मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Horoscope Today 15 January 2024: तुमच्यासाठी सण-उत्सवाचा दिवस कसा राहील, वाचा राशीभविष्य!

Horoscope Today 15 January 2024: तुमच्यासाठी सण-उत्सवाचा दिवस कसा राहील, वाचा राशीभविष्य!

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 15, 2024 09:31 AM IST

Horoscope Today 15 January 2024: आज १५ जानेवारी २०२४ सोमवार रोजी, दिवस शुभ असेल की अशुभ, लाभ होईल की नुकसान, किती संधी मिळतील, जाणून घ्या आजचे मेष ते मीन सर्व १२ राशींचे राशीभविष्य.

Horoscope Today 15 January 2024
Horoscope Today 15 January 2024

आज सोमवार १५ जानेवारी रोजी, रवि मकर राशीत प्रवेश करतोय. पुण्यकाल सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत राहणार आहे. चंद्र गुरूच्या राशीतुन आणी स्वनक्षत्रातुन भ्रमण करीत राहु-नेपच्युन बरोबर योग साधणार आहे. पंचाग शुद्धी असणारा आजचा मकर संक्रांतीचा दिवस कसा असेल! वाचा राशीभविष्य!

मेषः 

आज संयमीत व धोरणी रहाल. खूप स्वप्ने रंगवली असतील, तर त्याची पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू होईल. काळजी घेण्याची सवय अंगी बाळगा. यश मिळवाल. बौद्धीक क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. स्वभावात थोडा निष्काळजीपणा राहील. प्रतिकुल परिणाम येण्याची शक्यता आहे. व्यापार उद्योग क्षेत्रात मोठे निर्णय घेऊ नयेत. भागीदारासोबत वाद विवाद टाळा. व्यावसायिक योजना गुप्त ठेवा. देण्याघेण्याच्या व्यवहारात सावधपणा ठेवा. आर्थिक व्यवहार फार काळजीपूर्वक करा. फार ताण घेऊ नका. मोठी आर्थिक गुंतवणूक आज टाळा.

वृषभः 

आज नोकरी व्यवसायात मनासारखे कार्यामुळे तब्येत खूष राहील. सगळीकडे धडाडी दाखवाल आणि लोकांना मनाप्रमाणे वागवून घ्याल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. ज्यांचे परदेशात व्यवहार आहेत त्यांना तेथून चांगले संकेत मिळाल्यामुळे छोटी ट्रीप करावीशी वाटेल. प्रकृतीचा कोणताही त्रास अंगावर काढू नये. नोकरी व्यवसायात घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांपासून लाभ होईल. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग आहे. पदप्राप्ती, मानसन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. प्रोफेसर यांच्यासाठी शुभदिवस आहे. व्यापारात काही नवीन योजना पूर्णत्वास जातील. मित्रमंडळींचे सहकार्य लाभेल.

मिथुन: 

आज राजकारणी लोकांना आपल्या कामामध्ये अडथळे आले तरी चिकाटी ठेवून पुढे नेण्याची जबाबदारी ठेवावी लागेल. प्रेमीजनांना प्रेमप्रकरणात अडथळे संभवतात. कामाची गती मंदावेल. धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टीत जास्त आवड निर्माण होईल. व्यापारात वाढ करणारा दिवस राहील. मेहनतीनुसार चांगला लाभ होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल करावी. कौटुंबिक जिवन अनुकुल राहणार आहे. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. नातेवाईक आप्तेष्ट यांची साथ मिळेल. आर्थिक उलाढालीतून फायदा होईल. वादविवाद टाळावे. आर्थिक बाबतीत लाभाच्या दृष्टीकोनातून उत्तम दिवस राहील.

कर्क: 

आज एक प्रकारची प्रेरणा आतून निर्माण होईल. प्रत्येक कामाचे खोलवर चिंतन कराल. प्रसिद्धी मिळवाल. तुमची अध्यात्मिक साधना फळाला येईल. सामाजिक कार्यात रस घ्याल. गैरसमज, वितंडवादाची गाठोडी मागे टाकून पुढे जाल तर सुखी व्हाल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. नवीन उमेदीने कामाला लागा. सकारात्मक परिणाम दिसतील. आपल्या इच्छेप्रमाणे कार्य घडतील. मित्रमैत्रिणींमधील वादविवाद संपुष्टात येतील. आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेच आहे. आत्मविश्वासाचा अतिरेक करणे टाळा. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. आर्थिक लाभाची सुखद संधी मिळेल. 

सिंहः 

आज हाती घेतलेल्या कामात यशस्वी व्हाल. कोणत्याही गोष्टीसाठी पराक्रमाची शर्थ कराल. अडचणी येतील. परंतु एकंदरीत यशाकडेच वाटचाल रहाणार आहे. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. वारसाहक्कातुन धनलाभ संभवतो. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. व्यापारात उधारी वसूल होतील. नातेवाईक आप्तेष्टांकडून सहकार्य लाभेल. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तिंच्या भेटी घडतील. कार्य पद्धतीवर लक्ष केंद्रित केल्यास अनपेक्षीत लाभ होतील. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. मुलांच्या प्रगतीमुळे प्रसन्न वातावरण राहणार आहे. परदेश प्रवास होण्याची शक्यता आहे.

