Horoscope Today 18 September 2023 : येणारा दिवस कसा जाणार याचं कुतूहल प्रत्येकाला असतं. तो चांगलाच असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण तसं होतंच असं नाही. त्यामुळंच आपलं भविष्य जाणून घ्यायची उत्सुकता माणसाला असते. मनुष्याच्या जन्म राशीनुसार आणि ग्रहांच्या स्थितीवरून ज्योतिषशास्त्र भविष्याबद्दल काही अंदाज वर्तवत असतं. त्याआधारे अनेक जण आपल्या दिवसाची आखणी करतात किंवा सतर्कता बाळगतात. त्यांच्यासाठी ज्योतिषविद्येचे अभ्यासक जय घोडके (jaynews21@gmail.com) सांगताहेत आजचं राशिभविष्य!
मेषः आजचा दिवस शुभ राहील. रोजगारात प्रगती होईल. खर्च कमी करा. व्यापारात आज वृद्धी होईल. बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होईल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नवीन उपक्रम राबवू शकाल.
शुभरंग: केसरी शुभदिशा: दक्षिण.
वृषभः आज मनातील इच्छा पूर्ण होतील. परदेशी जाणारयाची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी बढती होईल. वरिष्ठांकडून गौरव होईल. नव्या संधी निर्माण होईल. व्यापार उद्योगात वाढ होईल. भागीदारांकडून उत्तम सहकार्य लाभेल.
शुभरंग: पांढरा शुभदिशा: वायव्य.
मिथुनः संपत्ती मधील वाद दूर होतील. अपूर्ण कामे पूर्ण होतील. आजचे दिनमान चांगले राहील. मात्र, कुणाचा द्वेष करू नका. कामाच्या ठिकाणी असलेल्या अडचणी दूर होतील. प्रेमात यश लाभणार आहे. जोडीदाराची साथ लाभणार आहे. परिवारातील वाद मिटतील.
शुभरंग: पोपटी शुभदिशा: उत्तर.
कर्कः आजचा दिवस चांगला आहे. दिनमान चांगले राहील. जुनी अडलेली कामे आज पूर्ण होतील. प्रेमातील अडथळे दूर होतील व्यवसायात भरभराट होईल. मनाविरुद्ध असलेली कामे आज पूर्ण होतील. वारसा हक्काची प्रकरण मार्गी लागेल. आरोग्य देखील चांगले राहणार आहे.
शुभरंग: सफेद शुभदिशा: वायव्य.
सिंहः आज थोड्या संयमाने कामे करा. कामाच्या ठिकाणी सतर्क रहा. विरोधी गट आक्रमक होण्याची शक्यता आहे. व्यापारात आर्थिक लाभ होतील. पती पत्नीमधील दुरावा दूर होईल. बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंडळींसाठी चांगला दिवस आहे.
शुभरंग: लाल शुभदिशा: पूर्व.
कन्याः आज नेहमीच्या कामात मेहनत घ्यावी लागणार आहे. आज वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा गैरसमज निर्माण होतील. कामाच्या ठिकाणी नव्या संधी मिळतील. ताणतणावामुळे प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. दुरवरचे प्रवास टाळा.
शुभरंग: हिरवा शुभदिशा: उत्तर.
तुला: कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढणार आहे. कलागुणांना वाव मिळेल. अचानक धन लाभ होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. मित्रमैत्रिणींकडून सहकार्य मिळेल. नव्या प्रकल्पांना चांगला प्रतिसाद मिळेल. सामाजिक भागीदारी वाढेल.
शुभरंग: गुलाबी शुभदिशा: वायव्य.
वृश्चिकः आजचा दिवस चांगला आहे. नवे काम करतांना शांत रहा. मानसन्मान प्रतिष्ठा लाभेल. संकुचित मनोवृति टाळा. मानसिक शांतता लाभणार आहे. सहकाऱ्यांची उत्तम साथ मिळेल. वैवाहिक जोडीदार मनासारखा लाभेल.
शुभरंग: तांबूस शुभदिशा: दक्षिण.
धनुः अध्यात्म क्षेत्रात रममाण होण्याची शक्यता आहे. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. व्यापारात योजना सफल होतील. ईश्वराची आराधना याकडे कल राहिल. कुटुंबात आनंदाची व समाधानाची बातमी ऐकायला मिळेल.
शुभरंग: पिवळा शुभदिशा: ईशान्य.
मकरः आज व्यापारात प्रगती होणार आहे. नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी चंगला योग आहे. कायदेशीर कारवाईचा त्रास होऊ शकतो. शासकीय सेवेत प्रलोभनांना बळी पडू नका. कौटुंबिक पातळीवर सदस्यांशी सुसंवाद ठेवा. आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असल्याने सावधानी बाळगून व्यवहार करा.
शुभरंग: जांभळा शुभदिशा: पश्चिम.
कुंभ: आज हातून चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. त्यामुळे काळजी घ्या. वरिष्ठांकडून कामाचा दबाब राहील. मनमुटाव होण्याची शक्यता आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. आरोग्यावर खर्चात वाढ होईल.
शुभरंग: निळा शुभदिशा: पश्चिम.
मीनः आजचा दिवस चांगला राहील. नोकरदारांना नवीन प्रस्ताव प्राप्त होतील. मित्रमैत्रिणींकडून साथ लाभेल. आपल्या कार्यक्षेत्रात स्वतःला सिद्ध कराल. व्यापारात नवनवीन योजना आमलात आणाल. व्यापार रोजगारात प्रश्न मार्गी लागतील.
शुभरंग: नारंगी शुभदिशा: ईशान्य.