मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 16 January 2024: करिदीन आणि भद्राकाळ शुभ ठरेल की अशुभ , वाचा राशीभविष्य!

Horoscope Today 16 January 2024: करिदीन आणि भद्राकाळ शुभ ठरेल की अशुभ , वाचा राशीभविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 16, 2024 08:49 AM IST

Horoscope Today 16 January 2024: आज १६ जानेवारी २०२४ मंगळवार रोजी, दिवस शुभ असेल की अशुभ, लाभ होईल की नुकसान, किती संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे राशीभविष्य.

Horoscope Today 16 January 2024
Horoscope Today 16 January 2024

आज सोमवार १६ जानेवारी रोजी, आज करिदीन आणि भद्राकाळ आहे. चंद्रमा शनिच्या नक्षत्रातुन गोचर करणार असून, केतुशी प्रतियोग करणार आहेत. परिघ योग आणि कौलव आणि तैतील करणात आजच्या वर्जदिनी कसं असेल आपल्या राशींना ग्रहाचं बल! वाचा राशीभविष्य!

मेष: 

आज तात्त्विक वाद उकरून काढाल. इतरांना होणाऱ्या त्रासाची अजिबात पर्वा करणार नाही परंतु यामुळे जवळच्या लोकांची मने दुखावली जातील. कोणतेही निर्णय घाईने घेऊ नयेत. काही क्षुल्लक गोष्टींबाबत मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. व्यवसायात जादा भांडवलाची गरज भासेल. मुलाखती लांबणीवर पडतील. कुटुंबातील सदस्यांच्या भावनेकडे दुर्लक्ष करू नका. व्यापारात आर्थिक नियोजानावर सावधानीपूर्वक निर्णय घ्या. मुलाची चिंता सतावेल. व्यवहार सावधानीपूर्वक करावेत. 

वृषभ: 

आज उद्योगक्षेत्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चांगली कामे मिळतील. तुमची मते बेधडकपणे मांडाल आणि वाहवा मिळवाल. नवीन योजना राबवाल. कलेच्या क्षेत्रात खूप काम कराल परंतु संधी मिळणार नाही. तुमची बौद्धीक आणि मानसिक उन्नती होईल. नावलौकिक मिळेल. रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार आहात. सहकार्य लाभणार आहे. व्यापारात काहीबाबतीत अडचणी निर्माण होतील. आज व्यवहारात सावध राहा. आर्थिक बळ कमी पडेल. वास्तविकतेला महत्व देणे गरजेचे आहे. कुटुंबातून सहकार्य लाभेल. विद्यार्थ्याची प्रगती होईल. प्रवासातून लाभ होईल. मनावर नियंत्रण ठेवा. शांत आणि विचारपूर्वक निर्णय घ्यावेत.

मिथुन: 

आज शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी मिळतील. जोडीदाराशी संबंध सलोख्याचे राहतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. पूर्वी केलेल्या चांगल्या कामाचे फळ नक्की मिळेल. हाताखालच्या लोकांचे सहकार्य मिळेल. आध्यात्मिक प्रगती चांगली होईल. आपल्या कार्यक्षेत्रात यश मिळेल. महत्वाची कामे हाती असतील तर पूर्ण होतील. रोजगारात सावध राहून काम करा. कामातील उत्साह वाढेल. जबाबदारी वाढेल. व्यापारात आर्थिक फायदा होईल. दुसऱ्याच्या कामात हस्तक्षेप करू नका. स्थावर मालमत्ता संपत्तीचे प्रश्न मार्गी लागतील. सहकार्य लाभेल.

कर्क: 

आज मनात नसताना प्रवासाला जावे लागेत. तब्येत चांगली ठेवा. पायाची दुखणी होऊ शकतात. संततीच्या वागण्या बोलण्याचा त्रास होऊ शकतो. संसारात जोडीदाराचे वर्चस्व सहन करावे लागेल. स्थावर इस्टेटीचे प्रश्न मार्गी लागले तरी त्यात थोडी तडजोडही करावी लागेल. प्रवास आवश्यक असेल तरच करा. नोकरीत कामाच्या ठिकाणी ताण जाणवेल. प्रयत्न यशस्वी होण्यास अडथळे निर्माण होतील. खर्च विचारपूर्वक करावा. सरकारी कामे रखडतील. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर लक्ष द्यावे लागेल.

सिंहः 

आज घरात एखादी चांगली खरेदी कराल. त्यामुळे सर्व खूष रहातील. जोडीदारामुळे तुमचा फायदा होऊ शकतो. नोकरी व्यवसायात अचानक फायदा होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. धार्मिकतेकडे जास्त कल राहील. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभ्यासात मल लागेल. प्रभावशाली व्यक्तींच्या गाठीभेठी होतील. आत्मविश्वासात वाढल्याने कोणतेही काम सहज कराल. कुटूंबातील अडचणीकडे दुर्लक्ष करू नका. सरकारी काम वेळेवर पूर्ण होऊ शकते. मौजमजा करण्याकडे कल राहील. वाद विवाद टाळावेत. प्रवासातून आर्थिक लाभ होतील. 