कन्याः 

आज नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी आनंदी आणि उत्साही वातावरण लाभेल. तुमच्या आनंदात वरिष्ठही सहभागी झाल्यामुळे तुमचा आनंद अधिकच दुणावेल. नवीन संधीचे दान तुमच्या पदरात टाकण्यासाठी येत आहे. घरात नवीन वस्तूंची खरेदी कराल. काम पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला चैन पडणार नाही. उत्तम महत्त्वाकांक्षा ठेवून कामे पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन करणार आहात. आपणास उद्योग धंद्यात विशेष लाभ मिळेल. व्यापारात चांगले बदल मोठे फायदेशीर ठरतील. वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. पत्नीसोबत गोडी व दुरावा असे दोही फळे अनुभवास येतील. परदेश भ्रमणाचा योग आहे.

तूळ: 

आज धार्मिक गोष्टी करण्यासाठी बराच पैसा खर्च कराल. आर्थिक स्थिती सुधारेल. उत्तम सहकार्य मिळेल. मोठ्या भावंडांची मदत मिळेल. तुमच्या कामाचे लाभ तुम्हाला चांगले होतील. खेळाडूंना लाभदायक दिवस आहे. खाद्य पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल. बौद्धीक क्षेत्रात मानसन्मानाचे योग येतील. आपल्या प्रयत्नांना यश लाभेल. विद्यार्थ्यांची शिक्षणामध्ये अपेक्षेप्रमाणे प्रगती होईल. रखडलेल्या कामास गती मिळेल. कौटुंबिक पातळीवर वातावरण चांगले राहील. 

वृश्चिकः 

आजच्या तडजोड करावी लागेल. आळसामुळे कामे उरकण्यात थोडी दिरंगाई होईल. भावंडांशी मतभेद संभवतात. शेजाऱ्यांच्या गुप्त कारवायांमुळे त्रासून जाल. तणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. शिक्षणात थोडे अडथळे संभवतात. व्यापारात फायदा नुकसानीच्या घटना घडतील. विद्याभ्यासात प्रगती होईल. वाचनाची गोडी वाढेल. कंटूंबातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. मन समाधानी राहील. नोकरीत अतिरिक्त कामाचा ताण जाणवेल. मानसिक त्रास जाणवेल. स्वभावातील चंचलतेवर नियंत्रण ठेवा.

धनुः 

आज कार्यक्षेत्रात उत्तम ठसा निर्माण करण्यास तुम्ही वरचढ ठरणार आहात. चैनीच्या वस्तूंची खरेदी करण्याचा मूड राहील. मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. तुमच्या बुद्धीला विशिष्ट झेप देणारे ग्रहमान असल्यामुळे त्याचा फायदा तुम्ही जरूर करून घेणार आहात. व्यवहारात स्त्रियांच्या मध्यस्थीमुळे मनासारखी कामे होतील. मनाजोग्या अनुकुल घटना घडतील. वाहन खरेदीचे योग आहेत. आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. वैवाहिक सुखात वाढ होईल.

मकरः 

आज करिअरमध्ये मानसिक अस्वस्थता जाणवेल. वडीलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. खेळाडूंना लाभदायक दिवस आहे. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कलाकारांना कला क्षेत्रात वाव मिळेल पण आर्थिक लाभ होणार नाही. योग्य वेळी पैशाची व्यवस्था न झाल्यामुळे थोडी चिडचिड होईल. वादविवादामुळे मानसिक त्रास वाढेल. मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न ठेवा. पारिवारिक सहकार्य लाभणार नाही. नातेसंबंधाविषयी मनात कटुता तिरस्कार निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यापार रोजगातात काही अडचणीचा सामना करावा लागू शकतो. दुरवरचे प्रवास शक्यतो टाळा. अर्थप्राप्तीत अडथळे निर्माण होतील.

कुंभ: 

आज व्यवसायात कोणत्याही मोहात न अडकता कामे करण्याला प्राधान्य द्या. प्रयत्नाला महत्त्व द्यावे लागेल. मुलांच्या आवाक्याबाहेरच्या मागण्यांमुळे वैतागुन जाल. हृदयविकाराचा त्रास असणाऱ्यांनी पथ्यपाणी सांभाळा. प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार करणे आवश्यक ठरेल. घराकडे जातीने लक्ष द्याल. स्वभावात राग उत्पन्न होण्याची शक्यता आहे. मनमुटाव होण्याची शक्यता आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा. आरोग्याबाबतीत खर्चात वाढ होईल. प्रकृती अस्थिर राहील.

मीन: 

आज केलेल्या कष्टाचे चीज होईल. स्थावर इस्टेटीचे प्रश्न मात्र रेंगाळण्याची शक्यता आहे. निद्रानाशाची समस्या होऊ शकते. वाचनाची आवड जोपासाल आणि ज्ञानाचा आनंद घ्याल. गोड बोलून कामे करून घ्याल. आर्थिक स्थिती सुधारेल. एखादी फायदेशीर गुंतवणूक कराल. कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य घ्या. व्यापारात अती उत्साहीपणाने निर्णय घेऊ नका. धनलाभाचा योग आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील.