Horoscope Today 16 September 2023 : येणारा दिवस कसा जाणार याचं कुतुहल प्रत्येकाला असतं. तो चांगलाच असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण तसं होतंच असं नाही. त्यामुळंच आपलं भविष्य जाणून घ्यायची उत्सुकता माणसाला असते. मनुष्याच्या जन्म राशीनुसार आणि ग्रहांच्या स्थितीवरून ज्योतिषशास्त्र भविष्याबद्दल काही अंदाज वर्तवत असतं. त्याआधारे अनेक जण आपल्या दिवसाची आखणी करतात किंवा सतर्कता बाळगतात. त्यांच्यासाठी ज्योतिषविद्येचे अभ्यासक जय घोडके (jaynews21@gmail.com) सांगताहेत आजचं राशिभविष्य!
मेषः धाडसी निर्णय घ्याल. कुटुंबासह बाहेर फिरायला जाल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यापारात मोठी वृद्धी होईल. चिंतामुक्त रहाल. शुभरंग: केसरी शुभदिशा: दक्षिण.
वृषभः हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. वरिष्ठांची मर्जी राखाल. रागावर नियंत्रण ठेवा. राजकीय आणि सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. शुभरंग: सफेद शुभदिशा: वायव्य.
मिथुनः घातपाताची भीती आहे, गंभीर दुर्घटना घडू शकते. कष्टदायक स्वरूपाचा दिवस असल्याने घराबाहेर पडणं टाळावं. मानसिक अस्वस्थता जाणवेल. कुटुंबात वाद होण्याची शक्यता आहे. शुभरंग: पोपटी शुभदिशा: हिरवा.
कर्कः कुटुंबातील लोक एकत्र येतील. भविष्यासाठी गुंतवणूक कराल. ऑफिसमध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण होईल. फिरण्यासाठी एखाद्या मोठ्या शहरात जाल. शुभरंगः गुलाबी शुभदिशाः वायव्य.
सिंहः व्यापारातील व्यवहार सावधानतेनं करा. कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. हितशत्रुचा त्रास जाणवेल. निरर्थक गोष्टींत वेळ वाया घालवू नका. आर्थिक खर्चात वाढ होईल. शुभरंगः लाल शुभदिशाः पूर्व.
कन्या: महिलांवर जबाबदाऱ्या पडतील. अहंकारी वृत्तीचा त्याग करा. आरोग्याची काळजी घ्या. गृहस्थी सौख्य लाभेल. प्रेमसंबंधात स्नेह वाढेल. मनाला समाधान लाभेल. शुभरंगः हिरवा शुभदिशाः उत्तर.
तुलाः कायदेशीर प्रकरणं मार्गी लागणार आहे. नवीन लोकांसोबत ओळख होईल. नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्यास शुभ दिवस आहे. शुभरंगः नारंगी शुभदिशाः दक्षिण.
वृश्चिकः धार्मिक कार्यातला सहभाग वाढेल. लोकांची मदत कराल. संपत्तीत झपाट्याने वाढ होईल. मुलांची काळजी घ्यावी. शुभरंग: केसरी शुभदिशा: दक्षिण.
धनुः आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. मानसिक तणाव कमी होईल. कुटुंबात एकी निर्माण होईल. मुलांचा हट्ट पुरवू नका. शुभरंग: पिवळा शुभदिशा: ईशान्य.
मकरः प्रशासकीय कामं मार्गी लागतील. मुलांना शिक्षणात आणि व्यापारात यश मिळेल. विदेश प्रवासाचे योग आहे. आरोग्याची काळजी घ्यावी. शुभरंग: जांभळा शुभदिशा: पश्चिम.
कुंभः मानसिक स्वास्थ बिघडेल. चढ्या व्याजदराने कर्ज घेणं टाळा. प्रवासाचे योग आहेत. शुभरंग: निळा शुभदिशा: नैऋत्य.
मीन : कौटुंबिक कलह वाढणार आहे. आरोग्याची काळजी घ्या. नातेवाईक मदतीला धावून येतील. शुभरंग: पिवळसर शुभदिशा: ईशान्य.