आज गुरुवार १८ जानेवारी रोजी, चंद्र अश्विनी नक्षत्रात व मेष राशीत संक्रमण करत आहे. अशा स्थितीत आज चंद्राचा गुरु ग्रहाशी संयोग होत असल्यामुळे मेष राशीत गजकेसरी योग तयार झाला आहे. तर आज शुक्राचे सुद्धा धनु राशीत भ्रमण होणार आहे. अशा स्थितीत आज धनु राशीत तीन ग्रहांमध्ये संयोग निर्माण होईल. वाचा राशीभविष्य!
आज कामाची सुरुवात चांगली होईल. उधारी वसूल होतील. त्यामुळे आर्थिक घडी चांगली बसेल. शैक्षणिक क्षेत्रात काम करताना आनंद वाटेल. साहसी वृत्तीत वाढ होऊ शकते. आर्थिक प्रगतीच्या नवीन संधी प्राप्त होतील. व्यवसायात प्रगती होण्याचे योग आहेत. नव्या योजना कार्यान्वित करू शकाल. मोठ्या व मान्यवर व्यक्तींचा सहवास लाभेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. आपल्या कार्याची दखल घेतली जाईल. प्रशंसा व मानसन्मान मिळेल. भावडांशी चांगले संबंध राहतील. मानसिक व शारीरिक स्वास्थ लाभणार आहे. मोठे यश प्राप्त होईल. अल्पकालीन गुंतवणुकीत नुकसान होऊ शकते.
आज सुप्त गुणांचा फायदा होईल. पैसा खर्च करण्यातही लहरीपणा जाणवेल. कुठेही धोका पत्करण्याची तयारी ठेवाल. अती महत्त्वाकांक्षा असमाधान निर्माण करेल. कामानिमित्त प्रवास होईल. कार्यक्षेत्रात उद्दिष्ट पूर्ण होतील. परंतु बोलण्यावर संयम ठेवा. स्पर्धकांवर मात कराल. आपल्या योजना यशस्वी होईल. सर्वच बाबतीत समाधान लाभेल. मनाप्रमाणे घटना घडतील. मंगलकार्य घडतील. व्यवसायात उत्तम लाभ होतील. घरातील आनंदी वातावरण मानसिक सौख्य देणारं असेल. गुढशास्त्राची आवड निर्माण होईल. ओळखीच्या लोकांकडून फायदा होईल.
आज वाद-विवाद होत असले तरी तडजोडीचे धोरण स्वीकारल्यास गोष्टी टोकापर्यंत जाणार नाही. आपणास प्रतिकुल फले मिळण्याची शक्यता आहे. कितीही स्पर्धांना किंवा संकटांना तोंड द्यावे लागले तरी मन डगमगू देऊ नका. विरोधक आक्रमक होऊ शकतात. शेअर्समधील मोठी गुंतवणूक टाळावी. व्यापारी वर्गानी काळजीपूर्वक व्यवहार करा. भावनावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी. तुमच्या कामाचे श्रेय दुसर्याला मिळेल असी स्थिती आहे. व्यापारी वर्गाांनी कोणतेही महत्वपूर्ण निर्णय घेऊ नयेत. आर्थिक नुकसान होऊ शकते. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या.
आज मानसिक स्वास्थ उत्तम राहील. आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. धार्मिक वृत्ती राहील. काही लाभदायक गोष्टीही घडतील. उत्तम महत्त्वाकांक्षा ठेवाल. आत्मविश्वासही वाढेल. घरामध्ये मंगलकार्य ठरतील. रोजगारात समाधानकारक स्थिती राहील. व्यवसायात वृद्धी होईल. मोठ्या गुंतवणुकीसाठी योग्य दिवस आहे. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. मित्र किंवा सहकारी यांच्याकडून मदत मिळेल. मनामध्ये उर्जा व आत्मविश्वास वाढेल. वैवाहिक जोडीदाराच्या महत्वकांक्षा पूर्ण होतील. संततीच्या महत्वाच्या प्रश्नामध्ये निर्णायक यश मिळेल. घरातील अडचणी दूर होतील. पत्नी नोकरीत असेल तर बढतीचे योग आहेत.
आज दिवसभर मन प्रसन्न राहील. नोकरीतील बदल फायदेशीर ठरतील. लेखनाचा नवा बाज निर्माण करता येईल. बऱ्याच जणांना प्रसिद्धीच्या झोतात येण्याची संधी मिळेल. तुमच्या गुणांना वाव मिळेल. आपली प्रतिभा उंचावेल. दिनमान आत्मविश्वासाने परिपूर्ण राहील. नोकरीत कामाच्या ठिकाणी आपले कौतुक केले जाईल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मानसन्मानात वाढ होईल. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेन अधिक लाभ होतील. नवीन भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक सौख्य मिळाल्याने उत्साह वाढेल.
