे ओढ राहील. परिस्थितीचा आढावा चांगला घ्याल. सामाजिक क्षेत्रात काम कराल. समाजात आपली प्रतिष्ठा वाढल्याने आनंदी राहाल. नोकरीत बौद्धिक चातुर्याने आपण हाती घेतलेल्या कामात सफलता मिळवाल. अधिक प्रयत्न केल्यास जास्तीचे यश मिळू शकेल. आपली आर्थिक बाजु भक्कम राहील.

वृश्चिकः 

आज रोजगारात नवीन कामाची आखणी कराल. आपल्या बोलण्यामुळे गैरसमज होत नाहीत ना याचा विचार करून संवाद साधावा. कलाकरांना संधी मिळतील. यशाची जबरदस्त आसक्ती तुम्हाला नेहमीच असते. त्यामुळे जिद्दीने कामाला लागाल. बरीच कामे मार्गी लागतील. पूर्वीपेक्षा पैशाची आवक चांगली राहील. आत्मविश्वास वाढीस लागल्याने अवघड समस्याही सहज सोडवाल. आजचे निर्णय महत्वपूर्ण ठरतील. भविष्याच्या दृष्टीने लाभदायक ठरतील . उत्तम दिवस आहे. व्यापार व्यवसायात तेजी राहील. मुलांच्या हट्टापायी चैनीच्या वस्तूसाठी खर्च करावा लागेल. समाजात केलेल्या कार्याची स्तुती होईल. महत्वपूर्ण व्यक्तींच्या गाठीभेटी होतील.

धनुः 

आज सावधानीपूर्वक वाटचाल करणे गरजेचे आहे. द्विधा मन:स्थितीमुळे तुमचा घोटाळा होऊ शकतो. एकंदरीत तब्येत नाजूक रहाण्याकडे कल राहील. कामाचे नियोजन केले तरी त्याची कार्यवाही न केल्यामुळे कामे उलटपालट होऊन जातील. अतिरिक्त राग आणि वादविवाद टाळा. नोकरीत वारिष्ठांकडून त्रास जाणवेल. विशेष काळजी घ्या. वादविवाद टाळावेत. नव्या ओळखीवर फारसे विसंबून राहू नका. व्यापारात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. जामीन राहू नका अन्यथा फसवणुक होईल. उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण अधिक राहील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

मकरः 

आज लाभदायक दिवस आहे. देणीही देऊन टाकाल. कोणतेही काम पूर्णत्वाकडे न्यायचे असेल तर काही गोष्टींकडे कानाडोळा करायला लागेल. यामुळे रेंगाळलेली कामे गती घेतील. नोकरी धंद्यात काही ठोस बदल कराल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना पदप्राप्ती होईल. आनंदाची व समाधानाची बातमी ऐकायला मिळेल. नव्या संधी मिळतील. घरात मंगल कार्य घडतील. विद्यार्थ्याची प्रगती होईल. सहकार्य लाभेल. आपली कामे नियोजनात्मक पद्धतीने सुरुळीत पार पाडाल. व्यापारात प्रगतीकारक दिवस असुन अचानक आर्थिक लाभ घडतील. आज केलेली गुंतवणुक फायदेशीर ठरणार आहे. आरोग्य उत्तम राहील.

कुंभः 

आज यशप्राप्ती लाभेल. पैशाची कामे मनासारखी घडतील. संशोधन क्षेत्रात काम करणार्‍यांची प्रगती होईल. परिस्थितीचा उत्तम आढावा घेताना स्वतःची मर्यादा ओळखून परिपूर्ण काम कराल. कलाक्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. आपपल्या क्षेत्रात योग्य गुरूवर्य मंडळी भेटतील. पती पत्नीत स्नेह निर्माण होईल. महिला वर्गाकडून विशेष सहकार्य लाभेल. दुरवरचे प्रवास हितकारक ठरतील. आपल्या आवडीच्या गोष्टीसाठी वेळ मिळेल. आनंद प्राप्त होईल. उत्पन्नाचे नवनवीन मार्ग सापडतील. मानसिक सौख्य लाभेल. 

मीनः 

आज अत्यंत शुभ दिवस असेल. नवीन प्रॉपर्टी संबंधी विचार चालले असतील तर प्रत्यक्षात उतरवायला हरकत नाही. नोकरी व्यवसायात इतर लोकांचे डावपेच ताबडतोब लक्षात येतील. पैशाची आवक चांगली राहील. प्रेम प्रकरणात आवडत्या व्यक्तीजवळ मनातले बोलायला उत्तम ग्रहमान आहे. शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना मोठे यश प्राप्त होईल. नोकरदारास सलोख्याचे वातावरण अनुभवता येईल. धार्मिक अध्यात्मिक प्रसंगातून आत्मविश्वास मिळवू शकाल. नावलौकिकेत वाढ होईल. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात आनंदी रहाल.

 

जय अर्जुन घोडके

(jaynews21@gmail.com)

(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)