मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 17 January 2024: उद्योग क्षेत्रात तेजीचा दिवस! मेष ते मीन राशींचे वाचा राशीभविष्य!

Horoscope Today 17 January 2024: उद्योग क्षेत्रात तेजीचा दिवस! मेष ते मीन राशींचे वाचा राशीभविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 17, 2024 08:33 AM IST

Horoscope Today 17 January 2024: आज १७ जानेवारी २०२४ बुधवार रोजी, दिवस शुभ असेल की अशुभ, लाभ होईल की नुकसान, किती संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे राशीभविष्य.

Horoscope Today 17 January 2024
Horoscope Today 17 January 2024

आज बुधवार १७ जानेवारी रोजी, चंद्र रेवती नक्षत्रात गोचर करत मीन राशीतून मेष राशीत जाईल. तर आज मंगळाचा उदय होऊन बुधासोबत शुभ संयोग निर्माण होईल. अशा परिस्थितीत मेष ते मीन सर्व राशींसाठी बुधवार कसा राहील हे जाणून घेण्यासाठी आजचे राशीभविष्य पाहा.

मेषः 

आज कामाचे नियोजन उत्तम केल्यास यश मिळेल. व्यवसायात उच्चपदस्थ लोकांच्या मध्यस्थीने कामे लवकर होतील. प्रसिद्धीचे योग येतील. कलाकार आणि खेळाडूंना चांगल्या संधी मिळतील. प्रत्येक गोष्टीचे उत्तम चिंतन कराल. आपल्या कार्यक्षेत्रात आर्थिक लाभाबरोबर प्रतिष्ठाही मिळेल. जमिन विक्रीतून लाभ होईल. घरात एखादे धार्मिक कार्य कराल. नोकरीत अधिकार सत्ता प्रस्थापित करण्यात यश मिळेल. वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. व्यवसायवृद्धीसाठी प्रवासाचे योग येतील. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. खर्चावर नियंत्रण ठेवावे. 

वृषभः 

आज काही कामे अडली असतील तर ती पूर्ण होतील. सवलती मिळून जातील. व्यवसायात खास योजना आखाल. प्रमोशनही मिळू शकते. रहाणीमान उंचावण्यासाठी बराच पैसा खर्च कराल. विद्यार्थ्यांचा तणाव कमी होईल. पतप्रतिष्ठा वाढण्यास मदत होईल. युवकांना काळ अतिशय अनुकूल आहे. नवनविन संधी मिळतील. कलागुणांना वाव मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळेल. मेहनत वाढवावी लागेल. जबाबदारीने काम करा. वेळेचे नियोजन असेल तर योग्यच फायदा होईल. कोणताही महत्त्वाचा व्यवहार करताना कागदोपत्री तपासणी काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे.

मिथुनः 

आज नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी मिळतील. घरातील वातावरण सुधारेल. विद्यार्थ्यांनी कोणताही अविचार करू नये. नोकरीत अधिकार मिळेल. राजकारणात भावनेपेक्षा बुद्धीच्या कसरतीचा उपयोग जास्त होईल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास यश मिळेल. पूर्वी मांडलेले आर्थिक आडाखे यशस्वी होतील. नवीन धोरणं योजना राबवून स्पर्धकांवर मात करावी लागेल. काळजीपूर्वक काम करावे लागेल. वेळेचे व्यवस्थापन गरजेचे आहे.

कर्कः 

आज फायदा होईल. प्रेम प्रकरणामध्ये तरुणांना यश येईल. महत्त्वाचे निर्णय लवकर घ्यावेत. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने परदेशी जाण्याचे योग येतील. कामाच्या ठिकाणी अनेक सुधारणा कराल त्यामुळे उत्पन्न वाढेल, परंतु पैसे यायला थोडा वेळ लागेल. सफलतेचा आनंद मिळेल. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. व्यवसाय वृद्धीच्या संधी चालून येतील. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नवीन गृहोपयोगी वस्तु खरेदीचे योग येतील. जोडीदाराचा सल्ला त्याचं वर्चस्व मान्य करावे लागेल. कुटुंबातील व्यक्तींवर अथवा घरासाठी अचानक खर्च करावा लागेल. 

सिंहः 

आज स्वतःचे प्रश्न सोडवताना मनाचा गोंधळ उडेल. अस्वस्थता वाढेल. नोकरीत वरिष्ठांच्या अपेक्षा जास्त असल्यामुळे थोडा ताण राहील. व्यवसायात मात्र स्पर्धकांना तोंड द्यावे लागेल. नव्या कल्पना इतरांना पटणार नाहीत. अपेक्षित कार्य पूर्ण करण्यासाठी कसरत करावी लागेल. नोकरीत व्यापारात कामाचा विस्तार वाढेल. वेळेत काम पूर्ण करण्यावर भर द्या. आरोग्याची काळजी घ्यावी. अपेक्षित यशासाठी कष्ट वाढवावे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करावी. जाहिरात मीडिया क्षेत्राशी निगडित व्यवसाय करणाऱ्यांसाठी अनुकूल दिवस आहे. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील.

