मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 19 february 2024: वसंत ऋतूच्या प्रारंभासोबत आजचा दिवस कसा जाईल, वाचा राशीभविष्य

Horoscope Today 19 february 2024: वसंत ऋतूच्या प्रारंभासोबत आजचा दिवस कसा जाईल, वाचा राशीभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Feb 19, 2024 09:42 AM IST

Horoscope Today 19 february 2024: आज १९ फेब्रुवारी २०२४ सोमवार रोजी, दिवस शुभ असेल की अशुभ, लाभ होईल की नुकसान, किती संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे राशीभविष्य.

horoscope today 19 february 2024
horoscope today 19 february 2024 (Freepik)

आज सोमवार १९ फेब्रुवारी रोजी, चंद्र मिथुन राशीतून संक्रमण करणार आहे. विष्कंभ आणि प्रीती योग आहे. चंद्रमा मंगळ-शुक्र-प्लुटोशी प्रतियोगही करत आहे. मेष ते मीन सर्व राशींसाठी कसा जाईल आजचा शिवजयंतीचा दिवस! वाचा राशीभविष्य!

मेष: 

आज तुमच्या चपळ कार्यक्षमतेमुळे कार्यक्षेत्रात एक वेगळीच ओळख निर्माण होईल. व्यवसायात मनाप्रमाणे कामे मिळतील. प्रवास घडेल. नोकरीत योग्य मान सन्मान मिळेल. वाहन व घर खरेदी करता शुभ योग आहे. व्यापारी वर्गासाठी बर्‍याच संधी प्राप्त होतील. व्यापारात नवीन बदल यशस्वी ठरेल. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ होईल. व्यवसायात यश मिळाल्याने आनंदी राहाल.

वृषभः 

आज नवीन योजना यशस्वी होतील. थोडे धाडस दाखवा. आपल्या महत्त्वाकांक्षी योजनांचे नियोजन चाणाक्षपणे कराल व त्यात यशस्वी व्हाल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. कुटूंबात स्नेह वाढेल. स्वभावातील रागावर नियंत्रण ठेवा. आजचा दिवस यशप्राप्तीचा आहे मोठे आर्थिक व्यवहार करण्यास उपयुक्त दिवस आहे. आनंदाची बातमी मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात नावलौकिकता प्राप्त होईल. 

मिथुनः 

आज थोडा अहंकार बाजूला ठेवायला हवा. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने अभ्यासाकडे लक्ष द्यावे. प्रवासात वादविवाद टाळा. वैवाहिक जीवनात छोट्या मोठ्या तडजोडी कराव्या लागतील. कुटुंबातील इतर व्यक्तींमुळे त्रास सहन करावे लागतील. अशावेळी मानसिक अस्थिरता जाणवेल. करिअर संबंधी चिंता सतावेल. मनमानी पद्धतीने काम करण्याची प्रवृती मात्र टाळा. कोणतेही महत्वाचे निर्णय आज घेऊ नयेत. इतरांना आर्थिक मदत करताना विशेष काळजी घ्या.

कर्क: 

आज घराबाहेर वादाचे मुद्दे उत्पन्न झाले तर तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल. आर्थिक उलाढाली यशस्वी ठरतील. विश्वासाला न्याय देण्यासाठी जीवाचं रान कराल. स्वत:च्या हिमतीवर कामे पूर्णत्वाला न्याल. पैशाची अडकलेली कामे मात्र पार पडतील. मोठ्या भावंडांची साथ चांगली मिळेल. व्यापारी वर्गासाठी शुभ योग निर्माण होत आहेत. व्यापारात फायदा होईल. जोखमीच्या व्यवहारात मात्र सावध राहा. व्यसनापासून दूर राहा.

सिंह: 

आज घरापासून दूर राहण्याचे प्रसंग येतील. खर्चाला अनेक वाटा फुटतील. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींची काळजी घेणे आवश्यक आहे. वाहने जपून चालवा. तुमच्या स्वतंत्र आचार विचाराचे फायदे तोटे अनुभवास येतील. नोकरीत ताण वाढेल. मनस्तापाच्या घटना घडतील. प्रसिद्धिसाठी अधिक पैसा खर्च कराल. प्रकृतीची विशेष काळजी घ्या. व्यापारात विनम्रतेने आणि संयमाने कामे करण्याचा प्रयत्न करा.

