मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Rashi Bhavishya Today : वीकेंडला तुमचं नशीब पालटणार?, वाचा आजचे राशीभविष्य

Rashi Bhavishya Today : वीकेंडला तुमचं नशीब पालटणार?, वाचा आजचे राशीभविष्य

Sep 17, 2023 07:08 AM IST

Rashi Bhavishya Today 17 September 2023 : कोणत्या राशींच्या लोकांसाठी शुभ आहे आजचा दिवस? कोणाला राहावं लागेल सावध? कोणाला मिळेल प्रमोशन? कसं असेल तुमचं मानसिक संतुलन? नेमका कसा जाईल आजचा दिवस? वाचा आजचं राशीभविष्य.

Horoscope Today 17 September 2023
Horoscope Today 17 September 2023

Horoscope Today 17 September 2023 : येणारा दिवस कसा जाणार याचं कुतुहल प्रत्येकाला असतं. तो चांगलाच असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण तसं होतंच असं नाही. त्यामुळंच आपलं भविष्य जाणून घ्यायची उत्सुकता माणसाला असते. मनुष्याच्या जन्म राशीनुसार आणि ग्रहांच्या स्थितीवरून ज्योतिषशास्त्र भविष्याबद्दल काही अंदाज वर्तवत असतं. त्याआधारे अनेक जण आपल्या दिवसाची आखणी करतात किंवा सतर्कता बाळगतात. त्यांच्यासाठी ज्योतिषविद्येचे अभ्यासक जय घोडके (jaynews21@gmail.com) सांगताहेत आजचं राशिभविष्य!

मेषः हाती घेतलेल्या कार्यात यश प्राप्ती होईल. उत्त्पन्नात वाढ होईल. नवीन व्यवसायाची सुरवात करा. चांगल्या कल्पक योजना मांडा. मन शांत ठेवा. आरोग्य उत्तम राहणार आहे. शुभरंग: तांबूस शुभदिशा: दक्षिण.

वृषभः आर्थिक प्राप्तीत वाढ होईल. नियोजन उत्तम केले तर निर्णायक कामात यश मिळेल. शुभरंग: सफेद शुभदिशा: पश्चिम.

मिथुनः मित्रमैत्रिणी बरोबर युक्तिवाद टाळावेत. मनात असमाधान आणि असंतोष निर्माण होईल. मोठे व्यवहार टाळावेत. विद्यार्थ्यानी अभ्यासावर लक्ष केंद्रीन करावे. विचलित व्हाल. मनस्तापासारखा घटना घडली. कौटुंबिक ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. शुभरंग: पोपटी शुभदिशा: उत्तर.

कर्कः नवीन व्यवसायिक घटना घडणार आहे. आर्थिक दृष्या खुपच चांगला काळ आहे. वेगवेगळ्या मार्गाने धनलाभ होतील. नवे मित्रमैत्रिणी भेटतील. शुभरंग: पांढरा शुभदिशा: वायव्य.

सिंहः भाग्य अनुकुल आहे. मनोकामना पूर्ण करणारा दिवस आहे. त्याचबरोबर लाभाची मोठी संधी प्राप्त होईल. पती पत्नीस सामाजिक बहुमान मिळेल. महिलावर्गास शासनाकडून मान-सन्मान मिळेल. शुभरंग: लाल शुभदिशा: पूर्व.

कन्याः मान सम्मान प्रतिष्ठा वाढवेल. कलाकारांना योग्य संधी प्राप्त होतील. संतती आणी भांवडाकडून सौख्य लाभेल. नोकरी व्यापारात प्रगतीचे योग आहेत. कार्यात मग्न राहा. प्रवासातुन मोठे लाभ होतील. आर्थिक लाभ होईल. शुभरंग: हिरवा शुभदिशा: उत्तर.

तुलाः आजारपण व्याधी उद्‌भवतील. अपघाताचा योग संभवतो. आहारावर नियंत्रण ठेवा.आई वडीलांच्या तब्बेतीची काळजी घ्या. शुभरंग: सफेद शुभदिशा: वायव्य.

वृश्चिकः कौटुंबिक वातावरण प्रसन्नतापूर्वक राहिल. व्यापारात आर्थिक लाभ होणार आहे. आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. नवीन योजनेत वाढ विस्तार करण्यासाठी अनुकुल दिवस आहे. नोकरीत इच्छेनुसार बदली व बढती मिळेल. शुभरंग: तांबडा शुभदिशा: दक्षिण.

धनुः जुने आजार उद्भभवण्याची शक्यता आहे. संततीविषयी मन चिंताग्रस्त राहील. भागीदारासोबत वाद होण्याची शक्यताआहे. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. गुप्तशत्रुपासुन त्रास जाणवेल. शुभरंग: पिवळसर शुभदिशा: ईशान्य.

मकरः सामाजिक क्षेत्रात प्रगती कराल. सल्लामसलत करून निर्णय घ्यावेत. तीर्थक्षेत्री जाण्याचा योग आहे. विद्यार्थ्यांची अभ्यासाची प्रगती उत्तम राहील. आर्थिक धनलाभ होतील. कुटुंबातील सदस्यांकडून सहकार्य लाभेल. शुभरंग: निळा शुभदिशा: पश्चिम.

कुंभः कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आंनदायक राहिल. धनवृद्धी होईल. विरोधकावर मात कराल. संततीकडून चांगली बातमी मिळेल. नवीन घर, वाहन खरेदीस चांगला दिवस आहे. शुभरंग: जांभळा शुभदिशा: पश्चिम.

मीनः वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. कामे अपेक्षित वेळेत पूर्ण होतील. धनलाभाची संधी मिळेल. शेअर मार्केट मध्ये फायदा होईल. मनात उत्साह आणि उर्जा राहील. शुभरंग: पिवळा शुभ दिशा: ईशान्य.

WhatsApp channel