कन्याः 

आज खर्चावर काटेकोरपणे नियंत्रण ठेवण्यात यशस्वी व्हाल. भाग्याची साथ चांगली मिळेल. तुमच्या मनातील गोष्टी पूर्ण होण्याच मार्गावर राहील. व्यवहारात तुमची मते स्पष्टपणे मांडायला घाबरू नका. लाबंच्या प्रवासाचे योग येतील. परंतु प्रवासामध्ये प्रकृती व चीजवस्तूंची काळजी घ्यावी. मानसिक आणि शारिरिक आरोग्य उत्तम राहील. बेरोजगारांना नोकरीची सुसंधी मिळेल. घरातील वरिष्ठ मंडळी विशेषत: आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. खेळाडूंसाठी उत्तम दिवस आहे. नोकरी मिळेल. नोकरीत मोठ्या पदावर बदलीचे योग आहेत. कामात यश मिळेल.

तूळ: 

आज सौम्य व शांत स्वभावाचा फायदा कोणी घेत नाही ना याकडे लक्ष द्या. घरामध्ये एखाद्याच्या आजारासाठी पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. संततीच्या बाबतीत दोन पिढ्यांमधील संघर्ष अनुभवाल. इथे सुवर्णमध्य काढावा लागेल. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही याची काळजी घ्या. आर्थिक प्रगती करण्याबरोबर आरोग्यही जपा. व्यवसायिकांना अडचणीतून मार्ग काढावा लागेल. मानसिक भिती वाटेल. प्रेमिकांना एकमेकांच्या वागण्यामुळे मानसिक त्रास होईल. कोर्टकचेरीचे प्रसंग सध्या टाळावेत. प्रवासात काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. 

वृश्चिकः 

आज व्यवसायात कोणत्या गोष्टी केल्या असता आपली प्रगती होऊ शकते याचा खोलवर अभ्यास करा. वैवाहिक जीवनात एकमेकांना समजून घ्याल. त्यामुळे थोडी शांतता मिळेल. व्यवहारात नवनवीन गोष्टींचे जरा जास्तच आकर्षण राहील. उद्दिष्ट साकारण्यासाठी अनुकूलता लाभेल. परिस्थितीवर मात करण्यासाठी अनुत्साही न होता जोमाने चिकाटीने प्रयत्न करावे. आर्थिक आवक वाढेल. शेअर्समध्ये अथवा कमी कालावधीची गुंतवणूक करताना विचारपूर्वक करावी, तात्पुरता फायदा लक्षात घेऊ नये. 

धनुः 

आज कामाचा दर्जा सुधारून टाकाल. घरामध्ये मंगलकार्ये ठरतील. त्यासाठी उत्तमोत्तम खरेदी कराल. विवाह इच्छूकांना जोडीदार निवडण्याची संधी मिळेल. कला आणि बुद्धी यांचा संगम होऊन खूप चांगल्या कलाकृती तयार कराल. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. शेअर मार्केटध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कामाचा वेग नक्कीच वाढेल. जुन्या मित्र मैत्रिणी आपणास पुन्हा भेटतील. आपल्याला नवीन वाहन घेण्याचा योग आहे. नवीन वाहन घर खरेदीचे योग आहेत. प्रियजनांच्या भेठीगाठी होतील. आकस्मिक धनलाभाचे योग आहेत.

मकरः 

आज तापट स्वभाव सगळ्यावर भारी पडू शकतो. घरामध्ये जास्तीत जास्त वेळ द्यावा लागेल. व्यवसायात परिस्थितीचा साधक बाधक विचार करून निर्णय घ्यावा. प्रत्येक गोष्टीचा उगाचच विचार कराल. आत्मविश्वास आणि उत्साहाचा भाग कमी राहील. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना काळ अनुकूलच आहे. कर्ज फेडण्यासाठी अनुकूल दिवस आहे. विद्यार्थ्यांनी आळसापासून दूर रहावे. मनासारख्या घटना घडण्यास पूरक दिवस आहे. आपल्या ध्येयप्राप्तीकडे वाटचाल करा. बढती मिळण्याचे योग आहेत. आर्थिक आवक उत्तम आल्याने समाधान व्यक्त कराल. मनाची चंचलता मात्र दुर ठेवा.

कुंभः 

आज दिवस लाभदायक ठरेल. प्रत्येक विरोधावर मात करण्याची ताकद येईल. इतरांना सल्ले देण्यात आणि इतरांच्या वर्तनात कशी सुधारणा हवी हे समजवण्यात पुढे राहाल. आर्थिक स्थिती सुधारली तरी खर्चही तेवढेच वाढतील. अध्यात्मिक उन्नती साधाल. नवीन योजनेत कामाच्या जबाबदाऱ्या वाढतील. व्यवसायात आर्थिक तेजी आणि नेमकेपणा राहील. सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल. देवधर्म पूजापाठ यांसारखे धार्मिक कार्य करण्याची इच्छा निर्माण होईल.

मीनः 

आज तुम्ही अस्वस्थ व्हाल. तुमचे कोणतेही काम तातडीने होणार नाही. व्यवसाय नोकरीत शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरेल. मोठ्यांच्या मनाप्रमाणे वागावे लागेल. निर्णय विचारपूर्वक घेणे जरुरीचे आहे. घरातील वातावरण ताण-तणावात्मक राहील. व्यापारात आर्थिक समस्या येऊ शकतात. वेळेचा अपव्यय टाळा. स्थावर मालमत्ते बाबत अडचण येण्याची शक्यता आहे. व्यापारात सामंजस्य पणाची भुमिका घ्यावी. मनस्ताप होणाऱ्या घटना आपण टाळा. ध्येयापासून तुम्ही विचलित होऊ नका.

जय अर्जुन घोडके

(jaynews21@gmail.com)

(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)