कन्या: 

आज दुसऱ्यांचा जेवढा आदर कराल तेवढे तुम्हाला सहकार्य चांगले मिळेल. आरोग्याबाबतीत उपचार वेळेवर घ्यावेत. हाताखालच्या लोकांचे सहकार्य उत्तम ठरेल. उत्साह वाटेल. प्रकृती अस्वास्थ्य थोडे जाणवेल. मोबदला मिळेल. नोकरीत दुसऱ्याच्या कार्यात हस्तक्षेप करु नका. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवास सुखकर व लाभदायक होतील. 

तूळ: 

आज काम करण्यास उत्साह येईल. फक्त कुठेही टोकाची भूमिका घेऊ नका. अती महत्त्वाकांक्षा असमाधान निर्माण करेल. वारसाहक्काने धनप्राप्तीची शक्यता राहील. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. जिवनाचा मनसोक्त आनंद घ्याल. कुटूंबातील सदस्याचे आपल्या विषयी चांगले मत असेल. कामे करताना वेळेचे नियोजन कराल. 

वृश्चिक: 

आज अनेक कामे मार्गी लागतील. अधिकाराच्या जागेवर असणाऱ्यांना मानसिक स्वास्थ्य देणाऱ्या घटना घडतील. कामाच्या बाबतीत दुसऱ्यांना कामाला लावाल. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी मिळतील. प्रवासात थोडा त्रास होण्याची शक्यता असल्यामुळे उत्तम नियोजन करणे आवश्यक ठरेल. कामात यश मिळण्याचे योग आहेत. आळस दूर ठेवा. मित्रपरीवारांकडून उत्तम सहकार्य लाभेल. कुटुंबात धार्मिक कार्य घडेल. प्रवासातुन लाभ होईल. 

धनु: 

आज देश-विदेशासंंबंधी काही कामे असतील तर ती रखडतील. घरातील मोठ्या लोकांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. विशेषतः आईच्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक ठरेल. शत्रूच्या गुप्त कारस्थानाला बळी पडला नाहीत तरी त्रास मात्र होईल. स्वतःच्या हिमतीवर कामे पूर्ण कराल. वाईट सवयीचा त्याग करा. मनाची उद्विग्नता वाढेल. महत्वाची कामे शक्यतो आज टाळावीत. मुलांकडून काही बाबतीत त्रास होईल. वादविवाद होण्याचीही शक्यता आहे. 

मकर: 

आज घरामध्ये तुमचे विचार इतरांना पटणार नाहीत. त्यामुळे मतभेद होण्याची शक्यता आहे. घरातील स्त्रियांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. परदेशी जाण्याचे बेत लांबणीवर पडतील. झोपेच्या तक्रारी डोके वर काढतील. व्यवसायात वादविवाद होऊ शकतात. अनिश्चितेमुळे वैचारिक पातळीवर वातावरण ताण तणावात्मक राहील. शासकीय कामकाजा करिता यशदायक दिवस आहे. कायदेशीर कामात विलंब होईल. महत्वाची कागदोपत्रे मात्र संभाला. 

कुंभ: 

आज नुकसान होऊ शकते. वैवाहिक जीवनात ताणतणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. अती भावना प्रधानतेमुळे मात्र मनःस्तापाचे प्रसंग येतील. आलेला पैसा ताबडतोब गुंतवणूक करणे हिताचे ठरेल. कुटुंबातील आपसातील मतभेद वाढू नयेत याची काळजी घ्या. कोणताही विषय जास्त ताणू नये. मानसिक शारिरिक थकवा जाणवेल. मित्रमैत्रिणी बरोबर युक्तिवाद टाळावेत. 

मीन: 

आज घर सजवण्याचे स्वप्न साकार होईल. घरात उंची वस्तूंची खरेदी कराल. मुलांकडून त्यांच्या धाडसाचे कौतुक ऐकायला मिळेल. धंद्यात वाढ होईल. राजकारणी लोकांना आपला मान जपण्यासाठी संपर्क वाढवावा लागेल. कष्टाच्या मानाने लाभ कमी मिळेल. तुमची पदोन्नती व प्रगती होईल. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळेल. कलाक्षेत्रातील महिला अनुकूल प्रगतीच शिखर गाठतील. अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे.

WhatsApp channel