आज मानसिक स्वास्थ बिघडणार नाही याची काळजी घ्या. मनाचा गोंधळ उडेल. काही घरगुती गोष्टींमुळे अस्वस्थता वाढेल. नोकरीत वरिष्ठांच्या अपेक्षा जास्त असल्यामुळे थोडा ताण राहील. व्यवसायात मात्र स्पर्धकांना तोंड द्यावे लागेल. नव्या कल्पना इतरांना पटणार नाहीत. नैराश्यामुळे चिडचिड निर्माण होईल. खर्चाचे प्रमाण वाढल्याने आर्थिक चिंताही वाढेल. रोजगारात जबाबदारी नुसार काम करा. संकटाचा सामना करावा लागेल. विचार पूर्वक निर्णय घ्या. प्रकृती आस्थिर व बैचेन राहील. आर्थिक फसवणुक होण्याची शक्यता आहे.
आज आर्थिक प्रश्न सुटतील. खरेदीचा मोह होईल. घरातील काही गोष्टींसाठी पैसाही खर्च कराल. समजुतदारपणाचे धोरण स्वीकारावे लागेल. कलाकारांना चांगल्या संधी मिळतील. भागीदार व वैवाहिक जोडीदार यांची उत्तम साथ मिळेल. आपला स्वभाव फार उदारमतवादी राहील. आपल्या चैनी स्वभावावर आळा घालावा. व्यापारात आर्थिक लाभ घडेल. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. मित्र नातेवाईक आप्तेष्टाकडून सहकार्य लाभेल. कुटुंबात मंगलकार्याची रूपरेखा आखली जाईल. फायदेशीर प्रवास होऊ शकतो. आकस्मिकरित्या धनलाभ होऊ शकतो.
आज व्यापारात नवीन योजनेवर विचार कराल. घरासंबंधी समस्या सुटतील. वाचन लिखाण करायला सवड मिळेल. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची धमक येईल. बदलीचे योग आहेत. तुमच्या नवीन कल्पना आणि विचारांचे स्वागतच होईल. व्यवसायात अपेक्षित पैसे लवकर हाती न पडल्यामुळे स्पर्धक त्याचा फायदा घेतील. रोजगारात स्पष्ट धोरणामुळे अनुकूलता निर्माण होईल. दिवसभरात आशाजनक परिस्थिती निर्माण होईल. शेअर बाजार आणि विमामुळे लाभ होतील. अचानक मालमत्ता खरेदी घडेल. दुरचे प्रवास घडतील. मन प्रसन्न राहील.
आज कुटुंबात अनेक जबाबदाऱ्या अंगावर पडल्या तरी त्या कर्तव्यनिष्ठेने पार पाडाल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यासाठी कष्ट घेतले तरच मनाजोगे यश मिळेल. व्यापारात भांडवलाचे प्रश्न मिटतील. कर्ज प्रकरण मंजुर होतील. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढेल. कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आंनदायक राहील. नोकरीत मनासारखी बदली किंवा पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. मुलांच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न राहील. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. व्यवसायानिमित्त प्रवास होईल. शासकीय कामकाजासाठी शुभ दिवस आहे. मित्रांकडून मदत मिळेल. अपयशाची भिती न बाळगता कष्ट करत राहा.
आज उद्योग तेजीत राहील. किर्ती प्रसिद्धीच्या झोतात आल्यामुळे मानसिक स्वास्थ्य मिळेल. केलेली गुंतवणुक फायदेशीर ठरेल. नवीन प्रकल्प हाती येतील. आपल्याला सकारात्मक परिणाम दिसतील. विद्यार्थ्यांची प्रगती होईल. बंधुप्रेम मिळेल. प्रतिष्ठीत व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. नवीन व्यक्तीशी स्नेहपूर्ण संबंध प्रस्थापित होतील. कलागुणांना वाव मिळेल. मनातील इच्छित काम मार्गी लागतील. घरात पाहुण्यांचे आगमन होईल. लेखन क्षेत्रातील व्यक्तींना नवीन प्रकल्प हाती येतील. संशोधन पर अभ्यासाच्या प्रारंभास आजचा दिवस उत्तम आहे.
आज आत्मविश्वास आणि उत्साह कमी राहील्यामुळे नोकरी व्यवसायात व कामावर परिणाम होईल. आर्थिक बाबतीत मोठे व्यवहार टाळावेत. कुटुंबातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. आपल्या विषयी गैरसमज आणि संशयाचे वातावरण निर्माण होऊ शकते. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही याची काळजी घ्या. कौटुंबिक बाबीवर खर्च वाढेल. कर्जप्रकरणाकरीता आजचा दिवस टाळा. नोकरीत महत्वाच्या कामात अडथळे निर्माण होतील. निर्णय घेताना द्विधा मनस्थिती असेल. मोठे धाडसी निर्णय घेऊ नयेत. मन अस्वस्थ राहील.
आज आत्मविश्वास वाढल्यामुळे ध्येयावर प्रेम कराल. सामाजिक राजकीय क्षेत्रात पुढे जाल. संधीचा योग्य उपयोग कराल. आर्थिक आवक उत्तम झाल्याने नवी खरेदी कराल. व्यापारात योजना गुप्तपणे पार पाडा. एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. नोकरी व्यवसायात समाधानकारक सुधारणा जाणवेल. धरसोड मनोवृत्ती सोडा. ध्येय निश्चित करा. कामाप्रती विशेष ओढ निर्माण होईल. आपल्या हातून शुभ कार्य घडतील. वारसा हक्काचे प्रकरण मार्गी लागेल. चांगल्या विचारांचा लाभ होईल.
संबंधित बातम्या