मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope today 15 September 2023 : आजच्या दिवशी फळफळणार 'या' चार राशींचं भाग्य

Horoscope today 15 September 2023 : आजच्या दिवशी फळफळणार 'या' चार राशींचं भाग्य

Sep 15, 2023 12:03 PM IST

zodiac signs today 15 September 2023 : कोणत्या राशींच्या लोकांसाठी शुभ आहे आजचा दिवस? कोणाला राहावं लागेल सावध? कोणाला मिळेल प्रमोशन? कसं असेल तुमचं मानसिक संतुलन? नेमका कसा जाईल आजचा दिवस? वाचा आजचं राशीभविष्य.

 Today's Horoscope
Today's Horoscope

Horoscope Today 15 September 2023 : येणारा दिवस कसा जाणार याचं कुतूहल प्रत्येकाला असतं. तो चांगलाच असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण तसं होतंच असं नाही. त्यामुळंच आपलं भविष्य जाणून घ्यायची उत्सुकता माणसाला असते. मनुष्याच्या जन्म राशीनुसार आणि ग्रहांच्या स्थितीवरून ज्योतिषशास्त्र भविष्याबद्दल काही अंदाज वर्तवत असतं. त्याआधारे अनेक जण आपल्या दिवसाची आखणी करतात किंवा सतर्कता बाळगतात. त्यांच्यासाठी ज्योतिषविद्येचे अभ्यासक जय घोडके (jaynews21@gmail.com) सांगताहेत आजचं राशिभविष्य!

मेषः आज चांगले दिनमान आहे. आर्थिक लाभ होतील. मात्र, व्यापार किंवा उद्योगात मोठे आर्थिक व्यवहार टाळा. आर्थिक व्यवहार काळजी पूर्वक करा. मोठा धाडसी निर्णय घेण्या आधी १० वेळा विचार करा.

शुभरंग: भगवा शुभदिशा: दक्षिण.

वृषभः आजचे दिनमान लाभदायक राहणार असून कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. जे काही नवे प्रकल्प करायचे आहे, त्याची अमलबजावणी करा. यामुले रखडलेले प्रकल्प पुर्ण होतील. शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी चांगला योग आहे.

शुभरंग: पांढरा शुभदिशा: वायव्य.

मिथुनः आज दिनमान थोडे अशुभ आहे. जी कामे कराल त्यात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गाांनी महत्वपूर्ण निर्णय घेण्याआधी विचार करावा, असे न केल्यासआर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. प्रवास टाळावा.

शुभरंगः हिरवा शुभदिशा: उत्तर.

कर्कः व्यवसाय वाढीसाठी आज चांगला दिवस आहे. मनामध्ये उर्जा व आत्मविश्वास वाढणार आहे. संततीच्या महत्वाच्या प्रश्नामध्ये निर्णायक यश मिळेल. घरातील अडचणी दूर होतील.

शुभरंग: गुलाबी शुभदिशा: वायव्य.

सिंहः आजचे शुभयोग असून हा योग नोकरी बदलासाठी फायदेशिर ठरणार आहे. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

शुभरंग: लाल शुभदिशा: पूर्व.

कन्याः व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस कठीण आहे. काही व्यवहार केल्यास त्यात नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यवहार काळजीने करा. हितशत्रुपासुन त्रास होऊ शकतो.

शुभरंग: पोपटी शुभदिशा: उत्तर.

तुलाः आजचा दिवस चांगला आहे. आज व्यापार किंवा व्यवसायात फायदा होणार आहे. स्वकमाईचा उपभोग घ्याल. कौटुंबिक जीवनात सुख व शांती लाभेल.

शुभरंग: नारंगी शुभदिशा: वायव्य.

वृश्चिकः आज अनेपेक्षित लाभ होतील. जुनी रखडलेली प्रकरणे मार्गी लागतील. व्यवसाय व्यापारातील जागेचा प्रश्न मिटेल. आर्थिक पत वाढेल. मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याकडून मदत मिळेल. आईच्या प्रकृतीची काळजी घ्या.

शुभरंग: तांबूस शुभदिशा: दक्षिण.

धनुः आज कौटुंबिक पातळीवर चांगला योग आहे. घरच्यांशी चांगले संबंध राहील. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी चांगले संबंध राहतील. आज धनलाभाचा योग आहे.

शुभरंग: पिवळसर शुभदिशाः ईशान्य.

मकरः आजचा दिवस प्रसंनपूर्वक जाणार आहे. नवीन लोक भेटतील. तसेच त्यांच्या सहवासामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील ताण तणाव दूर होतील. प्रगतीसाठी आजचा योग चांगला आहे.

शुभरंग: निळा शुभदिशा: नैऋत्य.

कुंभः आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे. नवा उद्योग सुरू करण्यास अनुकूल वातावरण आहे. भावडांशी संबंध सुधारतील.

शुभरंग: जांभळा शुभदिशा: पश्चिम.

मीनः आजचा दिवस समधनाचा आहे. आध्यात्मिक कार्यामुळे दैवी लाभ होतील. नोकरी व्यवसायात याचा फायदा होईल. प्रशासकीय कामकाजात चांगला दिवस आहे. उपासना व आध्यात्माची आवड निर्माण होईल.

शुभरंग: पिवळा शुभदिशा: ईशान्य.

WhatsApp channel