कन्या: 

आज तुमच्या विचारांमध्ये कायम एक गोंधळ राहील. तरुणांना प्रेमात पडावेसे वाटेल पण ते व्यक्त करण्याचे धाडस गोळा करावे लागेल. थोडी मानसिक अस्थिरता जाणवेल. अवास्तव गोष्टींकडे जास्त आकर्षित व्हाल. खूप सद्भावनेने एखादी गोष्ट करायला जावी आणि पदरी फक्त वाईटपणा यावा असा अनुभव येण्याची शक्यता आहे. व्यापारात व नोकरीत रागावर नियंत्रण ठेवा. संयम बाळगा, अन्यथा हानी संभवते. कुटुंबातील सदस्यांसोबत मतभेद निर्माण होतील. नवीन खरेदीत पैसे खर्च होतील. व्यापारात प्रसिद्धी आणि यश मिळयाची शक्यता आहे. सामाजिक किंवा साहित्यिक समारंभात भाग घ्याल. भांडण आणी वादविवाद टाळावेत.

तूळ: 

आज नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन केली जाईल. त्याचा फायदा कामासाठी होईल. पैसे मिळाले तरी ठरवलेल्या कारणासाठीच पैसा खर्च कराल. घरामध्ये पाहुण्यांची वर्दळ राहील. तरुणांना नवीन मित्रमंडळी भेटतील. कामाच्या ठिकाणी योग्य तेथे कर्तव्य निभावाल. अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाज करा. काळजीपूर्वक निर्णय घ्या. व्यापारात व्यवसाय फायदेशीर राहील. महत्वकांक्षा पूर्ण होतील. यश मिळवल्याने उत्साह वाढेल. प्रतिष्ठित व्यक्तींच्या भेटी घडतील. ज्यांच्या भविष्यात फायदा होणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात प्रगतीकारक दिनमान आहे. मुलांकडून समाधान लाभेल. आज आर्थिक लाभ होतील.

वृश्चिकः 

आज सरकारी कामकाजामुळे अडलेली कामे पूर्ण होतील. नोकरी व्यवसायात धाडस दाखवाल त्यामुळे कामाची गती वाढून फायदा होईल. संगणक क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी चालून येतील. व्यापारात नवीन कार्याची योजना आखाल. नोकरीतील नवीन योजना भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. व्यापार चांगला चालेल. केलेल्या कामाचा आज आपल्याला निश्चितच लाभ होणार असून आर्थिक आवक वाढेल. मान सन्मानाचे योग लाभेल.

धनुः 

आज वडिलोपार्जित धंद्यामध्ये वाढ कराल. किर्ती प्रसिद्धीचे योग येतील. नवीन नोकरी लागू शकते. वैवाहिक जीवनात सामंजस्य राहील. दुसऱ्याच्या मताशी लवकर सहमत होणार नाही. जोडीदाराकडून बऱ्याच अपेक्षा पूर्ण होतील. व्यवसायात बरीच उलाढाल कराल. विद्यार्थ्यांना एखाद्या स्पर्धेत चांगले यश मिळू शकते. घरामध्ये छोट्या समारंभाच्या निमित्ताने प्रियजनांची गाठभेट होईल. रोजगारात स्वतःचे निर्णय महत्वपूर्ण राहतील. सामाजिक कार्यात सक्रीय भूमिका राहील. व्यापार रोजगार चांगला चालेल. मुलांसंबंधातील कामात प्रगती होईल.

मकरः 

आज राजकारणात असलेल्या व्यक्तींना समाजाच्या खालच्या थरापर्यंत पोहचावे लागेल. घरात सर्वांनी शिस्त पाळावी असं वाटेल परंतु त्याची सुरुवात प्रथम तुमच्या पासून करा. नोकरीमध्ये कोणावरही अवलंबून राहू नये. स्वत:ची कामे स्वतः करावीत. प्रेमप्रकरणात घरच्या विरोधाला तोंड द्यावे लागेल. रोजगारात विपरित प्रसंग घडतील. विचार पूर्वक निर्णय घ्या. व्यापारात विनम्रतेने आणि संयमाने कामे करण्याचा प्रयत्न करा. कमाईपेक्षा खर्च जास्त करू नका. गुप्तशत्रुपासुन त्रास संभवतो. आरोग्याची काळजी घ्या. वाहन सांभाळून चालवा. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.

कुंभः 

आज राजकारणी लोक आपला मुत्सद्दीपणा दाखवतील. भक्तिमार्गाकडे वळाल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. नोकरी व्यवसायात तुमच्या नवीन कल्पनांचे स्वागत होईल. एखादे काम धाडसाने कराल. इतरांच्या सहयोगाने कामात यश येईल. आपले विचार योग्य ठेवा. नोकरी रोजगारात प्रसन्न वातावरण असल्यामुळे आपण केलेले प्रयत्न यशस्वी होतील. विचारपूर्वक कामे केली तर आजचा दिवस चांगला जाईल.

मीनः 

आज एखादे काम नवीन पद्धतीने कसे करता येईल हे सांगाल. आर्थिक आवक चांगली राहील. तुमच्या बोलण्याची छाप इतरांवर पडेल. समाजात आपली प्रतिष्ठा वाढल्याने आनंदी राहाल. अधिक प्रयत्न केल्यास जास्तीचे यश मिळू शकेल. संशोधनात्मक कार्य प्रारंभ करण्यास उत्तम दिवस आहे. वरिष्ठांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित कराल. व्यापारिक स्पर्धेत विजयी होण्याचे योग आहेत. कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांकडून आपल्या कामाचे कौतुक होईल. वातावरण उत्साहवर्धक राहील.

 

जय अर्जुन घोडके

(jaynews21@gmail.com)

(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)