आज चंद्र शुक्राच्या राशीतुन आणि सुर्याच्या नक्षत्रातुन भ्रमण करतोय. मंगळ कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. नवमपंचम योग कोणत्या राशीसाठी ठरणार लाभदायक! मेष ते मीन सर्व राशीच्या लोकांना कसा जाईल आजचा दिवस, वाचा राशीभविष्य!
आज ठोस निर्णय घेऊ शकाल. ठरविलेले उद्दिष्ट साध्य करण्याकरता मेहनत कराल. घरात परस्पर विचार जुळणार नाही. आर्थिक वृद्धीची बातमी ऐकायला मिळेल. गुंतवणुकीसाठी दिवस उत्तम राहील. वाहन खरेदीचा विचार करत असाल तर दिवस आनंददायी आहे. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. तुमची पदोन्नती व प्रगती होईल. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळेल.
आज नोकरीत हक्क आणि अधिकारासाठी लढा द्यावासा वाटेल. धैर्याच्या प्रति सजग राहण्याची आवश्यकता आहे. सवलतींचा उपयोग योग्य कारणा करताच करावा. अनिष्ट चंद्रभ्रमणात मनातील संशयी वृती वाढेल. भावनेवर नियंत्रण ठेवा. अनैतिकता वाढेल. नोकरी बदलाची शक्यता आहे. मनावरचा संयम कमी होऊ शकतो. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. वादविवाद टाळा.
आज आर्थिक लाभ होईल. मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. धन संचय करा. वडिलोपार्जित स्थावर मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. मानी आणि अहंकारी वृत्तीचा मात्र त्याग करा. ध्येय निश्चित करा. वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. आज यश निश्चित लाभेल. सहकार्य लाभेल. आकस्मिक धनलाभ होईल. पदप्राप्ती मिळेल व मानसन्मान वाढेल.
आज कौटुंबिक जीवनात समृद्धी येईल. उत्तम कार्यासाठी कार्यक्षेत्रात ओळखतील मोठे अधिकारी तुम्हाला भेटू शकतात आणि प्रोत्साहन देऊ शकतात. आकस्मिक लाभ होतील. नोकरीत समाधानकारक वातावरण लाभेल. प्रमोशन बढती पदोन्नतीचे योग आहे. मान सन्मान वाढेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. जुनी येणी येतील. कर्जप्रकरण मंजूर होतील.
आज दिवस उत्तम राहील. आर्थिक लाभ होतील. बढतीचे योग आहेत. विलासी वस्तूंची खरेदी कराल. आत्मविशास वाढेल. मानसन्मान प्रतिष्ठा मिळेल. नवीन योजना आखल्या जातील. तुमच्या कल्पनांना जोडीदारांकडून साथ लाभेल. मित्रमैत्रिणी नातेवाईकांकडून मदत मिळेल. आत्मसंतुष्टी मिळेल. पत्नीसौख्य आणी संततीसौख्यही उत्तम असेल. आनंददायी वातावरण राहील.
आज आपला राशीस्वामी मंगळ उत्तम स्थितीत आहे. झेपणारे काम स्वीकाराल. आर्थिक स्थिती उत्तम होईल. सोबतच आर्थिक निर्णय घेण्यासाठी सक्षम असाल. व्यक्तीमत्वाचा प्रभाव इतरांवर पडेल. कुटुंबामधून सुवार्ता मिळणार आहे. व्यवसायात अनपेक्षीत फायदा होईल. भाग्यकारक घटना घडतील. प्रेमप्रकरणात यश लाभेल. जमीन खरेदी विक्रीतून अधिक लाभ होईल.
आज आरोग्याची काळजी घ्या. योग व व्यायामात सातत्य ठेवा. खर्चाला आवर घाला. वैचारिक मतभेदामुळे नाती दूरावू शकतात. चंचलपणावर आवर घाला. आर्थिक येणी येण्यास त्रास जाणवेल. व्यवहार अर्धवट होतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहील. विरोधक डोके वर काढतील. शत्रुपक्षाच्या कारवाया वाढू शकतील. मानसिक आरोग्य सांभाळा.
आज संधींना आपल्या हातातून जाऊ देऊ नका. नोकरीत नेहमीपेक्षा जादा काम करावे लागेल. सुखसोयीच्या साधनाची खरेदी कराल. कलागुणांना प्रोत्साहन मिळणार आहे. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढेल. नोकरवर्गाकरिता आनंदाची बातमी मिळेल. कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आंनदायक राहील. धनवृद्धी होईल. विरोधकावर मात कराल.
आज व्यापारात जादा कमाईच्या मोहाने न पेलवणारे काम स्वीकाराल. योग्य व्यक्तीची योग्य कामासाठी निवड करा. ठोस निर्णय घ्याल. मानसिक तनाव दूर होईल. जुने कर्ज परत मिळेल. विवाह जुळतील. भावंडाची योग्य साथ मिळेल. नविन संधी आपल्याला मिळणार आहे. सौभाग्य योगात वृद्धी होईल. आर्थिक बाबती मधील प्रकरणे सुरुळीत पार पडतील. कर्ज मंजूर होईल. मानधनात वाढ होईल.
आज अनपेक्षित फळे मिळण्याची शक्यता आहे. अडचणी येऊ शकतात. कामांना गती येईल. घरातील व्यक्तींना दिलेले आश्वासन पाळावे. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. आर्थिक नुकसानीची दाट शक्यता आहे. मानहानी खोटे आरोप याला सामोरे जावे लागेल. नोकरी व्यापारात आर्थिक व्यवहार टाळावेत. अशुभ अप्रिय घटना ऐकायला मिळतील. सावधानीपूर्वक वाटचाल करावी.
आज कलह उत्पन्न होणारा योग आहे. देवाण घेवाणीपूर्वी कागदपत्रे वाचा. वाद घालू नका. कुटुंबाचे समर्थन प्राप्त होणार नाही. रागावर नियंत्रण ठेवा. मानसिक क्लेश वाढेल. स्वभावात मत्सर चिडचिड पणा राहील. कौटुंबिक पातळीवरही समस्या उद्भवतील. कुटुंबापासुन दुर जाल. अनावश्यक राग आणी तापटपणा टाळावा. मोठी गुंतवणूक आज करू नये. प्रकृती वर लक्ष द्या.
आज घरात मंगलकार्य व धार्मिक कार्य घडतील. नोकरीत नेहमीच्या पद्धतीने काम न झाल्याने कामाची पद्धत बदलावी लागेल. तुमचे विचार घरातील व्यक्तींच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न कराल. विद्यार्थ्यांनी मनात शंका ठेवू नये. मन प्रसन्न राहील. नवनवीन कल्पना सुचतील. आर्थिक स्त्रोत वाढेल. आरोग्य उत्तम राहील. मनातील संभ्रम दुर ठेवा. दाम्पत्य जीवन सुखी राहील.