Horoscope Today 16 December 2023: बुधादित्य योगाचा राशींना होईल लाभ, वाचा राशीभविष्य
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 16 December 2023: बुधादित्य योगाचा राशींना होईल लाभ, वाचा राशीभविष्य

Horoscope Today 16 December 2023: बुधादित्य योगाचा राशींना होईल लाभ, वाचा राशीभविष्य

Updated Dec 16, 2023 10:01 AM IST

Horoscope Today 16 December 2023: आज चतुर्थीचा चंद्र स्वनक्षत्रातुन अर्थात बलवान श्रवण नक्षत्रातुन संक्रमण करीत आहे. उत्तम चंद्रबल लाभल्याने 'या' राशींचा दिवस आंनदायक राहील! वाचा राशीभविष्य!

Today Horoscope 16 December 2023
Today Horoscope 16 December 2023

आज शनिवार १६ डिसेंबर रोजी, सूर्य मूळ नक्षत्राच्या पहिल्या चरणातून मार्गक्रमण करून धनु राशीत प्रवेश करेल. सूर्य आज धनु राशीत आल्याने सूर्य आणि बुध यांचा संयोग होऊन बुधादित्य योग तयार होईल. तर आज चंद्र श्रवण नक्षत्रातून मार्गक्रमण करून शनीच्या राशीत मकर राशीत प्रवेश करेल. ग्रहनक्षत्राच्या योग संयोगात आजचा दिवस मेष ते मीन राशींसाठी कसा जाईल जाणून घ्या.

मेष

उत्तम दिवस आहे. खरेदी कराल. वारसाहक्कातुन संपत्ती मिळण्याचे योग आहे. कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. कार्यक्षेत्रात आनंदाची बातमी मिळेल. कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहील. व्यापाऱ्यांना आर्थिक नफा होईल. विरोधकावर मात कराल. संततीकडून चांगली बातमी मिळेल. ओळखीच्या लोकांकडून फायदा होईल. वैवाहिक जीवनात पाठिंबा मिळेल. प्रेमात गोडवा वाढेल.

वृषभ

नवीन व्यवसायाचा प्रस्ताव येईल. युवकांसाठी उत्तम दिवस आहे नवीन संधी मिळतील. आर्थिक लाभ होईल. कर्ज मंजूर होईल. नोकरीत कामासंबंधी चर्चा होईल. कामे पूर्ण होतील. व्यापारी यशस्वी होतील. कला क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी मिळेल, जास्त मानधन येईल. मानसन्मान प्राप्त होईल. मुलांना यश मिळेल.

मिथुन

शब्दांचा इतरांवर चांगला प्रभाव पडेल. कुटूंबात आनंदाचे वातावरण राहील. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. व्यापाऱ्यांना नफा मिळेल. नशीबाची साथ लाभेल. कार्यक्षेत्रात कामाची जबाबदारी वाढेल. सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात यश येईल. मालमत्ता खरेदी-विक्रीतून लाभ होईल. आजचा दिवस लाभदायक आहे.

कर्क

प्रतिकूल दिवस आहे. चंचलपणा कमी करा. अपूर्ण व्यवहार होईल. आलेल्या पाहूण्यांना नाराज करू नका. आर्थिक नुकसान होऊ शकते. विरोधक किंवा शत्रू कार्यरत राहतील. कुटूंबात काही अडचण असेल. मानसिक स्वास्थ चांगले राहील. काळजी घ्यावी. व्यर्थ काम टाळा. प्रवास टाळा.

सिंह

आर्थिक नुकसान होईल. खोटे आरोप होतील. वाईट संगतीचा परिणाम होईल. नोकरी आणि व्यापारात आर्थिक व्यवहार टाळा. आरोग्याच्या तक्रारी असतील. महत्वाचे निर्णय आज घेऊ नका. अशुब वार्ता ऐकायला मिळेल. सांभाळून राहा. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. वेळेत काम पूर्ण करा.

कन्या

आर्थिक लाभ होईल. गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस आहे. वाहन खरेदीसाठी दिवस शुभ आहे. कार्यक्षेत्रात चांगले काम कराल. पदोन्नती होईल. विद्यार्थांना यशस्वी दिवस आहे. पत्नीकडून सहकार्य लाभेल. बढतीचे योग आहेत. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना पद प्रतिष्ठा लाभेल. मुलांकडून समाधान सुख लाभेल. कौटुंबिक आनंद लाभेल.

तूळ

वाद होतील. रागावर नियंत्रण ठेवा. व्यापारात परस्पर सहकार्याची भावना ठेवा. मानसिक त्रास वाढेल. स्वभाव चिडचिडा राहील. कौटुंबिक पातळीवरही समस्या उद्‌भवतील. कुटूंबापासुन दूर जाल. रागावर नियंत्रण ठेवा. मोठी गुंतवणूक करू नका. सलोख्याने वागा. कार्यक्षेत्रात कामाचा बोजा वाढेल. आरोग्याची काळजी घ्या.

वृश्चिक

घरात धार्मिक कार्य घडतील. आनंदाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. नवनवीन कल्पनांना वाव द्याल. आर्थिक स्तोत्र वाढेल. मनातील संभ्रम दूर ठेवा. वैवाहीक जीवन सुखी राहील. देश-विदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. उत्तम दिवस आहे. आरोग्य उत्तम राहील. वाहन खरेदीसाठी शुभ दिवस आहे. आरोग्य उत्तम राहील. कुटुंबातील वातावरण आनंददायक राहील.

धनु

शुभ दिवस आहे. लाभ होतील. नोकरीत समाधानकारक वातावरण लाभेल. पदोन्नतीचे योग आहे. वरिष्ठ मंडळी आपल्या कामावर समाधानी असतील. सरकारी योजना यशस्वी ठरतील. कलाकारांना मान-सन्मान मिळेल. व्यापारात आर्थिक लाभ होईल. उधारी वसूल होईल. कर्ज मिळेल. आरोग्य सुदृढ राहील.

मकर

दिवस उत्तम राहील. आत्मविशास वाढेल. मान-सन्मान मिळेल. नवीन कल्पनांना वाव मिळेल. मित्रमैत्रिणी नातेवाईकांकडून मदत मिळेल. कार्यक्षेत्रात झोकून काम कराल. वैवाहीक जीवन उत्तम असेल. आनंददायी वातावरण राहील. सहकार्य लाभेल.

कुंभ

संमिश्र दिवस राहील. भावनेवर नियंत्रण ठेवा. अनैतिकता वाढीस लागेल. नोकरी बदलाची शक्यता आहे. मनावर संयम नसेल. शासकीय कामकाजात अडचणी येतील. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. भांवडासोबत वादविवाद टाळा. निरर्थक कामात वेळ वाया जाईल. नकारात्मक असाल.

मीन

आर्थिक लाभ होईल. मान-सन्मान वाढविणारा दिवस आहे. अहंकारी वृत्तीचा त्याग करा. ध्येय निश्चित करा. वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. आज यश निश्चित लाभेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. सहकार्य लाभेल. व्यापाऱ्यांना आकस्मिक धनलाभ होईल. विदेश भ्रमणाचे योग आहे. प्रवास लाभदायक ठरेल. कौटुंबीक सौख्य लाभेल. दिवस उत्तम आहे.

Whats_app_banner